मुख्य घटक
चीज/पनीर, मका, फळे - २ चीज क्युब्ज, १०० ग्रॅम पनीर अर्धी, १ वाटी उकडलेले स्वीटकॉर्न, १/२ वाटी डाळिंबाचे दाणे
उपघटक -
गोळ्यांसाठी - स्वीटकॉर्न, चीज, २ उकडून कुस्करलेले बटाटे, १ मोठा चमचा रवा, गरजेनुसार बेसन, हिरवी मिरची, मीठ चवीनुसार
गोळ्यांमध्ये भरण्यासाठी - डाळिंबाचे दाणे, कुस्करलेले पनीर, मीठ, कोथिंबीर व तळण्यासाठी तेल
रश्श्यासाठी -
१ बॉउल पालक प्युरी, १/२ वाटी पिस्ते, २ कांदे व ३ हिरवे टोमॅटो उकडून, १ चमचा आललसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या, मीठ, १ गरम मसाला व तेल
गोळे - वाटलेले स्वीटकॉर्न व इतर साहित्य एकत्र करुन घ्यावे. लिंबाएवढा गोळा घेऊन त्यात एक चमचा सारण भरुन गोळे करुन तळून घ्यावे.
रश्श्यासाठी - पिस्ते, कांदा,हिरवे टोमॅटो एकत्र वाटून घ्यावे. एका कढईत दोन चमचे तेल टाकून आलंलसूण पेस्ट परतून घ्यावी त्यात पालक प्युरी व पिस्ते - कांदा - टोमॅटोच वाटण टाकून परतून घ्यावं. गरम मसाला व गरजेनुसार पाणी टाकून छान उकळून घ्यावे. आयत्यावेळी वाटीत गोळे घेऊन त्यावर रस्सा टाकावा.
पनीर, मक्याचे दाणे डाळींब सजावटीकरिता वगळावे. गोळे जरा ब्राउन झाले चीजमुळे असं वाटतं. उलट केलं असतं गोळ्यात पनीर व सारणात चीज तर गोळ्यांचा रंग चांगला येईल असे वाटते प्रयोग करुन सांगा.
मस्तं. छान दिसतोय शेवटचा
मस्तं.
छान दिसतोय शेवटचा फोटो.
छान आहे प्रकार. पनीरही
छान आहे प्रकार. पनीरही तळल्यावर ब्राऊनच झाले असते पण ते घट्ट राहिले असते.
मला फोटोच दिसत नाहीयेत घरी
मला फोटोच दिसत नाहीयेत

घरी जाऊन पहाते
सही!! हे छान लागेल. पालक पनीर
सही!! हे छान लागेल. पालक पनीर चे फार सुंदर व्हेरीयेशन!!
फोटो मस्तच..
फोटो मस्तच..
मला फोटोच दिसत नाहीयेत +१
मला फोटोच दिसत नाहीयेत +१
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383