हिरव्या रश्श्यातील मकागोळे/कॉर्न बॉल्स इन ग्रीन ग्रेवी - तिखट - मंजू

Submitted by मंजूताई on 18 September, 2013 - 06:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुख्य घटक
चीज/पनीर, मका, फळे - २ चीज क्युब्ज, १०० ग्रॅम पनीर अर्धी, १ वाटी उकडलेले स्वीटकॉर्न, १/२ वाटी डाळिंबाचे दाणे
उपघटक -
गोळ्यांसाठी - स्वीटकॉर्न, चीज, २ उकडून कुस्करलेले बटाटे, १ मोठा चमचा रवा, गरजेनुसार बेसन, हिरवी मिरची, मीठ चवीनुसार
गोळ्यांमध्ये भरण्यासाठी - डाळिंबाचे दाणे, कुस्करलेले पनीर, मीठ, कोथिंबीर व तळण्यासाठी तेल

रश्श्यासाठी -
१ बॉउल पालक प्युरी, १/२ वाटी पिस्ते, २ कांदे व ३ हिरवे टोमॅटो उकडून, १ चमचा आललसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या, मीठ, १ गरम मसाला व तेल

क्रमवार पाककृती: 

गोळे - वाटलेले स्वीटकॉर्न व इतर साहित्य एकत्र करुन घ्यावे. लिंबाएवढा गोळा घेऊन त्यात एक चमचा सारण भरुन गोळे करुन तळून घ्यावे.
रश्श्यासाठी - पिस्ते, कांदा,हिरवे टोमॅटो एकत्र वाटून घ्यावे. एका कढईत दोन चमचे तेल टाकून आलंलसूण पेस्ट परतून घ्यावी त्यात पालक प्युरी व पिस्ते - कांदा - टोमॅटोच वाटण टाकून परतून घ्यावं. गरम मसाला व गरजेनुसार पाणी Happy टाकून छान उकळून घ्यावे. आयत्यावेळी वाटीत गोळे घेऊन त्यावर रस्सा टाकावा.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

पनीर, मक्याचे दाणे डाळींब सजावटीकरिता वगळावे. गोळे जरा ब्राउन झाले चीजमुळे असं वाटतं. उलट केलं असतं गोळ्यात पनीर व सारणात चीज तर गोळ्यांचा रंग चांगला येईल असे वाटते प्रयोग करुन सांगा.

माहितीचा स्रोत: 
मायबोली पाकृ, इतर पाकृ मालिका त्यातून सुचलेली स्वपाकृ
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383