Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
सहा सासवांच्या कांडपात ती
सहा सासवांच्या कांडपात ती गेली < सहा कासवांच्या वाचलं चुकून...
कधीकधी फार डोक्यात जातात या ६
कधीकधी फार डोक्यात जातात या ६ जणी. काय कामधाम नसल्यासारख्या त्या पायरीवर बसून असतात आणि श्री आला की कालवा करतात.
इथे कुणाला जान्हवीचे हसणे
इथे कुणाला जान्हवीचे हसणे ओव्हर नाही का वाटत? किमान निम्म्या तरी वेळेस अत्यंत खोटे हसते ती. >>>>>>>>>>> + १०
हो मलाही ती अवघ डुन हसते अस
हो मलाही ती अवघ डुन हसते अस वाटत
ही मालिका छानच
ही मालिका छानच चालल्ये.
अशोकजी तुम्ही रोज अपडेट देता ते वाचायला छान वाटतं आणि कधी बघता आली नाही तरी अपडेट्स मिळतात.
उंच माझा झोका नंतर हीच मालिका पहाण्यासारखी आहे.
येथील निष्पाप व निरागस
येथील निष्पाप व निरागस प्रेक्षकहो, श्री-जानू लग्नानंतर येथील प्रवासही बे एके बे, बे दुणे चार प्रमाणे तुतिथेमी, तुनिमाज्मेना, राधाबावळी प्रमाणेच असणार आहे हे ध्यानात असूद्या...
ए ल दु गो प्रेमींनो एका
ए ल दु गो प्रेमींनो एका लग्नाची तिसरी गोष्ट पण लवकरच सुरु होतेय
सुमेधाव्ही......सहमत......माल
सुमेधाव्ही......सहमत......मालिका चांगली आहे म्हणेपर्यंत ती खेचून तसंच ओव्हर किंवा ओढूनताणून अॅक्टिंग करणारी पात्रं घालून तिची वाट लावली जाते.
ए.ल.दु.गो. चं हेच झालं.....पहिल्यांदा बरी होती, बरी का चांगली होती पण नंतर आजीसुद्धा ओव्हरॅक्ट करायच्या.......विशेषतः घना आणि राधाच्या गळी साग्रसंगीत साखरपुडा का लग्नसमारंभ उतरवताना.....खिडकीत कावळ्याच्या रूपात आजोबा येणे वगैरे.....ज्यांच्या इच्छा किंवा म्हणणं ऐकावंच लागतं असे सीनियर सिटिझन सगळ्यांच्या घरात असतात, पण हे़ जरा अति होतं.... असो.
अपडेट....कालचे : तसा सारा
अपडेट....कालचे :
तसा सारा अळणीच एपिसोड होता.....अजून तो श्री बिच्चारा त्या जान्हवीला काही घरी आणत नाही व तिचे धक्कातंत्राने डोके फिरवित असल्याचे दाखविले. तशातच "आपण उद्या एका मंदिरात भेटायचे आहे..." असेही गाजर दाखविल्याने ही बया मग गारच.
श्री च्या घरात सहाही आयांची निव्वळ लग्नाचा मुहूर्त कसा आणि कधीचा काढायचा यावर हमरीतुमरी. इथे मात्र आजीबाई देवघरात जातात आणि श्री चा संसार "सायली" समवेत सुखाचा होवो अशी प्रार्थना करतात. म्हणजे सायली हे नाव घरात प्रथमच उच्चारले गेले.....अर्थात प्रार्थना मूकपणे चालली असल्याने श्री ला आजी नेमके काय म्हणत आहे हे गुलदस्त्यातच.
सहस्त्रबुद्धे यांच्या घरात आई "कोट्याधीश जावई" मिळणार असल्याने त्याच्यासाठी "आज डब्यातून नारळीभात घेऊन जा" असे जान्हवीला फर्मावते.
काहीही.
[आज गोखलेंच्या बंगल्यावर सायली येऊन जान्हवी रहस्य-भांडे फोडणार आहेत....अशी सूचक पट्टी घुमत आहे.]
काल श्री चा t shirt पाहिला
काल श्री चा t shirt पाहिला का?
Since 1991,Milan Nyc अस काहीतरी लिहिलं होत.
बहुतेक मिलन लॅबोरेटरीज वाले जाहिरात करतायत.......अस आपल मला वाटलं....
Since 1991,Milan Nyc अस
Since 1991,Milan Nyc अस काहीतरी लिहिलं होत.
बहुतेक मिलन लॅबोरेटरीज वाले जाहिरात करतायत.......अस आपल मला वाटलं....<<<<
अहो मिलान आणि न्यूयॉर्क दोन्ही फॅशन जगतातल्या मक्का-मदिना वगैरे आहेत. नॉन ब्रॅण्डेड/ नॉकआउट टिशर्टसवर असेच शब्द टाकलेले असतात पब्लिकला ब्रॅण्डेड वाटावे म्हणून....
(No subject)
कुठेतरी वाचल्याच आठवतय की
कुठेतरी वाचल्याच आठवतय की मिलान लॅबरोटरीज मधे तेजश्रीचा होणारा नवरा (राहुल डोंगरे) जी एम आहे. कदाचित म्हणुनच प्रमोशन असेल ब्रँडच.
चला म्हणजे आता ट्रिपल धक्का
चला म्हणजे आता ट्रिपल धक्का बसणार तर
श्री जान्हवीच्या मागे आहे हे सायलीकडून कळून आजीला पहिला धक्का
मंदिर म्हणजे श्री आपल्याला त्याच्या घरी नेतो आहे आणि तिथे बहुतेक आयांकडून होणारा अपमान म्हणजे जान्हवीसाठी धक्का
आणि आपल्या आया सायलीबरोबर आपले लग्न ठरवत आहेत आणि जान्हवी त्यांना डोळ्यासमोर नको आहे हे कळल्यावर श्रीला बसणारा धक्का
साधं पाच मिनिटं आधी एकमेकांशी कोणी स्पष्ट बोललं असतं तर हे सगळे गैरसमज, गुंते टाळता आले असते..असो
पण आजच्या भागाचा अपडेट टाका प्लीज धन्यवाद!
लग्न झाले की ही सिरीयल बघणं
लग्न झाले की ही सिरीयल बघणं आवरतं घ्यावं म्हणजे झालं
मलासुद्धा ही मालिका प्रचंड
मलासुद्धा ही मालिका प्रचंड आवडते.
मालिके एवढेच सुंदर अशोकमामा तुमचे अपडेट्स असतात.
श्रीची काकू 'आम्ही त्या
श्रीची काकू 'आम्ही त्या मुलीला बघितलं आहे' असं सांगते तरीसुद्धा श्री ला काहीच आश्चर्य वाटत नाही, तसंच त्या बांगड्या सायलीकडे कशा गेल्या, कोणी दिल्या हेसुध्दा जाणून घेण्याची गरज भासत नाही म्हणजे कमाल आहे!
ए.ल.दु.गो. चं हेच
ए.ल.दु.गो. चं हेच झालं.....पहिल्यांदा बरी होती, बरी का चांगली होती पण नंतर आजीसुद्धा ओव्हरॅक्ट करायच्या.......विशेषतः घना आणि राधाच्या गळी साग्रसंगीत साखरपुडा का लग्नसमारंभ उतरवताना.....खिडकीत कावळ्याच्या रूपात आजोबा येणे वगैरे.....ज्यांच्या इच्छा किंवा म्हणणं ऐकावंच लागतं असे सीनियर सिटिझन सगळ्यांच्या घरात असतात, पण हे़ जरा अति होतं.... >>>>
ए.ल.दु.गो. मस्त होती...सुरवातीपासून शेवट पर्यंत!! मला आवडायची.....खरतर अजूनही आवडते!! मी त्या मालिकेचे १५० च्या आसपास एपिसोड्स डाऊनलोड केलेले आहेत, अजूनही पाहते मी ते!!!
साधं पाच मिनिटं आधी एकमेकांशी
साधं पाच मिनिटं आधी एकमेकांशी कोणी स्पष्ट बोललं असतं तर हे सगळे गैरसमज, गुंते टाळता आले असते..असो>>>>तेवढे तरी कशाला?.....फक्त आपण ज्या व्यक्ती बद्द्ल बोलतोय त्या व्यक्तीचे नाव घेतले अस्ते तरी गुंते टाळता आले असते.
श्री जानूला बोलतो कि
श्री जानूला बोलतो कि सायलीच्या नावा व्यतिरिक्त मला काहिच माहित नाही......मग ती सार्खी आपल्या कार्यालयात का येते? आजीने तिला का पाठवले? तिने जानूला त्यांच्या लग्नाची बोलणी चालू आहेत असे का सांगितले? ...हे प्रश्न त्याला का पडले नाहीत?
खरंतर सायलीही काही वाईट
खरंतर सायलीही काही वाईट स्वभावाची मुलगी नाहीये. तिच्याजागी दुसरी कुठलीही मुलगी असती तर ज्याच्याशी आपलं लग्न ठरत आलं आहे, जो आपल्याला आवडतो, ज्याच्या आयांना आपण पसंत आहोत, ज्यांनी आपल्यासाठीच असं सांगून बांगड्या दिल्या आहेत, तो मुलगा रस्त्यात, ऑफिसमधे दुसर्या मुलीशी प्रेमगोष्टी करताना दिसला आणि काहीही स्पष्टीकरण न देता तिला बांगड्या काढायला लावल्या आणि ऑफिसबाहेर जायला सांगितले तर तिला राग येणं आणि आयांकडे तक्रार करणं स्वाभाविकच आहे.
सायलीला आधिच वाईट दाखविले
सायलीला आधिच वाईट दाखविले आहे......तिचे वडिल तिला सांगतात...हे स्थळ हातचे गेले तर आपले खूप मोठे नुकसान होईल..तसेच त्या सहा सासू तिला अजिबात आवडत नसतात...ती म्हणते कि लग्न झाल्यावर त्यांना गुंडाळणार.
ओके. सुरवातीपासून मालिका न
ओके. सुरवातीपासून मालिका न बघितल्याने हे माहिती नव्हतं. धन्यवाद!
काल काय झाले?
काल काय झाले?
माझे सासु सासरे पण गालातल्या
माझे सासु सासरे पण गालातल्या गालात हसत असतात या दोघांचे सीन्स बघताना...
कालचा तो मास्कवाला प्रकार
कालचा तो मास्कवाला प्रकार आवडला. म्हणजे त्यामागची भावना आवडली की आपल्या माणसाला असेच समजून घ्यायचे. तिची फजीती झाली असेल तर ती झाकून घ्यायचा असाच प्रयत्न करायचा.
काल [मला वाटते] झी मंडळींनी
काल [मला वाटते] झी मंडळींनी अनंतचतुर्दशी असल्याने मराठी प्रेक्षक घरी नसून मालिका वेळेला गणेशविसर्जन कार्यक्रमात असणार म्हणून श्री व जान्हवीला सुट्टी दिली आणि सहा आया/सासवांना आणून केवळ "आज होणारी सून येणार आहे आणि आपण जेवणासाठी स्पेशल मेनू काय करायचा ?" हाच संवाद दाखविला. त्यातही 'नारळीभाता' वरून डोळ्यातून पाणी काढणेही झाले. जान्हवीच्या घरात त्याच वेळी तिचे आईवडील जान्हवीने केलेला नारळीभात समाधानाने खात उभे होते.
शरयूआत्या फेसक्रीम लावून बसलेली असते....गोरी दिसण्यासाठी....आणि मग त्याच अवस्थेत बाजारात भाजी आणायला जाते....रडत परत येते.... का ? तर तिच्याकडे पाहून भाजीवाले हसत होते म्हणून. मग बाकीच्या चौघीनी तिच्या चेहर्यावरील तो लेप टॉवेलने पुसून काढला तरी ह्या बिच्चारीला नेमके काय झाले होते हे समजले नसल्यचे दाखविले.
थोडक्यात कालचा एपिसोड चुकला असेल कुणाचा तरी काही बिघडले नाही.
तिथे बहुतेक आयांकडून होणारा
तिथे बहुतेक आयांकडून होणारा अपमान म्हणजे जान्हवीसाठी धक्का>>>> त्यातच ती नारळीभात नेतेय करून. नारळीभात धार्जिणा नाही म्हणे गोखल्यांना.
तिथे बहुतेक आयांकडून होणारा
तिथे बहुतेक आयांकडून होणारा अपमान म्हणजे जान्हवीसाठी धक्का>>>> त्यातच ती नारळीभात नेतेय करून. नारळीभात धार्जिणा नाही म्हणे गोखल्यांना. >>>>> देवा रे किती परिक्षा घेशील रे पोरीची?????
Pages