परत एकदा निर्भया ...

Submitted by छोटी on 23 August, 2013 - 04:44

एका महिला चित्रपत्रकारावर (फोटोजर्नालिस्ट) मध्य मुंबईतील परळ भागात पाच जणांना सामूहिक बलात्कार...
"चाळ' या विषयावर काम करणारी ही तरुणी तिच्या एका सहकाऱ्यासमवेत या भागात आली होती. यावेळी सहकाऱ्याला बांधून ठेवून या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणीस जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला काही अंतर्गत दुखापती झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

भारत देशात महिला ह्या आता खूप असुरक्षित आहेत
महाराष्ट्राचा बिहार होत आहे..
कुठे तरी मला एकदा वाटून गेल
मला अजिबात गर्व नाही महाराष्ट्रीन असल्याचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी.. | 14 September, 2013 - 12:36
झाली एकदाची या नराधमांना फाशीची शिक्षा, पण खरी अंमलबजावणी कधी होईल देव जाणे.
नाहीतर आहेच आपली तारीख पे तारीख. आणी यांचे गुन्हे माफ करायला आहेतच राष्ट्रपती नाहीतर तत्सम कुणी लोकं.
<<
सध्याच्या राष्ट्रपतींचे आतापर्यंतचे रेकॉर्ड चांगले आहे.
पण गाफील राहू नका. आतापासून त्यांच्यावर दबाव ठेवा. नहीतर वय, जात, धर्म यांचा संबंध जोडून पुन्हा माफी सत्र सुरू होईल.

सर्वांनी कळकळीने लिहिले आहे इथे पण खरच काही सुधारणा होईलसे वाटत नाही....महाराष्ट्र काय दिल्ली काय किंवा बाकी काय....
जिथे मोनिया वांधी आणि माहुल वांधी आणि सनमोहन मिंग चं राज्य आहे तिथे या गोष्टी तर एकदम नॉर्मल आहेत.....
हॅ.... बलात्कार बिलात्कार सारख्या फालतु गोष्टींवर का कोणी कडक कायदे बनवतं???
आपलं सरकार, मंत्री संत्री जास्तित जास्त पैसे कसे खाता येतिल...या कडे लक्ष देइल की तुमचे फालतु बलात्कार, खुन , वाढलेला भ्रष्टाचार , महागाई या कडे देइल?????
आता एकच उपाय आहे ....निगरगट्ट होउन जगणे.....आणि प्रार्थना करणे की या मंत्री संत्री च्या मुलिंवर निर्भया होण्याची वेळ यावी ( हे मी वाईट बोलते आहे मला माहित आहे ) पण कदाचित कोणाचे तरी डोळे उघडतील आणि एकाला तरी कायदा कानुन बदलण्याची सुबुद्धी होईल.....

तो अल्पवयीन कारटा का सुटला? त्यानेच तर आतड्याचा कोथळा बाहेर काढला असे निर्भयाच्या जबानीत होते का काय असे वाचलेले आठव्तेय....

तो कारटा पुन्हा नव्याने काहीही करु शकतो.. अरेरे
>>>

तीन वर्शात तो पशू मोकाट सुटनार हा काय न्यय म्हणायचा? मला तर वटत वेल आली आहे जनतेने कायदा हातात घ्यायची...बाहेर आल की सम्पवायचा

पण अकन्दरीत काय deteriorate ज़ालय आपल social fabric....

http://www.thehindu.com/opinion/lead/why-capital-punishment-must-go/arti...

The brutality that brings their crimes into the ambit of the rarest of rare is bred into their lives. They have gone to bed hungry as children, suffered illnesses without medicine, defecated in the open, been savaged on the whims of adults, treated like dirt. Compassion has never touched them. Life has beaten sensitivity out of them. Men forced to live like brutes will kill like brutes. When these men, society’s victims, find a victim, they take a lifetime’s frustrations out on him or her. Their murders and rapes are unlikely to be refined. Their brutality might appal a court and nauseate the middle class, by whose standards they are judged, but it is a product of what the community has made of them. This is what should shock the collective conscience of the community. >>>

म्हणजे बलात्कार केला, खून केला तरी त्याचा दोष समाजावरच? भारतात कितीतरी लोकं गरीबीमधे जगतात, उघड्यावर संडास करतात, कित्येकांचे आईवडिल त्याना मारत असतात म्हणून ते सर्व असे निघृण बलात्कार करत सुटतात का? असले लॉजिक लावणार्‍याच्या अकलेची कीवदेखील करावीशी वाटत नाही.

रश्मी..
बरोबर आहे .लोकांनी ह्यांना पोलिसांच्या ताब्यात वगेरे नं देता सरळ तीथल्या तीथे ठेचून टाकावं. असल्या लोकांच्या कुटुबियांना सरळ वाळीत टाकावं म्हणजे लहानपणापासून त्यांना घरचेच लोक धाकात ठेवतील . त्याशिवाय आपल्या मुली सुरक्षित राहणार नाहीत असं वाटतंय .
फाशीची शिक्षा वगेरे झाली तरी अंमल बजावणी होईपर्यंत ह्यांना फुकटच पोसावं लागतं .
याचबरोबर आपल्या घरातल्या मुलांवर (boys) आपण काय संस्कार करतोय हे हि महत्वाचं आहे

Pages