परत एकदा निर्भया ...

Submitted by छोटी on 23 August, 2013 - 04:44

एका महिला चित्रपत्रकारावर (फोटोजर्नालिस्ट) मध्य मुंबईतील परळ भागात पाच जणांना सामूहिक बलात्कार...
"चाळ' या विषयावर काम करणारी ही तरुणी तिच्या एका सहकाऱ्यासमवेत या भागात आली होती. यावेळी सहकाऱ्याला बांधून ठेवून या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणीस जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला काही अंतर्गत दुखापती झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

भारत देशात महिला ह्या आता खूप असुरक्षित आहेत
महाराष्ट्राचा बिहार होत आहे..
कुठे तरी मला एकदा वाटून गेल
मला अजिबात गर्व नाही महाराष्ट्रीन असल्याचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मे. न्यायालयांनी आता हि केस संदर्भासाठी वापरून अशीच शिक्षा अशा आरोपींना सुनवायला हवी.>>>
खरय!
फाशीची शिक्षा झाली.
तो एक सो कॉल्ड अंडरएज सुटला ते फार वाईत वाटलं..>>> १००%

आज माझा सहकारी सांगत होता की शक्ती मिलच्या आसपास जो परिसर आहे,तिथून कामावरून येणार्‍या मुली
कशा येतात देव जाणे! बरेच गर्दुल्ले वगैरे तिथे असतात.बर्‍याच आसपास एकही पोलीस नसतो. हा सहकारी तिथे गेला असताना तिथल्या दोघांची मस्करीत जुंपली,तेव्हा हा टरकून गेला होता.

शक्ती मिलच्या केसमधील सर्व आरोपींना ऑर्थररोड जेल मधे स्त्री कैद्यांनीच तुफान पिटून काढले अशी बातमी वाचली. त्यातल्या नायजेरियन स्त्री कैदी यात पुढे होत्या. पार अर्धमेले होईपर्यंत मारल्याने आधीच मेले तर कटकट नको म्हणून त्यांना दुसरीकडे हलवले असे वाचनात आले..

<em>शक्ती मिलच्या केसमधील सर्व आरोपींना ऑर्थररोड जेल मधे स्त्री कैद्यांनीच तुफान पिटून काढले अशी बातमी वाचली. त्यातल्या नायजेरियन स्त्री कैदी यात पुढे होत्या. पार अर्धमेले होईपर्यंत मारल्याने आधीच मेले तर कटकट नको म्हणून त्यांना दुसरीकडे हलवले असे वाचनात आले..........सही!

>> शक्ती मिलच्या केसमधील सर्व आरोपींना ऑर्थररोड जेल मधे स्त्री कैद्यांनीच तुफान पिटून काढले अशी बातमी वाचली.
गो गर्ल्स!

शक्ती मिलच्या केसमधील सर्व आरोपींना ऑर्थररोड जेल मधे स्त्री कैद्यांनीच तुफान पिटून काढले अशी बातमी वाचली. त्यातल्या नायजेरियन स्त्री कैदी यात पुढे होत्या. पार अर्धमेले होईपर्यंत मारल्याने आधीच मेले तर कटकट नको म्हणून त्यांना दुसरीकडे हलवले असे वाचनात आले..
<<<
ग्रेट !!!!

so called अल्पवयीन... अगदी अगदी.. फार वाईट वाटते तो कधीतरी सुटेल ह्याबद्दल.

स्त्री कैद्यांनीच तुफान पिटून काढले >> गुड गुड गुड...

या सगळ्याच भयानक घटनाचक्रात शेवटी निदान कोणत्यातरी ठिकाणी कोणत्यातरी सांघिक शक्तीने स्त्रिया एक झाल्या आणि अद्दल घडवली, वाचून खरंच इतकं बरं वाटलं!

पण आता खरे तर बरेही वाटेनासे झाले आहे.

ह्या अश्या बातम्या पेपरात वाचायला मिळतात आणि काळीज आतून पिळवटून निघते. कधी कधी विचित्र वाटत. वाटत कि हे कधीच सुधारलं नाही तर??? क्षणभर निष्प्राण झाल्याप्रमाणे हातपाय थंड पडतात. आणि मग समजत, कि आपण विचार करून उपयोग नाही.

झाली एकदाची या नराधमांना फाशीची शिक्षा, पण खरी अंमलबजावणी कधी होईल देव जाणे.:अओ:

नाहीतर आहेच आपली तारीख पे तारीख. आणी यांचे गुन्हे माफ करायला आहेतच राष्ट्रपती नाहीतर तत्सम कुणी लोकं.

नायजेरिन बायका, ( त्या आरोपी / गुन्हेगार असल्या तरी ) शाबासकीला पात्र आहेत.
त्या देशात त्यांचे आयूष्य म्हणजेच एक संघर्ष असतो. त्यांना असे प्रतिकारासाठी सज्ज रहावेच लागते.
माझी एक सहकारी होती ( Ibeh Grace फेसबुक वर आहे ती. ) कॅशियर होती पण तिच्याकडे वाकड्या
नजरेने बघायची कुणाचीच हिम्मत नव्हती. तिच्या डू यू नो हू आय अ‍ॅम ? या प्रश्नावर भलेभले टरकायचे.
पण कामाच्या बाबतीत मात्र चोख होती. कॅश नेण्या आणण्यासाठी आम्ही तिच्यावर अवलंबून होतो.

खरे तर काही अपवाद सोडला तर परदेशात खरच असे टफ व्यक्तीमत्व पहायला मिळते. कदाचीत जीवन संघर्षातुन त्यांना बरेच काही शिकायला मिळत असते, मग ते अफ्रिका खंड असो वा अशिया.

भारतीय समाज अजूनही त्याच त्या जोखडात स्वतःला जखडुन आहे. पुरुषाला प्रत्युत्तर देणे हा आपला समाज पुरुषत्वाचा अपमान समजतो, त्यातुन स्त्रिया अधिक दबल्या जातात. अगदी घरातले उदाहरण सुद्धा बर्‍याच जणांना पहायला मिळत असेल. संस्कार वेगळे आणी अन्याय ( तो ही काही अपराध नसतांना ) सहन करणे वेगळे. नायजेरीयन स्त्रियांना सलाम.

फाशीची शिक्षा ठोटावली तरी अजून अंमलात आणेपर्यन्त आरोपीचे वकील बरीच शकले लढवतात जी एकदम हास्यापद आहेत... जशी की आतंकवादीला नाही का सोडतो भारत... हे कृत्य आरोपींनी 'फक्त' एका आवेगात केले ते पुर्वनियोजित कटकारस्थान न्हवते त्यामुळे ते माफीस पात्र आहेत असली फाजील कारणे सांगताहेत..

पण अश्या नराधमाच्या आवेग प्रवृतीने एका निरागस मुलीचा जी गेला त्याचे भान नाही ह्या वकीलांना? ह्या वकीलांना पण चोपए पाहिजे चांगले.

इतर संधीसाधू आहेतच म्हणायला, की हा फाशीचा निर्णय फक्त खुर्ची वाचवायला दिखावा आहे वगैरे वगैरे... इथे सुद्धा पोलिस्टिक्स... दुर्दैव आहे आप्ले. Sad

तो अल्पवयीन कारटा का सुटला? त्यानेच तर आतड्याचा कोथळा बाहेर काढला असे निर्भयाच्या जबानीत होते का काय असे वाचलेले आठव्तेय....

तो कारटा पुन्हा नव्याने काहीही करु शकतो.. Sad

हे आत्ताच फेसबुकवर वाचायला मिळालं.

>>***NIRBHAYA ACCUSED'S LAWYER MORE DANGEROUS AND WORSE THAN THE ACCUSED THEMSELVES****

AP Singh, the defence lawyer for the 4 accused in delhi gangrape case, says

After a girl is raped, she has no moral right to live. She should be killed as she has no moral authority left to lead life. If my daughter would have been raped I would have poured kerosene on her and burnt her alive. All the parents should kill their daughters who have been raped.>>

सायो,
ही बातमी आहे ती :

.तर मी माझ्या मुलीला जिवंत जाळले असते!
(15-09-2013 : 00:59:49)
नवी दिल्ली : माझ्या मुलीने लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवले असते, रात्री-बेरात्री बॉयफ्रेन्डसोबत फिरली असती तर मी तिला जिवंत जाळले असते, असे वादग्रस्त वक्तव्य दिल्लीच्या ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील बचाव पक्षाचे वकील ए.पी. सिंग यांनी केले आहे. अनेक स्वयंसेवी संघटनांच्या यासंदर्भातील तक्रारीनंतर दिल्ली बार कौन्सिलने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे.
१६ डिसेंबरला दिल्लीत धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या पीडितेचा उल्लेख करून सिंग यांनी ही मुक्ताफळे उधळली. माझ्या मुलीचे लग्नाआधी कुणाशी शारीरिक संबंध ठेवले असते आणि रात्रीबेरात्री ती आपल्या पुरुष मित्रासोबत भटकली असती तर मी तिला जिवंत जाळले असते. सर्व पालकांनीही असेच वागायला हवे, असे सिंग यांनी सांगितले.

त्या बलात्कार्‍यांना हे अशाच मेंट्यालिटीचे वकिल मिळू शकतात...

आरोपींना शिक्षा झाल्यावरही सिंगने अशीच बेलगाम विधाने केली होती.पण वरील वाचून घृणा येते अशा माणसांची!
वकिलाला मिडियासमोर भडक वक्तव्याबाबत शिक्षा होत नाही का? त्याच्या बायकोबद्दल सहानुभूती वाटते.

मुळात या सिंग वकिलांना "मोठे" करण्यात या मिडिया पर्सन्सचाच जास्त संबंध आहे. ज्या दिवशी फाशी सुनावली त्याच्या पुढील काही मिनिटातच सरकारी नव्हे तर या बचाव पक्षाच्या वकिलाभोवती झाडून सार्‍या मिडिया न्यूजमेन आणि कॅमेर्‍यांनी अक्षरश: रिंगण घातल्याचे दाखविले गेले....जणू काही तो सिंग म्हणजे कुणा देशभक्तांचेच रक्षण करीत होता. "काय म्हणायचे आहे या शिक्षेबद्दल ?" असा अगदी बावळट म्हटला जाणारा प्रश्न त्याला विचारला होता एकाने, तर याचे उत्तर, "अहो, साकेत म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे. या शिक्षेविरूद्ध आम्ही दोन्ही वरच्या कोर्टात अपील करणार आणि तिथे या चौघांची केस मांडली जाईल.....". सरकारच्यावतीने ज्यानी बाजू मांडली, त्यांच्याकडे कुणी गेल्याचे दिसलेच नाही.

फास्ट ट्रॅकच्या निकालाला तब्बल ८ महिने लागल्याचे दिसल्येच....आता हाय कोर्ट आणि मग सुप्रीम कोर्ट मग राष्ट्रपती.....

राम...राम.....काय त्या निर्भयाच्या कुटुंबियांची मानसिक स्थिती होत असेल आणि होईल....या दिरंगाईत.

नाही ना, अदिति.....असे होत नाही. जाळणे, मारणे वगैरे प्रतिक्रिया ही केवळ आपल्या संतप्त मनातील स्पष्ट भावना झाली. प्रश्न असा ही की त्याच्याकडे मिडियाने दुर्लक्ष करणेच योग्य होते......हीच मंडळी सासणकाठी नाचविल्यागत त्याच्या पुढे नाच करीत गेल्यावर तोही बेताल सुटलाच.

मुळात मिडीयाने बाईटखातर सगळाच ताळतंत्र सोडलाय. मिडीयालाच सरळ करा आधी. त्यांना कसलेही सोयरसुतक राहिलेलेच नाही. आली संधी की कमरेचे सोडुन नाचा एवढेच उरलेय

दोन आठवड्यापुर्वी दाभोळकर हत्येनंतर आपला समाज किती आंधळी श्रद्धा ठेवतोय याबद्दल चिंता व्यक्त करत
गळा काढणारा मिडीया गणपती आल्यानंतर कुठला गणपती किती पावरबाज, कोण नवसाला हमखास पावतो
याची जोरदार चर्चा करत होता.

Pages