Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोरीने नाही किंवा बापाने
पोरीने नाही किंवा बापाने नाही, तरी आईने मारलेला अंदाजी तीर अचूक बसला श्री च्या खर्या रुपाच्याबाबतीत.>>>>>>>> ते तिने उपाहासाने विचारले होते. अकाउंटंट नाही तर काय मालक आहे?? असं.
होय सस्मित.... तिच्या
होय सस्मित.... तिच्या बोलण्यात उपहासाचाच दर्प होता; पण त्यातून का होईना तिने त्याला 'मालक' या खर्या नात्याने ओळखले याचाच जान्हवीला आनंद झालेला दाखविलाय... म्हणजे असं की, निदान आईने तरी त्याच्या हुद्द्यावरून आणखीन् दोनेक एपिसोड्स गिळंकृत केले नाहीत.
गाणे केले डाऊनलोड. खुप गोड
गाणे केले डाऊनलोड. खुप गोड आहे. वरती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
मी पण केले गाणे डाऊनलोड मस्त
मी पण केले गाणे डाऊनलोड मस्त आहे.
आई सारखी तिच्याकडे पैसे
आई सारखी तिच्याकडे पैसे मागणार, मग ही वेड्यासारखी गुपचुप देणार, >>>मला नाही वाटत, जान्हवी आईला असे पैसे देईल...तिच्या स्वभावात नाही बसत ते...
धन्यवाद जाई, त्या साईटवर खुप
धन्यवाद जाई, त्या साईटवर खुप दिवसात गेलेच नव्हते. पूर्वी सिरियल्सची टायटल सॉंग्स तिकडून डाऊनलोड केली होती. ऐकतेय. खुप आवडलंय हे गाणं पहिल्यांदा ऐकल्यापासूनच. आता कधीही कुठेही ऐकता येईल.
लगे हाथ राधा ही बावरीचं तिने बेचैन होतांनापण डाऊनलोड केलं. तुझं माझं जमेना चं हनिमून साँग काही मिळालं नाही पण तिकडे..
मला भिती वाटतेय कि काहीही
मला भिती वाटतेय कि काहीही झालं तरी ती सावत्र आई आहे.
ती जान्हवीचं असं सहजासहजी भलं होऊ देईल असं काही वाटत नाही.
याआधी जान्हवीसाठी आलेल्या चांगल्या स्थळांचं तिने काय केलं हे विसरलात?
याआधी जान्हवीसाठी आलेल्या
याआधी जान्हवीसाठी आलेल्या चांगल्या स्थळांचं तिने काय केलं हे विसरलात?
>>>>
हो पण त्यातलं कोणी श्रीसारखं श्रीमंत नव्हतं ना? मला तर वाटतं ती खूश होईल आणि तिच्या पैशाच्या मागण्या वाढत जातील.
चीकू + १ श्री गोखले
चीकू + १ श्री गोखले गृहउद्योगाचा मालक आहे, म्हटल्याबरोबर आईच्या डोळ्यात एक चमक आणि चेहर्यावर हसूही दाखवलं होतं. आईला बाकी जाह्नवीच्या आयुष्याशी काहीएक देणंघेणं नाहीये.. तिला श्रीमंत नवरा मिळाला की त्यांच्या घरची परिस्थिती सुधारेल. एवढंच तिचं मागणं आहे. बाकी स्थळांच्या बाबतीत हे पूर्ण होतं नव्हतं म्हणून तिने त्यांना हुसकावून लावलं होतं. अनिलने त्या अटी मान्य केल्या म्हणून त्याच्याशी लग्न लावायला निघाली होती ती..
शी काल किती बेक्कार चेहेरा
शी काल किती बेक्कार चेहेरा करून रडत होती. असं वाटत होतं हसतेय....
बादवे या सहा बायका आणि श्री एकमेकांसमोरच नावं घेत नाही मुलींची (जान्हवी आणि सायली). त्याच्यामागे बोलताना सायलीची पत्रीका आणि यँवत्यँव....
अशक्य क्यूट होता आजचा श्री
अशक्य क्यूट होता आजचा श्री जान्हवीचा पार्ट...श्रीने आय लव यू म्हणायला सांगितलेय जान्हवीला
प्लीज आज काय झालं अपडेट टाका
प्लीज आज काय झालं अपडेट टाका ना
आज "सूनबाई...." ला जावईबापू
आज "सूनबाई...." ला जावईबापू मजेत आनंदाने आग्रहाने "आय लव्ह यू...." म्हण असा आग्रह धरीत होते, अन् तेही बस स्टॉपवर..... मात्र जान्हवी लाजून चूर झाली होती, तिने ते चिरतरुण वाक्य काही म्हटले नाहीच. मात्र ती खट्याळपणे बसमध्ये चढताना श्री कडे पाहातच राहिली होती. श्री हसून मागे फिरला. पुढे बॅन्केत तिने हा प्रकार मैत्रिण गीताला सांगितला. त्यावर गीताने तसे म्हणण्याबद्दल तिला प्रोत्साहन तर दिलेच शिवाय त्या वाक्याची स्वतःशीच प्रॅक्टिस करायलाही शिकविले. प्रथम डोळे बंद करून ती प्रॅक्टिस करू लागली तर तिच्यासमोर बॅन्केतील शिपाई हसत उभा राहिलेला दाखविला....ही लाजून खल्लास.
त्या अगोदर घरी आईने तिला खोलात विचारून 'श्री' या पदाविषयी खात्री करून घेतली. आई भलत्याच खूष दाखविल्या आहेत. कारण पिंट्याने सांगितले की गोखले गृह उद्योगचा कोटीचा व्यवसाय आहे. आईने लग्नालाही परवानगी दिली आहे.
आज तरी केवळ जान्हवी आणि श्री या दोघानीच हा एपिसोड खाल्ला आहे.
[अरेच्या एक राहिले....... बस स्टॉपवरील श्री जान्हवीचा प्रेमाची पाठशिवणीचा खेळ एक व्यक्ती उघडपणे पाहते.....सायली. तिला अर्थातच धक्का बसलेला दाखविला आहे अन् ती श्री च्या ऑफिसमध्ये येते. त्याविषयी उद्याच्या भागात असणार.]
अशोक, तुम्हाला सीरीयल फारच
अशोक, तुम्हाला सीरीयल फारच आवड्तिये असं दिसतयं. तुमचे प्रतिसाद वाढलेत इथले.
ओ....गॉड..... येस्स,
ओ....गॉड..... येस्स, चैत्राली, यू आर राईट. खरंच, मी पाहात असलेली ही एकमेव मालिका....हिंदीही कुठल्या पाहात नाही. एकतर या ना त्या कारणाने एकूणच टीव्हीपासून दूरच असतो, पण ज्यावेळी काही कार्यक्रम पाह्यचाच असेल तर ते निगडित असतात नॅशनल जिऑग्राफिक, डिस्कव्हरी आदींशी. बातम्याही मी कॉम्प्युटरवरूनच पाहतो.
....पण असे झाले की माझ्या घरी जुलैमध्ये थोरली बहीण आणि तिच्या दोन मुली राह्यला आल्या आणि त्यानी मला आग्रहाने "होणार सून मी ह्या घरची...." बघायला लावली. त्यावेळी पहिले चार-पाच भाग झालेही होते. पण मला जान्हवीचे हसणे....तिचा खेळकरपणा जितका भावला तितकीच श्री ची तिच्याकडे पाहण्याची दृष्टीही....दोघेही खूप फ्रेश असल्याने आवडलेही.
पुढे तुम्हा सार्या लोकांचे इथले प्रतिसादही वाचनीय होत असल्याचे जाणवत गेल्यावर मग मी भीतभीतच एकदोन प्रतिसाद दिले....अन् पुढे त्याची सवयच लागली....जे तुमच्यासारख्या चाणाक्ष सदस्यांनी ओळखले.
धन्यवाद अशोक
धन्यवाद अशोक
मी पाहात असलेली ही एकमेव
मी पाहात असलेली ही एकमेव मालिका....>>>> आम्हीही !
तिचा खेळकरपणा जितका भावला तितकीच श्री ची तिच्याकडे पाहण्याची दृष्टीही....दोघेही खूप फ्रेश असल्याने आवडलेही.>>>>>>>>>> अगदी अगदी!
शरयू काकूसाठी कोणाचा तरी फोन
शरयू काकूसाठी कोणाचा तरी फोन येतो....तो आजी उचलते....तर ब्लँक कॉल....मग आजी तिथून गेल्यावर परत फोन येतो तेव्हा श्रीला थांबवून काकू फोन घेते अन हळू आवाजात बोलत निघून जाते. श्री ला कळते कि 'दाल में कुछ काला है'
आजचा भाग गुड्गुड दाखवला......आधी जानूची आई गोड गोड बोलते..... मग श्री-जान्हवी ....अगदी गुदगुल्या झाल्या!!!
माझ्या घरच्या सर्वाना ही
माझ्या घरच्या सर्वाना ही मालिका खुप भावते. श्री व जान्हवी एकदम मस्त. "नाही कळले कधी" गाण्याच्या ओळी कोणाला हव्या असतील तर येथे उपलब्ध - http://fenugreeklove.wordpress.com/2013/09/12/mi-tula-tu-mala-honar-soon...
आता रविवार चा भाग वाट बघत आहे....
मलाहि आवडली हि
मलाहि आवडली हि मालिका.....खरच....खुप भारी आहे.
'एका लग्नाची...' नंतर चांगली अशी मालिका हिच!!
गाण छान आहेच....पण जोडी मस्त आहे!!!
sonalisl, जरी जानुचा स्वभाव
sonalisl, जरी जानुचा स्वभाव तसा नसला तरी तिची आई एक नं पाताळयंत्री आहे ना? ती बाबांच कारण पुढे करुन पैसे मागणार.....
कालच्या पुढील भागात जान्हवी
कालच्या पुढील भागात जान्हवी श्री ला I love You म्हणत असताना सायली ची entry दाखवलेय श्री च्या cabin मध्ये
अशोक काका, कुण्णाचं काहीही
अशोक काका, कुण्णाचं काहीही ऐकू नका. रोज बघाच ही सिरियल... आणि हो.. इथे लिहाच, प्लीज. मी आवर्जून येतेय अपडेट्स वाचायला.
थॅन्क्स दाद...... एक तरी भाची
थॅन्क्स दाद...... एक तरी भाची अशी मिळाली इथे की जिला मी '.....जान्हवी सूने' वर लिहिलेले भावते. रात्री ८ ची चुकली तर हीच सीरिअल रात्री ११ वाजताही [भा.प्र.वे.] झी वर दाखविली जाते, त्यामुळे आजपर्यंत तरी चुकलेले नाही. अपडेट जरूर देत जाईन.
अशोकजी,तुम्हि लिहिता सुद्धा
अशोकजी,तुम्हि लिहिता सुद्धा मस्त!
आजचे {शनिवार} चे अपडेट.... ~
आजचे {शनिवार} चे अपडेट....
~ आज जान्हवीची "आय लव्ह यू" च्या प्रॅक्टिसशी झटापट चालूच होती. त्यातच बॅन्क मॅनेजरनी तिला श्री च्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाण्यास सांगून त्याला एक लखोटा देण्यासही सांगितले. बॅन्केतून गीताचा निरोप घेऊन ती जात असतानाच अनिल आपटे तिथे येऊन तिला त्रास देताना दाखविले आहे. पण आता जान्हवी कणखर झाली असून त्याला जशास तसे उत्तर देते. हा पठ्ठ्या म्हणतो 'मी बॅन्केत खाते सुरू करायला आलो आहे. मला फॉर्म द्या...." जान्हवी शिपायाला त्याला फॉर्म द्यायला सांगते व तिथून निघून जाते.
श्री च्या ऑफिसमध्ये येते आणि शिवदे मॅडमशी बोलते. शिवदे यांचा ती "विवाहित मुलगी' आहे असा अजूनही समज असल्याने त्या जान्हवीचे मनापासून स्वागत करीत नाहीत, पण जान्हवी मी बॅन्केचे काम घेऊन आले आहे असे सांगते. श्री मीटिंगमध्ये असल्याने शिवदेमॅडम जान्हवीला श्री च्या केबिनमध्ये थांबण्यास सांगतात. ती त्यांच्यासमोरून जाताच शिवदेमॅडम बंगल्यावर भागीरथीबाईना फोन करतात.
श्री केबिनमध्ये येतो आणि मग या दोघांचा तो 'आय लव्ह यू' चा खेळ परत सुरू होतो....हा प्रसंग जान्हवीने छानच रंगविला आहे...विशेषतः तिचे डोळे मिटून घेऊन फक्त "आय लव्ह...' इतपत प्रगती करणे आणि 'यू' च्या वेळे चेहर्यावर हात ठेवून झक्कपैकी लाजणे....सारेच सुरेख.
शेवटच्या क्षणी ती ते वाक्य पूर्ण करणार इतक्यात केबिनमध्ये सायली प्रवेश करते. ती येताच श्री चा मुकाटपणा. मग तिने स्वत:हून जान्हवीला आपली ओळख करून देणे, ओळखीचे स्वरूप म्हणजे "मी श्री ची होणारी पत्नी आहे....". त्यासाठी हातातील सोन्याच्या बांगड्या जान्हवीला दाखविणे.....जान्हवीचे नंतर मीनाकुमारीच्या स्टाईलमध्य धुमसून रडणे व तिथून बाहेर पडणे.
उद्या [रविवार] एक तासाचा खास कार्यक्रम आहे.
आता ती सायली मधेच
आता ती सायली मधेच टपकली...दोघांत तिसरी... म्हणजे हिंदी सिनेमाच झाला....
अरे देवा... त्या बांगड्या
अरे देवा... त्या बांगड्या विसरलेच होते मी. आयमीन... विसरलाच होता श्री. इतक्या घराण्याच्या-बिराण्याच्या तर चक्कं सायलीकडे असल्याचं कसं विसरला असेल? धांदरटच आहे.
आज रविवारी ".....सूनबाई"
आज रविवारी ".....सूनबाई" विषयी १ तासाचा खास भाग होता...अन् त्यातही विशेष म्हणजे या तासापैकी सुमारे ४० मिनिटे केवळ श्री आणि जान्हवी यांच्यातील लटके रागावणे, हसणे, डोळ्यातून घळाघळा पाणी काढणे, एकमेवावर तसेच खेळकर आरोप प्रत्यारोप करणे.....आणि मग जान्हवीने मोठ्याने श्री समोर अखेरीस 'आय लव्ह यू' म्हणून वारंवार ओरडणे...त्याला श्री चा खेळकर प्रतिसाद मिळणे....आदी बाबीं चांगल्याच रंगल्या. त्यातही जान्हवीची भूमिका केलेल्या तेजश्री प्रधानचा आजचा अभिनय म्हणजे अप्रतिमच होता. हा पहिला एपिसोड असेल जिथे ती श्री ला सडेतोड बोलते...आणि त्यालाही "मी देखील कुणीतरी आहे...' याची जाणीव करून देते. 'सायलीबाबत तू मला धक्का दिलास' असे ती संतापून म्हणते आणि 'तुझी ही धक्का देण्याची पद्धत मला केव्हातरी मरणाजवळ घेऊन जाईल'....हे ऐकून श्री ही कोलमडतो....पण तिची योग्य ती समजूत घालून सायलीबाबतचा तिचा गैरसमज दूर करण्यात तो यशस्वी ठरतो. सायलीने घातलेल्या बांगड्या तिच्याकडून श्री काढून घेतो अन् परत त्या जान्हवीकडे येतात. बांगड्या घेतेसमयी जान्हवीला आता श्री ची 'आईआजी' आठवते आणि त्यानी तिच्यावर केलेले आरोपही. त्यामुळे ती श्री ला 'मला काहीतरी तुला सांगायचेय श्री याबाबतीत...' असे म्हणते जरूर, पण सांगू शकत नाही.
या दोघांव्यतिरिक्त या भागात श्री चे अन् सायलीचे किरकोळ भांडणही दाखविले आहे...तसेच तिचे ऑफिसमधून चिडून निघून जाणे. तर दुसरीकडे बॅन्केत रडत परत आलेल्या जान्हवीची गीताने केलेली योग्य अशी कानउघडणीही छान दाखविली आहे. बोरकर मॅनेजरनी जान्हवीला "प्रेम करणार्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवण्याचा' सल्लाही योग्य कसा आहे हे जान्हवीला उमगते आणि ती तिथून परत श्री च्या ऑफिसकडे येते. मॅनेजरनी देवापुढे 'या मुलीचा संसार मार्गी लाव...' अशी केलेली प्रार्थना दाद घेऊन गेली.
थोडक्यात....एकट्या आजीचा विरोध मावळला तर श्री जान्हवीचा संसार मार्गी लागेल असे अनुमान काढता येईल.
रविवारचा स्पेशल एपिसोड फक्त
रविवारचा स्पेशल एपिसोड फक्त आणि फक्त श्री- जान्हवीसाठी होता. अप्रतिम अभिनय. कितीही घिसापिटा प्रपोज करण्याचा प्रसंग असला तरी त्या दोघांनी जीवंत केला तो. जान्हवी रडताना, हसताना, रागावताना, श्रीवर चिडताना, सायलीबद्दल असुया निर्माण साल्यावर स्वतःशीच भांडताना खुप खुप आवडली.
श्री एकदम क्युट, हो मला माहितिये तू रडत नाहियेस फक्त तुझ्या डोळ्यातुन पाणी येतय कसला गोड म्हणत होता तो. सहा रुमालांबरोबर टिश्यु नाकारताना भारतातली जंगल कशी संपत चाललियेत, लेदर पर्स वापरत नाही कारण दुर्मिळ प्राण्यांच्या जाती नाहिश्या होत चालल्यात वगैरे सामाजिक परंतु स्वतःसाठीच पाळलेले संदेश पण देऊन झालं.
मला कालचा महाएपिसोड आवडला. त्या दोघांनी अक्षरशः खाऊन टाकला. जान्हवी आणि श्री कुठेच दिखाऊपणा नव्हता अगदी खरे खुरे प्रेमात पडल्यासारखे वाटत होते.
Pages