मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम ''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' - क्र.४

Submitted by संयोजक on 7 September, 2013 - 04:11

हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.

''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.

ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:
१. हायकू ३ ओळींचा असावा.

२.दरवेळी दिलेली वस्तू घेऊनच हायकू रचायचा आहे. उदा. दिवा. आणि त्यावर रचलेला हायकू बघा:

"नववर्षाच्या नव्या पहाटे नवीन आली हवा
क्षण थरथरला मिटून गेला
खिडकीमधला दिवा ''

३. वस्तूचा उल्लेख तिसर्‍या ओळीत व्हावा आणि पहिल्या दोन ओळींचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध त्या वस्तूशी असायला हवा. जो तिसर्‍या ओळीत दिसला पाहिजे. तिसरी ओळ ही विरोधाभास/ पंच ( अनपेक्षित परिणाम )साधणारी असावी.

४. हा उपक्रम गणेशोत्सवाचे पाच दिवस (दिनांक १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१३) चालेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० सप्टेंबरपासून दररोज सकाळी ११ वाजता नव्या वस्तूसाठी नवा धागा काढला जाईल आणि त्यानंतरच्या २४ तासात त्या वस्तूवर हायकू या उपक्रमात भाग घेणार्‍यांनी प्रतिसादातच रचायचा आहे.
२४ तासांनंतर पहिला धागा वाचनासाठी खुला असेल

५. पारंपारिक जपानी हायकू हा १७ जपानी सिलॅबींचा असून पहिल्या ओळीत ५ दुसर्या ओळीत ७ आणि तिसर्‍या ओळीत ५ सिलॅबी असतात. पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायकूही आढळतात. आपल्या चौथ्या हायकू उपक्रमाला रंगत यावी म्हणून या उपक्रमाचा महत्त्वाचा नियम-
"हायकू कमीतकमी २० ते जास्तीत जास्त ४० अक्षरांचा असावा. कुठल्याही दोन ओळींचे यमक साधलेले असावे. तिसर्‍या ओळीत आम्ही दिलेल्या विशिष्ट वस्तूचा उल्लेख अनिवार्य आहे.

६. वरील नियमांनुसार तयार न होणारा हायकू बाद केला जाईल.

७. एक आयडी एकाहून अधिक हायकू रचू शकेल.

८. हायकू बद्दल अधिक माहितीसाठी येथे एक लिंक दिली आहे.

http://www.wikihow.com/Write-a-Haiku-Poem

जालावर अन्यत्रही मोठ्या प्रमाणात अनेक भाषांत आधुनिक स्वरूपात हायकू लिहिले जातात. त्यात निसर्ग, प्रेम वगैरे पारंपारिक विषयांबरोबरच दैनंदिन जीवन , राजकारण, विनोद यांवरील हायकूंचाही समावेश असतो.

चला तर मग! या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची रंगत अनुभवूया,गणेशोत्सवाचा आनंद वाढवूया !! ऑल द बेस्ट !!!

आजच विषय आहे :- पुस्तक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आली आली PL त्याचे एवढे काय
पोर कॅंटीन मध्ये दिसत नाहीत.....
पुस्तक घेवून कुठे पडली की काय

बघून वाचने अन खुद्कन हसणे
ओळखून आहे मी
तुझे पुस्तकात लपवलेल्या फोटोत रमणे

आली ती सरसर चालत माझ्या पुढ्यात
सुजलेल तोंड दाखवत म्हणाली
याच्यावर काय लिव्हलय तुमच्या पुस्तकात

पान पालटणे नोहे, जाणिजे यज्ञकर्म
श्लोक असा रचावयास हवा, म्हणायाचे जर
पानांच्या बांधीव गठ्ठ्यास पुस्तक

अभ्यास करुन आता कंटाळा आला गं
तर आई म्हणे मला
पुस्तकाची पाने फाडुन खा गं Proud
( हुश्श! पहिल्यांदा असं लिहीलय माबोवर.. सांभाळुन घ्याच :डोमा:)

पहिल्यांदा लिहीले आणि लोकप्रिय झाल,
मग लिहितच गेले आणि एक दिवस लिहिता लिहिता
भाग्य उजळल आणि पुस्तकच तयार झाल..

गतस्मृतींच्या पानांवरती
तुझ्या आठवांचे मोरपीस सापडले
आणि पुस्तक गालात हसले Happy

सुट्टीचा कुठलाही वार
एक निवांत दुपार
कॉफीचा मग, मी आणि पुस्तक... स्साला सुख म्हणजे आणखी काय अस्त

हे जर अक्षरांच्या संख्येमुळे नियमात बसत नसेल आणि तर त्यातील स्साला हा शब्द वगळून वाचावे Happy
आणि ते एक, 'आपल्या अभिषेक'ची परवानगी वगैरे घ्या की वो काढून Wink

पूर्वी उशाशी ,गादीखालीही काही सापडायची
कपाटात भरलेली, टीपॉयवर विखुरलेली दिसायची .
आता डिझानयर घरात पुस्तकांना इतकी सूट नाही मिळायची..

जुन्या कपाटाच्या तळाशी धूळ होती साठलेली
झटकताच हळुवारपणे
पुस्तंकांची अन आठवणींची कशी ती गट्टी जमली