एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्टं थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखकः बेफिकीर
कथा: रेवाचा निर्णय काय?
रेवाच्या डोळ्यातून उतरत असलेली चमक निमितच्या वाक्याने पुन्हा झगमगू लागली. निमित स्वतःचे आवरताना स्वतःच्या आवरण्यापेक्षा रेवाच्या आवरण्याकडे अधिक लक्षपूर्वक पाहात होता. रेवाचे जवळपास होतच आलेले होते. मात्र तिने शेवटचे आरश्यात पाहिले तेव्हा निमितही तिच्यामागे उभा होता आणि त्याने आरश्यात रेवाचे डोळे पाहिले आणि व्यावसायिक कळकळ देहबोलीत ओतून रेवाला म्हणाला...
"यू शूड बी लूकिंग चीअरफुल, अॅज इफ यू नो?... यू आर सो हॅपी टू बी इन द ग्रूप"
रेवाने आरश्यातूनच किंचित उदासपणे निमितच्या त्या आग्रही चेहर्याकडे पाहिले आणि पुन्हा एक हलकासा ब्रश अप करत अचानक तिने स्वतःच्याच प्रतिमेकडे उत्फुल्लपणे पाहिले.
"दॅट्स इट रेवा... देअर यू आर"
निमितचा उत्साह आता शिगेला पोचला होता. रेवा त्याला याक्षणी जशी दिसायला हवी होती तशी दिसत होती.
टेक्नोझोन ईन्डियाचे टेक्निकल डायरेक्टर सुब्बी, त्यांची पत्नी उर्मिला, टेक्नोझोनचाच सप्लाय चेन चीफ अरोरा आणि डिझाईनचा सर्वेसर्वा नातू या चौघांना डिनरचे प्रपोजल देणे हे भल्याभल्यांना जमू शकले नसते. निमितने घाबरत घाबरत खडा टाकला आणि सगळे चक्क तयार झाले. या तयार होण्यामागे निमितच्या मितवा अॅन्सिलरीजचे उत्पादन सर्व तांत्रिक निकषांवर अगदी हवे तसे उतरणे हे कारण होते. तांत्रिकदृष्ट्याच जर काही कमतरता असत्या, तर अरोराने निमितचा एस एम एस सुद्धा वाचला नसता. अरोराला डिनर मान्य झाले नसते तर सुब्बींचा सेक्रेटरीही निमितला भेटला नसता. आणि सुब्बी आणि अरोराच्या पुढे जाण्याची नातूची पोझिशनच नव्हती.
मितवा अॅन्सिलरीज! निमित मधील 'मित' आणि रेवामधील 'वा' असे ते नांव तयार झाले होते. व्यावसायिक यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करणार्या मितवाचा होल अॅन्ड सोल निमित हा पंचेचाळिशीचा, गोरा पान, पोट सुटलेला, बेढब आणि अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि साहस यांचा संगम असलेला माणूस होता. जे उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी ज्या ज्या प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आणि शक्य आहे त्यातील एकही करणे तो बाकी सोडायचा नाही. चोवीस तास व्यवसायाचे भूत मानगुटीवर बसलेला निमित एक माणूस म्हणून यांत्रिक झाला होता. यंत्रमानव, जो ठरवेल ते करतो, ते करण्यासाठी जे आवश्यक वाटेल ते करतो.
सुब्बींची मिसेस त्यांच्याबरोबर नसती तर आज निमित कोणाबरोबर डिनरला आहे हेही रेवाला माहीत झाले नसते. फक्त तो रोजच्याप्रमाणे एक ते दीड वाजता येईल आणि आपला एखादा नोकर दार उघडून त्याला आत घेईल आणि मग निमित झोपून जाईल इतकेच तिला माहीत असते. पण आज तो घरी आला तेच मुळी पावणे सातला आणि म्हणाला...
"रेवा, तुझ्याकडे पंचेचाळीस मिनिटे आहेत... रीजन्सीच्या सिक्स्थ फ्लोअरला डिनर आहे... सुपर हायक्लास ग्रूप आहे.. यू शूड लूक यूअर बेस्ट सो फार इन द लाईफ.. त्यात एकांची मिसेसही आहे.. सो यू कूड बी फ्रेंडली विथ हर... कॅरी सम फ्लॉवर्स विथ यू फॉर हर... आय अॅम टेलिंग यू... यू शूड लूक सिंपली स्टनिंग..."
एक बाहुली! जी त्याक्षणी दिवसभरच्या ड्रेसमध्ये होती. कोणत्यातरी कारणाने आज तिला नवर्याची साथसंगत मिळणार हेही तिच्यासाठी जरा वेगळे होते. ती इतकी काही भोळसट नव्हती की तेवढ्यावर समाधानी होईल, पण काहीच नाही तर निदान ते तरी! तिने ठरवले. हा आपल्याला सादर करणार! लोक आपल्याला बघणार! आपल्याला बघून निमितकडे असूयेने बघणार! मग आपल्याशी मैत्रीपूर्ण बोलू लागणार! आपल्याकडून अशी अपेक्षा असणार की आपण त्या लोकांना खेळवावे! त्यांना आपल्या विचारांचा तळ गाठता येऊ नये. या स्त्रीशी नेमकी किती घट्ट मैत्री होऊ शकेल याचा अंदाज बांधता येऊ नये. हे सगळे असेच होणार असेल, तर आज निमितसकट सगळ्यांनाच शॉक देऊ!
रेवा! चव्वेचाळिसाव्या मिनिटाला ती सिव्हिकमध्ये बसली तेव्हा निमित क्षणभर थांबला आणि तिच्याकडे बघत तारीफ करणार्या चेहर्याने हासत म्हणाला...
"रेवा... आय कान्ट बिलीव्ह.. तू अजूनही तितकीच सुंदर दिसतेस... आय.. आय लव्ह यू"
'आय लव्ह यू'! रेवाला ते शब्द ऐकू जरी असेच आलेले असले तरीही त्या शब्दांचा जो अर्थ तिच्या मनात पोचला तो असा होता...
'धन्यवाद तू सुंदर दिसत असल्याबद्दल! आज नक्की पब्लिक भाळणार तुझ्यावर'!
पण रेवामधील खूप जुनी झालेली कोणतीतरी एक निरागस नवयौवना मात्र त्यातही थोडीशी सुखावली, यामुळे, की ती आजही तितकीच सुंदर दिसते हे तितक्याच जुन्या झालेल्या तिच्या नवर्याला मान्य आहे. इतकेच नाही तर स्वीट सिक्स्टीन असलेली आपली मुलगी शीतल आणि आपण रस्त्यातून जात असताना लोक आपल्याचकडे पाहतात हेही रेवाला आठवले. सिव्हिकमध्ये रेवाच्या केसातील आणि हातातील मोगर्याचा गंध भरून उरला तेव्हा निमितचे मन रीजन्सीच्या सहाव्या मजल्यावर पोचलेदेखील होते.
रीजन्सीच्या पोर्चमध्ये मात्र वेगळेच समजले. सुब्बी, अरोरा आणि नातू एकाच गाडीतून उतरले. मिसेस सुब्बी दिसतच नव्हत्या. निमितने सगळ्यांशी रेवाची ओळख करून दिली. रेवाने सुब्बींना विचारले..
"मिसेस सुब्बी?"
"ओह शी हॅड सम क्लब मीटिंग अॅन्ड ऑल... लास्ट मिनिट चेंज.. सो सॉरी". सुब्बींनि दिलगीरी व्यक्त केली.
निमित म्हणाला...
"नो इश्यूज... बट शी मस्ट कम द नेक्स्ट टाईम सर"
"ओह श्योर"
"प्लीज"...
दाराकडे हात दाखवत निमितने सगळ्यांना एलेव्हेटरकडे गाईड केले. सगळ्यांच्या मागून चालताना अचानक निमित रेवाच्या कानात पुटपुटला..
"टेक्निकली वुई आर थ्रू... सो सुब्बी अॅन्ड नातू आर ऑलरेडी विथ अस रेवा.. वुई ओन्ली नीड टू टेक केअर ऑफ अरोरा... ओके?"
"हं"
रेवाला कश्यातच स्वारस्य नव्हते. मिसेस सुब्बी न आल्याने हातातील मोगर्याचा गजरा तिने नुसताच बाळगला.
सहाव्या मजल्यावरून शहर झगमगीत दिसत होते. एका अतिशय जाणीवपूर्वक निवडलेल्या टेबलभोवती सगळे स्थानापन्न झाले तेव्हा सुब्बी रेवाकडे बघत म्हणाले...
"आय अॅम सो सॉरी... आमच्या रुक्ष गप्पा तुम्हाला आता ऐकत बसाव्या लागणार... मी आधीच कळवायला हवे होते की विद्या येत नाही आहे म्हणून..."
रेवाने तोंडभर हासत उत्तर दिले...
"छे छे?... त्यात काय इतके? पण पुढच्यावेळी नक्की आणा त्यांना..."
"नक्की नक्की"
त्यानंतर ऑर्डर प्लेस होण्याचा कार्यक्रम झाला आणि मग रेवा ही एकटीच स्त्री असल्याने आणि तिला कंफर्टेबल वाटणे मस्ट असल्याने सुब्बींनी रेवाशी जुजबी चर्चा केली. रेवा एरवी काय करते, तिच्या हॉबीज काय, त्यांची मिसेस काय करते वगैरे चर्चा झाल्यावर आपसूकच बिझिनेसशी संबंधित गप्पा सुरू झाल्या.
तांत्रिकदृष्ट्या मितवा थ्रू असल्यामुळे सुब्बी आणि नातूला काहीच डिस्कस करायचे नव्हते. मात्र सुब्बी निमितशी आंतरराष्ट्रीय व्यापार, शेअर्स, मंदी, विकास असल्या विषयांवर बोलत असताना त्यात व्यत्यय आणून बिझिनेस डिस्कस करणे हे अरोराच्या दृष्टीने प्रोटोकॉलच्या विरुद्ध होते. काही झाले तरी सुब्बी खूपच वरिष्ठ होते. सुब्बी आणि निमितच्या गप्पा सुरू असताना अरोरा त्यांच्या गप्पात ब्रीफली सहभागी होत होता. रेवा मात्र त्या गप्पात काडीचाही इंटरेस्ट नसूनही फक्त त्यातच इंटरेस्ट असल्यासारखे आविर्भाव चेहर्यावर आणत होती. सुब्बींच्या दृष्टीने रेवाचे आता मीटिंगमध्ये काहीच काम नव्हते, पण ती एका बिझिनेस असोसिएटची पत्नी असल्याने तिच्याप्रती योग्य तो आदरभाव राखणे इतकेच ते आपले कर्तव्य समजत होते. अरोराला रेवामध्ये काहीही दिलचस्पी नव्हती कारण त्याच्यामते त्या बिझिनेस डिनरमध्ये ती असण्याचेच कारण नव्हते. नातू मात्र रेवाला पाहिल्यापासून किंचित गढूळला होता आणि रेवाला ते जाणवलेले होते. त्यामुळे नातूकडे ती जवळपास बघतच नव्हती. काही बोललीच तर ती अरोराशी बोलत होती.
अर्ध्या पाऊण तासाने गप्पांचा ओघ निमितने अलगदपणे मितवाच्या काँट्रॅक्टकडे वळवला तेव्हा वेटर सूप आणि कॉकटेल्सचे बोल्स आणि ग्लासेस क्लीअर करत होता. आता निघालेल्या विषयासंबंधात सुब्बींनी फक्त नातूला 'होप द प्रॉडक्ट इज क्लीअर?' असे विचारले आणि नातूने घाईघाईने 'येस सर' असे म्हणून हासत निमित आणि रेवाकडे पाहिले. रेवाने नातूची कीव केल्याप्रमाणे एक स्माईल फेकले.
आता खरी रंगत चढली गप्पांना! कारण आता सप्लाय चेनचा दादा अरोरा आणि मितवाचा ओनर निमित यांची जुंपणार होती. अरोराने इराक युद्ध, चायनातील स्टील रिक्वायरमेन्ट आणि ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील जागतिक मंदी हे विषय आत्ता का काढलेले असावेत याची निमितला पूर्ण जाणीव होती. या विषयांकडून तो शेवटी प्राईस रिडक्शनवर येणार यात शंका नव्हती. एकमेकांना जोखत दोघे वरवर स्टायलिश वाटणार्या पण छुपे निगोसिएशन असलेल्या गप्पा मारत होते. सुब्बींना हे सगळे समजत होते, पण नातूच्या डोक्यावरून जात होते. रेवा हुषार होती. कोणत्या क्षणापर्यंत अरोराच्या बाजूने असल्यासारखे दाखवायचे आणि कोणत्यावेळी कोणाचातरी फोन आला असे दाखवून काही काळ लांब जायचे हे ती अनुभवाने शिकलेली होती. पण ती वेळ लवकर येत नव्हती. रेवा वैतागत होती. आजवरच्या अनुभवानुसार मेन कोर्स सर्व्ह होतो तेव्हा कमर्शिअल्स थ्रू झालेली असतात हे तिला माहीत होते. पण इथे तर मेन कोर्सही संपत आलेला होता.
आणि अचानक अरोरा आणि निमितच्या गप्पा चालू असताना सुब्बींनी काहीतरी लक्षात आल्याप्रमाणे रेवाकडे एकदम बघत विचारले...
"सॉरी... मगाशी तुम्ही काय म्हणालात? ... यू हॅव डन बिझिनेस अॅनलिस्ट्स डिप्लोमा फ्रॉम ओ आर?"
रेवा हबकली. तिच्या अंदाजाने गप्पांच्या सिक्वेन्समध्ये हा प्रश्न, तोही आत्ता, निघणेच शक्य नव्हते. अरोरा आणि निमित आता अक्षरशः बुद्धिमत्तेचा संपूर्ण कस लावून एकमेकांच्या अनुभवाला भिडत होते. मात्र सुब्बींनी विचारलेल्या या प्रश्नामुळे अर्थातच त्यांची ती चर्चा एकदम थांबलीच. हबकलेल्या रेवाने क्षणभर निमितकडे ओझरते पाहात आत्मविश्वासाने सुब्बींना उत्तर दिले..
"येस सर... आय हॅव डन इट"
"अरे देन व्हाय डोन्ट यू जॉईन अस इन एम आय एस? द पोझिशन इज अल्सो गूड... पॅकेज इज एक्सलंट..."
पोटात दचकून खड्डा पडलेला असताना अचानक सुखद कारंजी उडू लागावीत तसा रेवाच्या पोटातून आनंद ओसंडत तिच्या चेहर्यावर सांडला. डोळ्यांमधून तो उघडपणे व्यक्त होत असतानाच तोंडाने मात्र ती म्हणाली...
"आय मीन... आय मीन.. आय डोन्ट नो..."
चुटपुटत निमितकडे बघत ती पुन्हा सुब्बींकडे पाहू लागली. सुब्बींनी एका कोट्याधीशाच्या पत्नीला अॅक्रॉस द टेबल एका अतिशय रेप्यूटेड कंपनीतील उत्तम जागेवरील नोकरीची ऑफर देऊ केली होती. तीही तिच्या नवर्यासमोरच! क्षणाच्या एक लाखाव्या भागात निमितमधील बिझिनेसमन जागा झालस होता आणि रेवाला पुढचे काही सुचायच्या आत म्हणाला होता...
"बाय ऑल मीन्स! वुई बोथ वूड बी ऑनर्ड"
निमितचा डाव सरळ होता. ज्या कंपनीत बायकोच नोकरी करेल, तेही एम आय एस सारख्या इन्फर्मेशनच्या समुद्रात बुडून, तिथे बस्तान बसवणे त्याला अत्यंत सोपे जाणार होते. त्याने रेवाला काही चॉईसच विचारलेला नव्हता. सुब्बी फक्त म्हणाले...
"प्लीज इमेल यूअर सी व्ही अॅन्ड ऑल... अॅन्ड मे बी.. देअर आर सम फॉर्मॅलिटीज.. दॅट्स इट"
त्यांच्यासारख्या कंपनीला कोणीही उमेदवार मिळाला असता. त्यांनी ती ऑफर रेवालाच का केली होती? हा प्रश्न ते सोडून सगळ्यांच्या मनात आलेला होता. तो जाणवताच सुब्बी म्हणाले...
"कॉस्ट सेव्हिंग... यू नो मिस्टर निमित?... इफ आय हॅव टू सोर्स अ कँडिडेट फ्रॉम द जॉब मार्केट... आय हॅव टू पे... "
जोरजोरात हासत निमित म्हणाला...
"सो आय हॅव ऑलरेडी गिव्हन द डिस्काऊंट"
यावर मात्र अरोराही हासला. सुब्बी आणि अरोरांचे हासणे निर्मळ होते. नातूच्या हासण्यात 'रेवा आता रोज दिसणार' याचा आनंद झळकत होता. रेवाला कोणीच काही विचारले नव्हते.
अरोरा आणि निमितच्या पुढच्या डिस्कशनमधील वाक्ये रेवाच्या कानांवर आदळत राहिली. पण अर्थ मनापाशी पोहोचू शकला नाही.
रेवासमोर अनेक प्रश्न होते. फक्त नोकरी करावी की नाही इतकाच प्रश्न नव्हता. ही नोकरी करून किंवा न करून आपण आपल्या आयुष्यात नेमके काय काय हवे ते घडवून आणू शकतो अशी बरीच मोठी यादी होती मुद्यांची!
रेवासमोरचे प्रश्न असे होते:
- नोकरी करावी की करू नये
- केली तर आपल्यातील एक उच्चशिक्षित व्यक्ती योग्य त्या वळणावर आपले आयुष्य नेऊ शकेल का?
- केली तर शीतलला या वयात आईची अधिक गरज असताना आपले नोकरी करणे तिच्यासाठी काही प्रमाणात घातक ठरेल का?
- निमित आपल्या नोकरीमार्फत माहिती काढून स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करेल हे आपल्याला सहन होईल का?
- आपण नोकरी नाही केली तर आपण आयुष्यात नेमक्या कोण बनून राहू?
- ही नोकरी करण्यास निमित मान्यता देत आहे तर मग कोणतीही इतर चांगली नोकरी करण्यासही त्याने मान्यता का देऊ नये?
- आजवर निमितच्या मनात आपल्याबद्दल असा विचार का आला नाही?
- सुब्बींचा आणि त्यांच्या कंपनीचा माणूस शोधण्याचा खर्च वाचवण्याचा फायदा आपण का करून द्यावा?
- ही संधी समोर येईपर्यंत आपण कधीच असा विचार गांभीर्याने का केलेला नव्हता?
- निमितचे आणि आपले यापुढील नाते, नोकरी केली तर कसे असेल आणि नाही केली तर कसे असेल?
- आपण नेहमी निमितचा विचार का करायचा? त्याने आपला विचार नक्की किती वेळा केला आजवर?
- आपल्याला आर्थिक गरज नसताना आपण नोकरीत डोके का शिणवून घ्यायचे?
- आपण कधीकाळी केलेला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आज इतका महत्वाचा का ठरावा?
- ही ऑफर आहे की इतरच काही?
- अशी ऑफर मिळेल यासाठीच हे डिनर आयोजीत करावे असा निमितचा तर प्लॅन नसेल?
- ही ऑफर हा बिझिनेस डीलचा तर एक भाग नसेल? सुब्बी आणि अरोरा यांनी निमितला इंप्रेस करण्याचा?
- माझ्याबाबतीत इतरजण निर्णय घेतात हे मला का मान्य व्हावे? भले निर्णय योग्य असेल तरीही?
- एकदा बाहेरच्या जगात कर्तृत्व दाखवून निमितचा इगोच नष्ट करावा का?
विचारात गढलेल्या रेवाने शेवटी..... अत्यंत सूज्ञ निर्णय घेतला...
=========================================================
नियमावली:
१) कथेचा शेवट अतिरंजीत चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.
==========================================================
रेवा-निमितची भेट होते.
...अँड दे लिव हॅपिली एवर आफ्टर असा शेवट अपेक्षित आहे.
दि. १२ सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता एस टी वायची ही कथा बंद करण्यात येईल.
धन्स गं उदार मनाबद्दल.
धन्स गं उदार मनाबद्दल.
धीस इज सिंपली ऑस्सम!!!
धीस इज सिंपली ऑस्सम!!!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
गणराया सर्व कथाकरांना असेच काहीतरी मनोरंजक लिहीण्याची सुबुद्धी देवो!
माझा रूमाल
माझा रूमाल
त्याच वेळी नातूचा शर्ट पाठून
त्याच वेळी नातूचा शर्ट पाठून कोणी तरी खेचला. नातूने मागे वळून पाहिले तर
एक भिकारी त्याच्या शर्टाचे टोक खेचत होता. background ला दुसर्याने गाणे सुरू केले "शिरडी वाले साईबाबा"
>>>>>> नातूनं लगेच ते गाणं थांबवलं. गाण्याचे शब्द 'गलबला' वृत्तात बसत नसल्याने त्याला ते अजिबात आवडलं नाही. इतरांनी नजरनंच का होईना पण बरंच काही खाऊन घेतल्याने आता त्यांना झोपेची गरज आहे असं नातूला आतून वाटलं. त्यानं त्या भिकार्याला शिरडीवाले ऐवजी एखादी ताजी, फडकती गजलांगाई गाण्याची फर्माईश केली.
मात्र त्याच वेळी त्याला या नंबराची आठवण झाली आणि तो गझलेच्या तालावर सूर्यनमस्कार घालू लागला. शेजारच्या बाकड्यावरून एक नवसिक्सपॅक्स्कुलोत्पन्न तरूण त्याच्या सूर्यनमस्कारांकडे डोळ्यात तेल घालून बघत होता. त्या तरूणानं हातातली पॅरॅशुट ऑईलची बाटली बाजूला ठेवली आणि तो नातूच्या नमस्कारांकरता एक ते बारा आकडे म्हणायचं काम करू लागला.
रेवा ऊर्फ रुखसानाला आता शीतलची खूपच आठवण येऊ लागली. कारण तिनं आजची संध्याकाळची दोघींकरता पेडीक्युअरची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. आपण नाही तर शीतलंनं तरी पेडीक्युअर करून घ्यावं म्हणून तिनं शीतलला फोन लावला .......
अचानक भिकार्याच्या झोळीतून फोन वाजू लागला. आँ? हा काय योगायोग? असं म्हणत असतानाच भिकार्यानं तो फोन बघितला आणि सुरू करून कानाला लावला.
"हाय आई!" शीतलच होती ती.
"शीतल??????? अगं तू भिकार्याच्या वेषात गाडीमध्ये गाणी का म्हणतीयेस?"
"एक्स्ट्रॉचा पॉकेटमनी मिळवायला. आता मला जास्ती पैसे मिळवायला लागणार आहेत." फोन बंद करून शीतलनं आईला सांगितलं.
"अगं कार्टे लाज नाही का वाटत तुला? आईवडील इथे काबाडकष्टानं स्मगलिंग करून पै पै जोडतायत आणि तुला हे असे भीकेचे डोहाळे???"
"अजून डोहाळे लागले नाहीयेत आई. उगाच नाही नाही ते बोलू नकोस. आत्ताशी कुठे दोन महिने पूर्ण होताहेत."
शीतलनं न.सि.पॅ.कु. तरूणाकडं लाजून एक चोरटा कटाक्ष टाकला. खरंतर ती आज त्याच्याबरोबर चैन्नईला पळून जाऊन लग्न करणार होती. कोणी ओळखू नये म्हणून तिनं भिकार्याचा वेष धारण केला होता. वातावरण निर्मितीकरता आणि नवीन संसारात तेवढाच तेलामीठाला आधार म्हणून ती गाणीही म्हणत होती. पण.......
शेवटी आईचा फोन आल्यावर सगळं विसरून तिनं फोनला उत्तर दिलं. भलेभले सांगून गेलेच आहेत की .... आईच्या ममतेपुढे आणि मागेही अनेक मैलांपर्यंत काही नसतं. शीतलला आज याचाच प्रत्यय आला होता.
झंपी, मी लिहिण्याच्या मोडात
झंपी, मी लिहिण्याच्या मोडात असल्याने तुझा रूमाल न पाहता आधीच चादर आंथरली. आता ग कसं करायचं? तू लिहित असशील तर काढून टाकते.
हरकत नाही, मी टायपत होते...
हरकत नाही, मी टायपत होते... आता बदल करून टाकते.
तोवर माझा रूमाल
आई गं .. मेले हसुन हसुन
आई गं .. मेले हसुन हसुन हापिसात.. काय टिवस्ट दिलेत
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मस्त चाललिये सुतकताई. बाकीचे
मस्त चाललिये सुतकताई. बाकीचे कताईवीर कुठे आहे दिवसपाळीतले?
लुनावाल्या ब्रह्मेंकडुन थोडे
लुनावाल्या ब्रह्मेंकडुन थोडे सुत कातून घ्या!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काहीच्या काही सु क चालली आहे!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
(No subject)
शीतलचा फोन ठेवल्यावर रेवा
शीतलचा फोन ठेवल्यावर रेवा उगीचच विचारात पडली.
आजवर मुलीला केलेले संस्कार कशी काय विसरू शकते? नाही... मी हे मुळीच होवु देणार नाही.
ह्या विचारातच असताना तिला आठवले की, शीतलचा जन्माबद्दलचे गुपित.
रेवा एकदम भूतकाळात गेली...
तो दिवसच तसा होता.. मुसळधार पाउस होता.. त्यावेळी आम्ही भाड्याच्या बंगलीत रहात होतो.. कामाचा जम बसला न्हवता. निमित कामानिमित्त खंड्याळ्याला गेला होता.
कामवालीनेही रोजच्यासारखीच दांडी मारली होती. वडा पाव खावून ती सुस्तावलेली होती. गुलाम अलीच्या गाण्याने एकदम वेगळाच मूड झाला होता आणि अचानक... दारावरची बेल वाजली...
पुर्ण चिंब भिजलेला,मजबूत शरीरयष्टीचा, पांढरा शर्ट घातलेला एक तरुण दारात उभा होता...
जरासे नीट न्याहाळले वर ती जवळ्जवळ किंचाळलीच... राज.. तू?
तरुणाने पण तीच प्रतिक्रिया दिली. रेवा? रेवाच ना तू?
माझी गाडी बंद पडली म्हणून मदत मिळते का बघत मी इथे आलो... इति राज.
पटकन त्याला आत घेवून रेवाने दार लावले. त्याला अंग पुसायला टॉवेल देता देता.. भिजलेल्या शर्टातून दिसणार्या सिक्स पॅक कडे तिचे लक्ष गेले.. ह्म्म्म.... बरा दिसतो आता. कॉलेजला असताना बराच वरण भात टाईप होता. दहा दहा वडा पाव खायचा... विचारातच ती खुदकन हसली.
थोड्याच वेळात रंगीत पाण्याबरोबर त्यांच्या कॉलेजच्या गप्पा रंगल्या. त्या दिवसाची परीणीती हि आजची शीतल होती... इतकी वर्षे निमितला ह्याचा पत्ता लागू दिला न्हवता. आणि हे सत्य कोणालाच कळले न्हवते. निदान असा तिचा समज होता. आणि इतक्यात विचारातून रेवा अचानक जागी झाली ती फोनच्या रींगने.
पलीकडून भयाण हास्याचा आवाज करत कोणीतरी म्हणाले, तुला काय वाटले हे सत्य कोणालाच कळणार नाही? मी कोण हे विचारण्याच्या आधी आजच्या आज तू कोकण रेल्वे पकडून मालवणला निघून ये...१ करोड घेवून.
रेवा घाबरली .. अहो पण तुम्ही कोण? आणि......
.
रेवा चे गोलपोस्ट गोल
रेवा चे गोलपोस्ट गोल मारायच्या आधीच बदलतायत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निर्णय काय घेणार कप्पाळ . धमाल चालू आहे.
व्हॉट ?? रेवाला कळेचना. मग
व्हॉट ?? रेवाला कळेचना.
मग पहिले तर टायगर तिच्याकडे बघून खो खो हसत आपला फोन बंद करत होता!!
दुष्ट ! भलत्या वेळी चेष्टा ! रेवाने हातातला फोन खिडकीबाहेर फेकला.
एव्हाना भिकारी उतरून गेले होते . नातू त्य्यांच्या मागे गुफ्तगू करायला पळाला.
"सो... व्हेर वेर वी " - टायगर त्याच्या डीप आवाजात म्हणाला ...
"ह्म, माझा पीछा सोडणार नाहीस तर तू"
" एक बार जो मैने कमिटमेन्ट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता"
" चल्ल वात्रट कुठला"
तेवढ्यात बाहेर दूधसागर धबधबा दिसू लागला होता. दोघांनाही तो माहोल पाहून खंडाळ्याची आठवण येऊ लागली.... गाडी हळू हळू स्लो डाउन झाली .....
पुढच्या स्टेशनात दुबईच्या
पुढच्या स्टेशनात दुबईच्या कंपनीला चढवल्याशिवाय गाडी पुढे नका हो जाऊ देऊ.
मी येते थोड्या वेळाने
टायगरला अशी भलत्या वेळी
टायगरला अशी भलत्या वेळी चेष्टा करायची सवयच होती. रेवाला आठवलं एकदा तिच्याकडून अतिशय मोठ्या क्लायंटच्या काही ट्रेड्स चुकीच्या बूक्सवर टाकल्या गेल्या होत्या. रेवा भयंकर घाबरली. ऑफिसमध्ये फार लोक नव्हते. मार्केट बंद झालेले त्यामुळे ट्रेडर्स सगळे घरी गेले होते. अचानक तिला टायगर उर्फ ट्रेडरच्या डेस्ककरून शीळ घातल्याचा आवाज आला. रेवाला धावतच टायगरच्या डेस्ककडे गेली. टायगर मात्र तिला बघून फारसा खूश दिसला नाही. तिची कहाणी ऐकल्यावर तर तो जोरात, 'ये क्या किया? You are fired' असं ओरडला. रेवा रडकुंडीस आली. खाली मान घालून ती वळली आणि त्याच त्या गडगडाटी हास्याने जोरात दचकली. टायगरने तिची मदत केली मात्र एका अटीवर. त्याने काही खास अकाउंटच्या ट्रेड्स एका विशिष्ठ बुकला ट्रान्सफर करण्यास रेवाला सांगितले. रेवा आपल्या कामात हुशार असली तरी ह्या खेळात मुरलेली नव्हती. टायगरने नेमके हेच हेरले. रेवा त्याच्या रुपावर, हुशारीवर आणि गडगडाटी हास्यावर भाळली होतीच. तिने मागचा पुढचा विचार न करता टायगर म्हणेल त्या ट्रेड्स त्याला हव्या तशा बुक्सवर ट्रान्सफर करून द्यायला सुरूवात केली. हा सगळा उद्योग टायगर कुणासाठी करत होता ह्याची भोळ्या रेवाला सुतराम कल्पना नव्हती. भाई आणि गँग टायगरला भरभक्कम मोबदला देत होती. त्याने रेवाला प्रेम आणि फसवणूकीच्या अनोख्या दुनियेत ओढले आणि रेवा खेचली गेली. आता टायगरला त्याच्या उद्योगांत मनपसंद साथी मिळाला होता. पण म्हणतात ना मांजर डोळे मिटून दूध प्यायले तरी इतरांना ते दिसतेच. फ्रॉड केल्या कारणावरून रेवा आणि टायगरची कंपनीतून हकालपट्टी झाली आणि मग सुरू झाला कधी न संपणारा पाठशिवणीचा खेळ.....
रेवथी आणि ट्रेडरची कंपनीतून हकालपट्टी झाली तरी भाई त्यांच्या हुशारीवर भयंकर खूश होता. त्याने रेवा आणि टायगरला आपल्या पंखांखाली घेतले. रेवा आणि ट्रेडर झाले रुखसाना आणि टायगर. रुखसानाने पुढे रुपं बदलली तरी टायगर आणि त्याचे गडगडाटी हास्य बदलले नाहीत. भाईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक मिशन्स यशस्वी केली. प्रत्येकवेळी नवे ठिकाण, नवे फ्रॉड्स आणि नवे पोलिस. एक अपवाद वगळता त्यांना तुरुंगाची हवा लागण्याची वेळ आली नव्हती. त्याला कारण सुद्धा तसेच होते. तुरुंगातली ती एक रात्र त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी रात्र ठरली. देशद्रोहाच्या मार्गावरून देशसेवेच्या मार्गावर आणणारी ती रात्र. 'रॉ' संघटनेचे तेव्हाच्या चीफ सेक्रेटरी सिमरन वेदी त्या रात्री त्यांना येऊन भेटल्या. वाममार्गाला लागलेले तरुण रक्त योग्य वळणावर आणण्यासाठी एक प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला होता. अनेक तासांच्या कौन्सिलिंगनंतर रेवा आणि टायगर रॉ तर्फे एजंट म्हणून काम करायला तयार झाले. मात्र हे काम त्यांना हुशारीने पडद्याआड राहून करायचे होते. भाई आणि गँगची पाळंमुळं खणून काढायचे काम प्रचंड खबरदारी घेऊन करायचे शिवधनुष्य त्यांनी पेलले होते. बदल्यात 'रॉ''ने त्यांची तुरुंगात 'न' जाण्याची सोय केली होती.
"सल्लाम वालेकुम रुखसाना भैन" भाईचा आवाज आणि रुखसाना नाव ऐकून भर दिवसा रेवा आणि टायगरच्या डोळ्यांसमोर तारे चमकले. एक क्षण आपण छेनै एक्प्रेसमध्ये आहोत की भाईच्या दुबईमधल्या आलीशान महालात हेच त्यांना कळेना. भाईसोबत सगळी गँग बघून त्यांना आनंद, आश्चर्य आणि भिती अशा संमिश्र भावनांनी घेरले आणि कानात गाणे वाजू लागले, 'ये कहां आ गये हम....'
झंपी, >> आजच्या आज तू कोकण
झंपी,
>> आजच्या आज तू कोकण रेल्वे पकडून मालवणला निघून ये...१ करोड घेवून.
मालवणात कोकण रेल्वेने?
मग त्यापेक्षा फ्रंटियर मेलने दुबई गाठणं बरं नाही का पडणार?
आ.न.,
-गा.पै.
इथ बी शंका? आता कथेचा शेवट
इथ बी शंका?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आता कथेचा शेवट करा,,,,
राजतिलक पार्ट 2 होऊ लागला आहे आता![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मला तरी हीच कथा पुढे न्यावी
मला तरी हीच कथा पुढे न्यावी असे वाटतेय. इथे पात्रे एस्टॅब्लिश झालीत. तिकडे सध्या तरी काही लिहिणार नाही मी.
आणलं सगळ्यांना ट्रेनमध्ये.
आणलं सगळ्यांना ट्रेनमध्ये. आता लिहा.
गाडी हळू हळू स्लो डाउन होऊन
गाडी हळू हळू स्लो डाउन होऊन थांबलीच .....
सतरा अँबेसिडर गाड्यांचा ताफा घेऊन नावेद भाई आणि गँग येऊन पोहोचली आणि गाडेत चढली पण होती!
पण गाडी थांबली त्याला कारणही तसेच होते !
गाडीच्या समोर रुळसमोर एक मोठा जनसमुदाय पांढर्या स्वच्छ सदरा- लुंगी अशा वेषात तलवारी , बंदुका इ. घेऊन उभा होता. त्यांच्या सगळ्यात पुढे स्वतः थलैवा हात वर करून ट्रेन ला थांब! असा इशारा देत उभे होते !! कपाळाला गंध , अंगात पांढरा सदरा, गळ्यात चेन,पांढरी लुंगी , कमरेला जाड चामड्याचा बेल्ट, डोळ्याला ङॉगल्स, हातात अंगठ्या असा थाट आहे थलैवाचा!! चेहरा कमालीचा सात्विक अन शांत ! गॉगल्स्च्या आडचे डोळे मात्र भयंकर भेदक! त्यामुळे तशीच वेळ आल्याशिवाय ते गॉगल्स काढत नाहीत!
रेवा आणि टायगर ने ते पाहून आपाप्सात नेत्रपल्लवी केली अन ते दोघे दोन फोनवर पलिकडे भराभर सूचना देऊ लागले. दिलीहून स्पेशल टास्क फोर्स तातडीने मागवावा लागणार होता.
इकडे भाईने त्याचे खास पंटर्स अन शार्प शूटर्स - शाणा सुलेमान अन छप्पन टिकली - दोघाना इशारा केला - दोघेही समजले की त्यांना काय करयाचेय ...!
सध्या तरी रेवा/ रुक्साना/
सध्या तरी रेवा/ रुक्साना/ टायग्रेस अन टायगर हे रॉ एजन्ट्स आहेत ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रेवा / रुख्साना कोणीही असू शकते म्हणा - डबल एजन्ट ?!!
अरे देवा! विसरलेच की. आता
अरे देवा! विसरलेच की. आता त्यांना डबल एजंट करा.
आता सगळ्यांनी "मद्रास कँफेत "
आता सगळ्यांनी "मद्रास कँफेत " चला,,, विक्रमसिंग वाट बघतोय
उदयन, तुम्हीच का नाही लिहायला
उदयन, तुम्हीच का नाही लिहायला सुरूवात करत ?
रेवा आणि टायगर ने ते पाहून
रेवा आणि टायगर ने ते पाहून आपाप्सात नेत्रपल्लवी केली अन ते दोघे दोन फोनवर पलिकडे भराभर सूचना देऊ लागले. दिलीहून स्पेशल टास्क फोर्स तातडीने मागवावा लागणार होता.
दिल्लीच्या फोनवर केलेला कॉल reroute होऊन विक्रम सिंगपर्यंत आला. त्याने चढवलेल्या गॉगल्स मधे त्याला रेवाचा फोन नंबर दिसला. google glasses च्या हुशारीचे कौतुक करत त्याने तो कॉल घेतला. throat mike मूळे तो काय बोलतोय हे बाजूला उभ्या राहणार्याला सुद्धा ऐकायला येत नव्हते. RAW ने सुरू केलेल्या technology drive चा कमाल होता. विक्रम सिंघला आपले लंकेचमधले जुने दिवस आठवले. तिथे साधा सेल फोन पण नसल्यामूळे दर वेळी कोणालाहि फोन करायला public फोन पर्यंत धावयला लागायचे. अशा धामधुमीत माजी पंतप्रधानांपर्यंत वेळेत पोहोचू न शकल्यामूळे त्यांचा बॉम्ब्स्फोटांमधे हत्या झाली होती. तो सल विक्रमसिंगला अजून छळत होता. "अपने साफ दामन पे लगा हुआ बद्दा दाग" पुसून टाकायचा त्याचा हा शेवटचा प्रयत्न होता. दुबईच्या भाईला रंगे हाथ पकडून 'अपने खानदान का नाम उंचा" करण्याची त्याच्या आईची आखरी ख्वाईश त्याला पुरी करायची होती. ते काम होईतो मद्रास कॅफे मधे बसून आपल्या हातावर गोंदलेले 'मेरे बापने एक नमकूल को जना था' हे गोंदण काढायची त्याची तयारी नव्हती. मद्रास कॅफेमधे ते गोंदण बघून कळवळलेल्या रेवाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर चमकला. आपल्या नव्या रुपात रेवा आपल्याला ओळखणे शक्य नाही ह्या विचाराने डोळ्यात पाणी आले. ते अश्रू पुसून काढायला त्याने डोळ्यांवरचा गॉगल काढला.
चेन्नई express मधून खाली उतरलेले रेवा नि टायगर समोर कोण आहे ते बघत होते. तेव्हढ्यात थलैवा ने आपला गॉगल काढला नि गॉगलच्या पाठी लपलेला चेहरा बघून रेवा बेशुद्ध झाली.
टायगर मात्र पुटपुटत होता "गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा"
मोबाइल वर आहे
मोबाइल वर आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
असाम्या, प्लीजच आता इतक्या
असाम्या, प्लीजच आता इतक्या सगळ्या पात्रांना नजरानजर करायला लावू नकोस. एकता कपूरची शिरेल होईल नाहीतर ही!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्रत्येक नजरा नजरी सोबत एक
प्रत्येक नजरा नजरी सोबत एक क्लोजप अन ढ्यांऽग!! असं वाजवायचे नेपथ्य मी सांभाळतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रच्यकने : "ङॉगल्स" हे कसे काय उच्चारायचे?
एकता कपूरची शिरेल होईल नाहीतर
एकता कपूरची शिरेल होईल नाहीतर ही! > >अजून नाहिये का ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
उदयन घे तुझा विक्रम सिंघ घातला express मधे.
>> 'मेरे बापने एक नमकूल को
>> 'मेरे बापने एक नमकूल को जना था'![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नामाकूल. त्यातला फक्त नामा काढला की झालं.सगळं गोंदण काढायची गरज नाही.
Pages