Submitted by दिनेश. on 9 September, 2013 - 08:56
या सहलीचा शेवटचा टप्पा आहे हैदीलॅंड. हा हैदी म्हणजे एका स्विस परीकथेचा नायक. त्याची कथा म्हणजे तशी नेहमीचीच.. अनाथ मुलगा, त्याची सावत्र आई वगैरे. पण ही कथा ज्या परीसरात घडली असे मानतात, ती
जागा म्हणजे हैदीलँड.
परत परत जावेसे वाटावे अशी ही जागा. तुमचे नाव हैदी किंवा पीटर असेल तर इथे तुम्हाला एक चॉकलेट बक्षीस मिळते.
कथा मी नीट ऐकली नाही. विस्तीर्ण कुरणे, त्यात चरणार्या गायी, फळांनी लगडलेली चेरी / पेअर्स / सफरचंदाची झाडे, सभोवार फुललेली अनोखी फुले, देखण्या पायवाटा, सुबक पुष्करणी, विस्तीर्ण दरीकडे बघत निवांत बसावे अशी जागा..(. परीराज्य आणखी काय वेगळे असते हो ? )
आणि मग ढग दाटून आले, गडगडासह पाऊस पडू लागला, तर तुम्ही पण माझ्याबरोबर हुदडायला यालच ना ?
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. रस्त्याच्या फोटोने
मस्त. रस्त्याच्या फोटोने कुर्गची आठ्वण आली.
खूप सुंदर, त्या रस्त्याचे
खूप सुंदर, त्या रस्त्याचे फोटो बघून नागमोड्या वाहणा-या नदीची आठवण झाली.
११ आणि २८ हे रस्ते केवळ पायी
११ आणि २८ हे रस्ते केवळ पायी चालण्यासाठी आहेत.
११ आणि २८ चा खास उल्लेख वाचून
११ आणि २८ चा खास उल्लेख वाचून परत तिकडे गेलो. 'पायी' वापर करणार्यांसाठी ही चांगलीच व्यवस्था मानली पाहिजे. ११ नंबरच्या फोटोमध्ये उजव्या हाताला कुत्र्याचे एक चित्र दिसत्ये....[म्हणजे तो कुत्रा असावा असे वाटते].... त्याचा अर्थ 'या रस्त्यावर कुत्र्यांना आणू नये..." अशा अर्थाची सूचना आहे का ती ?
नंबर २४ देखील खूप देखणा फोटो आहे.
अशोक, कुत्रा आणला तर त्याच्या
अशोक,
कुत्रा आणला तर त्याच्या गळ्यात पट्टा असावा, अशी पाटी आहे ती. ( मोकळी कुरणे, गायी आणि बकर्या बघून कुठला कुत्रा ताब्यात राहील ? )
अगदी क्वचित ठिकाणी कुत्र्यांना मोकळे सोडायच्या जागा असतात.
मस्त. १६ वा फोटो अनुभवायलाच
मस्त. १६ वा फोटो अनुभवायलाच हवा असे वाटले. शांत, निवांत क्षणी त्या बाकड्यांवर बसून समोरचा देखावा बघत 'तनहाइ' अनुभवण्याचे perfect ठिकाण. सोबतीला त्या मागच्या जलधारेचे संगित.
मस्त फोटो दिनेशदा माधव, +१
मस्त फोटो दिनेशदा
माधव, +१
नेहमीप्रमाणेच मस्त फोटो.
नेहमीप्रमाणेच मस्त फोटो.
दिनेशदा, हैदी ही एक मुलगी आहे. ती अनाथ असते आणि तिच्या आत्यानं तिचा सांभाळ केलेला असतो. पण पुढे आत्याला नोकरीकरता शहरात जायचं असल्याने ती हैदीला तिच्या आजोबांकडे स्विस आल्प्स पर्वतांत रहायला पाठवते. पीटर हा तिचा मेंढपाळ मित्र असतो. ही एक स्विस लोककथा आहे.
हैदीची माहिती इथे मिळेल.
दिनेशदा, तो पाचवा फोटो मजेशीर
दिनेशदा, तो पाचवा फोटो मजेशीर आलाय. झाडावरून ते गृहस्थ डोकावून बघताहेत असं वाटतंय.
वाह, सर्व प्र चि अतिशय सुंदरच
वाह, सर्व प्र चि अतिशय सुंदरच .....
मामी, तो ड्रायव्हर.. कथा
मामी, तो ड्रायव्हर.. कथा वाचायची राहिलीच.
हो माधव, त्या ठिकाणाहून पायच निघत नव्हता.. ( तिन्हीसांजा सखे मिळाल्या.. )
वा सगळे फोटो सुंदर आहेत.
वा सगळे फोटो सुंदर आहेत.
सगळे फोटो सुंदर!! (आता नविन
सगळे फोटो सुंदर!! (आता नविन शब्द सुचत नाहियेत!) विशेषत:१२ आणि १७ ते २१ हे फोटो विशेष आवडले.
सुंदर फोटो... चेरीज बघुन
सुंदर फोटो...
चेरीज बघुन ..........
खिडकीतला फ्लॉवरबेड मस्त.... त्या घराबाहेर बाहुल्या बसल्यात हवा खात शिळोप्याच्या गप्पा हाणत.
साधना, त्या फुलांचा किंवा अशी
साधना, त्या फुलांचा किंवा अशी खिडकीत फुले लावायच्या प्रथेचा संबंध चक्क आमच्या आफिकेशी आहे.
स्विस लोक भटकंतीसाठी ज्यावेळी आफ्रिकेत आले तेव्हा त्यांना असे आढळले कि तिथे काही फुलझाडे
मुद्दाम खिडकीत लावतात. असे केल्याने बरेच किटक घरात यायला अटकाव होतो. स्विस लोकांच्या गायी गुरांमूळे त्यांना किटकांचा त्रास होतच असणार.
पण आफ्रिका म्हणजे आफ्रिकेतला नेमका कुठला देश आणि नेमकी कुठली फुलझाडे, ते मात्र मला कळले नाही.
या प्रथेला त्यांनी दिलेले सुंदर रुप मात्र नंतरचे.
तुमचे नाव हैदी किंवा पीटर
तुमचे नाव हैदी किंवा पीटर असेल तर इथे तुम्हाला एक चॉकलेट बक्षीस मिळते. >> पारपत्र दाखविल्यानंतर ...
मस्त फोटोज ! किशोर चिनी
मस्त फोटोज !
किशोर चिनी लोकांसारखं सांगायचं माझं भारतीय नाव क्ष आहे व इंग्रजी नाव पीटर आहे
हे सर्व फोटो बघितल्यावर
हे सर्व फोटो बघितल्यावर आपल्या हिमाचल प्रदेशाचि आठवण येते.
एकसे एक देखणे फोटो आहेत. हा
एकसे एक देखणे फोटो आहेत. हा परिसर सर्वात जास्त आवडला. अगदी निरव शांतता असेल नाही तिथे? जवळपास रहाणार्यांचा हेवा वाटला. तिथे रहणाना कायमचे पिकनिक
हायडीची गोष्ट माझ्या आणि मुलाच्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे. त्यातले कुरणांचे वर्णन इथे डोळ्यांना बघायला मिळतेय जसेच्या तसे.
सई, खुप शांतता होतीच. इथे
सई,
खुप शांतता होतीच. इथे वाहनांना बंदी आहे. चालतच जावे लागते.
आणि नीलला दाखव नक्की हे फोटो.
२४ मस्त आहे. Typically Swiss.
२४ मस्त आहे. Typically Swiss.
सही आहेत सर्वच प्रचि. सहा
सही आहेत सर्वच प्रचि.
सहा नंबरचं झाड कसलं डेरेदार आहे. त्याखालच्या सावलीत हेडफोनवर डॉल्बी* प्लेयर वर गाणी ऐकत बसावंसं वाटतंय :).
* ध्वनीचे जादूगार रे डॉल्बी गेले
खुपच छान फोटो आहेत.
खुपच छान फोटो आहेत.