लेडी फिंगर कुकीज १२-१५
कन्डेन्स मिल्कचा डब्बा
क्रीम चीज (फॅट फ्री सुद्धा चालेल.) एक पॅक
१/२ कप एक्स्प्रेसो पावडर (नसेल तर कोणतीही इस्टंट कॉफी)
कुल व्हिपचा डब्बा १/२ ते एक
चॉकोलेट चांगल्या प्रतिचे .( चिप्स किंवा वेळ असेल तर चॉकोलेट कर्ल्स )
क्रीम चीज आणि कंडेन्स मिल्क एकत्र करुन चांगले बीट करुन घ्यायच. आता अगदी हल्क्या हाताने त्यात कुल व्हिप फोल्ड करुन घ्यायचे. (कुल व्हिप ऐनवेळी फ्रीजमधून बाहेर काढावे. )
ब्लॅक कॉफी करुन त्यात कुकीज जस्ट डीप करुन त्यांचा एक लेअर glass bowl / trifle bowl मध्ये तयार करुन घ्यावा.
त्यावर वरची क्रीम रेसीपीचा एक लेअर द्यावा.
वरच्या दोनही स्टेप दोनदा कराव्यात.
वरती पावडर कॉफी भुरभुरावी.
आता चॉकोलेट कर्ल्स (चॉकोलेटचा ब्लॉकला व्हेजीटेबल पीलर वापरून तयार करता येतात.) चा एक थिक लेअर देवून घ्यावा. (वेळ नसेल तर चॉकोलेट चीप्सचा लेअर करुन घ्यावा)
अगदी छान थंड करुन घ्यावे. आणि सर्व्ह करावे.
ओरिजिनल रेसीपी मध्ये कॉफी तयार न करता प्रत्येक लेअरला कॉफी पावडर भुरभुरवायला (कसला क्युट शब्द आहे हा) सांगितलेल. तस केल तरी चालेल. तेवढीच एक स्टेप कमी.
मोठ्या बोल मध्ये एकदम अॅरेंज न करता individual glass मध्ये अॅरेंज केले तरी चालेल.
स्टेप्स खुप कमी आहेत. पण तसे सांगू नये. दिवसभर किचन मध्ये काम केल्यासारखा चेहरा करावा आणि क्रेडीट घ्यावे.
कुल व्हिपचा डब्बा १/२ ते
कुल व्हिपचा डब्बा १/२ ते एक
<<<हेच एक नाहीये घरात. याला काही पर्याय आहे का?
थँक यू सीमा लगोलग रेसिपी
थँक यू सीमा लगोलग रेसिपी दिल्याबद्दल.
नंदिनी अमूल क्रीम फेटून घेतलं तर चालेल.
सीमा --- yummy .... -फोटो
सीमा --- yummy .... -फोटो ??????
मस्त प्रकार आहे. घरात काय्काय
मस्त प्रकार आहे. घरात काय्काय आणि बाजारात काय्काय मिळतेय ते बघतोच आता.
सीम ऑनेस्टली मला तु वापरलेले
सीम ऑनेस्टली मला तु वापरलेले अर्धे शब्द समजले नाहीत. (हामाबुदो)
उदा. लेडी फिंगर कुकिज ? यू मिन भेंडीची बिस्किटं? (मी कध्धी ऐकली नाहियेत)
कन्डेन्स मिल्क - ही काय भानगड आहे? शिवाय कुल व्हिप? म्हण्जे काय? इव्हन मला चॉकोलेट कर्ल्स म्हणजे काय, ते ही माहित नाहीये.
त्यातल्या त्यात कुल व्हिप म्हणल्यावर मी एखादा क्रिमचा प्रकार असेल असं इमॅजिनलं होतं पण "आता अगदी हल्क्या हाताने त्यात कुल व्हिप फोल्ड करुन घ्यायचे."" --> हे वाचल्यावर दांडी उडाली. फोल्ड करायचं म्हणजे पेपर असतो का हा एखादा?
मी अत्यंत अज्ञानी आहे
आणि दुर्दैवाने यात घालावे लागणारे बरेच पदार्थ माहित नसल्याने चव इमॅजिन करू शकले नाही.
पण >> स्टेप्स खुप कमी आहेत. पण तसे सांगू नये. दिवसभर किचन मध्ये काम केल्यासारखा चेहरा करावा आणि क्रेडीट घ्यावे >> हे वाक्य जबरी आहे. खूप हसले.
दक्षे, यातल फक्त कन्डेस्न्ड
दक्षे, यातल फक्त कन्डेस्न्ड मिल्क माहित आहे मला ते पण ईन्स्टंट खरवस करताना नेस्ले चा एक टिन मिळतो, बासुंदी मध्ये वगैरे वापरु शकतो..
बाकी च्या बाबतीत मी पण अडाणी..
दक्षे, ज्योकच केला आहेस.
दक्षे, ज्योकच केला आहेस. भेंडीची बिस्किटे
आणि भारतात सगळे जिन्नस याच नावाने मिळतात.
मस्त रेसिपी! ह्यात क्रिम चिज
मस्त रेसिपी! ह्यात क्रिम चिज ऐवजी मस्करपोने चिज वापरले तरी छान लागते.
>>स्टेप्स खुप कमी आहेत. पण तसे सांगू नये. दिवसभर किचन मध्ये काम केल्यासारखा चेहरा करावा आणि क्रेडीट घ्यावे.>> हि टिप फ़ारच आवडली!
सीमा रेसिपी खूप छान आहे. मी
सीमा
रेसिपी खूप छान आहे. मी एकदा बार्बेक्यु नेशनमधे हे खाल्ले होते, फार आवडले होते. सोपे वाटतेय करायला. फक्त लेडी फिंगर कुकिजचा फोटो टाकता येईल का? मी गुगल करून बघितले पण नीटसे कळले नाही कसे दिसते ते.
दक्षिणा
फोल्ड करायचं म्हणजे पेपर असतो का हा एखादा? >> माझ्या माहितीप्रमाणे फोल्ड करणे म्हणजे एखाद्या जड मिश्रणामधे हलके मिश्रण हळुहळू एकाच बाजूने फिरवून मिसळणे. (उदा. अंड्याच्या मिश्रणात चॉकोलेट पावडर) बेकिंगमधे ही टर्म बरेचदा वापरतात. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
फोल्ड करायचे म्हणजे हलक्या
फोल्ड करायचे म्हणजे हलक्या हाताने मिसळायचे म्हणजे त्या इमल्शन मधे मिसळलेली हवा, बाहेर निघून जात नाही.
तसेच कट अँड फोल्ड अशीही एक पद्धत असते. यात भांड्याच्या मधे कापल्यासारखे करुन बाकीचा अर्धा भाग उरलेल्या अर्ध्या भागावर टाकायचा. मग भांडे ९० अंशात फिरवायचे आणि परत असेच करायचे. काही केक्सच्या
मिश्रणासाठी असे करावे लागते.
भारतात, गोड चवीची कुठलीही लांबट बिस्किटे वापरता येतील. मी बॉन बॉन ची वापरली होती.
दक्षिणातै.. मी पण आहे तुझ्या
दक्षिणातै.. मी पण आहे तुझ्या बरोबर.. उसगावात खाल्ला होता तेव्हा आवड्ला
प्लीज उत्तरे द्या हं
भारी. यात कच्च अंड घालायचं
भारी. यात कच्च अंड घालायचं नसल्याने नक्की करणार.
दक्षिणा, गूगलशी मैत्री कर की.
मस्त मस्त!
मस्त मस्त!
फोल्डिंगवर यू ट्यूब वर पण
फोल्डिंगवर यू ट्यूब वर पण व्हिडिओज आहेत.
सीमा टीप भारीच आवडली.
हे हॉलिडे सिझन ला नक्की करणार!
हा घ्या फोटो. गुगल वर मिळाला.
हा घ्या फोटो. गुगल वर मिळाला. छानच रेसिपी सीमा. अंड नसल्याने नक्किच करून बघणार.
लेडी फिंगर कुकीज
लेडी फिंगर कुकीज
मस्तानी, हो हो असच दिसत ते.
मस्तानी, हो हो असच दिसत ते. थँक्स गं.
मी पण फोटो टाकते येत्या वीक मध्ये.
Photo kadhnya adhi mala phone
Photo kadhnya adhi mala phone kar ga. Yete lagech khayla :p ekdum tompasu
डोना हेज फास्ट आणि सिंपल
डोना हेज फास्ट आणि सिंपल मध्ये तिने काय करावे? कोफी केली काळी, कुकीज होत्याच. मग क्रीम काय ते
मिसळून घेतले. मग एका प्लेटीत क्रीम चा एक डाव, दोन बिस्किटे आणि एका शॉट ग्लास मध्ये कॉफी.
बिस्किटे कॉफीत बुडवून, क्रीमला लाऊन खावी म्हणे. सो सिंपल. मॉस्त लागते पण हे स्वीट.
सीसीडी मध्ये एक २० रु ला चॉकोलेट शॉट मिळतो तो आणून त्यात बिस्किट घालून खाल्ले तरी चलेगा.
दक्षिणा>> संपूर्ण पोस्टला
दक्षिणा>> संपूर्ण पोस्टला अनुमोदन. मला सुद्धा काहीच समजले नाही
मी पण दक्षिणा च्या बुटात....
मी पण दक्षिणा च्या बुटात....
पण रेसिपी मस्त वाटते आहे....
पण रेसिपी मस्त वाटते आहे....
चला मी एकटीच माठ नाही तर
चला मी एकटीच माठ नाही तर
दक्षिणा
दक्षिणा
दक्षे
दक्षे
त्या वरच्या कुकीज आहेत का ?
त्या वरच्या कुकीज आहेत का ? मला त्या खडावा वाटल्या
सीमा, मस्त रेसिपी!
सीमा, मस्त रेसिपी!
सीमा, अगं तिरामसु म्हणजे माझे
सीमा, अगं तिरामसु म्हणजे माझे अगदी लाडके. तुझ्या कृतीने करुन पाहीली. अंडे नसल्याने मोह आवरला नाही. मस्त झाली गं. पूर्ण फॅटफ्री बनवता आल्याने अजूनच छान !
सीमा हे तिरामिसु किती लोकांना
सीमा हे तिरामिसु किती लोकांना पुरेल?? मला २५ लोकांसाठी बनवायचंय म्हणजे ३ पॅक्स कुकीज तरी लागतील.
क्रिम चीज, कुल व्हीप आणि कंन्डेन्स्ड मिल्क्चा डबा किती आउंसेस्चा होता?
मस्त! वाचताना तरी सोपी, जमेल
मस्त! वाचताना तरी सोपी, जमेल अशी वाटतेय रेसिपी. त्यामुळे करून बघायची हिंमत होईल असं वाटतयं.
Pages