तिरामिसु ट्रायफल

Submitted by सीमा on 29 August, 2013 - 00:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लेडी फिंगर कुकीज १२-१५
कन्डेन्स मिल्कचा डब्बा
क्रीम चीज (फॅट फ्री सुद्धा चालेल.) एक पॅक
१/२ कप एक्स्प्रेसो पावडर (नसेल तर कोणतीही इस्टंट कॉफी)
कुल व्हिपचा डब्बा १/२ ते एक
चॉकोलेट चांगल्या प्रतिचे .( चिप्स किंवा वेळ असेल तर चॉकोलेट कर्ल्स )

क्रमवार पाककृती: 

क्रीम चीज आणि कंडेन्स मिल्क एकत्र करुन चांगले बीट करुन घ्यायच. आता अगदी हल्क्या हाताने त्यात कुल व्हिप फोल्ड करुन घ्यायचे. (कुल व्हिप ऐनवेळी फ्रीजमधून बाहेर काढावे. )
ब्लॅक कॉफी करुन त्यात कुकीज जस्ट डीप करुन त्यांचा एक लेअर glass bowl / trifle bowl मध्ये तयार करुन घ्यावा.
त्यावर वरची क्रीम रेसीपीचा एक लेअर द्यावा.
वरच्या दोनही स्टेप दोनदा कराव्यात.
वरती पावडर कॉफी भुरभुरावी.
आता चॉकोलेट कर्ल्स (चॉकोलेटचा ब्लॉकला व्हेजीटेबल पीलर वापरून तयार करता येतात.) चा एक थिक लेअर देवून घ्यावा. (वेळ नसेल तर चॉकोलेट चीप्सचा लेअर करुन घ्यावा)
अगदी छान थंड करुन घ्यावे. आणि सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
आवडले तर सगळे एकदम संपते. :)
अधिक टिपा: 

ओरिजिनल रेसीपी मध्ये कॉफी तयार न करता प्रत्येक लेअरला कॉफी पावडर भुरभुरवायला (कसला क्युट शब्द आहे हा) सांगितलेल. तस केल तरी चालेल. तेवढीच एक स्टेप कमी.
मोठ्या बोल मध्ये एकदम अ‍ॅरेंज न करता individual glass मध्ये अ‍ॅरेंज केले तरी चालेल.

स्टेप्स खुप कमी आहेत. पण तसे सांगू नये. दिवसभर किचन मध्ये काम केल्यासारखा चेहरा करावा आणि क्रेडीट घ्यावे.

माहितीचा स्रोत: 
कॉस्टकोच्या डेझर्टचे पुस्तकात ही रेसीपी आहे. (BTW Costco Rocks) :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीम ऑनेस्टली मला तु वापरलेले अर्धे शब्द समजले नाहीत. (हामाबुदो) Sad
उदा. लेडी फिंगर कुकिज ? Uhoh यू मिन भेंडीची बिस्किटं? Uhoh (मी कध्धी ऐकली नाहियेत)
कन्डेन्स मिल्क - ही काय भानगड आहे? शिवाय कुल व्हिप? म्हण्जे काय? इव्हन मला चॉकोलेट कर्ल्स म्हणजे काय, ते ही माहित नाहीये.

त्यातल्या त्यात कुल व्हिप म्हणल्यावर मी एखादा क्रिमचा प्रकार असेल असं इमॅजिनलं होतं पण "आता अगदी हल्क्या हाताने त्यात कुल व्हिप फोल्ड करुन घ्यायचे."" --> हे वाचल्यावर दांडी उडाली. फोल्ड करायचं म्हणजे पेपर असतो का हा एखादा? Uhoh

मी अत्यंत अज्ञानी आहे Sad
आणि दुर्दैवाने यात घालावे लागणारे बरेच पदार्थ माहित नसल्याने चव इमॅजिन करू शकले नाही. Sad

पण >> स्टेप्स खुप कमी आहेत. पण तसे सांगू नये. दिवसभर किचन मध्ये काम केल्यासारखा चेहरा करावा आणि क्रेडीट घ्यावे >> हे वाक्य जबरी आहे. खूप हसले. Lol Rofl

दक्षे, यातल फक्त कन्डेस्न्ड मिल्क माहित आहे मला ते पण ईन्स्टंट खरवस करताना नेस्ले चा एक टिन मिळतो, बासुंदी मध्ये वगैरे वापरु शकतो..
बाकी च्या बाबतीत मी पण अडाणी..

मस्त रेसिपी! ह्यात क्रिम चिज ऐवजी मस्करपोने चिज वापरले तरी छान लागते.

>>स्टेप्स खुप कमी आहेत. पण तसे सांगू नये. दिवसभर किचन मध्ये काम केल्यासारखा चेहरा करावा आणि क्रेडीट घ्यावे.>> हि टिप फ़ारच आवडली!

सीमा
रेसिपी खूप छान आहे. मी एकदा बार्बेक्यु नेशनमधे हे खाल्ले होते, फार आवडले होते. सोपे वाटतेय करायला. फक्त लेडी फिंगर कुकिजचा फोटो टाकता येईल का? मी गुगल करून बघितले पण नीटसे कळले नाही कसे दिसते ते.

दक्षिणा
फोल्ड करायचं म्हणजे पेपर असतो का हा एखादा? >> माझ्या माहितीप्रमाणे फोल्ड करणे म्हणजे एखाद्या जड मिश्रणामधे हलके मिश्रण हळुहळू एकाच बाजूने फिरवून मिसळणे. (उदा. अंड्याच्या मिश्रणात चॉकोलेट पावडर) बेकिंगमधे ही टर्म बरेचदा वापरतात. जाणकारांनी प्रकाश टाकावा. Happy

फोल्ड करायचे म्हणजे हलक्या हाताने मिसळायचे म्हणजे त्या इमल्शन मधे मिसळलेली हवा, बाहेर निघून जात नाही.
तसेच कट अँड फोल्ड अशीही एक पद्धत असते. यात भांड्याच्या मधे कापल्यासारखे करुन बाकीचा अर्धा भाग उरलेल्या अर्ध्या भागावर टाकायचा. मग भांडे ९० अंशात फिरवायचे आणि परत असेच करायचे. काही केक्सच्या
मिश्रणासाठी असे करावे लागते.

भारतात, गोड चवीची कुठलीही लांबट बिस्किटे वापरता येतील. मी बॉन बॉन ची वापरली होती.

फोल्डिंगवर यू ट्यूब वर पण व्हिडिओज आहेत.
सीमा टीप भारीच आवडली.
हे हॉलिडे सिझन ला नक्की करणार!

डोना हेज फास्ट आणि सिंपल मध्ये तिने काय करावे? कोफी केली काळी, कुकीज होत्याच. मग क्रीम काय ते
मिसळून घेतले. मग एका प्लेटीत क्रीम चा एक डाव, दोन बिस्किटे आणि एका शॉट ग्लास मध्ये कॉफी.
बिस्किटे कॉफीत बुडवून, क्रीमला लाऊन खावी म्हणे. सो सिंपल. मॉस्त लागते पण हे स्वीट.

सीसीडी मध्ये एक २० रु ला चॉकोलेट शॉट मिळतो तो आणून त्यात बिस्किट घालून खाल्ले तरी चलेगा.

सीमा, अगं तिरामसु म्हणजे माझे अगदी लाडके. तुझ्या कृतीने करुन पाहीली. अंडे नसल्याने मोह आवरला नाही. Happy मस्त झाली गं. पूर्ण फॅटफ्री बनवता आल्याने अजूनच छान !

सीमा हे तिरामिसु किती लोकांना पुरेल?? मला २५ लोकांसाठी बनवायचंय म्हणजे ३ पॅक्स कुकीज तरी लागतील.
क्रिम चीज, कुल व्हीप आणि कंन्डेन्स्ड मिल्क्चा डबा किती आउंसेस्चा होता?

Pages