तिरामिसु ट्रायफल

Submitted by सीमा on 29 August, 2013 - 00:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लेडी फिंगर कुकीज १२-१५
कन्डेन्स मिल्कचा डब्बा
क्रीम चीज (फॅट फ्री सुद्धा चालेल.) एक पॅक
१/२ कप एक्स्प्रेसो पावडर (नसेल तर कोणतीही इस्टंट कॉफी)
कुल व्हिपचा डब्बा १/२ ते एक
चॉकोलेट चांगल्या प्रतिचे .( चिप्स किंवा वेळ असेल तर चॉकोलेट कर्ल्स )

क्रमवार पाककृती: 

क्रीम चीज आणि कंडेन्स मिल्क एकत्र करुन चांगले बीट करुन घ्यायच. आता अगदी हल्क्या हाताने त्यात कुल व्हिप फोल्ड करुन घ्यायचे. (कुल व्हिप ऐनवेळी फ्रीजमधून बाहेर काढावे. )
ब्लॅक कॉफी करुन त्यात कुकीज जस्ट डीप करुन त्यांचा एक लेअर glass bowl / trifle bowl मध्ये तयार करुन घ्यावा.
त्यावर वरची क्रीम रेसीपीचा एक लेअर द्यावा.
वरच्या दोनही स्टेप दोनदा कराव्यात.
वरती पावडर कॉफी भुरभुरावी.
आता चॉकोलेट कर्ल्स (चॉकोलेटचा ब्लॉकला व्हेजीटेबल पीलर वापरून तयार करता येतात.) चा एक थिक लेअर देवून घ्यावा. (वेळ नसेल तर चॉकोलेट चीप्सचा लेअर करुन घ्यावा)
अगदी छान थंड करुन घ्यावे. आणि सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
आवडले तर सगळे एकदम संपते. :)
अधिक टिपा: 

ओरिजिनल रेसीपी मध्ये कॉफी तयार न करता प्रत्येक लेअरला कॉफी पावडर भुरभुरवायला (कसला क्युट शब्द आहे हा) सांगितलेल. तस केल तरी चालेल. तेवढीच एक स्टेप कमी.
मोठ्या बोल मध्ये एकदम अ‍ॅरेंज न करता individual glass मध्ये अ‍ॅरेंज केले तरी चालेल.

स्टेप्स खुप कमी आहेत. पण तसे सांगू नये. दिवसभर किचन मध्ये काम केल्यासारखा चेहरा करावा आणि क्रेडीट घ्यावे.

माहितीचा स्रोत: 
कॉस्टकोच्या डेझर्टचे पुस्तकात ही रेसीपी आहे. (BTW Costco Rocks) :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनी ,
३० कुकीज लागतील माझ्या मते.
कुल व्हिपचा डबा 8 OZ चा असतो. तो पुर्ण लागेल. आणि क्रीम चीज चे २ पॅक लागतील. (8 oz each)
कंडेन्स मिल्क standard size असतो बघ target/walmart/kroger/market street मध्ये तोच. (माझ्याकडे नाहीये आता) १ कॅन लागेल.
1/2 कप कॉफी पावडर more than enough होते.

कुकीज सोडून सगळ साहित्य नेहमीच्या रेग्युलर स्टोअर मध्ये मिळत तेच. in case कुकीज नाही मिळाल्या तर , ओरिओ कुकीज (चॉकोलेट किंवा प्लेन) मधल आयसिंग काढून वापर. authentic तिरमिसु होणार नाही. पण मस्त लागते.

कंडेन्सड मिल्क चा डबा १४ औंस चा असतो.

रेसिपी "नो कट्कट " आहे अगदी. मी कधी तिरामसु करेन असं वाट्लं नव्हतं. इतक्या सोप्या रेसिपी बद्दल खरच मनापासून धन्यवाद.

मला फक्त क्रीम ( व्हीप क्री+ कंडेन्सड मिल्क+ क्रीम चीज) जरा चवीला गोड झालं. काही alternative आहे का?

बिनु नाही नाही. अगं हेव्ही व्हिपिंग क्रीमचा कार्टन मिळतो बघ (दुधासारखं असत ते) तो आणायचा. बीटरने क्रीम बीट करुन घ्यायच. आणि कुल व्हिपच्या ऐवजी ते वापरायच. बीट केलेल्या क्रीम मध्ये साखर असणार नाही. त्यामुळ गोड जास्त होणार नाही. कुलव्हिपला फक्त रिप्लेस करेल हे व्हिपड क्रीम . कंडेन्स मिल्क आणि क्रीम चीज तसच फोल्ड करायच यात.

सीमा, हे ट्रायफल छान झालेलं. सगळ्या लोकांना खुप आवडली. प्रमाण पण पर्फेक्ट होतं.
३० कुकीज + १६ आउंस व्हीप्ड क्रिम + १ डब्बा (१४ आउंस) कंन्डेन्स्ड मिल्क + १६ आउंस क्रिम चीज २६ मोठ्यांना अगदी उत्तम पुरलं. थोडं मिक्शर उरलंय ते फ्रीज करून ठेवलंये. पुढच्या खेपेस ४ जणांसाठी पुरेल.
बीनू ने गोडाबद्दल लिहीलेलं म्हणून कंन्डेन्स्ड मिल्क जरा कमी घातलं.

खुप छान डेझर्ट झालं. खुप खुप धन्यवाद.

Pages