रॅपर्स्विल सोडल्यानंतर पुढचे ठिकाण होते वडूझ. Vaduz.
याच नावाचे गाव महाराष्ट्रात पण आहे.
तिथे आपण पुढच्या भागात जाणार आहोत. या भागात मात्र केवळ रस्त्याचे फोटो. कधीही संपू नये असे वाटेल
असा हा रस्ता.
अत्यंत आरामदायी बस, सुंदर रस्ता, कुशल चालक.. आणखी काय पाहिजे. प्रत्येक वळणावर सुंदर दृष्य समोर
येत होते.
सध्या फारच कमी शेती होते तिथे. बहुतेक चराऊ कुरणेच आहेत. या काळात बर्फ वितळल्यामूळे गायींना
वर डोंगरात चरायला नेतात आणि खालच्या भागातला चारा कापून ठेवतात. गायींना वर नेणे आणि आणणे
अर्थातच उत्सवी असते.
पण तिथली शेती अशी ३/४ महिन्यांचीच. त्यामूळे शेतकरी शेती न करता, एखाद्या कारखान्यात काम करणे
पसंत करतात. तिथे त्यांना वर्षभर काम असते.
तर चला, सीट बेल्ट बांधा. डुलकी मात्र येऊ देऊ नका.. प्लेन शिफॉनमधली एखादी सुंदर तरूणी दिसूही शकेल.. पुढे काय होतं ते माहीत आहेच.
1
2
3
4
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
27
28
29
30
31
32
अप्रतिम फोटो दिनेशदा. आमच्या
अप्रतिम फोटो दिनेशदा.
आमच्या स्विस ट्रीपच्या आठवणी आल्या. तुम्ही लिहीलय त्या गावी नव्हतो गेलो तरी सृष्टीसौंदर्य तेच.
व्वा !!! सुंदरतेच्याही
व्वा !!! सुंदरतेच्याही पलिकडला अनुभव दिनेश. आज योगायोगाने माझ्या नेटला स्पीडही वाजवी मिळत गेल्याने सारेच्यासारे फोटो चटदिशी पडद्यावर आले आणि मग आनंदाचा जो अनुभव आला तो शब्दबद्ध करणे कठीणही जात आहे.
रस्ते असे सुंदर असतात आणि त्यावर तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात......नशीबवान आहात तुम्ही, हेच खरे.
[फोटो क्रमांक ३१..... मला तर आपल्या मलकापूरच्या अलिकडे लागणार्या बांबवडे गावचे दृष्य वाटले. हे गाव तुम्ही पाहिले आहेच.]
अशोक पाटील
अप्रतिम फोटो
अप्रतिम फोटो
मस्त मस्त!
मस्त मस्त!
अहाहा!! संपू नाही असं वाटणारे
अहाहा!! संपू नाही असं वाटणारे रस्ते.................क्लासच!
फारच सूंदर फोटो.
फारच सूंदर फोटो.
वॉव मस्तच.
वॉव मस्तच.
व्वा! फारच सुंदर!
व्वा! फारच सुंदर!
अप्रतिम सुंदर फोटो क्रमांक
अप्रतिम सुंदर
फोटो क्रमांक ३१..... मला तर आपल्या मलकापूरच्या अलिकडे लागणार्या बांबवडे गावचे दृष्य वाटले. >>
मामांच निरिक्षण अचुक आहे.
हाही भाग मस्तच, दिनेशदा
हाही भाग मस्तच, दिनेशदा
आभार दोस्तांनो. हो अशोक, ते
आभार दोस्तांनो.
हो अशोक, ते बांबवडे आले कि मलकापूर आलेच असे वाटते.
( हे सर्व फोटो मी चालत्या बसमधून काढलेले आहेत. )
अतिशय सुंदर - फोटो आणि परिसर
अतिशय सुंदर - फोटो आणि परिसर ....
अप्रतिम .. तिथे आपल पण
अप्रतिम .. तिथे आपल पण छोटेसे घर असावे ..असे वाटत आहे...
आहाहा....असं चित्रातलं दृष्य
आहाहा....असं चित्रातलं दृष्य सजीव झालेलं दिसतंय जादूने
स्वर्ग ह्यापेक्षा काहि वेगळा
स्वर्ग ह्यापेक्षा काहि वेगळा असेल का दिनेशदा....
मस्तच.
मस्तच.
दिनेशदा, सुरेख प्रचि, धावत्या
दिनेशदा, सुरेख प्रचि, धावत्या वाहनातून काढूनही.
आज एक गोष्ट पुनः जाणवली की युरोप असो वा अमेरिका- पश्चिम प्रवासात घरांचे रंग, आकार, आर्किटेक्चर इतकं मोहवत रहातं प्रवासात.. सौम्य, सुंदर, फ्रेश. निसर्गावर ओरखडा काढण्याऐवजी त्याला जडावाचे दागिने घातल्यासारखी घरं.
अप्रतिम प्रचि प्रचि क्र. २१
अप्रतिम प्रचि
प्रचि क्र. २१ मधे पाण्यात उभा असलेला प्राणी लांडगा आहे का ?
सुनिल, अजून जिप्स्याचे फोटो
सुनिल, अजून जिप्स्याचे फोटो यायचेत, लेख लडाखचे. तेव्हा स्वर्ग म्हणजे काय ते कळेल आपल्याला
हो भारती, नैसर्गिक वस्तूंपासून बांधलेली हि घरे. पण आता मात्र बरीच वापरात नाहीत. पुर्वी शेतीसाठी लोक रहात असत. आता तशी काही गरज नाही. चार्याची निर्यात करतात ते.
किरण, बारीक नजर हो तुझी.. ती बकरी आहे. हैदीलँडमधे बर्याच बकर्या आहेत.
व्वा दिनेशदा... युरोप
व्वा दिनेशदा... युरोप ट्रिपच्या वेळी तुमच्याकडुन नक्कीच टिप्स घेईन.
अप्रतिम... आणि सगळं कसं
अप्रतिम... आणि सगळं कसं स्वच्छ स्वच्छ चित्रातल्या सारखं कुठे झाडाचं पान ही दिसत नाही गळलेलं
व्वा, कसले सुंदर टापटीप
व्वा, कसले सुंदर टापटीप रस्ते, निटनेटकी घरं, दोन्ही बाजुला हिरवळ!
डोळे निवले अगदी!
सह्ही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सह्ही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
धावत्या बसमधुन मस्त टिपली
धावत्या बसमधुन मस्त टिपली आहेत प्र.चि.
<< Vaduz. याच नावाचे गाव महाराष्ट्रात पण आहे. >> वडज का? दिनेशदा. जुन्नर, शिवनेरीच्या पायथ्याशी खंडोबाचे देऊळ आहे या गावात.
किती अप्रतिम रस्ता आहे! फारच
किती अप्रतिम रस्ता आहे! फारच सुरेख फोटो आलेत.
अनवाणी पायांनी दूरवर चालत जायला मजा येईल. अजिबातच दमायला होणार नाही. पाय दुखायला लागले किंवा अधूनमधून ब्रेक घ्यावासा वाटला तर शेजारच्या हिरवळीवर मस्त फतकल मारता येईल मला वाटतं रमतगमत मोठ्यानं गाणं म्हणत गेलं तरी चालेल, कुणीसुद्धा वळून बघणार नाही.
बांबवडं!! किती सुंदर आठवण करून दिलीत अशोकमामा. मला पिरंगुटच्या घाटातून उतरतानाही बांबवड्याची आठवण होते. वरचा रस्ता आणि बांबवड्यावरून मला कर्हाड-मलकापूर रस्त्यावरचं कोकरुडच्या अलिकडचं एक टुमदार गाव आठवलं, नाव बिल्कुल आठवत नाहिये आत्ता. कर्हाडनंतर हायवेवरून उजवीकडे वळल्यावर थोड्या अंतरानंतर तो छान रस्ता आहे आणि त्या गावात घड्याळाचा टॉवर असलेली बैठी प्रशासकीय इमारत पण आहे. मग आपण डावीकडे वळतो. फारच मोघम आठवतंय. दिनेश, तुम्हाला आठवतंय का ते गांव?
सई, पुढच्या भागात असे काही
सई, पुढच्या भागात असे काही रस्ते ( फक्त चालायचे ) दिसणार आहेत.
ते गाव नाही आठवत पण मला शाहुवाडी आले कि तसे अजुनही वाटते. निनाईच्या देवळाजवळ उतरून, कच्च्या रस्त्याने घरी जावेसे वाटते. मारुतीचे देऊळ, सावरी आंब्याची झाडे, करवंदाच्या जाळ्या आणि वाटेवर परत भेटणारं माझं बालपण.
मार्को, स्विस नंतर ग्रीस,
मार्को, स्विस नंतर ग्रीस, इताली, ऑस्ट्रिया करायचे आहेत.
किशोर, वडूझ असेच नाव आहे. एस. टी. वर पाटी पण बघितली आहे.
दिनेशदा, घर बसल्या स्विसची
दिनेशदा,
घर बसल्या स्विसची अशी सुंदर सैर करवल्या बद्दल धन्यवाद !
काय हे ( झक्कास) रस्ते ! पण याला रस्ता म्हणता येईल का ? एकही खड्डा शोधुन सापडत नाही ...
सई.....दिनेश....झकासराव.... "
सई.....दिनेश....झकासराव....
"बांबवडे" गावावर तुम्ही इतके प्रेम करता हे वाचून मला खूप आनंद झाला. विशाळगड सहलीसाठी आम्ही मित्र निघालो की बांबवडे इथे चहापाणासाठी एक ब्रेक ठरलेलाच [तिथे नाही तर मग आंब्यात....तोही भाग असाच हिरवागार]. स्वीस चे दिनेशने काढलेले फोटो पाहून असे वाटू लागले की केवळ निरभ्र स्वच्छता आमच्याही भागाला लाभली तर हा कोकण भागही स्वीसची धाकटी बहीण शोभेल.
@ सई...कराड-मलकापूर-कोकरूड वरील एका गावाचा तू उल्लेख केला आहेस. मी त्या मार्गाने स्प्लेन्डरवरून कराडला गेलो आहे...पण तो रस्ता 'ढेबेवाडी' चा होता....त्या पट्ट्यात येते का तुझ्या स्मरणातील ते गाव ?
अशोक पाटील
मुक्काम पोस्ट ढेबेवाडी हा
मुक्काम पोस्ट ढेबेवाडी हा मस्त चित्रपट आठवला... वर्षा आणि निळू फुले.. बाकी बरेच कलाकार होते.
Pages