शतशब्दकथा____ शतशब्दकथा

Submitted by कवठीचाफा on 30 August, 2013 - 19:57

आजुबाजुचा अंदाज घेताना त्याच्या लक्षात आलं .......... देवा ! ही भट्टीसारखी तापलेली कोंदट जागा आपली ? मग आपण बसतो ती स्टडी रूम कुठे गेली ? आणि आजुबाजुला झगमगणारे लाईटस ?
त्याने पुन्हा डोळे चोळुन पाहीले पण आजुबाजुचा देखावा तसाच राहीला. म्हणजे हा भास नव्हता तर ! मग हे असं कसं घडलं ? अचानक मघाशी ऐकलेल्या त्या अमानवी आरोळीची आठवण झाली, .. असा आवाज कुठल्याच प्राणीमात्राचा असणं शक्य नव्हतं....
या क्षणी एखादी सिगारेट ओढल्या शिवाय मन ताळ्यावर यायचेच नाही ! सवयीनेच खिशात हात गेला .... तत्क्षणी डोळ्यासमोर विज कडाडली..
" क्युं बे, पाकीट मारनेकी कोशीश कर रहा था ? " slapping.gif
चालत्या लोकलमधली त्याची शतशब्दकथा मनातच विरली, आणि बेपर्वा लोकलनं तीच अमानवी शिट्टी पुन्हा वाजवली.

vroam.gif

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोल!