Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जानव्हिला सास्ररि गेल्यावर
जानव्हिला सास्ररि गेल्यावर सास्वान्चे प्रोब्लेम सोड्वावे लागणार आसे वाटतेय......
भयंकर डोक्यात जायला लागलेय
भयंकर डोक्यात जायला लागलेय आता ही मालिका. किती ते गैरसमज आणि नायक नायिकेतलं lack of communication या गतीने दोघांचं लग्न लागायला अजून चार महिने लागतील. मला वाटतं खालील क्रमाने घटना घडतील.
१. सायलीचं आगमन - तिच्याकडे सोन्याच्या बांगड्या बघून श्रीचं लग्न तिच्याशी ठरलं या गोड गैरसमजातून सर्व सासवा परस्परच लग्नाची तयारी करायला लागतील
२. जान्हवी शेवटी निराश होऊन अनिलशी लग्नाची तयारी दाखवेल. मग त्यांच्या लग्नाची तयारी सुरु होईल.
३. श्रीला आपलं लग्न सायलीशी लागणार आहे हे शेवटच्या क्षणी कळेल. मग तो आपलं जान्हवीवर प्रेम असल्याचं सांगेल.
४. शिवदेबाई सगळ्यांना जान्हवी अनिलची बायको असल्याचे सांगतील. या मालिकेत कुठलीही गोष्ट खातरजमा करून घेण्याची पध्द्त नसल्याने सगळयांना ते खरं वाटेल. श्री निराशेच्या गर्तेत फेकला जाईल आणि मग शेवटी आजीचं मन राखण्यासाठी सायलीशी लग्नास तयार होईल.
५.दोन्ही लग्ने बहुतेक एकाच दिवशी एकाच मुहुर्तावर असतील. हार घालण्याच्या वेळीच मनीश दोन्ही ठिकाणी धावत जाऊन सत्य सांगेल. मग परत गोंधळ, रडारड आणि मग शेवटी श्री-जान्हवीचे लग्न.
चीकू, ही मालिका डोक्यात जात
चीकू, ही मालिका डोक्यात जात असेल तर बाकीच्या तुम्ही बघूच नका
तुमचा कल्पनाविलास चांगला आहे पण मला नाही वाटत असे काही होईल या मालिकेत!
प्रोमोजमध्ये श्री-जान्हवी
प्रोमोजमध्ये श्री-जान्हवी फोनवर बोलताना दाखवलेत. जान्हवीचा श्रीबद्दलचा गैरसमज दूर होईल बहुतेक.
चीकू एकता कपूरच्या मालिकांच्या परमभक्त दिसताहेत.
जान्हवीचा श्रीबद्दलचा गैरसमज
जान्हवीचा श्रीबद्दलचा गैरसमज दूर होईल बहुतेक. >> हो! आणि नाही झाला तर जान्हवीचा साहेब आहे ना
प्रोमोजमधे जान्हवी श्रीशी
प्रोमोजमधे जान्हवी श्रीशी बोलुन झाल्यावर (फोनवर गैरसमज दूर होतो) मैत्रिणीला सांगते की त्याच लग्न झालेलं नाहिये तेंव्हा तिच्या चेहर्यावरची एक्सप्रेशन्स मस्त दाखवलीत. नविन नविन प्रेमात पडल्यावर असतात तशी निरागस, आतुर वगैरे
अनिलची अॅक्टींग जबरी आहे, पण तिडीक आणतो डोक्यात तो.
जान्हवीची आई अशी काय हपापल्यासारखी तिच्या लग्नाच्या मागे लागलिये जस्काय लग्न नाही केले तिने तर आकाश कोसळणार आहे.
जान्हवीची आई अशी काय
जान्हवीची आई अशी काय हपापल्यासारखी तिच्या लग्नाच्या मागे लागलिये जस्काय लग्न नाही केले तिने तर आकाश कोसळणार आहे.
>>
नाहीतर काय. मला तर वाटते की तीच का नाही अनिलशी लग्न करत. तिच्या वयाला साजेसा आहे तो.
अश्या श्रीमंत माणसाशी लग्न केले की मणी-मंगळसुत्राऐवजी ४ पदरी मंगळसुत्र आणि पैठणी घालून फिरेल रोज.
शिवाय जान्हवीच्या बाबांची गुडघेदुखी आणि कटकट नको.
"जान्हवी" {तेजश्री प्रधान}
"जान्हवी" {तेजश्री प्रधान} आणि "श्री" {शशांक केतकर} हे दोघे 'मायबोली' वरील या मालिकेवरील चर्चेमुळे अधिकच प्रसिद्ध होत चालले आहेत. शनिवारच्या भागामध्ये या दोघांनीही संयत अभिनयाची कमाल केली आहे. जान्हवीला मिळलेली श्री च्या लग्नाची चुकीची बातमी आणि श्री चा झालेला समज की तिला आपण 'गोखले गृहउद्योगा'चे मालक आहोत अशी कळालेली माहिती, यावरून बॅन्केत घडलेले दोघातील संवाद ऐकणे तसेच त्यांचा मुद्राभिनय पराकोटीच्या दर्जाचा होता. [संवाद लेखकालाही दाद दिली पाहिजे]
जान्हवीने श्री ला 'प्लीज तू जा इथून' असे शांतपणे सांगणे आणि त्यानेही तिथून खाली मान घालून जाणे दोघांच्या स्वभावाचे द्योतकच जणू.
परन, लग्न झाल्यावर सिरीयल
परन, लग्न झाल्यावर सिरीयल संपण्यापेक्षा चहूबाजूंनी वाढत जाईल. त्या सगळ्या सास्वा, त्यांची स्टोरी आणि मग नायिकाच कशी त्यांचे प्रॉब्लेम सोडवणार आणि त्यांना सुखी करणार हे दाखवताना ताणणार हि सिरीयल.>>>> अन्जु, चहुबाजुनी नाही हि सिरियल सहा बाजुनी वाढेल. सहा सासवा आहेत ना
जान्हवीचा गैरसमज दूर झाला आहे. तिला श्रीने सांगीतल फोनवर की त्याच लग्न झालेल नाही आणि तो accountat पण नाही....
जान्हवीचा गैरसमज दूर झाला
जान्हवीचा गैरसमज दूर झाला आहे. तिला श्रीने सांगीतल फोनवर की त्याच लग्न झालेल नाही आणि तो accountat पण नाही.. << मुग्धा हे कोणत्या एपीसोद मधे आहे?
<जान्हवीची आई अशी काय
<जान्हवीची आई अशी काय हपापल्यासारखी तिच्या लग्नाच्या मागे लागलिये जस्काय लग्न नाही केले तिने तर आकाश कोसळणार आहे.>
अनिलशी जान्हवीचे लग्न झाल्याने त्यांच्या विवंचना संपणार आहेत. पैशाच्या, मुलाच्या भविष्याच्या.
जान्हवीला याआधी अनुरूप स्थळांनी पसंती दर्शवलेली असूनही तिने खोटेनाटे सांगून लग्न जुळू दिले नाही.
अरे वा! अशोक यांचा प्रतिसाद मालिकेच्या धाग्यावर प्रथमच दिसतोय.
जान्हवीचा गैरसमज दूर झाला
जान्हवीचा गैरसमज दूर झाला आहे. तिला श्रीने सांगीतल फोनवर की त्याच लग्न झालेल नाही आणि तो accountat पण नाही....>>>>>> हे आज दाखवतील....
लग्न झाल्यावर सिरीयल
लग्न झाल्यावर सिरीयल संपण्यापेक्षा चहूबाजूंनी वाढत जाईल. त्या सगळ्या सास्वा, त्यांची स्टोरी आणि मग नायिकाच कशी त्यांचे प्रॉब्लेम सोडवणार आणि त्यांना सुखी करणार हे दाखवताना ताणणार हि सिरीयल.>>>> एकदम बरोबर अन्जु...
श्रीशीच लग्न होइल विदाऊट
श्रीशीच लग्न होइल विदाऊट प्रेक्षकांचा कौल ? राधाच्या लग्नासारखा
होय भरत..... मालिकांच्या
होय भरत.....
मालिकांच्या धाग्यावर मी प्रथमच आलोय हे सत्यच. तसं पाहिलं तर मी हा धागा अगदी चौथ्या एपिसोडपासून वाचतोय कारण योगायोगानं तो भाग मला पाह्यला मिळाला होता. विश्रांतीच्या निमित्ताने घरीच असल्याने नॅशनल जिऑग्राफिक, डिस्कव्हरीसारखे काही प्रोग्राम पाहायला मिळत गेले, त्याचवेळी भाचीने "मामा, हा नवीन एक कार्यक्रम बघ. आवडेल तुला..." असं सांगितल्यामुळे पाहिला....अन् आवडलाही. शिवाय येथील विचारांची देवाणघेवाण नजरेला आल्यानंतर मालिका आवडतच गेली.
आता जान्हवी श्री च्या गळ्यात माळ घालणार हे नक्की....फक्त उत्सुकता आहे ती घरात आल्यानंतर सासवांच्या 'दुरुस्त्या' कशा करणार याची.
मामा, स्वागत आहे इकडेही तुमचं
मामा, स्वागत आहे इकडेही तुमचं
थॅन्क्स शुभांगी..... खरं
थॅन्क्स शुभांगी.....
खरं सांगायचं झाल्यास मला मालिकेपेक्षाही तुम्हा लोकांचं इथले संवाद वाचणे जास्त भावत आहे. त्यामुळे कथानकातही मजा येते.
अशोक, पण त्या दोघांच्या
अशोक, पण त्या दोघांच्या अभिनयाबद्दल तुम्ही जे लिहिलं आहे ना ते अगदी खर आहे. अगदी सुंदर आणि नैसर्गिक अभिनय करतात दोघही
मुग्धा.... मला दोघांच्याही
मुग्धा....
मला दोघांच्याही अकृत्रिम अभिनयाचे खूप कौतुक वाटले....तसेच खेळकरपणाचेही. वास्तविक माझ्या दिनक्रमामुळे फार थोड्या मालिका पाहायला मिळायच्या. यातीलही पहिले चार भाग हुकलेच पण तुम्ही लोकांनी यावर इतके सुंदर लिहिलेले वाचून मग मीही वेळापत्रक असे बसविले आहे की तो अर्धा तास मिळतो आणि ज्यावेळी कथानकात फक्त जान्हवी आणि श्री समोरासमोर येतात तो भाग फार मोहवितो... त्याला कारण म्हणजे ते अभिनय करतात असे वाटतच नाही मुळात.
जान्हवीची बॅन्केतील मैत्रिणही चांगले काम करते.....[नाव विसरलो तिचे]
जान्हवीची बॅन्केतील मैत्रिणही
जान्हवीची बॅन्केतील मैत्रिणही चांगले काम करते>>> तिचा जान्हवीला चिडवतानाचा "अकाऊंटंटीण" हा शब्दप्रयोग मला फार आवडला होता
तिचा जान्हवीला चिडवतानाचा
तिचा जान्हवीला चिडवतानाचा "अकाऊंटंटीण" हा शब्दप्रयोग मला फार आवडला होता स्मित >>> +१
"अकाऊंटंटीण" मलाही आवडलं मस्त
"अकाऊंटंटीण" मलाही आवडलं मस्त आहे
मुग्धा बरोबर सहा बाजूंनी.
मुग्धा बरोबर सहा बाजूंनी. मलापण दोघांचा अभिनय आवडतो. तिची आईपण व्हिलनचा रोल मस्त करते,' गुंतता हृदय हे' मधे होतीना ती, तिथेपण तिने चांगले काम केले होते.
मीपण बऱ्याचदा डिस्कव्हरी,
मीपण बऱ्याचदा डिस्कव्हरी, हिस्टरी, एनडीटिव्ही गुड टाईम बघत असते, मालिका मोजक्याच बघते.
तिचा जान्हवीला चिडवतानाचा
तिचा जान्हवीला चिडवतानाचा "अकाऊंटंटीण" हा शब्दप्रयोग मला फार आवडला होता>>> +++११
अगो मुलींनो..... त्या
अगो मुलींनो..... त्या "अकाउंटंटीन" म्हणणार्या मुलीचे नाव काय ते सांगाना कुणीतरी ?.... आय मीन कथानकातील......आणि जमल्यास जान्हवीचे पूर्ण नावही [माझे पहिले भाग चुकल्यामुळे मला जान्हवी इतकेच माहीत आहे]
अशोक पाटील
तिचे नाव सारिका आहे
तिचे नाव सारिका आहे
थॅन्क्स
थॅन्क्स सोनाली....
"सारिका".... छान आहे हेही नाव. तरीही जान्हवी हे नाव खूप आपलेसे वाटते.... कदाचित १००% सात्विक वाटते त्यामुळेही असेल.
आता प्युनीण का?
आता प्युनीण का?
सॉलिड जोक होता तो. टीव्ही
सॉलिड जोक होता तो. टीव्ही मालिका बघताना खूप दिवसांनी जोरात हसायला आलं.
Pages