बर्याच दिवसांनी परत जलरंगामध्ये चित्र रंगवून बघितलं. जलरंगामध्ये रंगवता येत नाही म्हणून हे माध्यम गेले वर्षभर वापरायचं टाळत होते.
गेल्या महिन्यात नेटवर एका ब्लॉगमध्ये खूप सारे जलरंगामधले मोर दिसले होते. मी कितीतरी वेळ ते मोर बघत बसले होते. आपणही कधीतरी असं रंगवायचं हे त्याच वेळी ठरवलं. रंगवल्यानंतर इथे लिंक द्यावी म्हणून ते चित्र शोधत होते पण सापडलं नाही. काल खूप शोधल्यावर तो ब्लॉग सापडला आणि त्या ब्लॉगलेखिकेला /चित्रकाराला मी माझं चित्र दाखवून तिच्या बॉगची लिंक देण्याची परवानगी मागितली.
http://arealpe.wordpress.com/tag/peacock-watercolor-painting/ हे या मोरासाठीचं इंस्पिरेशन.
Thanks Andrea Realpe.
कागद - १४५ जीएसएम
साईझ - ए-३
माध्यम - जलरंग (कॅमल आर्टिस्ट ग्रेड वॉटर कलर)
पूर्ण चित्र झाल्यावर ते ओलं मला असतानाच मोराच्या पिसार्यावर पर्शियन ब्लु रंगाचे शिंतोडे उडवायचे होते. पण चित्रं बरं झाल्याच्या आनंदात मी ते घरात सगळ्यांना दाखवायला गेले आणि तेवढ्या वेळात चित्र वाळलं. मग नंतर रंगाचे आणि पाण्याचे शिंतोडे उडवून त्याला ब्रशनी अॅडजस्ट करायचा प्रयत्न केला. पण हे करताना रंगाचे शिंतोडे नको तिथे पण उडाले आणि बॅकग्राऊंडला मला हवा तसा इफेक्ट द्यायला जमलं नाही.
पण याआधीचे जलरंगाचे माझे प्रयत्न बघता, हेही नसे थोडके.
वा मस्त चित्र.
वा मस्त चित्र.
धन्यवाद कंसराज.
धन्यवाद कंसराज.
मी विचारीन म्हणून आधीच
मी विचारीन म्हणून आधीच एक्स्ट्रा माहिती दिलीस ना...धन्स..:)
ते आधीच वाळल्यामुळे वेगळंच टेक्श्चर मिळालं चित्राला,छानै
वर्षू, शिंतोडे उडायच्या आधीचं
वर्षू, शिंतोडे उडायच्या आधीचं ब्रशवर्क जास्त चांगलं होतं असं मला वाटतंय. परत एकदा करून बघणार हे चित्र.
आणि ती माहिती मुद्दाम लिहितेय मी. मी पण गेल्या वर्षभरामध्येच रंगवायला लागलेय. रंग, कागद, टेक्निक्स काहीच नीट माहित नव्हतं आधी. इथे मायबोलीवर आणि नेटवर इतर ठिकाणी वाचून माहिती मिळतेय. माझ्यासारखंच नव्याने शिकणारं कोणी असेल तर मला झाला तसा त्यांनाही उपयोग होईल.
आणि हो, तू जलरंग वापरणार असशिल तर इथे पाटलांनी रंगवलेली खूप सुंदर चित्रं आहेत त्यांच्या रंगीबेरंगी पानावर. ती नक्की बघ. स्टेप बाय स्टेप फोटो पण टाकली आहेत त्यांनी.
मस्त आहे की! नुकताच आंघोळ
मस्त आहे की! नुकताच आंघोळ करून बसल्यासारखा दिसतोय.
सुरेख
सुरेख
सुरेख! माझ्यासारखंच नव्याने
सुरेख!
माझ्यासारखंच नव्याने शिकणारं कोणी असेल तर मला झाला तसा त्यांनाही उपयोग होईल.>> नक्कीच. इथे खरच खूप शिकायला मिळतं. विशेष म्हणजे माध्यम काय, कसे असतात हे शिकण्यापासून सुरवात आहे माझी.
@ नलिनी -विशेष म्हणजे माध्यम
@ नलिनी -विशेष म्हणजे माध्यम काय, कसे असतात हे शिकण्यापासून सुरवात आहे माझी. >>>> मलापण आधी खूप काही माहिती नव्हती. आतापण रोज बर्याच नविन गोष्टी कळत आहेत.
इथे मिळणारी माहिती, वेगवेगळ्या चित्रकारांचे ब्लॉग्ज वाचणे, वेगवेगळ्या माध्यमातली चित्रं नेटवर बघणं, चित्रांच्या प्रदर्शनांना भेटी देणं (हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जितकी जास्त चित्रं प्रत्यक्ष बघायला मिळतात तितकं नविन माध्यमांबद्दल, रंगवायच्या तंत्राबद्दल आपोआप कळत जातं.), क्राफ्ट स्टोअर्स ना भेटी देणं (औरंगाबादमधला एक दुकानदार मला दरवेळी नविन माध्यमांबद्दल, रंगांबद्दल सांगत असतो. कित्येकदा काही गोष्टी मी तो म्हणाला म्हणून विकत घेते. पण त्याचा फायदा होतो. )
मामी, नुकताच अंघोळ केलेला मोर >>
धन्यवाद सगळ्यांना.
लाजवाब … निळा भुलेश्वर
लाजवाब … निळा भुलेश्वर
फारच छान आहे. मामी, " नुकताच
फारच छान आहे.
मामी,
" नुकताच आंघोळ करून बसल्यासारखा दिसतोय" .....एकदम मस्तं.
सुरेख
सुरेख
सुन्दर
सुन्दर
छान ! वन्स मोर !!
छान ! वन्स मोर !!
( जलरंग हें फसवं माध्यम. प्रचंड आकर्षक , सोपं वाटतं पण त्यावर हुकमत मिळवणं खुपच कठीण ! स्वानुभव. म्हणून , मीही एक पाटिल भक्त )
जलरंग हें फसवं माध्यम. प्रचंड
जलरंग हें फसवं माध्यम. प्रचंड आकर्षक , सोपं वाटतं पण त्यावर हुकमत मिळवणं खुपच कठीण ! स्वानुभव. म्हणून , मीही एक पाटिल भक्त>>> खरे आहे. हे चित्र करून कितीतरी वर्षे झाली, त्यानंतर पाटलांच्या ऑनलाइन कार्यशाळेत पण भाग घेतला तरी माझी जलरंगांची भिती अजून गेली नाही.