नाट्योपचार (ड्रामा थेरपी)
तीस पस्तीस वर्षे वैद्यकिय महाविद्यालयात शिकवलं. औरंगाबदला आणि नांदेडला. विद्यार्थी म्हणजे शिक्षकाच्या भावजीवनातला महत्वाचा घटक. विद्यार्थी आठवतात ते त्यांच्या हुषारीनं, त्यांच्या अंगी असलेल्या काही गुणांमुळे. अशीच एक आठवण....
मला नाटकाची आवड. काम करण्याची आणि बसवण्याची. नांदेडला गेलो तर आपसुकच ही जवाबदारी माझ्याकडे आली, कारण डीन पण नाटकवेडे. त्यांनी आणि मी राज्य स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या विजेत्या नाट्कात ("स्मारक") काम केलेलं. इतकंच नाही तर ते मला म्हणाले, एक नाटक तू बसव, एक मी बसवतो !! च्यायला ! म्हणजे कॉम्पिटीशन की काय. मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी नाटक घेतलं : महानिर्वाण !! मी आणि माझा दुसरा सहकारी यांनी निवडलं ते "घेतलं शिंगावर" (या नाटकावर "दोन्ही घरचा पाहूणा" हा पिक्चर पण निघालाय !!) पात्र निवड झाली तालमी सुरू झाल्या. आणि एके दिवशी एक विद्यार्थी आला आणि म्हणाला: "सर, तुम्ही ते विजय ला (नाव बदलले आहे) घेतलंत !" मी म्हणालो: "हो, मग!" तो म्हणाला: "सर, तो ऐन वेळी कच खातो ! त्याची किर्तीच आहे तशी. परिक्षेत ऐनवेळी तोंड उघडत नाही. गप्प बसून रहातो. नाटकात ही असं केलं तर काय व्हायचं नाटकाचं?" त्याच्या चेहे-यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. "बघतो मी" म्हणत मी त्याला वाटेला लावलं. मलाही काळजी वाटायला लागली. तिकडे "महानिर्वाण" च्या तालमी जोरात चालू होत्या.
त्या दिवशी तालमी नंतर मी विजयला म्ह्टलं: "थांब, तुझ्याशी बोलायचंय़" आणि मग त्याला मला काय कळलं ते सांगितलं आणि "आता स्नेहसंमेलन चार दिवसावर आलंय, काय करावं? " असा प्रश्न टाकला. यावर त्यानं सांगितलेली हकिगत अशी...
त्याला Anxiety neurosis नावाचा एक प्रकार होता. त्यासाठी तो नांदेड्च्या एका मनोविकार तद्न्याकडे इलाज घेत होता. म्हणजे व्हायचं काय की काही तणावाची स्थिती आली की याला घाम सुटायचा, चेहेरा लाल व्हायचा, घशाला कोरड सुटणे, अंग थरथरू लागणे असे प्रकार व्हायचे. त्यासाठी त्याचा इलाज चालू होता आणि इथं आम्ही त्याला नाटकात एक मोठा आणि महत्वाचा रोल देवून बसलो होतो !!
मी त्याला स्पष्ट केलं की आता दुसरा कलाकार शोधण्याचा प्रश्नच नाही. हे काम त्यालाच करयचंय आणि तो ते चांगलं करणार याचा मला विश्वास आहे आणि तो या विश्वासाला जागणार आहे. कारण तो प्रॅक्टीस मधे काम उत्तम करत होता. नाट्काचा दिवस आला. त्याची एन्ट्री थोडी उशीराच होती. त्याच्या एन्ट्रीच्या वेळेस मी विंगेत त्याच्या बाजूलाज उभा होतो. त्याच्या एंट्रीची वेळ आली आणि पहातो तो हा गार पडायला लागलेला. घामानं शर्ट थबथबलेला ! स्पीचलेस उभा राहून विंगेतून आत पहातोय ! जणू काही ट्रान्स मधे असल्या सारखा ! मी त्याला हलवून जागं केलं आणि त्याच्याकडे पाहिलं आणि जणू काय मला हे सारं कळालं नाही असं दाखवून एक "थम्स अप" इशारा केला. त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि अक्षरश: आत (स्टेजवर) ढ्कललं. आणि काय सांगावं जणू त्याच्यात कायापालट झाला. तो जे "सुटला" ते सुटलाच !
नाट्कातलं अभिनयाचं पारितोषिक त्याला मिळालं. तो एमबीबीएस पास झाला.
हे वर्ष (२०१२-१३) नांदेड कॉलेजचं सिल्वर ज्युबिली वर्ष आहे. त्यासाठी एक फेस्बुक ग्रूप तयार झालाय. त्यात त्याचा फोटो नुकताच पाहिला. त्याचं लग्न झालंय आणि त्याच्या सुखी संसारवर अपत्याच्या रूपानं सुंदर फुल उमललंय. माझ्या माहिती प्रमाणे नाट्कातल्या त्या प्रवेशानंतर त्याला मानसोपचाराची गरज पडलेली नाही. त्याला गुण आला तो ह्या अभावितपणे झालेल्या नाट्योपचारनं, ड्रामा थेरपीनं !!
--अशोक
वा! सुरेख लिहिलंत !
वा! सुरेख लिहिलंत !
व्वा...
व्वा...
मस्त किस्सा.
मस्त किस्सा.
सो स्वीट. आता ह्या आजाराबद्दल
सो स्वीट. आता ह्या आजाराबद्दल वाचून काढते. डर के आगे जीत है हे त्याला माहीत नव्हते का?
अरे वा छानच
अरे वा छानच
व्वा..
व्वा..
--प्रज्ञा, विजय, नंदिनी,
--प्रज्ञा, विजय, नंदिनी, अश्विनी मामी, नताशा, किरनु
धन्यवाद !-
समर्पक वाटले म्हणून हे शीर्षक दिले. -
नंतर कळाले की- नाट्योपचरा नावाचा उपचार अस्तित्वात आहे !!
खूप सुंदर लिहिलय!! अभिनंदन
खूप सुंदर लिहिलय!!
अभिनंदन
किस्सा आवडला. विचार
किस्सा आवडला. विचार करण्यासारखा आहे.
धन्यवाद !
धन्यवाद !