Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुभांगी जी, जान्हवीने लग्न
शुभांगी जी, जान्हवीने लग्न मोडलं हे तर माहित आहेचं तुम्हाला...पण आता तिने हे श्रीला सांगितलं...'तो आता तिला खर काय ते सांगेल...म्हणजे तो अकौंटंट नाही वगैरे....'अस तो ठरवतो. तिच्या मागे मागे सावली सारखा (कि शेपटी सारखा???) फिरायला लागतो......अर्थात तिची परवानगी घेऊन ह...पण सांगू शकत नाही....पुढच्या भागात तो तिला प्रपोझ करतो.....पण तो टकल्या...म्हणजे अनिल तिला खोटच सांगतो कि, श्रीच लग्न झालेलं असून तो तिला फसवतोय...आणि कदाचित ती त्यावर विश्वासहि ठेवते...आता विरह-दुख-तडपना वगैरे सुरु होईल......"तुझ्याविना...."
मकु तु पुढचं पण सांगून टाकलंस
मकु तु पुढचं पण सांगून टाकलंस अनिल बहुतेक आजच्या एपिसोडात तिला ते सांगेल, किंवा उद्याच्या म्हणजे मग प्रेक्षक पुर्ण वीकेन्ड भर तडपतील 'पुढे काय होइल या विचारात. मग सोमवारी काहीतरी फुसका बार निघेल.
मधुरा काल तो अनिल, गोखले गृह
मधुरा काल तो अनिल, गोखले गृह उद्योगाच्या ऑफिसमधे शिवदेबाईंशी फ्लर्ट करत होता. ह्या सिरेलीत नाव घेऊन बोलायची पद्धत नाहिये का? एका अकौंटंटशब्दावरुन किती ते रामायण.
बादवे त्यामालिकेशी संबधीत कुणीतरी इथले प्रतिसाद वाचलेले दिसताहेत. आधी मुर्खासारखे वागणारी नायिका आता बँकेचे लोन काढुन तिच्या वडिलांच्या गुडघ्याचे ऑप॑रेशन करायला निघालिये.
शुभांगी., जान्हवी मला ठाण्यात
शुभांगी., जान्हवी मला ठाण्यात भेटली होती ती, मीच तिला सांगितलं की 'अगं बये, एवढी चांगली बँकेत नोकरी करतेस, तर तुला कामगार योजनांचा लाभ घेता येत नाही का?'
यातली नायिका झेंडा मधे आहे
यातली नायिका झेंडा मधे आहे तीच आहे ना? छान आहे दिसायला ती>>> मला पण हेच विचारायचं होतं...
त्या फोटोंमधे तो तिला हॉस्पिटल मधे मॅक डी चा कोक पाजतोय का?? तो डब्बा तसाच वाटतोय....
मंजु हो ठाण्यातलच शुटींग आहे
मंजु
हो ठाण्यातलच शुटींग आहे ना सगळे. मला आवडते ती जान्हवी नायिका न वाटता शेजारच्याच घरातली असल्यासारखी वाटते.
अनिश्का हो ती झेंडामधे होती
अनिश्का हो ती झेंडामधे होती आणि ती डोंबिवलीची आहे, पाटकर शाळेत शिकली आहे ती, तेजश्री प्रधान नाव आहे.
मंजुडी तुम्ही लिहिलेय ते बरोबर आहे कामगार-योजना किंवा अजून काही मेडिक्लेम, डिपेंडंट असतील आई-वडील तरी बँकेतर्फे योजना असतात त्याचा लाभ घ्यायचा सोडून म्हाता-हाशी लग्न करायला काय निघाली.
जरी श्रीचे लग्न झाले असे तिला सांगितले तरी त्याचा पर्याय म्हणजे अनिलशी लग्न असा होऊ शकत नाही.
अनिश्का हो ती झेंडामधे होती
अनिश्का हो ती झेंडामधे होती आणि ती डोंबिवलीची आहे, पाटकर शाळेत शिकली आहे ती, तेजश्री प्रधान नाव आहे.>>>>> हो का??? अर्रे वा....आमच्या डोंबिवलीची आहे ती...
आधी मुर्खासारखे वागणारी
आधी मुर्खासारखे वागणारी नायिका आता बँकेचे लोन काढुन तिच्या वडिलांच्या गुडघ्याचे ऑप॑रेशन करायला निघालिये. >> हे आधी न सुचायला अक्कल केळी खायला गेली होती का तिची?
उगिच त्या अनिलला मध्ये घुसवलंय. किती चिप आहे तो शी मला तर त्याला पाहिलं तरी शिसारी येते.
तो टकल्या आपटेचा बापट कसा
तो टकल्या आपटेचा बापट कसा काय झाला ... तो जानव्हीचा भाउ म्हणतो आपटा इथून .. नंतर एका संवादात ...माझं नाव बापट सांगणार नाही म्हणतो...
अनिश्का अग मीपण डोंबिवलीचीना.
अनिश्का अग मीपण डोंबिवलीचीना.
ह्या सिरेलीत नाव घेऊन बोलायची
ह्या सिरेलीत नाव घेऊन बोलायची पद्धत नाहिये का? एका अकौंटंटशब्दावरुन किती ते रामायण.>>>> खरच...ह्या सिरेलीत नाव घेऊन बोलायची पद्धत नाही...घरात पण श्री व आजी आणि इतर बायका ती मुलगी असेच बोलत असतात...ऑफिसमधे शिवदेबाईंशी बोलताना तो टकल्या जान्हवी बद्द्ल सांगतो तर शिवदेबाईंना मागचे सगळे आठवते...म्हणजे अख्या गावात एकच जान्हवी नावाची मुलगी आहे का???? काहीहि......
ती जान्हवीची मैत्रिण
ती जान्हवीची मैत्रिण जान्हवीशी बोलताना किती सेन्सिबल वाटते पण तेच ती साहेबाकडे गेल्यावर अशी डोक्यावर पडल्यासारखी काय वागते. मी बाहेर जाणार नाही, माझा किती वेळ खाल्ला वगैरे. असो.
आजच अॅट्रॅक्शन - आयुष्यभर जजमेंटस करत राहिल तर प्रेम कधी करायच?? - इति श्री आणि त्यावर जान्हवीची गोंधळलेली मुद्रा.
.म्हणजे अख्या गावात एकच
.म्हणजे अख्या गावात एकच जान्हवी नावाची मुलगी आहे का???? काहीहि.. >> आवडत्या मालिका मध्ये
काही गोष्टी आपले डोके बाजुला ठेवून बघायच्या ...
आयुष्यभर जजमेंटस करत राहिल तर
आयुष्यभर जजमेंटस करत राहिल तर प्रेम कधी करायच?? > हे मी कालच पाहिलं . आज आता गैरसमज , दु:ख, तडफड इ. असेल . असो. पहायला आवडत्येय ही मालिका.
अनिश्का अग मीपण
अनिश्का अग मीपण डोंबिवलीचीना.>>>>>>>>>>>>.
<ऑफिसमधे शिवदेबाईंशी बोलताना
<ऑफिसमधे शिवदेबाईंशी बोलताना तो टकल्या जान्हवी बद्द्ल सांगतो तर शिवदेबाईंना मागचे सगळे आठवते.>
ती कोणत्या बँकेत काम करते हेही सांगितले ना त्याने?
ती बेबीआत्या तर खूपच डोक्यात
ती बेबीआत्या तर खूपच डोक्यात जाते. आणि तिचा फोन आल्यावर लगेच श्री आपलं बोलणं अर्धवट ठेवून निघतो काय अर्थात त्यामुळे जान्हवीला त्याची खरी ओळख कळायला अजून एक दोन आठवडे लागतील आणि तेवढीच सिरियल पुढे ताणली जाईल.
आणि अजून सायलीची एन्ट्री कशी
आणि अजून सायलीची एन्ट्री कशी काय झाली नाही? तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या बघून अजून गैरसमज, विरह, अजून सिरियल लांबणे वगैरेला भरपूर वाव आहे की
>>म्हणजे अख्या गावात एकच
>>म्हणजे अख्या गावात एकच जान्हवी नावाची मुलगी आहे का????
अगदी अगदी.... मला पण अगदी गंमत वाटली!
सहज आहे ते सोप्प करा, सोप्प आहे ते सुंदर करा, सुंदर आहे ते जतन करा..... आवडला डायलॉग
आणि अजून सायलीची एन्ट्री कशी
आणि अजून सायलीची एन्ट्री कशी काय झाली नाही? << बांगड्या मिसींग आहेत हे श्रीच्या लक्श्यात आले नाहिये का?
सहज आहे ते सोप्प करा, सोप्प आहे ते सुंदर करा, सुंदर आहे ते जतन करा.<<< पण सीरीयल मधे सग ळे सोप्प आहे ते कॉम्प्लीकेटेड करायच्या मागे लागले आहेत
आदिती तो एक मुर्ख अनिल
आदिती
तो एक मुर्ख अनिल अर्धवट मेसेज देत सुटलाय आणि ही बावळट जान्हवी कोणतीही खातरजमा न करता ऐकिव माहितीवर विश्वास ठेवणार वाटतं :रागः त्यात शिरेलीचे २-३ भाग सहज जातिल, मग रडारडी मग मनवा मनवी यात महिना... लोको महिनाभर तर या दोघांचं काही लग्न होत नाही अजून.
हल्ली सगळ्या सिरीयल बघतांना
हल्ली सगळ्या सिरीयल बघतांना डोके गहाण ठेवायला लागणार, किती सिली मिस्टेक करतात.
जान्हवी एवढी बँकेत काम करणारी आणि श्रीबद्दल खातरजमा करणार नसेल तर कठीण आहे आणि जरी श्रीचे लग्न झाले असले तरी अनिलशी लग्न करण्यापेक्षा unmarried राहिलेले काय वाईट.
अनिलशी लग्न करण्यापेक्षा
अनिलशी लग्न करण्यापेक्षा unmarried राहिलेले काय वाईट. << हो अनिलशी लग्न मोडल त्यात श्रीचा काही सबंध नव्हता. त्या मुळे श्रीच काहीही असल तरी ते मोडलच होत.
खरतर जान्हवीची आई तिला बघायला आलेल्या मुलांना (ते लग्नानंतर आर्थिक मदत करायला तयार असतांनाही) तिच्याबदद्ल वाईट का सांगते आणि अनिलशीच लग्न करण्यासाठी का इनसीस्ट करते ते कळले नाही.
ती सावत्रपणाने वागतेय, तिला
ती सावत्रपणाने वागतेय, तिला जान्हवीचे वाईट करायचे आहे आणि पैसाही भरपूर हवाय.
<ऑफिसमधे शिवदेबाईंशी बोलताना
<ऑफिसमधे शिवदेबाईंशी बोलताना तो टकल्या जान्हवी बद्द्ल सांगतो तर शिवदेबाईंना मागचे सगळे आठवते.>
ती कोणत्या बँकेत काम करते हेही सांगितले ना त्याने?>>>> हो...सांगितले पण शिवदेबाईंना मागचे सगळे आठवल्यानंतर...
मला तर वाटत आहे, लग्न झालं की
मला तर वाटत आहे, लग्न झालं की सिरियल संपणार.........
मुळात बापाच्या वयाचा नवरा
मुळात बापाच्या वयाचा नवरा दाखवला ते प्रचंडच चुकलेय. दर भागात ही गोष्ट अधिकाधिक खटकते आणि भयंकर वाटतेय. फार फार तर दहा-बारा वर्षांनी मोठा, वाया गेलेला, गुंड प्रवृत्तीचा माणूस दाखवला असता तर वास्तववादी तरी वाटले असते. आजच्या काळात, मोठ्या शहरात राहणारी, बँकेत नोकरी करणारी आणि तिची फॅमिली बॅकग्राऊंड बघता वडलांच्या वयाच्या माणसाशी लग्न ही गोष्ट अगदीच कृत्रिम वाटते.
बाकी श्री आणि जान्हवीची लव्ह स्टोरी बघायला मजा येतेय. परीकथा इस्टाईल
हिरोहिर्वीण सोडून मला अनील
हिरोहिर्वीण सोडून मला अनील आपटेच आवडला..जबरी काम करतोय तो
परन, लग्न झाल्यावर सिरीयल
परन, लग्न झाल्यावर सिरीयल संपण्यापेक्षा चहूबाजूंनी वाढत जाईल. त्या सगळ्या सास्वा, त्यांची स्टोरी आणि मग नायिकाच कशी त्यांचे प्रॉब्लेम सोडवणार आणि त्यांना सुखी करणार हे दाखवताना ताणणार हि सिरीयल.
Pages