Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 11:32
जिंदगी लाचार आहे
मरणही दुश्वार आहे
पाडशी खिंडार का तू
ये , मनाला दार आहे
मी मला नाही म्हणत मी
हा तुझा उद्गार आहे
वळवळत होती मघाशी
तीच इच्छा घार आहे
काल कुठला वार होता
आज कुठला वार आहे
तू पुन्हा येशील परतुन
मी इथे नसणार आहे
वीट दबकत व्यक्त झाली
"केव्हढा हा भार आहे "
-----------------------------------------
होत असतानाच कळते
ही गझल बेकार आहे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही गझल खरंच बेक्कार आहे.
ही गझल खरंच बेक्कार आहे.
धन्यवाद सर ( बेक्कार हा शब्द
धन्यवाद सर
)
( बेक्कार हा शब्द '' हर्षोल्ल्हासाने '' उच्चारल्यास अर्थाला एक वेगळीच छटा लाभते हे जाणवले.
(No subject)
काल कुठला वार होता आज कुठला
काल कुठला वार होता
आज कुठला वार आहे<<< व्वा
होत असतानाच कळते
ही गझल बेकार आहे<<< मस्त
वार आणि दार शेर आवडले!
वार आणि दार शेर आवडले!
धन्यवाद शिबा धन्स
धन्यवाद शिबा
धन्स पुलस्तीजी
धन्स बेफीजी .......हा वार चा शेर तुम्हाला आवडेलच असे मी गेस केलेच होते