नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसेच आपण कोण आहोत ते खरं सांगून का टाकत नाही? << खरं आणि रोखठोक सांगितलं की serial संपली Lol

फार काही पुढे सरकली नाहिए यांची गाडी. श्रीच्या आजीने बांधलेल्या देवळात जान्हवी आणि तिचे आई-वडील जातात आणि तिथे जान्हवीची आई श्रीच्या आ़ईबरोबर भांडते. मग तिथे श्री येतो, म्हणजे तो आणि जान्हवीची भेट व्हावी अशी सिच्युएशन तयार करतो मनिष. मग तिचे बि.पी. लो होते आणि श्री तिला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करतो.

प्रोमोजमधे जान्हवी त्या अनिलला घराबाहेर जा अस सांगताना दाखवली आहे. तो काहीतरी बोलतो तिच्या वडिलांबद्दल.

जान्हवीचे बाबा काहीतरी स्ट्राँग अ‍ॅक्शन घेणारेत<< काल म्हणालेत ना की मी ऑपरेशन करुन घेणार नाहीये

काही संवाद खूप भावले मनाला....."जिवंत असे पर्यंत नाती जपण्यापेक्षा नात्यांमधला जिवंतपणा जपायला हवा." हा तर खूप मस्त होता.

बाकी पुढ काय होणार हे स्पष्टच आहे....पण कथा छान पकड घेतीये. मुळात कुठेही जास्त अतिरेक केलेला नाही असे वाटते...पण भविष्यात माहित नाही. कारण प्रत्येक मालिका आधी फ्रेश वाटते आणि नंतर बोअर करते.

हो मधूरा, अजून एक संवाद आवडला.

ज्यच्यावर उपकार केले त्याला एकवेळ विसरा पण ज्याने उपकार केले त्याला विसरू नका.

1175418_627460657275987_1571522479_n.jpg560797_627460670609319_1747680195_n.jpg557092_627460787275974_407550547_n.jpg1186337_626389320716454_1083771403_n.jpg1239417_627460877275965_1427589609_n.jpg

काही संवाद खूप भावले मनाला....."जिवंत असे पर्यंत नाती जपण्यापेक्षा नात्यांमधला जिवंतपणा जपायला हवा." हा तर खूप मस्त होता. >>>> =+१
ज्यच्यावर उपकार केले त्याला एकवेळ विसरा पण ज्याने उपकार केले त्याला विसरू नका.>>>+१

एक बित्तंबातमी - नायिकेचं खरंखुरं लग्न ठरलंय Happy

ती नायिका खरच खूप गोड आहे. गोरी पान वगैरे नसली तरी सोज्वळ आणि सात्विक चेहरा आहे तिचा. मला अशी माणस खूप आवडतात. त्यांच्याकडे नुसत पाहिल तरी मन प्रसन्न होतं आणि अशा माणसांशी मैत्री झाली तर मग जॅकपॉट लागला असच म्हणायच Happy

ती नायिका खरच खूप गोड आहे. गोरी पान वगैरे नसली तरी सोज्वळ आणि सात्विक चेहरा आहे तिचा. मला अशी माणस खूप आवडतात. त्यांच्याकडे नुसत पाहिल तरी मन प्रसन्न होतं आणि अशा माणसांशी मैत्री झाली तर मग जॅकपॉट लागला असच म्हणायच स्मित>>>+१

यातली नायिका झेंडा मधे आहे तीच आहे ना? छान आहे दिसायला ती... स्माईल पण छान आहे तिची.. इथे जरा जास्तच हसते कधी कधी.. Happy पण तरी.....

मग जान्हवी आणि श्री......'शुभमंगलsssss सावधान' !!!>>>अजून ती सोन्याच्या बांगड्या घेऊन गेलेली सायली आहे कि मालिका ...लग्न लांबवायला.

नायिकेचे लग्न 'राहुल डोंगरे' नावाच्या तरुणाशी ठरलंय. FB वर कोणीतरी फोटो टाकला तो मी बघितला. छान आहे तो.

ए.ल.दु.गो. नंतर हीच एका मालिका दर्जेदार वाटते. बाकी हि मालिका मला आवडतिये. बाकी, सासवांचा भूतकाळ पण आहे काही ना काही....कदाचित नंतर तोच भूतकाळ दाखवण्यात मालिकेचे काही भाग घालवतील.

मस्त होता शनिवारचा भाग. सगळे संवाद मस्त. तो अनिल पण काय च्या काय बोलतो Angry

त्या तिघांनी मिळुन चांगला अपमान केला त्या अनिलचा.
त्या अनिल आणि जान्हवीच्या आईला बघुन आपल्याला राग येतो यातच त्यांचा अभिनय उत्तम असल्याची पावती आहे. Happy

त्या सगळ्या सासवा आता बघवत नाहित.

त्या अनिल आणि जान्हवीच्या आईला बघुन आपल्याला राग येतो यातच त्यांचा अभिनय उत्तम असल्याची पावती आहे >>>>>>>> पटेश...

त्या प्रत्येक आईची एक कथा असणार. आणि सर्वांच्या जखमेवर मलमं लावायला लौकरच सून येईल,.
तिकडे ती राधा आणि इकडे ही... सर्वगुणसंपन्न..

११ वर्षात त्या केसाळ म्हातार्‍याने तुझं कधी ऐकलं नाही पण राधाने त्यांना किती कमी वेळातच आपलंसं केलंय हे अत्यंत सोज्वळपणे बोलून रंजू त्या सीमाच्या जखमेवर सॉलिड मिठ चोळत होती काल. Lol Rofl

Pages