Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
काल पुण्यात एका इंडिकावर या
काल पुण्यात एका इंडिकावर या ओळी वाचायला मिळाल्या
'जेजमेंट फेल तो येरवडा जेल'
आणि त्याच्याच खाली
'फक्त तुझ्याचसाठी....'
आत्ताच एका बाईकच्यामागे
आत्ताच एका बाईकच्यामागे लिहिलेले वाचले
माझा देव साधा
आई आणि दादा
एका बाईकच्यामागे
एका बाईकच्यामागे लिहिलेले............
बापाची पेंड
एका ट्रकवर.. "प्रगतिच्या
एका ट्रकवर.. "प्रगतिच्या शिकराकडे"![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एका बाईकच्यामागे लिहिलेले -
एका बाईकच्यामागे लिहिलेले -
tumachyasathi kaypan........
ani swarthasathi naaypan.............
(No subject)
सांगलीहुन कोल्हापुरला जाताना
सांगलीहुन कोल्हापुरला जाताना एका टाटा सफारीच्या मागे लिहीले होते,
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
"काय बघतोस रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं"
एका ट्रकवर वाचले....... मी
एका ट्रकवर वाचले.......
मी पळतो, तू का जळतो?
काल एका ट्रकवर
काल एका ट्रकवर वाचले.......
गरीबी आली तर लाजू नका...श्रीमंती आली तर माजू नका....
"MASTER OF ALL, JACK OF
"MASTER OF ALL, JACK OF NONE."
आज एका इनोव्हामागे पाहिले.
'They say people improve with
'They say people improve with age. I am reaching magnificent' असा एका आजोबांचा बम्पर स्टिकर पाहिला होता इथे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाहनाच्या मागे नाहि तर NH4 वर
वाहनाच्या मागे नाहि तर NH4 वर बेळगाव्जवळ एका दुकानाची पाटि..............'तुमच्यासाठी कायपण' ??
'
कालच एका पिकअप टेंम्पोवर
कालच एका पिकअप टेंम्पोवर बघितले:
तंबाखुला लावला चुना, नॉनस्टॉप नाशिक पुना.
एका शिवाजी भक्ताने रिक्षाच्या
एका शिवाजी भक्ताने रिक्षाच्या मागे लिहिल होत. . .
लष्क-रे-शिवबा
एका आंबेडकर भक्ताने रिक्षाच्या मागे लिहिल होत. . .
लष्क-रे-भीमा
नीळा धुमाकूळ
"ट्रक किंवा रिक्शाच्या मागील
"ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार....! जय हो..!"
1) "बघतोस काय ? मुजरा कर .....!"
2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
3) "बघ माझी आठवण येते का ?"
4) ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''
5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
6) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
7) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
8) 'अहो, इकडे पण बघा ना...'
9) "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
10) थांब लक्षुमी कुंकू लावते!
11) तुमचे लक्ष आमच्याकडे का?
12) "लायनीत घे ना भौ"
13) चिटके तो फटके!
14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
15) अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्य ू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
16) १३ १३ १३ सुरूर !
17) "नाद खुळा"
18) "हाय हे असं हाय बग"
19) आई तुझा आशिर्वाद.
20) "सासरेबुवांची कृपा "
21) "आबा कावत्यात!"
22) पाहा पन प्रेमाणे
23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
24) "हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"
25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.
26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...
27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
30) हेही दिवस जातील
31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
32) घर कब आओगे?
33) १ १३ ६ रा
34) सायकल सोडून बोला
35) हॉर्न . ओके. प्लीज
36) "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"
37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
38) तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
39) माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा
40) बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--
सुसाईड मशिन
मिसगाईडेड मिसाईल
मॉम सेज नो गल्स
41) एका ट्रक च्या मागे लिहले होते:
राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
42) एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल"
खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
43) अजस्त्र डंपरच्या पाठीमागे
उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल
44) एका टेम्पोच्या मागे..
आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!
राज्य करेल तर मराठाच आमच्या
राज्य करेल तर मराठाच आमच्या गाडीवर
चेपु वरून साभार
चेपु वरून साभार
एका टेम्पोच्या मागे
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले
'गाठोडं गेलं तर जाउद्या पण
भामटा लक्षात राहू द्या
अनास्पुरे_जर्मनीकर "कांदोने
अनास्पुरे_जर्मनीकर
"कांदोने हमे लुटा कपासीमें कहा दम था
हमने जहा ऊस लगाया वहा पाणी कम था"
पेंटर एकदम जय महाराष्ट्रवादी दिसतोय. हिंदीमध्येही मराठी ठेवलेय.
बाकी तो ट्रेलर MH15 चा दिसतोय. अन कांदा, कपास व ऊस म्हणजे तालूका मालेगाव असावा कारण नाशिक जिल्ह्यात इतरत्र कपास करत नाहीत.
पाषाणभेदजी.... पेंटर एकदम जय
पाषाणभेदजी....
पेंटर एकदम जय महाराष्ट्रवादी दिसतोय. हिंदीमध्येही मराठी ठेवलेय.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>>बाकी तो ट्रेलर MH15 चा दिसतोय. अन ......>>शक्य आहे.
एका ट्रकवर लिहिलं होतं
एका ट्रकवर लिहिलं होतं 'आईवडिलांचा आशिर्वाद' आणि त्याच्या खाली 'शेवटी नशिब'. अगदी समर्पक!
काल सकाळी दुध आणायला गेले
काल सकाळी दुध आणायला गेले होते समोर एक रिक्षा उभी होती तिच्या मागे लिहिल होतं "नुसता धूर"
दुकानात जाउन दुध घेउन घरात येइपर्यंत कसबस दाबलेल हसु घरात आल्यावर अनावर झाल आणि १० मिनिट एकटिच हसत होते. साबा आणि नवरा आ वासुन बघत होते पण त्यांना काही सांगण्याच्या परिस्थितीत मी नव्हतेच....
(No subject)
नांदेडमधील एका बाइकच्या मागे
नांदेडमधील एका बाइकच्या मागे तरुणींना केलेले आवाहन/ विचारणा/ त्यांची काढलेली छेड की अजून काहीतरी:
A पोरी, १T A३० का?
पेंटर एकदम जय महाराष्ट्रवादी
पेंटर एकदम जय महाराष्ट्रवादी दिसतोय. हिंदीमध्येही मराठी ठेवलेय. >>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
नुसता धुर >>
कोल्हापुरला तर जाळ पण काढतात
(No subject)
ऑफिस मधुन घरी जातांना एका
ऑफिस मधुन घरी जातांना एका कार च्या मागे लिहले होते
कर्जे की है,जलो मत ...............
टॅक्सीच्या मागे लिहिलेली
टॅक्सीच्या मागे लिहिलेली शापवाणी - खाये पिये नंदलाल भूके मरे पापी चांडाल
एका गाडिच्या मागचे वाक्य "
एका गाडिच्या मागचे वाक्य
" विचारंल तर काय झाल?"
एका टेम्पोवर पाहिलं - राजे,
एका टेम्पोवर पाहिलं - राजे, आज तुम्ही असतात तर ही वेळ आली नसती.
Pages