Submitted by वैवकु on 17 August, 2013 - 13:34
.....................................................................................................
@३ ४ ५
*
९
८ ७४
९
()
:>,!
*
&^% व्णॉ० @#$%^^&&****()!~:|+_><?}{ ASADBIHJYUIAW ZX XVNOQUEHFJORU SBCJJPOL,DQW FCK E
>>>>
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वैभ्या टच असलेली गझल. मात्र
वैभ्या टच असलेली गझल.
मात्र गझलेबाबत अजून थोडे गंभीर व्हावे ही विनंती.
गझल आवडली.
धन्स सर ...फोनवर बोलीन
धन्स सर ...फोनवर बोलीन सविस्तर .....उद्या रविवार आहे निवांत असाल ना ?
फिरण्यास मी निघताक्षणी हटकून
फिरण्यास मी निघताक्षणी हटकून येशी पावसा
भिजण्यास घाबरतात त्या पोरी कश्या पटवायच्या<<< व्वा - दुसरी ओळ व्वा व्वा!
चालायला जमले सरळ नाहीच आयुष्यामधे
मी क्लासलाही जायचो झोपेतही चालायच्या<<< अँ?
'सरळ'चा काय संबंध?
जागेपणी चालायची धडकी अशी भरली मला
मी क्लासलाही जायचो झोपेतही चालायच्या - असे सुचले. कृ गै न!
गझलेमधे गुंफायच्या पेचात सापडतोय मी
सोडून दे संवेदने गहिर्या मिठ्या मारायच्या <<< सुंदर शेर
वाटेल ते ते बोललो रागावला
वाटेल ते ते बोललो रागावला नाही प्रभू
होत्या शिव्याही घातल्या ..ह्या विठ्ठालाच्या आssXX .....<<<
कंप्लीट भंकस
कशाचा कशाला मेळ नाही असे
कशाचा कशाला मेळ नाही असे वाटले.
म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे तेच कळले नाही.
वाटेल ते ते बोललो रागावला नाही प्रभू
होत्या शिव्याही घातल्या ..ह्या विठ्ठालाच्या आssXX .....<<< कंप्लीट भंकस >>>> बेफिकीरांना पुर्ण अनुमोदन.
सतत विठ्ठलाला कशाला वेठीला धरता कुलकर्णी ? काय कोसायचे असेल ते स्वतःला कोसा की.
माशा, ते विठ्ठलाची निंदा
माशा,
ते विठ्ठलाची निंदा अश्यासाठी करतात की त्यांची स्वतःची निंदा व्हावी
आधीची गझल वाचा त्यांची
असो!
मला काय!
मला जाणीव असते विठ्ठला तू
मला जाणीव असते विठ्ठला तू स्तुत्य असल्याची
तुला बदनाम करतो मी स्वतःला निंदण्यासाठी
वाचा, माशा
बेफिकीर , वाचले पण पटले नाही
बेफिकीर ,
वाचले पण पटले नाही .
मला जाणीव असते विठ्ठला तू स्तुत्य असल्याची
तुला बदनाम करतो मी स्वतःला निंदण्यासाठी >>
हे तर वट्ट कळले नाही . निंदनीय व्हायचेच असेल तर बाकी ढीगभर कारणे आहेत की. विठ्ठलाला बदनाम करून मग स्वतः निंदनीय व्हायचे हे कशासाठी ? विठ्ठलाने असे काय केले आहे ?
आणि मुळात कवीला निंदनीय का व्हायचे आहे ? विठ्ठल स्तुत्य असल्याची जर जाणीव आहे तर त्याच्या बदनामीचा घाट कशासाठी ? ही एकप्रकारे पहिल्या ओळीशी (पर्यायाने भावनेशी) प्रतारणा नाही का?
त्याने खरंच विठ्ठलाची बदनामी होणार आहे का ? ( तर नाही ) , मग कवी निंदनीय कसा काय होईल?
प्रत्येक कविता कळलीच पाहिजे वा पटलीच पाहिजे असा काही नियम नाही . पण वाचल्यानंतर जे वाटले ते लिहिले.
प्रतिसाद सांपादित करून
प्रतिसाद सांपादित करून विपूतून पाठवल आहे बेफीजी
हा व खालचा प्रतिसाद संपादित
हा व खालचा प्रतिसाद संपादित करून विपूतून पाठवला आहे माधवी शहाडे मॅडम
(No subject)
गझलेमधे गुंफायच्या पेचात
गझलेमधे गुंफायच्या पेचात सापडतोय मी
सोडून दे संवेदने गहिर्या मिठ्या मारायच्या....वा !
गझलेमधे गुंफायच्या पेचात
गझलेमधे गुंफायच्या पेचात सापडतोय मी
सोडून दे संवेदने गहिर्या मिठ्या मारायच्या
मस्तच शेर, काफिया 'मारायचे' असा झाला असता खरे तर पण ठीकच!
वेगळेपणा दर्शविण्यासाठी विठ्ठलाचा शेर ह्या तत्वाला कधी कधी मुरड घालायला हरकत नसावी
मला ही गझल अशी दिसतेय.
मला ही गझल अशी दिसतेय.
.....................................................................................................
@३ ४ ५
*
९
८ ७४
९
()
:>,!
*
&^% व्णॉ० @#$%^^&&****()!~:|+_><?}{ ASADBIHJYUIAW ZX XVNOQUEHFJORU SBCJJPOL,DQW FCK E
>>>>
जो निस्सीम प्रेम करतो तोच
जो निस्सीम प्रेम करतो तोच मर्यादा उल्लंघू शकतो.. अर्थात कवितेतले हे 'सीमोल्लंघन ' एक वेळ देवाला पटेल, वाचकाला रुचेलच असे नाही. कोणाला ते निरर्थक वाटेल, कोणाला एक पोज वाटेल, कोणाला धक्कादायक. या सार्याची तयारी हवी..
''हासडल्या तुज शिव्या तरीही तुझ्याच पायी आलो लोळत '' लिहिणार्या मर्ढेकरांना कशाकशातून जावे लागले असेल..
मला ही गझल अशी दिसतेय.
मला ही गझल अशी दिसतेय.
मलासुद्धा!!
गझल दिसत नाहीये...
गझल दिसत नाहीये...
वैभवने ही गझल संपादित
वैभवने ही गझल संपादित करुन हे असे का टाकले माहीत नाही.... इथे आधी लिहिलेली गझल खाली देत आहे.वैभवशेठ.....माझा हा आगाऊपणा न आवडल्यास संपादित करेन.
नाहीत ज्या केल्या मुळी त्याही चुका काढायच्या
आहेत ह्या जन्मामधे सगळ्या मला फेडायच्या
जेवायची असली सुखे तर मूग गिळ् अन् गप्प बस
आपण कशाला लष्कराच्या भाकर्या भाजायच्या
फिरण्यास मी निघताक्षणी हटकून येशी पावसा
भिजण्यास घाबरतात त्या पोरी कश्या पटवायच्या
चालायला जमले सरळ नाहीच आयुष्यामधे
मी क्लासलाही जायचो झोपेतही चालायच्या
काढून अकलेच्या मिश्या मी पास होवू लागलो
त्या खालच्या यत्तांमधे वरचे धडे वाचायच्या
गझलेमधे गुंफायच्या पेचात सापडतोय मी
सोडून दे संवेदने गहिर्या मिठ्या मारायच्या
वाटेल ते ते बोललो रागावला नाही प्रभू
होत्या शिव्याही घातल्या ..ह्या विठ्ठालाच्या आssXX ....
~वैवकु
धन्यवाद डॉ़क साहेब आजकाल लोक
धन्यवाद डॉ़क साहेब
आजकाल लोक कशाकशावरून नाराज होतात कै नेम नै त्यात हे वैवकु प्रकरण जरा येड्छापच दिसतय
असो
मला काय !
आपल्याला तर ब्वॉ अख्खी गझल समजली तुमचः तुमी बघून घ्या लोक्स !!!
असो
मला काय !
काही वेळेला काही लिखाण आपल्या
काही वेळेला काही लिखाण आपल्या हातून होतं. मग ते 'नसतं लिहिलं तरी चाललं असतं' ह्या कॅटेगरीतलं आपलंच आपल्यालाही वाटतं. पण हा केवळ एक 'आफ्टर थॉट' का काय असतो... (पश्चातबुद्धी?) कुणास ठाऊक तुला ह्या रचनेबद्दल असंच वाटतंय का.. (मला माझ्या बर्याच कवितांबद्दल कधी कधी असं वाटतं.)
असो..

प्रामाणिकपणेच सांगत असतो, आजही सांगतो.... अजिबात आवडली नाही रे मित्रा.... त्यातल्या त्यात 'गझले'चा शेर आवडला.... बस्स.
वै व कु , आपल्या दोन्ही विपु
वै व कु ,
आपल्या दोन्ही विपु वाचल्या.
मला गझलविषयक तांत्रिक काही कळत नाही.पण मी वाचत असते व अर्थ लावायचा प्रयत्न करते.तुमच्या गझलेबद्दल ही काही अर्थ कळाले नाहीत.
एखाद्या लेखनाबाबत साधक बाधक चर्चा जेंव्हा होत असते तेंव्हा त्यातून लिहिणा-याला व वाचणा-याला बरेच काही मिळत असते. कित्येक गोष्टींचे नव्याने आकलन होते. कधी आपल्याला लागलेला अर्थ वेगळाच असतो .
लिहिणा-याच्या मनात त्यापेक्षा वेगळं काहीतरी असते. माबो सारख्या प्लॅट्फॉर्म वर जेंव्हा कवी उपलब्ध असतो तेंव्हा साहजिकच न समजलेले थेट कवीलाच विचारावे असे वाटते. त्यामुळे मी माझ्या शंका विचारल्या होत्या.
असो.
विठ्ठलाचे शेर आवडले नाहीत असं नव्हे तर त्यामागचे लॉजिक कळाले नाही.
@३ ४ ५ * ९८ ७४ ९ () :>,!
@३ ४ ५ *
९८ ७४
९ ()
:>,! *
&^% व्णॉ० @#$%^^&&****()!~:|+_><?}{ ASADBIHJYUIAW ZX XVNOQUEHFJORU SBCJJPOL,DQW FCK E
हाहाहाहा. ये तो होनाही था.....! गद्य होतं का पद्य, वाचायला काही मिळालं नाही. पण, वरील अॅट दी रेट ऑफ तीन, चार, पाच पासून ते एफसीई पर्यंतची सध्या धाग्यात दिसत असलेली आकडेमोड पाहता हे अस्वस्थ मनस्थितीचं लक्षण आहे. बाकी, आपण रचना टाकायचे थांबविले आहे, असे दिसते. मनःपूर्वक आभार. काही नाही हो, आपल्या रचना वाचून माझी गझल वाचनाची आवडच कमी व्हायला लागली होती. सॉरी हं वाईट वाटून नका घेऊ. काही दिवस विश्रांती घ्या. सकाळी मॉर्निंग वॉकला पाचेक किलोमिटर जात जा. आहारात फ्रूट्सचा वापर करा. बरं वाटेल....!
-दिलीप बिरुटे
(आभारी)
(No subject)
डॉ. साहेबांनी दिल्यामुळे गझल
डॉ. साहेबांनी दिल्यामुळे गझल वाचली .धन्यवाद डॉक .
पोरी कशा पटवायच्या आणि गहिर्या मिठ्या हे शेर आवडले .
मला ही गझल दिसतच नाही
मला ही गझल दिसतच नाही