Submitted by उद्दाम हसेन on 15 August, 2013 - 13:57
राज्यांच्या विकासात सध्या गुजरात मॉडेल आणि बिहार मॉडेल असे परवलीचे दोन शब्दप्रयोग सतत ऐकू येतात. यात महाराष्ट्र किंवा इतर राज्यांचं स्थान काय ? ही मॉडेल्स नेमकी काय आहेत ? वस्तुस्थिती किती, प्रचाराचा भाग किती याचं हितगुज इथं करूयात.
(सांख्यिकी काथ्याकुटीला पर्याय नाही हे उघड आहे. जाणकारांनी सोप्या भाषेत सांगावं ही विनंती ).
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संपूर्ण चर्चे मध्ये मुख्य
संपूर्ण चर्चे मध्ये मुख्य मुद्दा विकास नक्की कशाला म्हणायचं हा वाटतो. ते stats सोडून द्या कारण ते कसेही वळवता येतात. एकाच गोष्टीकडे कितीही पद्धतीने पाहता येते आणि वेगवेगळे निष्कर्ष काढता येतात. इथे सुरजीत भल्ला ह्यांचा एक इंटरव्ह्यू पहिला होता. जेंव्हा सगळे शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होत आहेत असे म्हणायला लागले तेंव्हा ह्या भल्लानी अफलातून मांडणी केली की लोकसंखेच्या अनुमानाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमीच आहे. रेशो वर घसरले. कारण नुसता आकडा पहिला तर तो अंगावर येतो. तेच रेशो मध्ये बघितले तर लगेच समीकरण बदलते त्यामुळे हे stats फार फसवे असतात.
Kiranu, तुमचा इथला प्रतिसाद
Kiranu,
तुमचा इथला प्रतिसाद बराचसा पटतो आहे. पण खालील दोन वक्तव्ये अजिबात पटली नाहीत.
१.
>> आल्याबरोबर गोध्रा आणि गुजरात हत्याकांड घडलं. गुजराती अस्मितेला हात घातला गेला. धार्मिक द्वेष
>> कधी नव्हे इतका टोकदार बनला.
मोदींनी दंगली ताबडतोब आटोक्यात आणल्या. गुजरातेतील दंगलींचा पूर्वेतिहास पाहता मोदी देवदूत आहेत.
२.
>> धार्मिक द्वेषाची लाईन साईडट्रॅकला टाकून विकासाची लाईन मोदींनी धरली हे चांगलं झालं.
धार्मिक द्वेषाची लाईन मोदींनी कधीच धरली नव्हती. मात्र त्यांच्यावर असे बिनपुराव्याचे बेछूट आरोप मात्र वारंवार झालेत.
आ.न.,
-गा.पै.
गा. पै. <<तुमचा इथला प्रतिसाद
गा. पै.
<<तुमचा इथला प्रतिसाद बराचसा पटतो आहे. पण खालील दोन वक्तव्ये अजिबात पटली नाहीत.>>
+१११११
<मोदींनी दंगली ताबडतोब
<मोदींनी दंगली ताबडतोब आटोक्यात आणल्या.>
हे प्रतिपादन तुम्ही वारंवार करीत असता. याआधीही सांगितले आहे की त्याकाळात प्रसारमाध्यमांत गुजरातेतल्या परिस्थितीबद्दल बातम्या येत होत्या. गुजरातेतल्या माझ्या ओळखीच्या लोकांकडून त्या खर्या आहेत हेही कळत होते. २९ फेब्रुवारीपासूनचे ७२ तास काय झाले हे सगळ्यांना माहीत आहे. लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय ७२ तासांनंतरच घेण्यात आला.
धार्मिक द्वेषाच्या लाईनबद्दल काही बोलायची गरजच नाही. पण जर मोदी पंतप्रधान झाले, तर त्यांना ही लाईन पूर्णपणे बाजूला ठेवावी लागेल याची मला पूर्ण खात्री आहे.
संपूर्ण चर्चे मध्ये मुख्य
संपूर्ण चर्चे मध्ये मुख्य मुद्दा विकास नक्की कशाला म्हणायचं हा वाटतो. >>
असंच काही नाही. जे काही म्हणायचंय ते पहिल्या पोस्टपासून रोखठोक लिहीलय. लिंक्स दिल्यात. मोदींनी विकास नक्कीच केला. पण ज्या प्रमाणात क्लेम केले जातात आणि प्रचार केला जातो, त्या क्लेममध्ये तथ्य किती हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे हा. नाणे खणखणीत असल्यास नेमका काय विकास केला हे सांगता येणे अवघड नसावे. कि फेसबुक वर रोज दहा पोस्टस टाकल्या (किंवा ठरवून दिलेला कोटा) कि लोकांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा ही अपेक्षा आहे ? मोदींमुळे २४ तास वीज आली असे क्लेम त्यांच्याकडे जादूची कांडी आहे असा भ्रम निर्माण करतात. कुठून आणली त्यांनी वीज ? उद्या बिहारात भाजपाची सत्ता आली तर एका वर्षात २४ तास वीज देणारेत का मोदी ? सौराष्ट्रात कृषी उत्पादन वाढलं. कशाने वाढलं ? कुठून आलं पाणी ? राजस्थानात भाजपाची सत्ता असताना का नाही वाढलं कृषी उत्पादन ? या प्रश्नांची उत्तरं पण नकोत का द्यायला ? राजस्थानला जवळपास ६०० कोटी रु मिळालेत. सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत कालवे काढण्यासाठी या पैशाचा वापर अपेक्षित होता. अद्याप त्या कालव्यांच्या कामाला सुरुवात झालेली नाही. तर गुजरातमध्ये २००७ पर्यंत केवळ १९%च काम झालेलं होतं. अद्याप पाटाचं काम झालेलं नाही. १९% काम झालं तरी इतका फरक पडलेला आहे. १००% काम झालं असतं तर बराच फरक पडला असता. म्हणजेच मोदींचा विकास हा १९% गुण मिळवलेला विकास म्हणायला हवा. धरण एका दिवसात बांधलं जात नाही. त्याचं सर्वेक्षण, प्रकल्प आराखडा, मंजुरी, पाठपुरावा आणि अर्थसंकल्पिय तरतूद यात अनेक वर्षे जातात. या कुठल्याही टप्प्यावर मोदींचं काहीच योगदान नाही. मात्र लाभाचं फळ देखील १००% घेता आलेलं नाही असा अर्थ निघतो.
हे विश्लेषण चुकीचं असल्यास करेक्ट करावं ही विनंती. विश्लेषण चुकीचं असल्यास आनंदच होईल. कारण जादूची छडी असल्याप्रमाणे विकास होत असेल तर देशाला अशा छडीची गरज आहेच. अशी जादूची छडी जवळ असलेला कुणीही प्रधानमंत्री होवो या मनःपूर्वक शुभेच्छा !
मोदीच्या राज्यात वीज जात
मोदीच्या राज्यात वीज जात नाही.
मोदी ह्यॅव आणि त्यँव ....
मोदी ह्यॅव आणि त्यँव .... रजनीकांतला मागे टाकणार बहुतेक.
अरेच्चा ! असा, सावरकर, वामन
अरेच्चा !
असा, सावरकर, वामन पंडीत, भारतीय, डँबीस वगैरे मंडळी पण होती ना त्या ट्रेनिंगला ?
मोदींचा रजनीकांत तर केलाच आहे
मोदींचा रजनीकांत तर केलाच आहे नेटभगव्यांनी. इथं फक्त माणूस बनवण्यासाठी प्रश्न विचारलेत. उत्तरं देता येत नसतील तर आपण जो जप करतो त्याचा अर्थ तरी आपल्याला कळतो का हा प्रश्न उभा राहतो.
नाही. माझे सर्टिफिकेट हवे
नाही. माझे सर्टिफिकेट हवे असल्यास इ मेलने पाठवतो. इतरांची कल्पना नाहि
जामोप्या !!
जामोप्या !!
Kiranu, >> मोदींचा रजनीकांत
Kiranu,
>> मोदींचा रजनीकांत तर केलाच आहे नेटभगव्यांनी.
मोदींना नेटभगव्यांनी रजनीकांत केलं की नाही ते फारसं महत्त्वाचं नाही. गुजरातचा विकास झाला असं कोण म्हणतं ते इथे सापडेल :
>> किंबहूना गेल्या चारपाच वर्षात असे ड्रायव्हर हे प्रामुख्याने गुजरात व मुख्यमंत्री मोदींचे मोठेच प्रचारक
>> झाले आहेत, असे मधू किश्वर या महिला पत्रकाराने सांगितले.
मधू किश्वर हिंदुत्ववादी नाहीत.
आ.न.,
-गा.पै.
पण भाऊ तोरसेकर कडवे आहेत
पण भाऊ तोरसेकर कडवे आहेत बहुतेक.
गापै तुमच्या लक्षात येत
गापै
तुमच्या लक्षात येत नाहीये कि लक्षात आलेलं नाही हे दाखवताय ? स्पष्ट लिहीलय. गुजरातचा विकास झाला हे कुणीच अमान्य करत नाहीये. प्रश्न आहे ज्या पद्धतीने मोदींना प्रोजेक्ट करण्यासाठी जे दावे केले जात आहेत त्यात कितपत तथ्य आहे हे तपासण्याचा. लक्षात घ्या, नीतीशकुमारांचा मार्ग अत्यंत खडतर असताना त्यांनी ढोल वाजवलेले नाहीत. मग गुजरातची तुलना कुठल्याही राज्याशी होऊ शकत नाही किंवा गुजरातची तुलना फक्त चीनशीच होऊ शकते हे दावे ज्याक्षणी केले जात होते त्याक्षणी महाराष्ट्र गुजरातच्या कितीतरी पुढे होता ही वस्तुस्थिती आहे. कृपया लिंक्स वाचा, पोस्टस वाचा आणि मग लिहा.
इथे लिहीलेलं चुकीचं असेल तर कृपया वस्तुनिष्ठ पद्धतीने ते खोडून काढता येईल तुम्हाला.
भरत मयेकर, आपला इथला प्रतिसाद
भरत मयेकर,
आपला इथला प्रतिसाद वाचला.
१.
>> हे प्रतिपादन तुम्ही वारंवार करीत असता.
ही बाब न्यायालयात सिद्ध झाली आहे. नेमक्या याच कारणामुळे मोदींवर खटला घालता येत नाहीये.
२.
>> याआधीही सांगितले आहे की त्याकाळात प्रसारमाध्यमांत गुजरातेतल्या परिस्थितीबद्दल बातम्या येत
>> होत्या. गुजरातेतल्या माझ्या ओळखीच्या लोकांकडून त्या खर्या आहेत हेही कळत होते.
त्या खर्या असल्या तरीही मोदी दोषी आहेत असं सूचित होत नाही. मोदींवर कर्तव्यच्युतीचा आरोप लावता येत नाही.
३.
>> २९ फेब्रुवारीपासूनचे ७२ तास काय झाले हे सगळ्यांना माहीत आहे.
२९ फेब्रुवारी? हा काय प्रकार आहे?
४.
>> लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय ७२ तासांनंतरच घेण्यात आला.
साफ चूक! सैन्याला ताबडतोब बोलावण्यात आलं होतं. हिंदू मधील बातमी आहे : The Army began flag marches in the worst-affected areas ...
मात्र गुजरातेतलं सैन्य तातडीने उपलब्ध होऊ शकलं नाही. कारण भारत-पाक सीमेवर तणावाची स्थिती होती (डिसेंबर २००१ मधील संसदेवरच्या आक्रमणामुळे). म्हणून बाहेरून तुकड्या मागवल्या. अधिक माहिती मधू किश्वर यांच्या संकेतस्थळावर मिळेल : http://www.manushi.in/articles.php?articleId=1688
असो.
२००२ च्या दंगलींवरून उगीचंच मोदींना झोडपणे थांबवावे.
आ.न.,
-गा.पै.
Kiranu, >> नीतीशकुमारांचा
Kiranu,
>> नीतीशकुमारांचा मार्ग अत्यंत खडतर असताना त्यांनी ढोल वाजवलेले नाहीत.
नेमकी हीच खरी रड आहे. मोदींचे ढोल मोदींनी बडवले नाहीत. नीतिश यांचा ढोल कुणीच बडवत नाही. मोदी आणि नीतिशकुमार दोघेही विकासपुरूष आहेत, बरोबर? मग मोदीच का इतके लोकप्रिय झालेत?
कारण भंपक सेक्युलर माध्यमांनी त्यांना मोठे केलेय. गेली १०-१२ वर्षे विनाकारण दंगलींवरून झोडपत बसले आहेत. त्यामुळे मोदींचं नाव देशाच्या कानाकोपर्यात गेलं. मोदींचे प्रचारक नेटभगवे नसून भंपक सेक्युलर माध्यमे आहेत. नाहीत. नेमक्या या अपप्रचाराविरुद्ध देशभरातील ट्रकचालकांचा अनुभव असल्याने लोक माध्यमांवर विश्वास ठेवत नाहीत.
आता या सर्व गदारोळातून विकासाबाबत सत्य प्रस्थापित करायचं आहे. ते तुम्ही करालच! त्याकरिता शुभेच्छा!
फक्त एक गोष्ट सुचवू इच्छितो. जनतेला जाणवतो तो खरा विकास की आकडेवारीत असतो तो खरा विकास हे आधी स्पष्टपणे मनाशी ठरवा.
आ.न.,
-गा.पै.
गापै मोदी हा विषय इग्नोर
गापै
मोदी हा विषय इग्नोर करणारे असंख्य लोक आहेत. तरीही त्यांच्या फेसबुक वॉलवर मोदीजपाच्या दिवसाला दीडशेच्यावर पोस्टी टा़कणारे लोक सेक्युलर आहेत कि ट्रकचालक आहेत असं तुम्हाला म्हणायचंय ? रेटून केलेल्या प्रचाराला उत्तर दिलं कि मोदींना विनाकारण झोडपलं असे गळे काढण्याची सवय नेटभगव्यांना आहे. हे आजचं नाही, त्यांना जो नेता मोठा करायचा आहे त्याच्यासाठी वापरली जाणारी सनातन पद्धत आहे ही. थोडक्यात यांची अपेक्षा अशी असते, काहीच्या काही अव्वाचे सव्वा दावे करायचे, त्याला कुणी प्रतिप्रश्न केला कि देशद्रोही, काँगी, कम्युनिस्ट किंवा बीग्रेडी असं लेबल लावायचं. विचारलेल्या प्रश्नांनी अडचण झाली कि भाऊ तोरसेकर यांच्यासारखी बगल मारायची आणि तुमच्यामुळेच आमचा नेता लोकप्रिय झाला अशा उलट्या बोंबा ठोकायच्या ! कुठल्याही वर्तमानपत्रातल्या राजकीय बातम्या पहा, इतर नेत्यांना अर्वाच्च्य शिव्या वाहीलेल्या असतात, पण वाजपेयी किंवा तत्सम नेत्यांचा परमपूज्य असा उल्लेख असतो. एखादी प्रतिक्रिया मनाविरुद्ध आली कि त्याचा गलिच्छ भाषेत उद्धार केला जातो. या लोकांनाच नेटभगवे म्हटलं जातं. हे सेक्युलर आहेत असं तुमचं किंवा भाऊ तोरसेकरांचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं.
आम्हाला यांच्याकडून प्रचार होतो त्यांच्याकडून साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं हवी होती. बगल देण्यापेक्षा उत्तर देणं खूप सोपं आहे. या आहेत फॅक्टस त्यामुळे तुमचं प्रतिपादन चुकीचं आहे इतकंच अपेक्षित आहे. कोण ते असंबद्ध भाऊ तोरसेकर वगैरेंशी आम्हाला काही कर्तव्य नाही. आम्हालाच सत्य शोधून काढायचं असेल तर पहिल्यांदा या प्रचारकांनी आम्ही जो प्रचार करतो त्याबद्दलची वस्तुस्थिती आम्हाला ठाऊक नसते, फक्त वरून जे सांगतात तेच आम्ही बोलतो हे आधी कबूल करावं.
मोदिनी गुजरातचा विकास केला हे
मोदिनी गुजरातचा विकास केला हे बर्याच लोकांना वाटते.. पण काय विकास केला हेही बहुसंख्य लोकांना ठावूक नाही.. अमेरिकी पीआर कंपनी एपको वर्ल्डवाइड हिला मोदीच्या प्रचाराचे काम दिलेले आहे मोदी त्याकरता त्या कंपनीला तगडी रक्कम महिन्याकाठी देतात असे वाचनात आलेले आहे.
http://www.bhaskar.com/article/NAT-how-modi-saved-15000-people-4303245-N...
मागे मोदींना अमेरिकेचे संसद
मागे मोदींना अमेरिकेचे संसद सदस्य भेटले होते. मोदिनी चाणाक्षपणे ह्या भेटीचा गवगवा केला होता पण ह्या सार्या सदस्यांना ८ लाख रुपये मोदींची भेट घ्यावी म्हणून देण्यात आले होते . अशी बातमी वाचनात आली होती .
http://www.bhaskar.com/article/NAT-how-modi-saved-15000-people-4303245-N...
किरणू, नेटभगव्यांबद्दल तू
किरणू, नेटभगव्यांबद्दल तू लिहीले आहेस ते एक्दम अचूक आहे.
पण माझा प्रश्न हा की भारताच्या लोकसंख्येचा आणि इंटरनेट्चा विस्तार याचा विचार करता हा सगळा नेट्वरचा प्रोपोगंडा किती प्रभावी ठरेल? मी जेंव्हा माझ्या खेडेगावाचा विचार करतो तेंव्हा तिथले स्थानिक प्रश्न त्यांच्यासाठी सर्वात जिव्हाळ्याचे ठरतात, त्यांची उत्तरे जो देऊ शकले असे वाटते तो जिंकणार.
मोदीनी गुजरातेत काय केले आणि महाराष्ट्राचे रँकिंग कितवे याचा इंटेरिअर्सला, ग्रासरुट्वर किती फरक पडतो?
आगाऊ, >> मोदीनी गुजरातेत काय
आगाऊ,
>> मोदीनी गुजरातेत काय केले आणि महाराष्ट्राचे रँकिंग कितवे याचा इंटेरिअर्सला, ग्रासरुट्वर किती फरक पडतो?
माझा नेमका हाच प्रश्न आहे Kiranu ना! अर्थात Kiranu यांनी अन्वेषण थांबवावे असे नाही. ते कितपत समर्पक आहे हे त्यांनी आगोदर जाणून घ्यावे, एव्हढंच सुचवेन.
आ.न.,
-गा.पै.
ते कितपत समर्पक आहे हे
ते कितपत समर्पक आहे हे त्यांनी आगोदर जाणून घ्यावे, एव्हढंच सुचवेन.>>>
तुमच्याकडून जाणून घ्यावं म्हणतो. पहिल्यापासून हेच तर म्हणतोय..आता आले तुम्ही मुद्द्यावर
लॉबिंग अमेरिकेत लिगल आहे ना?
लॉबिंग अमेरिकेत लिगल आहे ना?
Pages