मराठी मालिकांची इंग्रजी नावे

Submitted by मुग्धटली on 15 August, 2013 - 05:22

हि माझी पहिलीच वेळ आहे माबोवर लिहिण्याची पण आशा करते की तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या या प्रयत्नाला...
तर सगळे मिळून एक गंम्मत करुया आपल्याला माहित असलेल्या मराठी मालिकांची नावं जर इंग्रजीत केली तर कस होईल??? म्हणजे उदा. सध्याची एक मालिका

"तू तिथे मी" - where ever you I am there.....

बघा तर कस वाटत ते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधा बावरी - Radha Mad>>> राधा ही बावरी- This mad Radha? Proud

बावरी म्हणजे बावरलेली धरले तर This Confused Radha असे होईल.. Proud

शब्द्शः भाषांतर करायचे म्हणून, आशयात्मक असते तर 'राधा ही रडवी' जास्त परफेक्ट. क्रायिंग राधा.

उंबरठा...........याला कसे ट्रांस्लेंट करणार ? >>> पोर्च(?)
>>>> threshhold (फिजिक्समध्ये threshold frequency शिकले होते त्यावरुन आठवलं Proud )

तू तिथे मी where ever you I am there
>>
डोळ्यासमोर वोडाफोनची पगवाली जाहिरात झळकली. Happy

एका लग्नाची दुसरी गोष्ट - Second story of a marriage
श्वेतांबरा - The woman in white
मला सासू हवी - I want a mother-in-law
होणार सून मी या घरची- I am going to be daughter-in-law in this family
या गोजीरवाण्या घरात- In this lovely home
एकापेक्षा एक अप्सरा आली - one better than the first - heavenly nymph arrived Happy

चीकू,

>> heavenly nymph arrived

Rofl

हे थोडं बदलतो : heavenly nymph turning up!

आ.न.,
-गा.पै.

स्वप्नांच्या पलीकडले......... Behind the Dreams
चार दिवस सासूचे............ Four days of Mother-in-Law
लक्ष्य.............................. Goal
आंबट-गोड ..................... Sour-Sweet
पुढचं पाऊल..................... Next Foot Happy

देवू,

आंबट-गोड ला इथे इंग्लंडात sweet-n-sour म्हणतात. Happy

पुढचं पाऊल हे उचलायचं असल्याने त्यास next step म्हणावं लागेल. Happy

आ.न.,
-गा.पै.

अरे वा...... दोन दिवस दुर्लक्षिलेला धागा होता..... खूप वाईट वाटत होत, पण आज एकदम २९ पोस्टि बघुन वेड लागायची पाळी आलीय. बावर्‍या राधाच्या सगळ्या पोस्ट्ना अनुमोदन. सगळ्यांना धन्स.

बर मला एक सांगा हा वाहता धागा आहे की पान हे कस समजणार???

आणि आता एक माझ्याकडुन
शेजारी शेजारी पक्के शेजारी - neighbours perfect neighbours.

Pages