Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लीना भागवतची पण काहीतरी
लीना भागवतची पण काहीतरी स्टोरी आहे बहुतेक. एक दिवस ती उशिरा घरी येते तेंव्हा बांगड्या आणि माळलेला गजरा काढुन घेते नेमके श्री तिला बघतो आणि ही नंतर सांगते म्हणते कुठे गेली होती ते.
तेंव्हा ती श्री ची नोकरी
तेंव्हा ती श्री ची नोकरी वाचवण्यासाठी आजीबाईशी खोटं बोलते>>>>>>>>> पण काय खोटं बोलते???>>> सस्मित, श्री पहिल्यांदा जाह्नवीचा आवाज फोनवर ऐकतो, तेंव्हाच तिच्या आवाजाच्या प्रेमात पडतो. तेंव्हा ती त्याला फाईल घ्यायला तुमच्या अकाउंटंटला पाठवा असं सांगते. तिला बघायची श्रीला उत्सुकता असते, म्हणून ऑफिसची फाईल घ्यायला तोच अकाउंटंट म्हणून (तिला भेटायला) जातो, पण फाईल न्यायचे विसरतो. ती अतिमहत्त्वाची फाईल असल्याने ती घेऊन जाह्नवी श्रीच्या घरी जाते. आज्जी आधीच उशीरा फाईल मिळाली म्हणून रागवलेली असते. ती जाह्नवीला ओरडते. ती सांगते की तुमचा अकाउंटट आला होता पण फाईल न्यायचं विसरला. आज्जी मग अकाउंटटवर चिडते. त्याच्या बेजबाबदारपणासाठी त्याला नोकरीवरुन काढायचं ठरवते म्हणून जाह्नवी तो आरोप स्वतःवर घेते, की तीच विसरली असावी. तिला नीट आठवत नाहीये काय झालं.. म्हणून आज्जीला वाटतं की तिचा दोष लपवण्यासाठी तिने अकाउंटटवर खोटेनाटे आरोप केले.
मला पण आवडते लीना भागवत, पण
मला पण आवडते लीना भागवत, पण त्याने ती बोअर मारते, ही फॅक्ट लपत नाही तिच्या विसराळूपणावर केवढे ते फुटेज खाणं चाल्लय
लीना भागवतची पण काहीतरी स्टोरी आहे बहुतेक.>> हो शुभांगी, तिच्या नवर्यावर आजीचा राग आहे कशावरुन तरी म्हणून तो घर सोडून गेला, त्यामुळे ती लपत छपत त्याला भेटते. असं एका भागात ती स्वगतात बोलली आहे आणि एकदा श्री तिला असं गजरा माळून रात्री उशीरा येतांना पहतो, तेंव्हा वेळ आली की तुला सांगेन पण आजीला सांगू नकोस असं वचन ती त्याच्याकडून घेते.
...तो भाग पाहतांना वाटून गेलं, लीना भागवतच्या ह्या चोरुन भेटण्यावर कोणी शंका घेऊ नये, म्हणूनच ती विसराळूपणाचं नाटक तर करत नसेल?
बांगड्या अशाच कशा गिफ्ट देतात
बांगड्या अशाच कशा गिफ्ट देतात ? हाताचं माप वगैरे काही लागत नाही का ?
आणि महत्वाचं म्हणजे सायली आणि जान्हवी दोघींचे माप एकच बांगड्याचे.....
रावी आणि परन, एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या त्या बांगड्या आहेत गोखले घराण्याच्या म्हणजे कधितरी त्या आजीच्या हातात पडल्या असणार, नंतर लागला नंबर श्रीच्या आईचा आणि श्रीने जान्हवीला बांगड्या दिल्यावर त्या तिच्या सावत्र आईने घालुन बघितल्या.... आता मला सांगा या ३ ३ महासासवांनी हातात घातलेल्या बांगड्या जान्हवी काय किंवा सायली काय कोणीही घातल्या तरी त्यांना त्या बाजुबंद म्हणुनच होतील...
लीना भागवतची पण काहीतरी स्टोरी आहे बहुतेक. एक दिवस ती उशिरा घरी येते तेंव्हा बांगड्या आणि माळलेला गजरा काढुन घेते नेमके श्री तिला बघतो आणि ही नंतर सांगते म्हणते कुठे गेली होती ते.>>>>> लक्षात रहाणार तिच्या????
मला एक कळत नाही या काय किंवा कोणत्याही मालिकेमधली लोक बिझनेस कसा सांभाळतात? श्रीची आजी - सोन्याच्या परंपरागत चालत आलेल्या बांगड्या नातवाला देताना किमान एकदा तरी खात्री करुन घ्यायची ना की हा बाबा नक्की कोणाला देणार आहे? इतक्या साध्या गोष्टीसुद्धा न पाळणारी लोकं गप्पा मात्र कोट्यांच्या उलाढालींच्या मारत असतात.....
नाही मुग्धा. अशाच बांगड्या
नाही मुग्धा. अशाच बांगड्या सगळ्या सुनांना लग्नात दिलेल्या असतात. फक्त हीला लग्ना आधी दिल्या जातात.
अतिमहत्त्वाची फाईल असल्याने
अतिमहत्त्वाची फाईल असल्याने ती घेऊन जाह्नवी श्रीच्या घरी जाते. >>> सानी, चेकबुक द्यायला जाते ती, कारण आज्जीला Online व्यवहार जमत नाहीत. इती श्री.
तो भाग पाहतांना वाटून गेलं, लीना भागवतच्या ह्या चोरुन भेटण्यावर कोणी शंका घेऊ नये, म्हणूनच ती विसराळूपणाचं नाटक तर करत नसेल? >>> +११११
कुणाला चोरून भेटते ती?
कुणाला चोरून भेटते ती?
मंजूडे मलाही आवडते गं ती, पण ते विसराळूपणाचं जामच बोर आहे बेअरिंग. तिचं.
ह्या मलिकेत लोक एकमेकांशी इतक
ह्या मलिकेत लोक एकमेकांशी इतक बोलतात पण की वर्ड टाळुन गैरसमज वाढवतात. आजी आणि श्री मुली बद्दल बोलतांना तीच नाव न घेता बाकी इतर गोष्टी डीटेल मधे बोलतात. जान्हवी श्रीच्या आयांशी बोलतांना अकाउंटंटचा नाव न घेताच बोलते.
लीना भागवत यांचा नवरा जिवंत
लीना भागवत यांचा नवरा जिवंत आहे. आणि तो व्यसनी की कायसा असल्याने आईआज्जी(रो. हत्तांगडी) यांनी त्याला हाकलला आहे. काल लीना भागवत म्हणतात(लाजत घाबरत) एखादा माणूस सुधारू शकत नाही का?
यावरून वाटतं त्या चोरून चोरून आपल्या आधी व्यसनी न नंतर सुधारलेल्या नवर्यालाच भेटायला जात असाव्यात. रात्री गजरा इ.इ.!!!!!!!!!!!!!!!!
सुरुवातीपासून मालिका न
सुरुवातीपासून मालिका न बघितल्यामुळे आलेल्या काही शंका
नायिकेच्या बाबांना ती का लग्न करते आहे ते खरे कारण माहिती आहे का? माहिती असल्यास ते विरोध का करत नाहीत?
त्या अनिलरावांना एक मोठा मुलगा आहे असा उल्लेख कुठेतरी वाचला. तो आपल्या बाबांना समजावण्याचा प्रयत्न का करत नाही?
त्या पाच सासवा घरी एकत्र राहातात. घरकाम (आणि चोरून ऐकणे) सोडून त्यांना काही बाहेरचं बाकीचं काम, नोकरी, छंद, समाजकार्य वगैरे काही आहे की नाही?
शंकानिरसनाबद्दल आधीच धन्यवाद
नायिकेच्या बाबांना ती का लग्न
नायिकेच्या बाबांना ती का लग्न करते आहे ते खरे कारण माहिती आहे का? माहिती असल्यास ते विरोध का करत नाहीत?>>> त्यांच्या विरोधाला आई जुमानत नाही. ती फार डॉमिनेटिंग आहे आणि खरे कारण म्हणजे, तो माणूस नायिकेच्या बाबांचं पायाचं ऑपरेशन, भावाला नोकरी आणि दरमहा घरखर्चासाठी बरीच रक्कम पाठवायला तयार आहे.
त्या अनिलरावांना एक मोठा मुलगा आहे असा उल्लेख कुठेतरी वाचला. तो आपल्या बाबांना समजावण्याचा प्रयत्न का करत नाही?>>> मुलगाच वडलांचं हे लग्न ठरवतोय. तोही आला होता आधी. त्याचंही लग्न ठरलयं तो इंग्लंड की कुठे तरी राहतोय.
त्या पाच सासवा घरी एकत्र राहातात. घरकाम (आणि चोरून ऐकणे) सोडून त्यांना काही बाहेरचं बाकीचं काम, नोकरी, छंद, समाजकार्य वगैरे काही आहे की नाही?>>> मालिकांमधल्या बायका असलं काही करत नसतात!! अत्यंत चुकीचा प्रश्न आहे!
अतिमहत्त्वाची फाईल असल्याने
अतिमहत्त्वाची फाईल असल्याने ती घेऊन जाह्नवी श्रीच्या घरी जाते. >>> सानी, चेकबुक द्यायला जाते ती, कारण आज्जीला Online व्यवहार जमत नाहीत. इती श्री.>>> धन्स स्निग्धा हे तपशिल पार विसरुन गेले होते.
विनंतीला मान देऊन धागा वहायचे
विनंतीला मान देऊन धागा वहायचे थांबवल्याबद्दल धन्यवाद अॅडमीन.
हल्लीच बघायला लागलोय... सध्या
हल्लीच बघायला लागलोय... सध्या तरी हि मालिका, त्यांची लव्हस्टोरी अन गैरसमज लपवाछपवी छान चाललीय.. अभिनय सुद्धा उत्तम .. त्रास न देणारा.. दोघांना बघून वाटतेही प्रसन्न.. लग्नानंतरही स्टोरीला धमाल असेल जेव्हा ती त्यांच्या घरात येईल.. मात्र जेव्हा स्टोरी संपेल आणि पाणी घालायला लागतील तेव्हा.. तसे तर प्रत्येक सिरीअलची कधी ना कधी वाट लागतेच.. मात्र तोपर्यंत छान मालिका..
मला स्वताला लहानपणी खूप वाटायचे की मी असा श्रीमंत असलो पाहिजे होतो.. म्हणजे बापज्यादांचा अमाप पैसा.. मग एखाद्या गरीब पण गुणी मुलीच्या प्रेमात पडावे आणि तिला आयुष्यभर राणीसारखे ठेवावे... म्हणून ते दिवस आठवले जातात.. मालिका बघताना गालावर मोरपीस फिरवल्यासारखे हुळहुळत राहते... म्हणूनही आवडीने बघतो बस्स...
धन्यवाद सानी
धन्यवाद सानी
<<विनंतीला मान देऊन धागा
<<विनंतीला मान देऊन धागा वहायचे थांबवल्याबद्दल धन्यवाद अॅडम<<>>
धागा वहाणे म्हणजे काय? मा. बो. वर नविन आहे त्यामूळे महिती नाही.
जान्हवी श्रीच्या आयांशी
जान्हवी श्रीच्या आयांशी बोलतांना अकाउंटंटचा नाव न घेताच बोलते. >>> कारण ते तिलाही माहीत नसतं, ती जेव्हा श्रीला त्याच नावं विचारते तेव्हा तो पटकन श्री असं म्हणतो आणि लगेच 'श्री अकांटंट' (Mr. Accountant या अर्थाने) असं म्हणतो.
ही मालिका फार रटाळ चालु आहे
ही मालिका फार रटाळ चालु आहे वेग अजिबातच नाहिये कथानकाला.... दोन एपिसोड नुसते एक्मेकांच्या आठवणीत घालवले.....
नै त काय
नै त काय
अभिनय सुद्धा उत्तम .. त्रास न
अभिनय सुद्धा उत्तम .. त्रास न देणारा.. दोघांना बघून वाटतेही प्रसन्न.. >>++१११
दक्षिणा... मी पहिल्यांदाच
दक्षिणा... मी पहिल्यांदाच माबोवर काहितरी लिहायचा प्रयत्न केला आहे. खाली लिंक देते आवडल तर बघ
http://www.maayboli.com/node/44645
धागा वहाणे म्हणजे काय? मा.
धागा वहाणे म्हणजे काय? मा. बो. वर नविन आहे त्यामूळे महिती नाही.>>> श्रीयू, काही विशिष्ट नंबर पर्यंत प्रतिसाद झाले की ते पुसले जाणे याला धागा वाहणे म्हणतात. आता ते बंद झाले म्हणजे सगळे प्रतिसाद इथे सेव्ह होतील. आधीचे बरेच पुसले गेलेत.
मलासुद्धा अजून ही मालिका
मलासुद्धा अजून ही मालिका आवडतेय.
कालचा भाग जरा अती वाटला.
कालचा भाग जरा अती वाटला. श्रीचा अश्रुपात, सगळ्या आयांनी समजावणं..आणि मुख्य म्हणजे मुलीच्या नावाचा अजिबात उल्लेख नाही. तो बोलतोय जान्हवीबद्दल, त्यांना वाटतय तो बोलतोय सायलीबद्द्ल आता हा गैरसमज दूर व्हायला अजून आठवडातरी लागणार बहुतेक
तो श्री आधी आवडायचा ...जरा
तो श्री आधी आवडायचा ...जरा realistic, level-headed वाटायचा. पण गेल्या भागात फारच हळवा, over-sensitive दाखवला एखाद्या मोठ्या कंपनीचा प्रमुख एवढा अतिसंवेदनशील असतो का? एवढे जान्हवीवर प्रेम आहे तर सरळ तिला जाऊन सांगत का नाही मनातली बात? तसेच आपण कोण आहोत ते खरं सांगून का टाकत नाही?
महिती बद्दल धन्यवाद सानी. हो
महिती बद्दल धन्यवाद सानी.
हो सगळे प्रतिसाद वाचयला मस्त असतात त्यामूळे सेव झालेले उत्त्म.
कालच्या भागात बॅकग्राऊंडला
कालच्या भागात बॅकग्राऊंडला "मन ये मेरा" हे गाणे वाजत होते, ते कोणत्या चित्रपटातील आहे कोणाला माहित आहे का? मला आवडले ते गाणे.
सध्या काय चालू आहे यात?
सध्या काय चालू आहे यात? अपडेट्स प्लिज
वर्षा, ते स्पेशल २६ मधलं गाणं
वर्षा, ते स्पेशल २६ मधलं गाणं आहे.
धन्यवाद बिल्वा.
धन्यवाद बिल्वा.
Pages