कॉर्न बॉल्स

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 August, 2013 - 05:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाऊण वाटी मक्याचे पिठ
१ वाटी स्वीट कॉर्न मिक्सरमधून भरडून काढलेले
अर्धा वाटी किसलेले चिज
मुठभर चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा मिरीपूड
१ चमचा आल-लसुण,मिरची,कोथिंबीर पेस्ट
आवश्यकते नुसार मिठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

१) भरडलेले स्वीट कॉर्न, चिज, मिरपूड आल-लसुण पेस्ट, मिठ, कोथिंबीर एकत्र करुन घ्या.

२) आता ह्यात मावेल म्हणजे साधारण चपातीसाठी लागत तेवढ घट्ट होई पर्यंत मक्याचे पिठ टाका. मी वरील चित्रात एक वाटी घेतले होते पण पाउण वाटीच लागले.

३) वरील मिश्रणाचे हव्या त्या आकारात बॉल्स बनवून घ्या.

४) कढईत तेल चांगले गरम करुन मध्यम आचेवर बॉल्स तळून घ्या.

५) ५-६ मिनीटांत चांगले खरपूस तळून होतात. मग सॉस किंवा नुसतेस किंवा चिजने सजवून सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणाने १४ बॉल्स झाले.
अधिक टिपा: 

पाककृती हवी आहे ह्या धाग्यावर कॉर्नची रेसीपी हवी आहे म्हणून सांगितल्यावर तिथे काही मैत्रीणींनी छान छान रेसिपी दिल्या. त्यातील ही एक सृष्टीने दिलेली रेसिपी. धन्स सृष्टी खुप छान झाले बॉल्स. लेकीला खुप आवडले.

मी साहित्य सगळे अंदाजे टाकले आहे पण व्यवस्थित झाले.

माहितीचा स्रोत: 
मायबोलीकर आयडी सृष्टी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटुन दुसरा फोटो मस्त.
जागू, चिजची चव लागते का गं तळल्या नंतर ?

मी नेहमी पारी करुन आत चिज भरते, पहिला घास खाल्ल की एकदम आहाहा होते Happy

वा जागू, मस्त फोटो ! पण हे गरमच खायचे कि थंडही चांगले लागतात. पार्टी साठी आधी करुन ठेवले तर चालतात का?

मस्तच !

स्लर्प स्लर्प!!

आप्पेपात्रात कुणी केल्यास इथे लिहा प्लीज! तळण नको वाटते.

माधवी, तुझी पालकाचे सारण मध्ये घालण्याची आयडीया आवडले.

जागूताई, परवा संध्याकाळी चहा बरोबर खायला केले होते (मी फक्त बायकोला रेसिपी पाठवण्याचं पुण्य पदरात घेतो आणि नंतर खाण्याचं ... असो). जबराट झाले होते. आधी फक्त २-३ पूरे असं म्हणत ८-१० कसे उडवले ते कळलच नाही. एक नंबर!!

तुझ्या शेजारी कोणी घर विकत आहे का? येतोच रहायला >> त्यापेक्षा तुमच्या शेजारी घर रिकामे असेल तर जागुला बोलवा! Wink

हे गणेशोत्सव २०१३ पाकृ स्पर्धेतही चालतील>>>हेच लिहायला आले होते

पाकृ स्पर्धेबद्दल वाचले तेव्हा पहिले जागूचे कॉर्न बॉल्स आठवले.

Pages