कॉर्न बॉल्स

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 August, 2013 - 05:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाऊण वाटी मक्याचे पिठ
१ वाटी स्वीट कॉर्न मिक्सरमधून भरडून काढलेले
अर्धा वाटी किसलेले चिज
मुठभर चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा मिरीपूड
१ चमचा आल-लसुण,मिरची,कोथिंबीर पेस्ट
आवश्यकते नुसार मिठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

१) भरडलेले स्वीट कॉर्न, चिज, मिरपूड आल-लसुण पेस्ट, मिठ, कोथिंबीर एकत्र करुन घ्या.

२) आता ह्यात मावेल म्हणजे साधारण चपातीसाठी लागत तेवढ घट्ट होई पर्यंत मक्याचे पिठ टाका. मी वरील चित्रात एक वाटी घेतले होते पण पाउण वाटीच लागले.

३) वरील मिश्रणाचे हव्या त्या आकारात बॉल्स बनवून घ्या.

४) कढईत तेल चांगले गरम करुन मध्यम आचेवर बॉल्स तळून घ्या.

५) ५-६ मिनीटांत चांगले खरपूस तळून होतात. मग सॉस किंवा नुसतेस किंवा चिजने सजवून सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणाने १४ बॉल्स झाले.
अधिक टिपा: 

पाककृती हवी आहे ह्या धाग्यावर कॉर्नची रेसीपी हवी आहे म्हणून सांगितल्यावर तिथे काही मैत्रीणींनी छान छान रेसिपी दिल्या. त्यातील ही एक सृष्टीने दिलेली रेसिपी. धन्स सृष्टी खुप छान झाले बॉल्स. लेकीला खुप आवडले.

मी साहित्य सगळे अंदाजे टाकले आहे पण व्यवस्थित झाले.

माहितीचा स्रोत: 
मायबोलीकर आयडी सृष्टी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु, Twist Of Taste मधे अश्याच रेसिपीने कॉर्न डॉग्ज केलेले दाखवले. फक्त त्याने ते बांबु स्टिकवर लावुन तळले होते.
पण घरी करायला हे सोप्पेय. Happy

मस्त! शेवट्चा फोटो सही..
मॅक्डी मधे पण एक व्हेज क्रिस्पी म्हणुन नवीन मेन्यु आलाय.. त्यात बहुतेक मेथी नि बटाटे स्मॅश घातलेत बाकी सेम.. Happy

व्वा मस्तच ..(. माझे कसले नाव लिहिले आहे मि ते गुगलवर बघुन थोडे बदल करुन केले होते .एवढेच )

मी साहित्य सगळे अंदाजे टाकले आहे पण व्यवस्थित झाले.>>> मि पण अंदाजे टाकले होते.

सकाळी घाईघाईत रेसेपी बघितली होती. यात तू पाकिटातलं कॉर्न फ्लोअर घातलंय की मक्याचं पीठ (मकई का आटा) ? फोटोत ते पीठ पिवळसर दिसतंय म्हणजे बहूतेक कॉर्न फ्लोअर नसेल असं वाटतंय.

तेच वाटलं मला. मक्याचं पीठ आणावं लागेल. आणि मग त्याच्या रेसेपी विचाराव्या लागतिल. अजून मक्याच्या भाकर्‍यांचा सिझन आला नाही. Happy आधी मी कॉर्न फ्लोअर असेल असंच समजत होते.

भारी ! Happy

हे कॉर्नफ्लोअर नाही, कॉर्नमील असणार म्हणून असे रवाळ झालेत मस्त. इथे मिळते का बघितले पाहिजे कॉर्नमील.

अगो, मकई चा आटा म्हणून मागितलं तर इथे हे पीठ मिळतं. राजधानी कंपनीची एक किलो ची पाकिटं बघितली आहेत. बहूतेक चक्कीमध्ये /छोट्या दुकानांमध्ये लुझ पण मिळेल इथे. पुण्यात कुठे मिळेल याचा मात्र अंदाज नाही. पुण्यातल्या एखाद्या पंजाब्याला विचारावं लागेल. Happy

छान दिसताहेत!:)

माझी एक अ‍ॅडिशनः
पालकाची पानं उकडून घेऊन त्यात थोडे बेसन आणि थोडा मैदा, तीखट, मीठ घालून त्याचा गोळा करायचा. मग ते पुरीएवढे लाटून त्यामधे हे कॉर्न बॉल्स भरून तळायचे आणि सर्व करताना अर्धे कापून सर्व करायचे. हा फोटो.

CornSpinach.jpg

असचं एकदा एक ट्राय केले होतं! दिसायला एवढे छान नाहीत पण चव मस्त लागत होती. पंजाबी भाजी च्या ग्रेव्हीत हे बॉल्स टाकले की नवीन प्रकारची भाजी तयार!

छान दिसताहेत आणि छान लागतही असणार.
कोकण रेल्वेत मेथीचा असा एक प्रकार मिळतो. त्यात अख्खे शेंगदाणे पण असतात.

Pages