माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.
१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.
आठवली की लिहितो
यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.
एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.
तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?
कधी कधी वाटत हा एक सुप्त
कधी कधी वाटत हा एक सुप्त संदेश आहे की जी गोष्ट मिळवण्यासाठी मी इतके कष्ट करतेय ती अगदी माझ्याजवळ आहे पण माझ्या नजरेतून सुटतेय....
>>
अस्सच असावे बहुतेक. स्वप्नांमधून अनेकदा अंतर्मन काहीतरी संकेत देत असते.
स्वप्नांमधून अनेकदा अंतर्मन
स्वप्नांमधून अनेकदा अंतर्मन काहीतरी संकेत देत असते.>>> ऑफीसची खडतर वाट म्हणजे हापिसला जाय्चा आलेला कन्टाळ्याच रुपक आहे..
हे स्वप्न रविवारी जास्त पडत असेल, सोमवारच्या ऑफीसची आठवण येवुन..
झकोबा गमभन, अहो मग मातीच
झकोबा
गमभन, अहो मग मातीच आणाना, करा यन्दा घरच्या घरीच गणपती
रियाची स्वप्ने भारीच्चेत, अन लक्षात बरी रहाताहेत. त्या दुसर्या स्वप्नाचा अर्थ माझ्यामते, कामानिमित्ताने घरापासून दूर जावे लागणे/रहावे लागणे असा होतोय.
अहो लिंबुदा, मला कुठे करता
अहो लिंबुदा,
मला कुठे करता येणार आहे गणपती? उगाच 'करायला गेलो गणपती नि झाला मारुती' असे काहीतरी व्हायचे
भारी स्वप्न आहेत एक
भारी स्वप्न आहेत एक एक....
काल गुजरातला गेलो होतो. मोदींसोबत मिटींग होती, पण गोड नाही खाल्ल... शुगर वाढलिय ना म्हणुन... मग मोदींनीही नाही खाल्लं. बिनासाखरेचं दुध घेतलं
सौ. ला सुद्धा तिचे बाबा
सौ. ला सुद्धा तिचे बाबा वारणार अस स्वप्न पडल होत, आणि दोनच दिवसात सासरे गेले
त्यानंतर मागच्या आठवड्यात तिला हॉस्पिटल मध्ये अॅड्मीट केलं होत तेव्हा बाबा भेटायला आले होते अस स्वप्न पडल होत, आणि त्याचं दिवशी लेक ज्या हॉस्पिटल मध्ये अॅड्मीट होती तिथे सुद्धा मला कोणीतरी दरवाजा नॉक केल्याचा आवाज आला मी दरवाजा उघडून बघितल तर कोणीच नव्हत
लिंबुभाऊ, मी ऑलरेडी बाहेर
लिंबुभाऊ, मी ऑलरेडी बाहेर (केरळात) जाऊन आलेय.. तिथे दिड एक वर्ष राहून आलेय! (आता अजुन ?? परत )
आणि मी म्हणलं तस उठल्या उठल्या स्वप्न रिकॉल केलं की तसच्या तसं लक्षात रहात माझ्या
म्हणजे जेवढं रिकॉल केलं तेवढंच लक्षात रहात! बर्याच गोष्टी सुटतातही
झकोबा
विजयदादा
केदारदादा
खुप सारे चढ, अवघड वळण
खुप सारे चढ, अवघड वळण आहेत
तरी मी कशी बशी कष्टाने आणी नेटाने ऑफिसला एकदाची पोहचते >>> रीया बेटा .. या स्वप्नाचा अर्थ असा की तुला व्यायामाची गरज आहे.
मामी असू शकतं
मामी
असू शकतं
स्वप्नातला व्यायाम पुरेसा
स्वप्नातला व्यायाम पुरेसा नाही का? मला ही अशी कठीण कठीण स्वप्न पडतात :))
स्वप्नांचा काढावा तसा अर्थ होतो. त्यात असा भरपुर डीटेल्स असलेले स्वप्न असेल तर काहीहीही अर्थ काढता येतो
त्यात असा भरपुर डीटेल्स
त्यात असा भरपुर डीटेल्स असलेले स्वप्न असेल तर काहीहीही अर्थ काढता येतो <<< ते आहेच. पण अगदीच मोजक्या, ढोबळ घटना असतील तरीही अर्थ काढणारास मनपसंत फिलर्स घालून खमंग इफेक्ट आणता येतो. सृजनशील अर्थ काढणारास पर्वणीच अशी ढोबळ स्वप्ने म्हणजे.
आजकाल मला मुख्यमंत्री
आजकाल मला मुख्यमंत्री बनण्याचेच स्वप्न दिसत आहेत.... काय करावं
नाना..अजुन आणला नाहीय नवरा
नाना..अजुन आणला नाहीय नवरा
रिया.. नकाशाचं पार भेंडोळ करते तु स्वप्नात.. कुठे खड्कवासला नि जायकवाडी
विजयजी.. सहीय ना... करा उमेदवारी.. माबो प्रचारक होतील
कालच स्वप्न नीट आठवत नाहीये
कालच स्वप्न नीट आठवत नाहीये
पण मी मिटींगसाठी लेट झाले असलं काही तरी होतं
मग तेच ते बरेच डोंगर चढुन ऑफिसला पोहचले... मग पोहत पोहत ओडीसीत गेले आणि तेवढ्यात मला कळालं की सगळे माझ्यासाठी थांबलेले.... कारण मी बॉस होते
अस काहीस!!!!
चनस
किमान धरणाला धरण असं नाव आलं ते बेटर... नाही तर कळालं असतं की खडकवासला धरणाला जाताना वाटेत मेरू उपसागर लागला वगैरे
रिया .. तुला भुगोल कोणी
रिया ..
तुला भुगोल कोणी शिकवलं गं.. त्यांना सांगितलस तर चक्कर येइल
<<मेरू उपसागर लागला वगैरे <<
<<मेरू उपसागर लागला वगैरे << मेरु उपसागर?????
मी_आर्या, रियाने घरी ऊस
मी_आर्या,
रियाने घरी ऊस लावायचं ठरलं. उसाला पाणी हवं म्हणून उपस उपस उपसलं. ते पाणी बाहेर ठेवलं तर चोरीस जाईल. म्हणून घरात आणून ठेवलं. म्हणून ते उपसा-घर झालं. त्यातून पुढे बंगालचा उपसागर जन्माला आला. रियाने इतका उपसा करून ठेवला होता की त्यात मेरू पर्वत बुडाला. म्हणून मेरू-उपसागर.
झालं समाधान?
आ.न.,
-गा.पै.
गामाजी, तब्येत कशी आहे आता?
गामाजी,
तब्येत कशी आहे आता? असेच हलके फुलके प्रतिसाद येऊ देत सध्या.
गापै...
गापै...
गापै... तुमचा प्रतिसाद वाचुन
गापै...
तुमचा प्रतिसाद वाचुन रिया रजनीकांतची बहीण आहे असं वाटु लागलयं
छ्या! कसला घोटाळा केलात
छ्या! कसला घोटाळा केलात तुम्ही चनस! रजनीकांत रियाचा भाऊ वाटायला पाहिजे!
आ.न.,
-गा.पै.
आर्यातै मला म्हणायचं होतं
आर्यातै मला म्हणायचं होतं धरणाला धरणाचच नाव आलं ते नशीब समजा
काल पडलेलं एक स्वप्न - एका
काल पडलेलं एक स्वप्न -
एका माबोकराचं लग्न ठरलय.... लवकरच सापु होणारेय ( हे स्वप्न नाही खरं आहे )
तर मला अस स्वप्न पडलं की, मी कुठेतरी गेलेले तिथुन घरी आले तर आमच्या घरात काही तरी कार्येक्रम सुरू होता.. बहिणीकडून कळलं की कोणाचा तरी सापू आहे आमच्या घरी.... पहाते तर त्याच माबोकर मित्राचा आणि त्याची होणारी बायको (व्हू वॉज वेअरींग मरून सारी( आणि मित्राकडून कळालं की तिने खरच मरून साडीच घेतलीये सापू साठी ) ) माझी जवळची मैत्रिण निघाली... आणि त्यांचा सापू आमच्या घराच्या बाल्कनीत होता. मी जशी त्या बाल्कनीत गेले तसं अचानक पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीच रुपांतर मोठ्या कार्यालयात झालं आणि तो मित्र फोन वर बोलत इकडे तिकडे हिंडत होता. त्याची कोणी तरी रंजना नावाची साली किंवा बहिण मला त्याच्याशी बोलायलाच देत नव्हती... मग मला राग आला आणि मी रडत बसले तर आमच्या शेजारी रहाणार्या परीने त्याच्या अंगावर सुरवंट सोडलं
मग मी ते झटकलं आणि तितक्यात तिथे त्याची सासू आली (तारक मेहता मधली माधवी त्याची सासू होती) आणि मला सांगायला लागली की अग अचानकच ठरलं हे लग्न. त्याच काय झालं आमच्या दळणाच्या डब्यात एक कागद सापडला आणि त्या कागदावरचा नंबर फिरवला तर तो यांचा नंबर निघाला. मग ही (म्हणजे त्याची ती) त्यांच्या घरी डब्बा द्यायला गेली तर त्याच्या आईला आवडली ही आणि त्यांनी मग लग्नच ठरवून टाकलं..... आम्हाला विचारलं पण नाही.. पण आपणच कसं म्हणायचं ग की आम्हाला विचारा तरी
मग मी म्हणाले काकू काळजी करू नका... चांगला मुलगा आहे.... मग त्या म्हणे ठिकेय तू म्हणतेयेस तर होऊन जाऊ देत आता लग्न.... चल हळदीचा कार्येक्रमही आत्ताच उरकून घेऊयात म्हणजे नंतर टाईमपास नको
तर मित्रा, बघ आता, तू पण ब्लू शर्ट आणि ब्लॅक पॅण्ट घालनार असशील तर सुरवंट्से बच्के रेहना
टिप : तो मित्र गगोकर नाही
स्वप्न : बाह्यमन निद्रावस्थेत
स्वप्न :
बाह्यमन निद्रावस्थेत असताना, जाग्या असलेल्या अंतर्मनानं भासवलेली दृष्य, यांचा संबंध अनेक गोष्टींशी येतो, आगदी आपण झोपलेले असताना वातवरणात घडणार्या बदलांची शरीरानं घेतलेली नोंदही यात सामिल आहे.
उदा. अंधाराची स्वप्ने, ही अचानक लाईट्स ( सरावाचा असलेला कुठलाही अंधूक का असेना प्रकाशस्त्रोत ) गेल्यानंतर पडतात..
कधी कधी काही गोष्टी आपण पुर्ण विसरतो पण अंतर्मनानं त्याची नोंद घेतलेली असते अश्यावेळी ही स्वप्नं दिसतात. उदा. पाण्याची ,प्राण्याची, आगिची, परिक्षेची कसलीही भीती यांना जर आणखी कशाची म्हणजे, अजिर्ण, पित्त, असल्या विकारांची जोड मिळाली की ती विकृत स्वरूपात दिसतात..
कधी कधी मेंदूवर आलेल्या अतिरीक्त ताणांवर विरंगुळा म्हणून काही अचाट आणि अतर्क्य स्वप्नं दिसतात यांना काहीही अर्थ असत नाही, उदा. उडणे वगैरे टाईप
कधी एखादं दडवलेलं गुपित,( ते लहान असो किंवा मोठं ) त्याची अंतर्मनानं घेतलेली नोंद ही काही चमत्कारीक स्वप्नं पाडून जाते उदा. ते सार्वजनीक ठिकाणी अंगावर कपडे नसणं वगैरे टाईप. यातल्या कित्येक गोष्टी तर आपण ताबडतोब विसरलेलो असतो किंवा त्यांना काडीमात्र किंमत नसते पण याची नोंद झालेली असते. मात्र ही स्वप्न फार कमी काळाची असतात.
आणि स्वप्नाचा अतिमहत्वाचा भाग म्हणजे शाररीक गरज.. तहान लागणे, मोकळं होण्याची गरज भासणे यांचा ताबडतोब परीणाम म्हणून ही स्वप्नं दिसतात.
उदा. तहान लागलेली असताना, पाणी पिताना, पाण्यात पोहोताना वगैरे टाईप आणि नैसर्गिक हाकेच्यावेळी त्या कृतीची स्वप्नं पडतात, ही अत्यल्प जिवी स्वप्ने.
आता जसं विजय देशमुख यांनी म्हंटलंय त्याप्रमाणे वारसाहक्कानं आलेली स्वप्नं.. ही मात्र खरंच तशीच येतात. आणि काहीही स्वरूपाची असू शकतात.
एखाद्या सुप्त विचारांचा कल्पना विस्तार करून देणारी स्वप्नं म्हणजे सरळ सरळ कथानक दिसणं हे नंदिनीनं म्हंटलंय तसं
इंट्युशन आणि देजा वु ही मात्र सुप्त मानसिक शक्तीची कमाल आहे, एका ठराविक काळापर्यंत पुढे प्रवास करून पुन्हा मागे येणं असला काहीतरी प्रकार आहे..
आता लास्ट बट नॉट लिस्ट भयानक स्वप्नांची साखळी.. हा अनुभव काहीच लोकांना येतो, यात तेच कथानक अनेक स्वप्नांतून पुढे पुढे जात रहातं.. यामागे एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे असुरक्षीततेची भावना (पण मला ते पटत नाही.) पण निरूपद्रवी प्रकार हा ही,
शेवटी झोपेल्या माणसाचं अंतर्मन कुठला दरवाजा उघडून काय पहातं हे कुणाला कळणार ?
जाता जाता थोड्याफार अभ्यासातून माहीत असलेली गोष्ट : व्हू डू चे काही प्रयोग डीप हिप्नॉसीसनं केले जातात, ते ही माणूस झोपलेला असताना.. या वरून अंदाज घ्यावा की झोपलेल्या माणसाचं मन नक्की झोपलेलं असतं का ते..
पोष्ट खूप मोठी आहे, अनेकांना पटेल न पटेल पण कधीकाळी याचा मानसशास्त्रीय अभ्यास केला होता त्यावरून लिहीतोय.. न पटल्यास इग्नॉरास्त्राचा वापर उत्तम
कचा मस्त पोस्ट
कचा मस्त पोस्ट
चाफ्या लै भारी माझ्या
चाफ्या लै भारी
माझ्या स्वप्नांची कारणं सांग बर
रिया
रिया
स्वप्नांची साखळी >> हो कधी
स्वप्नांची साखळी >>
हो कधी कधी मला पडतात अशी स्वप्न. पण पुढचा एपिसोड कधीही दिसतो. आज स्वप्न पडलं, तर पुढचा भाग कधी आठवड्याने तर कधी महिन्याने पण दिसतो.
माझ्या स्वप्नांची कारणं सांग
माझ्या स्वप्नांची कारणं सांग बर >>>> ती तुझ्या रिलॅक्सेशन साठी आहेत लेडी रजनीकांत
ही खरच स्वप्न आहेत कि भ्रम (
ही खरच स्वप्न आहेत कि भ्रम ( झोपेतून उठल्यावर आठवून बघा)
लेडी रजनीकांत .............
मला वाटत ज्या गोष्टीचा आपल्या आयुष्यात सूतराम संबंध नाही अशी गोष्ट स्वप्नात दिसली तरच त्याला स्वप्न म्हणावे नाहीतर आहेच -कि मनी वसे ते स्वप्नी दिसे
साधारणतः स्वप्नात माणूस स्वतःला कमजोर,भित्रा,आत्मविश्वास नसलेला असच समजत असतो, जर याउलट कुणाला स्वप्न पडत असेल तर तो भ्रम समजावा
Pages