Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी करताना ती भाजी जर लवकर शिजायला हवी असेल व कमी तेलात व्हायला हवी असेल तर करायची एक युक्ती कळली व त्यानुसार भाजी केल्यावर खरोखरीच तेल कमी लागले व भाजी पटकन शिजली. अर्थात इथे अनेकांना ही युक्ती माहीत असेलच!
सिमला मिरची चिरून उकळत्या पाण्यात ४-५ मिनिटे घालून उकळू द्यायची. नंतर पाणी निथळून, नॅपकीनवर कोरडी करून फोडणीला टाकायची. अशा प्रकारे भाजी केल्यावर तेलही कमी लागले व तुलनेने झटकन शिजली भाजी. शिवाय चवीत व कुरकुरीतपणात कोणता फरक जाणवला नाही.
अकु सिमला मिरचीची माझी ट्रिक
अकु
सिमला मिरचीची माझी ट्रिक म्हणजे मी मावेमधे २ मि. ठेवते. आणि मग भाजी करते. तेल कमी लागते शिवाय वेळही कमी लागतो भाजी होण्यास. बरेचदा मी फ्लॉवरसाठीही असेच करते.
सध्या भाज्या वाफवून घेऊन त्या
सध्या भाज्या वाफवून घेऊन त्या अगदी थोड्या तेलाची फोडणी करून त्यात परतणे असे करून बघत आहे. अशा प्रकारे कोणकोणत्या भाज्या केल्या जाऊ शकतात? सध्या ह्या पद्धतीने सिमला मिरची, फ्लॉवर, गाजर-मटार, श्रावण घेवडा, भरली वांगी, दुधी, तांबडा भोपळा या भाज्या करून पाहिल्या व त्या चांगल्या झाल्या व चवीतही फार फरक जाणवला नाही. या खेरीज आणखी कोणत्या भाज्या वाफवून मग किंचित फोडणीत परतून चांगल्या लागतील?
अकु, तोंडली, दोडकं ...
अकु, तोंडली, दोडकं ...
gawar, sagalya prakarchi
gawar, sagalya prakarchi kadadhanye.
थँक्स आरती, प्राची.
थँक्स आरती, प्राची.
तोंडल्याची भाजी केली आहे एकदा वाफवून. गवारही बर्याचदा वाफवूनच केली जाते. दोडक्याची नाही पाहिली करून.
मी कारलं पण या पद्धतीने करते
मी कारलं पण या पद्धतीने करते अकु. फक्त ते मी कुकरमध्ये वाफवते म्हणजे परफेक्ट शिजतं आणि कमी तेलात होतं. सगळ्या शेंगा भाज्या (फ्रेंच बिन्स, शेवगा) या पद्धतीने शिजवल्याने कमी तेल खातात की पितात

इकडे asparagus मिळतं ते पाण्यात पाच मिनिटं ऊकळून ऑऑ मध्ये लसणाच्या चकत्यावर परतून मीठ मिरपूड घालून मस्त लागतं. बटरमध्ये केलं तर अहाहा
सगळ्याच भाज्या करता येणार
सगळ्याच भाज्या करता येणार अशा. मी भाज्या शिजवते, त्या तळत्/परतत नाहि, त्यामुळे तेल कमि लागते.
बरेच लोक कांदा तेलात परततात किंवा नीट तळु देतात, मग तेल जास्त लागते.त्याऐवजी अगदि थोडे तेल टाकुन त्यात कांदा टाकुन झाकण ठेवुन शिजु द्यायचा, मग भाजी टाकुन झाकण ठेवुन शिजवायचि. त्यामुळे तेल कमि लागते. आधि वाफवुन घ्यायची गरज नाहि पडत.
कुठल्याहि ग्रेव्हि/मसाला वाटण चि भाजि सुद्धा अशिच करता येते. अगदि १ चमचा तेल टाकाय्चे फोडणि पुरते आणि वाटण टाकुन १ वाफ येवु द्यायची मग भाज्या टाकायच्या. म्हणजे ते वाटण शिजते, त्याला तळावे लागत नाहि. आणि गॅस सुद्धा खरब होत नाहि आजुबाजुला काहि उडुन.
अकु, पालेभाज्या सोडून सगळ्याच
अकु, पालेभाज्या सोडून सगळ्याच अश्याच करता येतात. पालेभाज्या अगदी कमी तेलात, वाफेवर शिजतात.
सांबार मसाला कोणता चांगला? मी
सांबार मसाला कोणता चांगला? मी । कोणकोणते ट्राय केले पण आमटी केल्यसारखंच वाटत... आॅथेंटिक सांबार रेसिपी आहे का इथे... शोधली .. मिळाली नाही..
चिवा, देसी दुकानात मिळणारा
चिवा, देसी दुकानात मिळणारा डॅलस मेड 'येस' ब्रँडचा सांबार मसाला झकास आहे. आई गेल्या वेळी तो भारतात पण घेउन गेली होती म्हणजे विचार कर.
थँक्स वेका, प्रिया७, नीधप.
थँक्स वेका, प्रिया७, नीधप.
चिवा, मला एमटीआर किंवा सुहानाचा सांबार मसाला आवडतो. एमटीआर वापरून केलेल्या सांबाराची चव झकास असते. त्या पाकिटावर दिल्याबरहुकूम कृती करायची. तिकडे मिळेल/ नाही ह्याची कल्पना नाही.
एक ७७७ का असाच काहीतरी सांबार
एक ७७७ का असाच काहीतरी सांबार मसाला मिळाला होता, तोही बरा वाटला मला.
आचि मिळतो का तिकडे? तो
आचि मिळतो का तिकडे? तो बर्यापैकी चांगला आहे सांबार मसाला.
"ऑथिन्टिक सांबार मसाला" कृती (ऑप्शन्सः उडुपी, मंगलोरी, तमिळी, केरळी इत्यादि) हवा असल्यास देऊ शकेन. धन्यवाद.
नेहमीप्रमाणेच कृती करूनही
नेहमीप्रमाणेच कृती करूनही साबुदाणा जास्त भिजला बहुतेक. खिचडी अगदी गिच्च झाली आहे. पिठूळ चव लागते आहे.
आता या बिघडलेल्या खिचडीचे काही करता येईल का?
घरात बटाटा आणि दाण्याचे कूट सोडून बाकी उपवासाला चालणारे पदार्थ नाहीयेत.
साबुदाणा वडे किंवा थालिपिठ
साबुदाणा वडे किंवा थालिपिठ होउ शकतील का???? किंवा हे सर्व मिक्सर मधुन काढुन पाणी अॅड करुन डोसे करता येतील.....
खिचडी अगदी गिच्च झाली आहे.>>>
खिचडी अगदी गिच्च झाली आहे.>>> थोडी खिचडी एका वाटीत घेऊन किंचीत तूप घालून कूकरमधे ठेवून कूकरची शिट्टी काढून सात-आठ मिनिटं वाफवून बघ, खिचडी मोकळी होण्याची शक्यता आहे. ती वाफवलेली खिचडी जरा निवली की मगच मोकळी होईल.
वाफवल्यावरही गिच्च गोळाच राहिला तर त्यात बटाटे उकडून कुस्करून मिरची इत्यादी घालून वडे नाहीतर थालिपीठ करता येईल.
नाहीतर खिचडीत जास्त पाणी घालून उकळव, पाणी आटलं की ताक घाल, जिरेपूड, किंचीत मीठ, हिमि घालून मस्त लापशी होईल.
धन्यवाद मंजू आणि अनिश्का.
धन्यवाद मंजू आणि अनिश्का.
मंजू, लापशी लागते का चांगली? थोडी लापशी करते आणि थोडे वडे करेन संध्याकाळी.
लापशी झक्कास लागते. ती खरंतर
लापशी झक्कास लागते. ती खरंतर कच्च्या सबुदाण्याची जास्त चांगली, चविष्ट लागते, पण खिचडीचीही चांगली लागते, चवीत किंचीत फरक होतो.
खिचडी गिच्च झाली तर गरम
खिचडी गिच्च झाली तर गरम करायची व त्यात थोडे आंबटगोड ताक घालायचे, सरसरीत झाली पाहिजे. चव अॅडजस्ट करायची आणि गॅस बंद करायचा. अशा खिचडीच्या लापशीला साबुदाण्याचं बोंदगं म्हणतात. मला हा शब्द माहीत नव्हता. एका बहिणीच्या सासुबाईंकडून प्राप्त झालेले ज्ञान आहे.
मस्त शब्द आहे अकु मंजूडे तु
मस्त शब्द आहे अकु
मंजूडे तु कसली सुगरण आहेस ना?
नंदिनी, घरी मसाला करण्याा
नंदिनी, घरी मसाला करण्याा उत्साह असता तर काय पाहिजे होतं... हे वर सुचवलेले बघते आता ...
नंदिनी खरच लिही ना चारही
नंदिनी खरच लिही ना चारही प्रकारच्या साम्बारच्या रेसिपीज बारकाव्यासकट! ताजा मसाला घालून केलेले साम्बार फारच अप्रतिम लागते!
१> काल नवर्याने नको म्हणत
१> काल नवर्याने नको म्हणत असताना दुध [ वारणा] तापवायला ठेवले.
१.५ ली दुधाचा करपट वास येतोय काय करावे ?
२> सगळ्यात स्वस्त धान्य कोणते [ नवरा रोज २ ३ मुठी कबुत रांना घालतो ]
सगळ्यात स्वस्त धान्य कोणते [
सगळ्यात स्वस्त धान्य कोणते [ नवरा रोज २ ३ मुठी कबुत रांना घालतो ] - त्या कबुतरांच त्रास च्या धाग्यावरची लोक येतील इथे .
एका बोलमधे व्हीनीगर आणि
एका बोलमधे व्हीनीगर आणि त्याच्या शेजारी एक मेणबत्ती पेटवून ठेवल्यास बरेचसे वास / धूर त्या व्हीनीगरमधे शोषले जातात.
कबुतरांच्या धान्यात तितकीच रेती मिसळावी. यात कुणाचीच फसवणुक नाही. कबुतरांना दात नसल्याने त्यांना खडे खावेच लागतात. या खड्यांमूळेच धान्य त्यांच्या पोटात रगडले जाते.
२> सगळ्यात स्वस्त धान्य
२> सगळ्यात स्वस्त धान्य कोणते
उत्तरः
रेशन वगळता, गोडाऊनमधे (अगदी आपल्या नेहेमीच्या वाण्याकडे देखिल) मिक्स्ड ग्रेन्स खाली सांडलेले असतात. (हेच सेम चक्कीत खाली जमा झालेल्या मिक्स पिठाचेही) अनेक गरीब लोक तिथून नेतात, व त्याचा जेवणात वापर करतात. कामवालीला सांगून मागवून घेता येईल.
(पण मला तरी पर्सनली त्या गरीबांच्या तोंडचा घास काढणे आवडणार नाही.. अन रेशनचे सबसिडाईज्ड अन्न असे वापरणेही पटत नाही. भूतदया करण्यासाठी बाजारभावाने त्या त्या दिवशी दुकानात भाव विचारून जे स्वस्त मिळेल / वाटेल ते विकत आणावे हे उत्तम.)
कामवालीला सांगून मागवून घेता
कामवालीला सांगून मागवून घेता येईल >>> कामवालीला का सांगायचं?
कारण हे कुठे मिळेल व त्याची
कारण हे कुठे मिळेल व त्याची अॅक्चुअल किम्मत तिला नीट ठाऊक असेल.
शिवाय कामवाला/वाली हे लोक
शिवाय कामवाला/वाली हे लोक कामे करण्यासाठीच असतात ना? मग त्यांना काम सांगितलं तर कुठे बिघडलं
:दिवे:
Pages