घराच्या अगदी पुढ्यात एक वाळलेलं झाड आहे …
पानं गळून गेलेलीत सगळी … हिरवा ठीपकाही नाही ….
दाटीने असलेल्या बारीक फांद्या… वाळलेल्या ..पण
एकमेकांच्या आधाराने नेट धरून उभ्या
रोज संध्याकाळी
दुरून उडत आलेल्या …
प्रत्येक फांदीवर बसलेल्या चिमण्या दिसतात
गजबजलेल्या… जणू चीमण्यांचेच झाड
ठरलंय आमचं,
'झाडावर जागा त्यांची …त्यांच्यावर नजर माझी'
माझ्या खोलीच्या खिडकीतून रम्य दिसतो हा नजारा
पाऊस आला कि मात्र मी आवर्जून खिडकी बंद करते
मग बंद खिडकीत फडफडत येउन बसतात त्या
कप्प्यां कप्प्यात ……. निवाऱ्याला …. अगदी हक्काने
पावसापासून जपून ……. तरीही जरा जरा भिजतच
ठरलंय आमचं,
'आत खिडकी माझी…. बाहेरून त्यांची'
कसलं सुंदर दृश्य दिसत असेल… नाही ?
नाही बघू शकत मी बंद खिडकीतून
मात्र
त्यांच्या पंखांचा फडफडणारा आवाज,
मंद चिवचिवाट आणि
पंखातून उडालेल्या पावसाच्या थेंबांचा ओघळ
बंद काचेवर जाणवत राहतो.. आत.. !!
आत …पाझरत राहतो !
पाउस ओसरला कि त्या परत झेप घेतात झाडाकडे
अन वाट मोकळी करून देतात माझ्या नजरेला
त्या झाडावर ...त्यांच्यावर ...स्थिरावण्यासाठी !
जणू अलिखित करारच केलाय आम्ही.
कितीतरी वेळ मग आम्ही असेच गुण गात असतो
या अनामिक नात्याचे ,
आपापसात किंवा मग एक-एकट्यात ……….!!!
मी, ते झाड आणि चिमण्या ......
(फोटो internet वरुन साभार)
मस्त! फ़क्त ' भिरकावतात' ह
मस्त! फ़क्त ' भिरकावतात' ह शब्द थोडा खटकला. आपण कशाला तरी भिरकावतो, स्वत: भिरकावत नाही.
मस्त!
मस्त!
वावे, हो ग ...लक्षातच आले
वावे, हो ग ...लक्षातच आले नाही ...केला बदल बरं का
रोज संध्याकाळी दुरून उडत
रोज संध्याकाळी
दुरून उडत आलेल्या …
प्रत्येक फांदीवर बसलेल्या चिमण्या दिसतात
गजबजलेल्या… जणू चीमण्यांचेच झाड
>>.>.
बेटीची एक कविता आठवली ह्यावरुन. पहिले कडवे ते असे:
सुगी सरल्या रानात
उतरले अवचित रावे
वठलेला कदंब तरु
आज पंखात पालवे
छान आहे मयी तुझी कविता.
छान आहे
छान आहे
छान.
छान.
आवडली!
आवडली!
Thnx
Thnx
<<ठरलंय आमचं, 'आत खिडकी
<<ठरलंय आमचं,
'आत खिडकी माझी…. बाहेरून त्यांची'>>
वा.वा. अतिशय आवडले.
धन्यवाद
धन्यवाद
बी ... मस्तच
बी ... मस्तच
मयी, आश्चर्य आहे !कालची
मयी, आश्चर्य आहे !कालची चंद्र-शुक्रतार्याची, आजची चिमण्यांची ही कविता मला खूपच जवळची वाटतेय.. मीही पूर्वी कधीतरी या प्रतिमा अगदी याच संदर्भात नाही पण काहीशा समांतर अर्थाने कवितेत आणल्या होत्या.
खूप आवडते तुझे कवितालेखन, जवळचे वाटते.ले.शु.
छान आहे.
छान आहे.
भारती ... बस्स .. मिळव्ले मी
भारती ... बस्स .. मिळव्ले मी
Thnx
धन्यवाद अनुजा
धन्यवाद अनुजा
मस्त्त्त!
मस्त्त्त!
.
.
(No subject)
ओ हो, मस्तचे .....
ओ हो, मस्तचे .....
धन्यवाद शशांक
धन्यवाद शशांक
छान लिहिलय.. थोड्या वेळासाठी
छान लिहिलय..
थोड्या वेळासाठी मी पन तुमच्या घरी येउन बसले होते..
होय टीना तु ही चीऊच आहेस
होय टीना तु ही चीऊच आहेस
खूप छान कविता मयी
खूप छान कविता मयी
मयी ...
मयी ...
खूप छान.. मयी
खूप छान.. मयी
आवडली...
आवडली...
मैथीली - मयुरी धन्यवाद
मैथीली - मयुरी धन्यवाद
मयी कीत्ती गोड नात आहे तुझ
मयी कीत्ती गोड नात आहे तुझ त्या चिमण्यांशी आणि त्यांच त्या झाडाशी..