Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुंबई च्या दोन्ही
मुंबई च्या दोन्ही बाजु......मस्त आहेत पिक्स...
शुम्पी ने दिलेले फोटु मस्त.
शुम्पी ने दिलेले फोटु मस्त. पण त्यावर लिहिलेली भाषा कोणती आहे की font चा घोटाळा आहे?
मामीची बातमी पण वाचनीय. उपाय दिले आहेत, ते अंमलात आणले जातील ही आशा.
सुनीधी रशीयन भाषा आहे ती.
सुनीधी रशीयन भाषा आहे ती.
फोटोंचा विषय सुरु आहे म्हणुन
फोटोंचा विषय सुरु आहे म्हणुन हल्लीच पाहिलेले हे मुम्बईचे फोटो.
फोटोलेखमाला सुरु आहेत त्यातील दुसरा भाग.
इथे पहा
पहिल्या भागाची लिन्क दुसया भागाच्या सुरवातीलच दिली आहे.
शूम्पी... धन्यवाद.. कसले
शूम्पी... धन्यवाद.. कसले खल्लास फोटो आहेत.
सुनिधी, ती रशियन भाषा आहे.
सुनिधी, ती रशियन भाषा आहे. गुग्गुळाचार्यांनी भाषांतरित केलेले पान पहा इथे :
http://translate.google.com/translate?sl=auto&tl=en&js=n&prev=_t&hl=en&i...
आ.न.,
-गा.पै.
आजच्या लोकसत्तामधे आलेला हा
आजच्या लोकसत्तामधे आलेला हा लेख. (जरा बाळबोधपणे लिहिलेला आहे, पण माहिती छान आहे.)
http://epaper.loksatta.com/142047/indian-express/31-07-2013#page/6/1
जगन्नाथ शंकरशेट यांच्या वाड्याचं वर्णन आहे. गिरगावात कोणे एके काळी असे वाडे होते यावर आता विश्वास ठेवणं कठीण आहे.
१०२० सालच्या मुंबईची एक
१०२० सालच्या मुंबईची एक फील्म. सध्या फेबु वर फीरत आहे :
https://www.facebook.com/photo.php v=548442105208143&set=vb.438092716243083&type=2&theater
आज संस्थेच्या कामासाठी दक्षिण
आज संस्थेच्या कामासाठी दक्षिण मुंबईमध्ये गिरगाव, ग्रॅंट रोड भागात फेरफटका झाला. गिरगावात वेलणकरांच्या हॉटेलात जेवले. दादरपासून पुढे सगळ्या जुन्या खाणाखुणा ओळखत फ्लायओव्हरमागून फ्लायओव्हर पार करताना मजा येत होती. नविन झालेल्या टोलेजंग इमारतींमधून मधूनच कापड गिरण्यांचे अवशेष, चिमण्या डोकावत होत्या. गिरगावातून जाताना "अय्या! हे दुकान अजून आहे, ही बिल्डिंग अजून तश्शीच आहे" वगैरे बडबडत होते. परतताना एक खोल श्वास आपोआप घेतला गेला, आठवणी आतमध्ये सामावून जपून ठेवल्यासारखा. परत नजरेस पडेल तेव्हा पडेल.
आज सकाळी सी-लिंकवरून काढलेले
आज सकाळी सी-लिंकवरून काढलेले फोटो. दूरदर्शनचा मनोरा दिसत आहे.
ती ढगात गेलेली इमारत म्हणजे श्रीराम मिल्सच्या जागी बांधण्यात येत असलेली Palais Royale.
<< गिरगावात वेलणकरांच्या
<< गिरगावात वेलणकरांच्या हॉटेलात जेवले. >> खरं तर गिरगांवातलं जेवणासाठी प्रसिद्ध असलेलं " वीरकर यांचे वेलणकर हॉटेल " बंद होऊन एक तप तरी लोटलं असावं; अस्सल मराठी पद्धतिचं अप्रतिम शाकाहारी जेवण देणारं तें दक्षिण मुंबईतलं बहुधा सर्वोत्तम हॉटेल होतं असावं व मराठी माणसांपेक्षां गुजराथी लोक तिथलं नियमित गिर्हाईक असे ! पूर्वीं "छत्रे यांच्या कोल्हापुरी चिवड्या"साठी प्रसिद्ध असलेलं हॉटेल आतां "वेलणकर हॉटेल " झालंय; तिथला चिवडा, चकली व पुरणपोळ्या मात्र आजही "क्वालिटी प्रॉडक्टस" मानले जातात. तिथल्या जेवणाविषयीं मात्र कल्पना नाही.
ह्या मुंबईत ऐन मलबार हिल्स
ह्या मुंबईत ऐन मलबार हिल्स वरही हैद्राबादेच्या निजामाचा एक मोठा रिकामा प्लॉट आहे. हैद्राबादेस आम्हाला सवय होती लोकाना ह्या निजामाच्या प्रॉपर्ट्या दाखवायची. ही बातमी वाचून मुंबईत परके वाटायचे अंशत: कमी झाले. प्लॉट विक्रीस ठेवूनही कोणी घेत नाही आहे कारण मोठे लिटिगेशन होण्याची शक्यता आहे.
मी पण मध्ये लालबाग परळ भागात गेले होते ह्या बाफाची याद आली.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46884
हे व्हॉट्सप वर आलेले लिखाण...
हे व्हॉट्सप वर आलेले लिखाण... खर खोट देव जाणे.
मुंबईतील रस्ते आणि चौक यांच्या नामकरणाच्या निरनिराळ्या तर्हा इंग्रजांन आपण आज गिरवीत आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यावर आता बर्याच जागांची आणि रस्त्यांची नावं बदलण्यात आली आहेत पण आजही नव्या नावांऐवजी जुनीच नावं ज्याच्या त्याच्या मुखी असतात.
* भायखळा : ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते आणि त्याच्या मालकाचे नाव होते भाया भायाचे
खळे ते भायखळे आणि त्याचा झाला भायखळा.
* परळ : या ठिकाणी पुष्कळ परळीची झाडे होती म्हणून या गावाला परळ नाव पडले.
* दादर : मुंबई बेटाच्या उत्तरेला वसलेले गाव ओलांडल्यानंतर थोडा चढ चढून मुंबईत येता येत असे, म्हणून चढाच्या या भागाला नाव पडले दादर. वरचा मजला गाठण्याचा जिना म्हणजे दादऱ.
* माटुंगा : मातंग स्थान म्हणजे हत्ती ठेवण्याचे ठिकाण! यावरून माटुंगा हे नाव आले असं म्हणतात
की, या ठिकाणी भीमदेव राजाचे हत्ती ठेवले जात असत.
* नायगाव : हा भाग ‘न्याय-ग्राम’ या शब्दावरून आलेला आहे या ठिकाणी राजा भीमदेवाचे न्यायालय आणि राजवाडा होता न्याय मिळण्याचे ठिकाण ते न्याय न्याय आणि ग्रामचा अपभ्रंश नायगाव.
* बोरीबंदर : हे नाव १८५२ साली तेथपर्यंत असलेले समुद्रावरील बंदर आणि त्याच्या आजूबाजूला असलेली बोरींची झाडे यावरून पडले.
* ग्रँट रोड, रे रोड मुंबईतल्या सुमारे पंधरा रस्त्यांना मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरांची नावे दिलेली आहेत उदा लॅमिंग्टन रोड, आर्थर रोड, नेपियन सी रोड, सँडहर्स्ट रोड, ग्रँट रोड, फॉकलंड रोड, हॉर्नबी रोड, रे रोड,
कुलाब्याचा वुड हाऊस रोड वगैरे.
* चर्नी रोड : या भागात पुष्कळ गवत होते आणि गाई-म्हशी इथे चरत असत त्यांची चरणी ती चर्नी !
* नळबाजार : शहरातील सांडपाण्याचे मुख्य गटार जिथून वाहत जाऊन वरळीच्या समुद्राला मिळत होते तो भाग नळबाजार म्हटला जाऊ लागला आता नळबाजार कुठे आणि वरळी कुठे? पण त्या काळात हे दोन्ही भाग या गटाराच्या नळाने एकमेकांना जोडलेले होते.
* अँटॉप हिल : अँटॉप ही जागा अंतोबा नावाच्या कोळ्याची होती याव कुणाचा विश्वास बसेल काय? सायबाने अंतोबाचा अँटॉप केला आणि त्यावरून अँटॉप हिल नाव रूढ झाले.
* डोंगरी : हे नाव सरळसरळ डोंगरावरून आले आहे हा भाग तेव्हा संपूर्ण डोंगराळ होता.
* कांदेवाडी : गिरगावातील कांदेवाडी हे नाव तेथल्या कांद्याच्या गोदामांनी आणले.
* लोहार चाळ : हे नाव तेथे असणार्या लोखंडी सामानाच्या केवळ एका दुकानावरून पडले.
वा! भायखळा आणि दादरबद्दल
वा! भायखळा आणि दादरबद्दल नव्यानं कळलं.
मस्त माहिती. हा धागा खूप
मस्त माहिती. हा धागा खूप दिवसांनी वर आला.
यातली बरीचशी माहिती आधी वाचली
यातली बरीचशी माहिती आधी वाचली होती, बहुतांश खरीअसाच्वी,
मस्त माहिती.
मस्त माहिती.
दादर हे थोडे परळ भागापेक्षा
दादर हे थोडे परळ भागापेक्षा उंच आहे. पावसात परळ भागात अनेक ठिकाणी पाणी साचते, तसे दादर भागात होत नाही.
भोईवाडा पण भोई लोकांवरुन पडलेले नाव आहे.
विविध नावांविषयी बरीचशी
विविध नावांविषयी बरीचशी माहिती ह्या पुस्तकात मिळावी.
बाकी कायपण असो, कुर्ला आणि
बाकी कायपण असो, कुर्ला आणि चेंबूर ही नावं कुरल्या आणि चिंबोर्या या खेकड्यांवरून पडली आहेत! तोंपासु!!
-गा.पै.
दादर टिटिचा १९३४ हा जुना
दादर टिटिचा १९३४ हा जुना फोटो फेसबुकर फिरत आहे.
इंद्रा, मस्त फोटो.
इंद्रा, मस्त फोटो.
मस्त फोटो. फारसा फरक अजून
मस्त फोटो. फारसा फरक अजून नाही जाणवत या परिसरातील इमारतींत ! टीटी = ट्रॅम टर्मिनस, म्हणून ट्रॅम गायब झाल्याचं अर्थात तीव्रतेने जाणवतंच ! बाकी, असले फोटो बघून कोणाच्या काय काय बर्या-वाईट आठवणी जाग्या होतील सांगणं कठीणच !!
.... भाऊ.
भाऊ लई सुटलेत! -गा.पै.
भाऊ लई सुटलेत!
-गा.पै.
भाऊ, ब्येश्टच
भाऊ, ब्येश्टच
सहज गंमत म्हणून दादर टी.टी.ची
सहज गंमत म्हणून दादर टी.टी.ची माझी फार जुनी नसलेली आठवण-
रुईया कॉलेजला जाण्यासाठी बसने येणार्या मुला-मुलीना बीईएसटीचे थांबे गैरसोयीचे असत. म्हणून, मुद्दाम त्यांच्यासाठीं बसचे चालक दोन थांब्यांच्या मधे बस उभी करून त्याना उतरूं देत. माझी मुलगी चालकांच्या या समजूतदारपणाचं नेहमी कौतुक करायची. नंतर एकदां मला रुईयाच्या अगदीं जवळच जायचं होतं तेंव्हां हें आठवून मीं पुढे जावून चालकाला बस मधे उभी करायची हंळूच विनंति केली. त्याच्या या खड्या आवाजातल्या प्रतिसादामुळे दादर टी टी माझ्या कायमची लक्षात राहिली -" हो काका, ज्येष्ठ नागरिकाना अजून तरी ही सवलत नाय दिलेली. बसा मागे गुपचूप स्टॉप येईस्तो !! "
भाऊ , मस्त. काय हे? किती हा
भाऊ , मस्त. काय हे? किती हा दुजाभाव त्या कंडक्टरचा
कुठे फेडेल हे पाप तो? मोक्ष नाही हो मिळायचा त्याला.
सायन सर्कल वरून डाविकडे जो
सायन सर्कल वरून डाविकडे जो रस्ता चुनाभट्टी स्टेशन कडे जातो त्या रस्तावर शिरल्या बरोबर हवेतला फरक जाणवतो. हवेत एकदम गारवा येतो. त्याच र स्त्यावर उजवीकडे पुरातन शिव मंदीर आणि तळे आहे . कदाचीत त्या तळ्यामुळे ही असेल, पण तिथून चालत जायला मस्त वाटते.
Pages