Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उंदीर पळत नाहीये हीच समस्या
उंदीर पळत नाहीये हीच समस्या आहे >>>
स्ट्रेस बस्टर धागा...
स्ट्रेस बस्टर धागा...
अजून एकाही कविता आली नाही
अजून एकाही कविता आली नाही कांय उंदरावर
गझल येणारे म्हणे
गझल येणारे म्हणे
सगळे आपापली क्रिएटीवीटी
सगळे आपापली क्रिएटीवीटी पणाला लावत आहेत.
आता बाप्पाची आरती म्हणा,
आता बाप्पाची आरती म्हणा, म्हणजे उंदीर पण टाळ्या वाजवत बाहेर येईल.:खोखो: मग घालीन लोटांगण करुन त्याला मुकुंच्या स्टाईलने पकडा.:फिदी:
राजसी सही उपाय्.:स्मित: मी तेच लिहीणार होते आधी वाचतांना. सकाळी ११ पोस्ट होत्या, आता पार डबल सेंच्युरी हाणणार हा धागा.:फिदी:
आमच्या सध्याच्या घरात गोम
आमच्या सध्याच्या घरात गोम (कधी कधी ), पाल, उंदिर येऊन जाऊन असतात. तर बाहेर कधी तरी साप दर्शन देतो. पण एवढा पाऊस होऊन पण बेडुक राव डराव डराव करायला आले नाही.:अरेरे:
केदारदादा, घे
केदारदादा, घे -
++++++++++++++++++++++++
संदिप खरेची क्षमा मागून
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला माबोकर उंदरावरती बोलू काही.....
उगाच वळसे शब्दांचे देत रहा तू
आले नाहीत अॅडमिन तोवर बोलू काही
उपाय पाहून बिळातील कुजबुजल्या घुशी
बाफ 'उडू' दे त्यांचा नंतर बोलू काही
हवेहवेसे सल्ले तुला जर हवेच आहे ,
नकोनकोसे धाडसी कातर बोलू काही !
(उदयन आयडी याला उद्देशून खास )
उद्या, उंदरांची किती काळजी वाच रोमातून
रात्री येतील झक्की नंतर बोलू काही
रॅटकील असु दे हातामध्ये खबरदारी म्हणुनी ;
(कारण )बाफ अधांतरी, शेवट खडतर बोलू काही !
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.
मस्त गं रिया स्ट्रेस बस्टर
मस्त गं रिया
स्ट्रेस बस्टर धागा...>>> झकासराव +१ काय एक एक शक्कल लढवतायत लोक..
घुशीची काळजी आणि अगस्ती
घुशीची काळजी आणि अगस्ती मुनींची शपथ वाचून लई हसले
बरे, सुमेधा, कालपासून इतर खोल्यांची दारे बंद केलेली आहेत, त्यांची सद्यपरिस्थिती काय आहे?
मजेशीर उपाय आहेत खरे. भारतात
मजेशीर उपाय आहेत खरे.
भारतात तो चिकट गोंद मिळतो का ? पण त्याने केवळ छोटे उंदीर पकडता येतात. मोठे असतील तर त्यातून सुटका करून घेतात.
एक औषधाची गोळी असते ( कुठली ते इब्लिस सांगतील ) माणसासाठी थोडी सेडेटीव्ह असते. पण उंदरासाठी जरा घातक ठरते. त्याला गाढ झोप लागते. त्यातली अर्धी गोळी, पूड करून कणीक / साखरेत मिसळून ठेवायची.
पण नंतर झोपी गेलेला उंदीर शोधून काढावा लागतो. हा उपाय तसा विषारी नाही.
उंदराना सहन न होणारे आवाज करणारे यंत्र किंवा हमखास उघड्यावर त्यांना आणून मारणारे औषध अशांच्या जाहीराती, भारतात बघितल्यासारख्या वाटतात.
रिया मस्तच. इतर प्रतिसाद आणि
रिया मस्तच. इतर प्रतिसाद आणि उपायही जबरी
रिया मस्तच.
रिया मस्तच.
मस्त कविता रिया.
मस्त कविता रिया.:स्मित:
रीया उंदीरमामा खुश होतील आता
रीया उंदीरमामा खुश होतील आता त्यांच्यावरपण कविता झाली
हे घे तुला आहे उंदरांना नाही
(No subject)
हसुन हसुन डोळ्यात पाणी अजुन
हसुन हसुन डोळ्यात पाणी
अजुन कुणी रजनीकांतची आठवण नाही काढली का????
एन्ना रास्कला उंदरा...
चिकटवेन तुला कंप्युटरा...
फिरवेन तुला गरागरा
भोवळ येऊन का उगा मरा....
घाबरून उंदिर पळाला खरा
पण स्टिकपॅडवर चिकटला जरा
रजनी ने त्याला दिला आसरा
'माऊसपॅड' म्हणुन विकला बाजारा.....
कोल्ह्याचे मूत्र शिंपडा<<<<
कोल्ह्याचे मूत्र शिंपडा<<<< ?????
घरात उंदीर आल्यावर कोल्हा शोधायला बाहेर पडायचे????
आणि तो मिळाला तर तो तेव्हाच मुतेल याची काय गॅरंटी? आणि तसे काही झाले तर ते तिथून घरात आणून शिंपडायचे कुठे? कारण घरात उंदीर कुठे आहे ते कुठे माहीत आहे???
म्हणे कोल्ह्याचे मूत्र शिंपडा!
लाजो __/\__ तूच ग तूच
लाजो
__/\__
तूच ग तूच !
महान!
आणि धामण काय पाळा? धामण
आणि धामण काय पाळा? धामण कचाकचा माणसांना चावत सुटेल.
इथले सगळे उपाय पुणे ५२ सारखे वाटतायत
कात्रज उद्यानात सापडतो का
कात्रज उद्यानात सापडतो का बघा.:दिवा::फिदी:
कोल्हाच पाळावा. दिसला उंदीर
कोल्हाच पाळावा. दिसला उंदीर कि ..
कोल्ह्याचे मूत्र >>> हे शक्य
कोल्ह्याचे मूत्र >>> हे शक्य नसेल, तर कुत्र्याचे ट्राय करुन पहा... उपयोग झाला, तर मटका लागेल.. नाही झाला, तर चटका तर नाही लागणार ना? असो,
कोल्ह्याचे मूत्र आणायला जमत असेल तर लगेहाथ, एकशिंगी गेंड्याच्या शिंगाचा छोट्टासा तुकडा तोडून तो ब्रह्मकमळाच्या पाकळ्यांसोबत उगाळून तो रस उंदरांना पौर्णिमेच्या रात्री- ज्या प्रहराला माणसाचे पांघरलेल्या लांडग्यात (वेअरवुल्फमध्ये) रुपांतर होते, त्या वेळेला २ मि. कमी असतांना पाजावा.. असे केल्याने उंदीर माणसाळतो.. मग त्याला पळवून लावावे लागत नाही. (संदर्भ- उंदराला माणसाळवण्याचे १०१ उपाय- हे पुस्तक)
(No subject)
रिया, मस्त विडंबन. घरात उंदीर
रिया, मस्त विडंबन.
घरात उंदीर आल्यावर कोल्हा शोधायला बाहेर पडायचे????
आणि तो मिळाला तर तो तेव्हाच मुतेल याची काय गॅरंटी? >>> यासाठी अजितदादांकडून कन्सलटेशन घ्यावे.:डोमा:
सुमेधा, पाखुमध्ये 'विरंगुळा' घाला.
सानी, काही शंका १) हा रस
सानी, काही शंका
१) हा रस उंदराला अनिशा पोटी द्यावा की काही खाल्ल्या नंतर?
२) गेंड्याच्या शिंग हा मांसाहारात मोडतो की शाकाहारात? सुमेधा शाकाहारी आही की कसे ते माहीत नाही आणि तीच्या घरी उंदराने मांसाहारी खाल्ले तर चालेल की नाही ते माहीत नाही
३) हा रस साधारण कीती उगाळावा? त्यात घारीची नखे मिसळली तर अजुन परीणाम चांगला साधला जातो अस ऐकल आहे, ह्यावर नक्की काही सांगता येइल का?
४) उंदराला माणसाळायला नंतर साधारण कीती वेळ लागेल?
बेफे
बेफे
काहीही! रियाची कविता भारी
काहीही!
रियाची कविता भारी आहे!
पण आत्ताच बाहेर कशाला काढता? त्याला आणखी ४-५ आठवडे पोसा. यंदा फक्त बाप्पांची मूर्ती आणा.
ऊंदराच्या समोर एक चिखल आणि
ऊंदराच्या समोर एक चिखल आणि मातीच ताट समोर ठेवा आणि म्हणा:
"चिखल माती खा आणि परत जा, माती मायेची शपथ आहे तुला."
लक्षात राहील ना? काय म्हणायच? म्हणून दाखवा पाहू..
सानी
सानी
Pages