घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?

Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22

कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वचजण चांगले सल्ले देत आहेत.....ह .ह .पु. वा.

खरच आम्च्या इथे एक मोठ्ठी घुस पण आहे ..अंगणात....कोणी नसलेर की यांचेच राज्य असते दिवस - रात्र/
पण घुशीचा तसा त्रास काही नाहीये..फक्त दोन पिटुकले उंदीर....ओट्यावर पण येतात..मग मीही टाळ्या वाजवते....आणी काम सुरु.........आपण भितींला टेकून बसलो असलो तर आपल्या मागून हळूच ही पिटुकली शिवणापावनी खेळत असतात...हे हे हे

मुग्धामानसी.. अगं कादंबरीच काय प्रत्यक्षात झालयं हे माझ्यासोबत.. मिरजेत भाडेकरु होतो तेव्हा.. मी सकाळी अभ्यास करत होते नि वरुन उंदीरमामी(असावी बहुतेक) तिच्या पिल्लांना घेवुन पळ्त होती.. त्यांचे पाय स्लिप झाले नि एकामागुन एक सगळे माझ्या ओट्यात असलेल्या पुस्तकावर पड्ले!!

काळजी नाही हो, "काळीज" असे म्हणा! Happy
अन दम्यावर काय, लोक मनाला येईल तो उपाय सुचवित अस्तात, बिचारा गुदमरुन तडफडत असलेला दमेकरी ते कसलेही अघोरी उपाय करायला मागेपुढे पहात नाही! मला सान्गितलेले दोन उपाय म्हणजे वाघाचे मूत्र प्यायचे अन पळत सुटायचे, दुसरा उपाय पारवा खायचा!

दोन उपाय म्हणजे वाघाचे मूत्र प्यायचे अन पळत सुटायचे, दुसरा उपाय पारवा खायचा!>>>>>>>हा हा हा ////
वाघाने तसे करु दिले तर पळणार ना.................हा हा

लिंबुदा आमच्याकडे काळजी म्हणतात म्हणून तसे लिहीले. Happy खरा शब्द कलेजी आहे.
बिचारा गुदमरुन तडफडत असलेला दमेकरी ते कसलेही अघोरी उपाय करायला मागेपुढे पहात नाही! हे मात्र अगदी खरे. अजुन सशाचे रक्त, घोरपडीचे मटण हेही उपाय सांगतात.

निवा Lol

अजुन सशाचे रक्त, घोरपडीचे मटण हेही उपाय सांगतात. <<<< कै नै ओ, हे सगळे उपाय म्हणजे "खवय्ये"लोकान्च्या जीभेचे चोचले, नाव दमेकर्‍याचे, खाणार हे! मला तर साळिंदराचे मटण देखिल खायला सान्गितले होते.

वाघ काही मला बघुन "ओले" करणार नाही याची खात्रि, शिवाय त्याला शोधायचा कुठे? सबब तो बेत क्यान्सल केलेला.
सातारच्या त्या माझा मित्र पप्याने एक पारवा मारुन आणून दिला होता, तर त्याच्याच घरी शिजवायला लावल्यावर एक बोट भर तुकडा कसा तरी खाऊ शकलो होतो.
दमा अजुनही आहे तसाच आहे, व मरेस्तोवर ग्यारण्टीने सोबत रहाणार आहे!

पालीला पळवायल एक जालीम उपाय समजलाय नुकताच. तिच्या शेपटीच्या दिशेने बाजूला दिवा/मेणबत्तीचा उजेड पाडायचा. मग ती उलट्या दिशेने भराभरा सरपटायला लागते. मग तिला असे पुढे पुढे नेऊन खिडकीच्या दिशेने घेऊन जायचे. मग ती बाहेर गेली की खिडकी लावून टाकायची.

>>>>>> की खिडकी लावून टाकायची <<< Lol
मागे, पालीकरता भिंतीवर खडूने काहीतरी शब्द लिहीण्याचे फ्याड आले होते ना?

पालीकरता भिंतीवर खडूने काहीतरी शब्द लिहीण्याचे फ्याड आले होते ना? <<< पालीसाठी नाही, सापासाठी - "सर्पा तुला अगस्ती मुनीची शप्पथ!" आमच्या गावाला या. सगळ्या हस्ताक्षरांचे नमुने दाखवतो.

घोरपड कंबरेच्या दुखण्यावर रामबाण <<< घोरपडीची चरबी जखमेवरही चांगला उपाय आहे. (माझ्या आजीचा फेवरीट उपाय. घोरपडीची शिकार झाली की तिची चरबी आजीच्या बटव्यात जमा झालीच पाहिजे.)

सापासाठी आस्तिक लिहायचं म्हणे.

कोल्हापुरात्ल्या शेजारच्या एका वहिनीने लिहिलं होतं,
मी त्याना विचारलही अहो सापाला कुठे वाचता येतं म्हणुन.. Lol

सगळ्या हस्ताक्षरांचे नमुने दाखवतो.>>. Lol

उंदीर हिं आहे की मु याची तज्ञाकडून चवकशी करुन घ्या. हिं असेल तर बिन्धास मारा कुण्णी काही बोलणार नाही. मु असेल तर त्याच्या मिन्नतवार्‍या करा, अबू असीम आझमी, ओवेसी यांची परवानगी घ्या. उंदराला स्वतंत्र राष्ट्र हवे आहे काय याचीही चवकशी करा. ते हवे असल्यास देऊन टाका. त्याला आरक्षण हवे असल्यास सरकारला पत्र धाडा. Proud

अजय Proud

Pages