Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वचजण चांगले सल्ले देत
सर्वचजण चांगले सल्ले देत आहेत.....ह .ह .पु. वा.
खरच आम्च्या इथे एक मोठ्ठी घुस पण आहे ..अंगणात....कोणी नसलेर की यांचेच राज्य असते दिवस - रात्र/
पण घुशीचा तसा त्रास काही नाहीये..फक्त दोन पिटुकले उंदीर....ओट्यावर पण येतात..मग मीही टाळ्या वाजवते....आणी काम सुरु.........आपण भितींला टेकून बसलो असलो तर आपल्या मागून हळूच ही पिटुकली शिवणापावनी खेळत असतात...हे हे हे
मुग्धामानसी.. अगं कादंबरीच
मुग्धामानसी.. अगं कादंबरीच काय प्रत्यक्षात झालयं हे माझ्यासोबत.. मिरजेत भाडेकरु होतो तेव्हा.. मी सकाळी अभ्यास करत होते नि वरुन उंदीरमामी(असावी बहुतेक) तिच्या पिल्लांना घेवुन पळ्त होती.. त्यांचे पाय स्लिप झाले नि एकामागुन एक सगळे माझ्या ओट्यात असलेल्या पुस्तकावर पड्ले!!
(No subject)
काळजी नाही हो, "काळीज" असे
काळजी नाही हो, "काळीज" असे म्हणा!
अन दम्यावर काय, लोक मनाला येईल तो उपाय सुचवित अस्तात, बिचारा गुदमरुन तडफडत असलेला दमेकरी ते कसलेही अघोरी उपाय करायला मागेपुढे पहात नाही! मला सान्गितलेले दोन उपाय म्हणजे वाघाचे मूत्र प्यायचे अन पळत सुटायचे, दुसरा उपाय पारवा खायचा!
दोन उपाय म्हणजे वाघाचे मूत्र
दोन उपाय म्हणजे वाघाचे मूत्र प्यायचे अन पळत सुटायचे, दुसरा उपाय पारवा खायचा!>>>>>>>हा हा हा ////
वाघाने तसे करु दिले तर पळणार ना.................हा हा
लिंबुदा आमच्याकडे काळजी
लिंबुदा आमच्याकडे काळजी म्हणतात म्हणून तसे लिहीले. खरा शब्द कलेजी आहे.
बिचारा गुदमरुन तडफडत असलेला दमेकरी ते कसलेही अघोरी उपाय करायला मागेपुढे पहात नाही! हे मात्र अगदी खरे. अजुन सशाचे रक्त, घोरपडीचे मटण हेही उपाय सांगतात.
निवा
निवा
दम्यावर ते जिवंत मासा खायचा
दम्यावर ते जिवंत मासा खायचा पण एक उपचार असतो ना?
आजचा दिवस चांगला जाणार असे
आजचा दिवस चांगला जाणार असे दिसतय!!!!
अजुन सशाचे रक्त, घोरपडीचे मटण
अजुन सशाचे रक्त, घोरपडीचे मटण हेही उपाय सांगतात. <<<< कै नै ओ, हे सगळे उपाय म्हणजे "खवय्ये"लोकान्च्या जीभेचे चोचले, नाव दमेकर्याचे, खाणार हे! मला तर साळिंदराचे मटण देखिल खायला सान्गितले होते.
वाघ काही मला बघुन "ओले" करणार नाही याची खात्रि, शिवाय त्याला शोधायचा कुठे? सबब तो बेत क्यान्सल केलेला.
सातारच्या त्या माझा मित्र पप्याने एक पारवा मारुन आणून दिला होता, तर त्याच्याच घरी शिजवायला लावल्यावर एक बोट भर तुकडा कसा तरी खाऊ शकलो होतो.
दमा अजुनही आहे तसाच आहे, व मरेस्तोवर ग्यारण्टीने सोबत रहाणार आहे!
पालीला पळवायल एक जालीम उपाय
पालीला पळवायल एक जालीम उपाय समजलाय नुकताच. तिच्या शेपटीच्या दिशेने बाजूला दिवा/मेणबत्तीचा उजेड पाडायचा. मग ती उलट्या दिशेने भराभरा सरपटायला लागते. मग तिला असे पुढे पुढे नेऊन खिडकीच्या दिशेने घेऊन जायचे. मग ती बाहेर गेली की खिडकी लावून टाकायची.
घोरपड कंबरेच्या दुखण्यावर
घोरपड कंबरेच्या दुखण्यावर रामबाण
काहीही लिहाल तर वनखात्याला
काहीही लिहाल तर वनखात्याला घावाल
>>>>>> की खिडकी लावून टाकायची
>>>>>> की खिडकी लावून टाकायची <<<
मागे, पालीकरता भिंतीवर खडूने काहीतरी शब्द लिहीण्याचे फ्याड आले होते ना?
हो, कोळशाने काहीतरी मंत्र
हो, कोळशाने काहीतरी मंत्र लिहायचा होता. पाली मात्र बिनधास्त त्या मंत्रावरुनदेखील फिरायच्या.
पालीकरता भिंतीवर खडूने
पालीकरता भिंतीवर खडूने काहीतरी शब्द लिहीण्याचे फ्याड आले होते ना? <<< पालीसाठी नाही, सापासाठी - "सर्पा तुला अगस्ती मुनीची शप्पथ!" आमच्या गावाला या. सगळ्या हस्ताक्षरांचे नमुने दाखवतो.
घोरपड कंबरेच्या दुखण्यावर रामबाण <<< घोरपडीची चरबी जखमेवरही चांगला उपाय आहे. (माझ्या आजीचा फेवरीट उपाय. घोरपडीची शिकार झाली की तिची चरबी आजीच्या बटव्यात जमा झालीच पाहिजे.)
सापासाठी आस्तिक लिहायचं
सापासाठी आस्तिक लिहायचं म्हणे.
कोल्हापुरात्ल्या शेजारच्या एका वहिनीने लिहिलं होतं,
मी त्याना विचारलही अहो सापाला कुठे वाचता येतं म्हणुन..
सगळ्या हस्ताक्षरांचे नमुने दाखवतो.>>.
गजानन
गजानन
उंदराला इतकं घालून पाडून
उंदराला इतकं घालून पाडून बोललं जातंय कि तो आता सायबर सेल मधे तक्रार दाखल करेल भौतेक
उंदीर हिं आहे की मु याची
उंदीर हिं आहे की मु याची तज्ञाकडून चवकशी करुन घ्या. हिं असेल तर बिन्धास मारा कुण्णी काही बोलणार नाही. मु असेल तर त्याच्या मिन्नतवार्या करा, अबू असीम आझमी, ओवेसी यांची परवानगी घ्या. उंदराला स्वतंत्र राष्ट्र हवे आहे काय याचीही चवकशी करा. ते हवे असल्यास देऊन टाका. त्याला आरक्षण हवे असल्यास सरकारला पत्र धाडा.
किरणाण्णा लै टुकार विनोद
किरणाण्णा लै टुकार विनोद करताय
मायबोलीकर धन्य आहेत ...
मायबोलीकर धन्य आहेत ... सुरुवातच खतर्नाक केली आहे कमेंट्स ची ...
फक्त मानवाचेच देहदान चालते
फक्त मानवाचेच देहदान चालते प्राण्याचे बंद केले प्रयोगशाळे दान करणे
अजय
अजय
सावरकर , आधी नर का मादी ते
सावरकर ,
आधी नर का मादी ते शोधा मग पुढचा बार टाका
त्याने फरक पडत नाही हो
त्याने फरक पडत नाही हो
अजय
अजय
पण मारता तर आला पाहीजे धागा
पण मारता तर आला पाहीजे धागा कर्त्याला तोही प्रश्न आहे ना???
अजुन उंदीर बाहेर आला नाही
अजुन उंदीर बाहेर आला नाही ??????
.
.
.
.
.नक्कीच बिळात राहुन तुमचा धागा वाचत असणार तो
"सर्पा तुला अगस्ती मुनीची
"सर्पा तुला अगस्ती मुनीची शप्पथ!"
Pages