Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धामण पाळावी.. <<<<<<<<
धामण पाळावी..
<<<<<<<< हाहाहाहाहा......
रेनकोट व हेल्मेट?! अमेझिंग
रेनकोट व हेल्मेट?! अमेझिंग आहे हा बाफ! सुमेधाव्ही तुम्हाला उंदीर लवकरच सापडो!
पाठीला पोट चिकटलेल्या चारदोन
पाठीला पोट चिकटलेल्या चारदोन व्यक्ती आणाव्यात व उंदराला दाखवावे आणि सांगावे बघ तुझ्यामुळे काय झाले आहे आमचे ,करुणाकर असेल तर निघुन जाईल
कहर चाललाय उपायांचा, सरळ
कहर चाललाय उपायांचा,
सरळ झाडू घेवून धोपटून काढा ( नव-याला धोपटता तसे)
मी घरातले कितीही मोठे उंदीर
मी घरातले कितीही मोठे उंदीर एका चांगल्या थैलीत सहज पकडतो. >>>> चांगल्या थैलीत ....
श्री, सिमन्तिनी ...
अल्पना तू म्हणतीयेस तसंच माझ्या नणंदेकडे गेले असताना ती रोट्या करत होती तर ओट्यावर एक उंदीर पळापळ करायला लागला. ते दृष्य पाहून मी भोवळ येण्याच्या बेतात होते. नणंदेनं लाटणं तसंच पोळपाटावर ठेवलं आणी उंदराच्या दीशेनं दोन्-तीन टाळ्या वाजवल्या आणी तो गेला कि आहे हे पाहण्याची तसदीही न घेता पुन्हा रोट्या लाटायला सुरूवात केली. असला वीनोदी प्रकार पाहून मीही भोवळीचा बेत रहीत केला.
असला वीनोदी प्रकार पाहून मीही
असला वीनोदी प्रकार पाहून मीही भोवळीचा बेत रहीत केला>>>>>>>> भोवळ सोडुन हसुन हसुन लोळण घेतली नाही ना??
चांगल्या थैलीत .... >> मामी
चांगल्या थैलीत .... >> मामी चांगल्या याच साठी की भोके असलेल्या थैलीतुन तो सुटला तर पकडायल पुन्हा तो चान्स देत नाही. मग अधिक सावध होतो.
खरचं.. साप मधेच कौलातुन
खरचं.. साप मधेच कौलातुन जातात.. एकदातर आई घर झाडुन काढत होती तर एकजण आरामात उंदीरमामाच्या मागे मागे तुळीवरुन (आडवा पिलर) सळ्सळ्त गेला.. आम्ही नुसतेच बघतोय तर गायब
व्वा! काय उपाय सुचवलेत.. श्री, सिमन्तिनी
सर्पमित्र असतात तसे
सर्पमित्र असतात तसे उंदीरमित्र नाहीत का कोणी?
नसतील विचार करायला हवा, जाम पोटेन्शिअल आहे या धंद्यात.
तो हसून हसून मेला असेल
तो हसून हसून मेला असेल कधीच्>>.
ईईईईईईईईईईईईई मला चाफ्याचं
ईईईईईईईईईईईईई
मला चाफ्याचं स्किट आठवलं यावरून
हेच ते
http://www.maayboli.com/node/35016
मस्तच बाफ आहे हा. आता दिवस
मस्तच बाफ आहे हा. आता दिवस मजेत जाणार असं दिसतंय.
उंदीर मारायला एवढा मोठा बीबी
उंदीर मारायला एवढा मोठा बीबी होय. दिसला उंदीर की घ्यावा कुंचा आणि सापटवावा त्याला धरून. हा का ना का. घरामदेह अडगळ अजिबात असू नये, अडगळीत उंदीर गेला की काय बाहेर येत नाही घ्या.
घराम्धे प्लास्टिकचे डबे असल्यास सावधान. उंदीर प्लास्टिक कुरतडतो.. माझा टप्परवेअरचा डबा कुरतडला होत्या मेल्याने. हाणलाच धरून त्याला. दुसर्या दोघांनी वॉशिंग मशिनमधे संसार थाटला होता. त्यांनापण धाडला यमसदनाला.
सुमेधा, मी आता ही पोस्ट लिहितेय ना त्या खिडकीसमोर नाकतोडा बसलाय मस्तपणे.
नंदिनी, हेल्मेट आहे की नाही ?
नंदिनी, हेल्मेट आहे की नाही ?
सगळ्या पोस्टी वाचुन उंदरांना
सगळ्या पोस्टी वाचुन
उंदरांना रॅट किल नका टाकू त्यामुळे ते मरुन कुठल्यातरी फटीत वगैरे पडतात. आमच्या मागे बेड मध्ये मेला होता. वास आल्यानंतर कळल. स्टीक पॅडच चांगला. आणि ते पकडलेले उंदीर सोडून देउ नका त्यावर झुरळांचा स्प्रे वगैरे फवारलात तर मरतील किंवा प्लॅस्टीकच्या पिशवीत बांधून फेकून द्या. नाहीतर हेच उंदीर परत घरात घुसतात.
जैत रे जैत पिक्चर मध्ये एक सिन आहे. त्यात एक दिवस सगळे आदिवासी उंदीर पकडायच्या तयारीत असतात. तिथली एक व्यक्ती त्यांना विचारते की उंदीर कशाला पकडता तेंव्हा एक मुख्य आदीवासी म्हणतो भाजलेले उंदीर लय ग्वाड लागतात त्याच्या एक्स्प्रेशन्सवरच उंदराची चव दिसते.
>>>> करुणाकर असेल तर निघुन
>>>> करुणाकर असेल तर निघुन जाईल <<<
सातार्यात अस्तानाची आठवण आहे, गिते बिल्डिन्गमधे रहात होतो तिथे उंदिर होते, मग आयडिया केली, गव्हाचे पोते ठेवले होते त्याचे तोन्ड पूर्ण उघडले, अन मग मध्यात एक किलोचा डालडा तुपाचा रिकामा उभंटा प्लॅस्टिकचा डबा झाकण काढून खोवून ठेवला, अगदी कडेला शिगानशीग गहू असतील असे केले. रात्री दोन उंदीर बरोब्बर त्या रिकाम्या डब्यात येऊन अलगद अडकले.
मग झाकण लावुन तो डबा घेऊन उन्दिर सोडायच्या मोहिमेवर यत्ता बारावीतला मी अन माझा यत्ता आठवीतला मित्र पप्या मोहिते असे मिळून चारभिंतीवर गेलो, अगदी वर गेल्यावर तो डबा मोकळा केला अन उतारावरुन खाली पळणार्या उंदरांना पाहून काय झाले काय की, पण आमच्याही अंगात विरश्री संचारून त्या पळपुट्या उंदरांच्या मागे दगड घेऊन आम्हीही तस्सेच धावत दगड मारत सुटलो ते थेट तळच गाठला ! मग खाली आल्यावर आश्चर्य करीत बसलो की आपण न धडपडता बिना रस्त्याचे सरळसोट उंदरान्च्या मागे धावत कसे काय येऊ शकलो? आयुष्यात पुन्हा तसा प्रताप घडला नाही.
सगळ्या पोस्टी वाचुन
सगळ्या पोस्टी वाचुन पुरेवाट
मांजर बेस्ट उपाय आहे....
नंदिनी, हेल्मेट आहे की नाही ?
नंदिनी, हेल्मेट आहे की नाही ? <<< कशाला? नाकतोड्याला? मग मला घरात २४ तास हेल्मेट घालून फिरावे लागेल.
आमच्या अंगणात बेडूक, घुशी, चिमण्या, कावळे, खारोट्या, मांजरी हे सर्व पोटभाडेकरू म्हणून राहतात. नाकतोडे, खंड्या, भुंगे, गाईवासरू हे सर्व येऊन जाऊन असतात. मागच्याच आठवड्यात मण्यार येऊन गेली (गेली म्हणजे वरच गेली).
एकदा घरात कपडे वाळवायच्या
एकदा घरात कपडे वाळवायच्या दोरीवरुन उंदीर तुरुतुरु चालला होता. ते बघताच ती दोरी जोरात हलवली. मूषकराज पडले ते थेट खाली आई लादी पुसत होती, तिच्याजवळच्या अर्धवट पाण्याने भरलेल्या बादलीत.
पाण्यात पोहोत होते पण बाहेर पडायला जमेना, मग एक मोठे ताट आणले आणि त्याने बादली झाकून बाहेर जाऊन पाणी ओतले, पाण्याबरोबर उंदीरमामा पण पसार झाले.
नंदिनी,
मण्यार!! बापरे. विषारी आहे.
सांभाळून रहा.
मला 'कोसला' आठवले. पांडूरंग
मला 'कोसला' आठवले. पांडूरंग सांगवीकर दहावीचा अभ्यास करताना पोटमाळयावर उंदिर प़कडतो... तो प्रसंग आणि ते वर्णन... लैच भारी!!!
काठी, झाडु ने ठेचावा चांगला
काठी, झाडु ने ठेचावा चांगला ...!
अगोदर खुप इक्डुन तिकडे पळ-पळ कर्तो आणि थकतो .. तरी अजुन पळ्वावा..
मग झाडू ने २-४ रट्टे दिले की अर्धमेला होतो नन्तर चप्पल/ बूट/काठी/ हातोडी ने द्यावा दणका.
सेम, पाली साठी पण हाच उप्चार.. !
माझं घर आहे हे कुणी दुसरं का म्हणून घूसखोरी करणार?
घुशीची काळजी दम्यावर औषधी
घुशीची काळजी दम्यावर औषधी असते म्हणतात.
घुशीची काळजी >> जागू,
घुशीची काळजी
>>
जागू, आयुष्यात इतक्या समस्या आहेत, त्यात घुशीची "काळजी " कोण घेणार?
घुशीची काळजी दम्यावर औषधी
घुशीची काळजी दम्यावर औषधी असते म्हणतात. <<< जागू, म्हणजे काय? घुस घरात घुसली की त्या काळजीने दमा बरा होतो? की तुझ्या लिहिण्यात काही चूक झालीय?
ही "काळजी" म्हणजे "कलेजी"
ही "काळजी" म्हणजे "कलेजी" असावी बहुतेक!!
बरोबर ना जागुतै?
मायबोलीवरचे आयडी हल्ली
मायबोलीवरचे आयडी हल्ली एकमेकांच्या घरात उंदीर सोडून गुप्त बातम्या काढू लागलेत. सावधान. हा हेर असू शकतो.
खरच मी खुप जणांकडून ऐकलय की
खरच मी खुप जणांकडून ऐकलय की घुशीची काळजी उर्फ कलेजी दमा ह्या विकारावर गुणकारी असते. हा पण आता काहीजणांचा दमा घुस पाहूनही बरा होत असेल किंवा घुशीची काळजी खावी लागेल ह्या विचारानेच पळत असेल.
किरण उंदीर चोरणारा हेर असेल
किरण उंदीर चोरणारा हेर असेल का
रोबोही असू शकतो. लाईव्ह
रोबोही असू शकतो. लाईव्ह व्हिडीओ अपडेट जात असतील सोडणा-याकडे.
उंदीर मारुन टाकण्याऐवजी तो
उंदीर मारुन टाकण्याऐवजी तो एखाद्या कॉलेजला देता येऊ शकतो का?
बायोलॉजीसाठी डिसेक्शनसाठी घरात घुसलेल्या उंदराचा "देहदान" करता येते का?
Pages