घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?

Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22

कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाठीला पोट चिकटलेल्या चारदोन व्यक्ती आणाव्यात व उंदराला दाखवावे आणि सांगावे बघ तुझ्यामुळे काय झाले आहे आमचे Angry ,करुणाकर असेल तर निघुन जाईल Biggrin

मी घरातले कितीही मोठे उंदीर एका चांगल्या थैलीत सहज पकडतो. >>>> चांगल्या थैलीत .... Lol

श्री, सिमन्तिनी ... Lol

अल्पना तू म्हणतीयेस तसंच माझ्या नणंदेकडे गेले असताना ती रोट्या करत होती तर ओट्यावर एक उंदीर पळापळ करायला लागला. ते दृष्य पाहून मी भोवळ येण्याच्या बेतात होते. नणंदेनं लाटणं तसंच पोळपाटावर ठेवलं आणी उंदराच्या दीशेनं दोन्-तीन टाळ्या वाजवल्या आणी तो गेला कि आहे हे पाहण्याची तसदीही न घेता पुन्हा रोट्या लाटायला सुरूवात केली. असला वीनोदी प्रकार पाहून मीही भोवळीचा बेत रहीत केला. Happy

चांगल्या थैलीत .... >> मामी चांगल्या याच साठी की भोके असलेल्या थैलीतुन तो सुटला तर पकडायल पुन्हा तो चान्स देत नाही. मग अधिक सावध होतो.

खरचं.. साप मधेच कौलातुन जातात.. एकदातर आई घर झाडुन काढत होती तर एकजण आरामात उंदीरमामाच्या मागे मागे तुळीवरुन (आडवा पिलर) सळ्सळ्त गेला.. आम्ही नुसतेच बघतोय तर गायब
व्वा! काय उपाय सुचवलेत.. श्री, सिमन्तिनी Lol

सर्पमित्र असतात तसे उंदीरमित्र नाहीत का कोणी?

नसतील विचार करायला हवा, जाम पोटेन्शिअल आहे या धंद्यात. Biggrin

उंदीर मारायला एवढा मोठा बीबी होय. दिसला उंदीर की घ्यावा कुंचा आणि सापटवावा त्याला धरून. हा का ना का. घरामदेह अडगळ अजिबात असू नये, अडगळीत उंदीर गेला की काय बाहेर येत नाही घ्या.

घराम्धे प्लास्टिकचे डबे असल्यास सावधान. उंदीर प्लास्टिक कुरतडतो.. माझा टप्परवेअरचा डबा कुरतडला होत्या मेल्याने. हाणलाच धरून त्याला. दुसर्‍या दोघांनी वॉशिंग मशिनमधे संसार थाटला होता. त्यांनापण धाडला यमसदनाला.

सुमेधा, मी आता ही पोस्ट लिहितेय ना त्या खिडकीसमोर नाकतोडा बसलाय मस्तपणे.

सगळ्या पोस्टी वाचुन Lol

उंदरांना रॅट किल नका टाकू त्यामुळे ते मरुन कुठल्यातरी फटीत वगैरे पडतात. आमच्या मागे बेड मध्ये मेला होता. वास आल्यानंतर कळल. स्टीक पॅडच चांगला. आणि ते पकडलेले उंदीर सोडून देउ नका त्यावर झुरळांचा स्प्रे वगैरे फवारलात तर मरतील किंवा प्लॅस्टीकच्या पिशवीत बांधून फेकून द्या. नाहीतर हेच उंदीर परत घरात घुसतात.

जैत रे जैत पिक्चर मध्ये एक सिन आहे. त्यात एक दिवस सगळे आदिवासी उंदीर पकडायच्या तयारीत असतात. तिथली एक व्यक्ती त्यांना विचारते की उंदीर कशाला पकडता तेंव्हा एक मुख्य आदीवासी म्हणतो भाजलेले उंदीर लय ग्वाड लागतात Lol त्याच्या एक्स्प्रेशन्सवरच उंदराची चव दिसते.

Lol Lol Lol
>>>> करुणाकर असेल तर निघुन जाईल <<< Lol Lol Lol

सातार्‍यात अस्तानाची आठवण आहे, गिते बिल्डिन्गमधे रहात होतो तिथे उंदिर होते, मग आयडिया केली, गव्हाचे पोते ठेवले होते त्याचे तोन्ड पूर्ण उघडले, अन मग मध्यात एक किलोचा डालडा तुपाचा रिकामा उभंटा प्लॅस्टिकचा डबा झाकण काढून खोवून ठेवला, अगदी कडेला शिगानशीग गहू असतील असे केले. रात्री दोन उंदीर बरोब्बर त्या रिकाम्या डब्यात येऊन अलगद अडकले.
मग झाकण लावुन तो डबा घेऊन उन्दिर सोडायच्या मोहिमेवर यत्ता बारावीतला मी अन माझा यत्ता आठवीतला मित्र पप्या मोहिते असे मिळून चारभिंतीवर गेलो, अगदी वर गेल्यावर तो डबा मोकळा केला अन उतारावरुन खाली पळणार्‍या उंदरांना पाहून काय झाले काय की, पण आमच्याही अंगात विरश्री संचारून त्या पळपुट्या उंदरांच्या मागे दगड घेऊन आम्हीही तस्सेच धावत दगड मारत सुटलो ते थेट तळच गाठला ! मग खाली आल्यावर आश्चर्य करीत बसलो की आपण न धडपडता बिना रस्त्याचे सरळसोट उंदरान्च्या मागे धावत कसे काय येऊ शकलो? आयुष्यात पुन्हा तसा प्रताप घडला नाही.

नंदिनी, हेल्मेट आहे की नाही ? <<< कशाला? नाकतोड्याला? मग मला घरात २४ तास हेल्मेट घालून फिरावे लागेल.

आमच्या अंगणात बेडूक, घुशी, चिमण्या, कावळे, खारोट्या, मांजरी हे सर्व पोटभाडेकरू म्हणून राहतात. नाकतोडे, खंड्या, भुंगे, गाईवासरू हे सर्व येऊन जाऊन असतात. मागच्याच आठवड्यात मण्यार येऊन गेली (गेली म्हणजे वरच गेली).

एकदा घरात कपडे वाळवायच्या दोरीवरुन उंदीर तुरुतुरु चालला होता. ते बघताच ती दोरी जोरात हलवली. मूषकराज पडले ते थेट खाली आई लादी पुसत होती, तिच्याजवळच्या अर्धवट पाण्याने भरलेल्या बादलीत.
पाण्यात पोहोत होते पण बाहेर पडायला जमेना, मग एक मोठे ताट आणले आणि त्याने बादली झाकून बाहेर जाऊन पाणी ओतले, पाण्याबरोबर उंदीरमामा पण पसार झाले. Happy

नंदिनी,
मण्यार!! बापरे. विषारी आहे.
सांभाळून रहा.

मला 'कोसला' आठवले. पांडूरंग सांगवीकर दहावीचा अभ्यास करताना पोटमाळयावर उंदिर प़कडतो... तो प्रसंग आणि ते वर्णन... लैच भारी!!!

काठी, झाडु ने ठेचावा चांगला ...!
अगोदर खुप इक्डुन तिकडे पळ-पळ कर्तो आणि थकतो .. तरी अजुन पळ्वावा..
मग झाडू ने २-४ रट्टे दिले की अर्धमेला होतो नन्तर चप्पल/ बूट/काठी/ हातोडी ने द्यावा दणका.
सेम, पाली साठी पण हाच उप्चार.. !
माझं घर आहे हे कुणी दुसरं का म्हणून घूसखोरी करणार?

घुशीची काळजी
>>
जागू, आयुष्यात इतक्या समस्या आहेत, त्यात घुशीची "काळजी " कोण घेणार? Biggrin

घुशीची काळजी दम्यावर औषधी असते म्हणतात. <<< जागू, म्हणजे काय? घुस घरात घुसली की त्या काळजीने दमा बरा होतो? की तुझ्या लिहिण्यात काही चूक झालीय?

मायबोलीवरचे आयडी हल्ली एकमेकांच्या घरात उंदीर सोडून गुप्त बातम्या काढू लागलेत. सावधान. हा हेर असू शकतो.

खरच मी खुप जणांकडून ऐकलय की घुशीची काळजी उर्फ कलेजी दमा ह्या विकारावर गुणकारी असते. हा पण आता काहीजणांचा दमा घुस पाहूनही बरा होत असेल किंवा घुशीची काळजी खावी लागेल ह्या विचारानेच पळत असेल.

उंदीर मारुन टाकण्याऐवजी तो एखाद्या कॉलेजला देता येऊ शकतो का?
बायोलॉजीसाठी डिसेक्शनसाठी घरात घुसलेल्या उंदराचा "देहदान" करता येते का?

Pages