माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.
१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.
आठवली की लिहितो
यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.
एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.
तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?
अभिषेक, दक्षिणोत्तर दिशा
अभिषेक, दक्षिणोत्तर दिशा पाहून दक्षिणेकडे डोके करुन वा पूर्वेकडे डोके करुन झोपून बघा. झोपताना, गेल्या दिवसाबद्दल देवाचे आभार मानून झोपेत असताना माझे रक्षण करशीलच अशी भाकणूक मनातल्या मनात करुन झोपा. शक्यतो झोपायचे आधी थोडा वेळ शुभ स्तोत्रे म्हणत निरांजनावर त्राटक केल्यास खूपच फरक पडतो. हे शक्य नसल्यास झोपायचे आधी पूर्वी परवाचा म्हणायचे त्यात स्तोत्रे वगैरे असतच, हल्ली काहीच नसते, अस्तो तो टीव्ही अन त्यावरील भिकार कौटुम्बिक संघर्षाच्या /प्रेमाच्या त्रिकोण/चौकोन/पन्चकोनाच्या वगैरे! तर मुद्दा असा की पाठ टेकवायच्या आधी श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणा, म्हणता येत नसेल तर एम्पीथ्री ऐका.
अधिक काळजी म्हणून अमावास्या पोर्णिमेनंतर घरभर गोमूत्र शिंपडत जा. वाईट स्वप्ने येणे बंद होईल.
धनंजय, ताबडतोबीने रोज दूपारी बारा ते एकच्या दरम्यान काकबली काढून ठेवायला सुरुवात करा. जे काय अन्न शिजवले असेल त्यातला अगदी थोडा हिस्सा तळव्या येवढ्या पानावर/कागदाव/डीशवर काढून सोबत पाण्याची छोटी वाटी/गडू असे काही घेऊन गच्चीवर वा घराबाहेर उघड्यावर ठेवावे व नमस्कार करावा. सहसा दहीभात ठेवायची प्रथा आहे, पण रोजच दहीभात उपलब्ध असू शकेलच अएस नाही तेव्हा भाकर/पोळीचा तुकडा/ ठिपकाभर भाजी/आमटी असे जे काय असेल ते ठेवणे चालू करा.
मला काल २ दा पडलेले स्वप्न
मला काल २ दा पडलेले स्वप्न >>> मी आनि माझा भाऊ समुद्र पार करत आहोत.. म्हणजे आम्हाला पलीकडचा काठ दिसतोय.. आम्ही चालत चालत मध्यावर जातो.. तर माझा भाऊ मला मागे खेचतो....अन म्हणतो.. खुप जोरात आवाज येतो आहे बघ..त्या तेवढ्या पाण्यातुन एक ट्रेन निघुन जाते.. आमच्या समोरुन.. आनि मग आम्ही पलिकडे जातो.. आणि शॉपींग करतो..
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अंकु, अजुनही सारख कार्टुन
अंकु, अजुनही सारख कार्टुन च्यानेल बघत अस्तोस वाट्टे!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मग काय लिंबुकाका... कार्टुन
मग काय लिंबुकाका... कार्टुन पाहायच , हसायच अनै सोडुन द्यायच... चांगली स्व्प्न पडतात मग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तुम्ही मात्र पार्शिलीटी करता.. माझी एक मागची पोस्ट वाचली असती तर ...मला पण लगेच एक सल्ला अपेक्षीत होता/ दिला असता .. ..
मला तर वाटतय मला पडलेली
मला तर वाटतय मला पडलेली स्वप्न असा एक बाफ काढावा..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझी जवळपास सगळीच स्वप्न हहपुवा असतात
नुकतेच पडलेले स्वप्न मी एका
नुकतेच पडलेले स्वप्न
मी एका खुर्चोवर बसलेय आणि खालनं पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहत आहेत. खुप भिती वाटतेय वाहून जाण्याची. असे काहीतरी.
बहुतेक सध्याच्या नॉनस्टॉप पाऊसपाण्याचा परिणाम.
दोन दरवाज्यांच्या मधे , किंवा
दोन दरवाज्यांच्या मधे , किंवा दरवाज्यासमोर झोपला कि स्वप्ने जास्त पडतात ...
मला कुठेही झोपलं तरी स्वप्न
मला कुठेही झोपलं तरी स्वप्न पडतातच![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कालच स्वप्न पडलं की मी आणि माझे कलिग सिंहगडावर फिरायला गेलोय.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तिथे माझ्या कॉलेजातला एक कॉलेजमेट आला आणि मला म्हणाला तू आम्हाला धोका दिलायेस
म्हणून मी तुला मारून टाकणार.
मी विचारलं, 'काय धोका दिला सांग तरी'
तर तो म्हणे तू एकटीने सगळी कलिंगडं खाल्लीस... त्यावर मी म्हणाले मी पोलीसांना बोलवेन.... आणि अचानक सगळीकडून पोलीस बाहेर आले आणि मला कलिंगड मागायला लागले
एक पोलीस म्हणाला तू आम्हाला कलिंगड दिलं नाहीस तर आम्ही तुझ्यावर ड्रग्स सप्लाय करणार्या टोळीतील आहेस असा आरोप करून खटला भरू :अओ?:
मग तिथे माबोकर सारिका आली ( जिला मी कधी भेटलेही नाहीये
) आणि म्हणाली आमच्या यवलमाळेतला पाऊस घेऊन जा आणि रियाला कलिंगड खाऊ द्या ![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मग ते पोलीस गायला लागले "ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी'... मग कळालं माझा अलार्म वाजतोय मोबाईलचा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझ्या स्वप्नात कालच विमान
माझ्या स्वप्नात कालच विमान पडलं.....च्यायला काय गौड्बंगाल असेल हे विमान पडण्याचं......खूप लोकान्ना पडलेलं वाचलय!!!
...........ताप च्या मारी!! ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
नाना, तुम्ही 'बडे अच्छे लगते
नाना, तुम्ही 'बडे अच्छे लगते है' पहाता का?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
त्यात विमान पडलय ते आलं असेल स्वप्नत
रि, स्वप्न कैच्या कै
रि, स्वप्न कैच्या कै कवितेसारखं आहे..
अंकु, तुझी कोणची पोस्ट? कुठे?
अंकु, तुझी कोणची पोस्ट? कुठे? लिन्क दे
मी काल स्वप्नात एका छान
मी काल स्वप्नात एका छान छोट्या लहान मुलीला बोलावत होतो. तर खूप लोक म्नाझ्यावर ओरडत होते... ही तुमची मुलगी नाही म्हणून. . आणि मी रडत होतो.
लिंबुकाका ह्याच धाग्यावर पान
लिंबुकाका ह्याच धाग्यावर पान नं ३ वर आहे पहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग तिथे माबोकर सारिका आली (
मग तिथे माबोकर सारिका आली ( जिला मी कधी भेटलेही नाहीये ) आणि म्हणाली आमच्या यवलमाळेतला पाऊस घेऊन जा आणि रियाला कलिंगड खाऊ द्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>
बघ रिया मला तुझी कित्ती काळजी आहे ते!!
सारे तर काय तुमाखमै
सारे तर काय
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुमाखमै
अंकू, त्या पोस्ट मधे
अंकू, त्या पोस्ट मधे प्रॉब्लेम असा तर काहीच विचारला नाहीये, मग सल्ला कशाबद्दल देऊ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
ओके.. मी इ-मेल करते तुम्हांला
ओके.. मी इ-मेल करते तुम्हांला मग नंतर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला
शाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला उशीर झाला .. अभ्यासच करायचा राहिला..ई<<< मला ह्यातच अजुन जास्त डिटेल मधे पडते. पेपर आहे हेच माहीत नाहीये, अभ्यास वेगळ्याच विषयाचा केला गेलाय, हाईट म्हणजे सेमीसटरला विषय होता हेच माहीत नसत. आता शिक्षण संपल्यावर खुप अभ्यास करायचा राहुन गेला असच वाटतय.
>>>>> सेम पिंच.... त्यात भर म्हनजे वर्षभर एकही प्रॅक्टीकल अटेंड नाही केल आणि उद्या फायनल प्रॅक्टईकल आहे. किंवा एखाद्या विषयाच पुस्तक घेतलच नाही हे पेपरच्या आदल्या दिवशी आठवणं
रिया.. काय स्वप्न आहे गं ..
रिया.. काय स्वप्न आहे गं ..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नेहमी असं स्वप्न पड्तं की मी जिना उतरत आहे नि एक स्टेप चुकली म्हणुन पाय झट्कते .. मग दचकुन जाग येते तेव्हा पण पाय उचललेला असतो
चनस.......नवर्याला तर पडत
चनस.......नवर्याला तर पडत नाही ना "एखादी"!!!! आणि परत वर ""अहो..मला नं स्वप्नं...वगैरे वगैरे...
...स्वानुभव नाही पण भविष्यात झालं तर सांगता येत नाही हो!!
चनस रोज असलीच स्वप्न पडतात
चनस![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रोज असलीच स्वप्न पडतात मला
आजचं स्वप्न :
माझ्या ऑफिसमध्ये पुर्ण जमिनीवर पांढरा कार्डशीट पेपर अंथरलाय आणि त्यावर मी डोनाल्ड डकचे चित्र काढतेय (खुप सारे मल्टीपल चित्र) आणि प्रिती पण आलीये चित्र काढायला पण अट अशी आहे की डोनाल्ड डकच्या आवाजात बोलत बोलत चित्र काढायची.... मध्येच मी चुकुन अमिताभच्या आवाजात बोलले....![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
( ते जायकवाडी धरण आहे हे मला तिथल्या पाटी वरून कळालं)![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मग मला वाईट वाटलं ... आम्ही हरलो म्हणून मी रडायला लागले .... रडता रडता पळत पळत खडकवासलाच्या दिशेने निघाले. प्रिती पण माझ्या मागे पळत पळत आली आणि एकदम संध्याकाळ झाली.
मग आम्ही बस मधून जात होतोत.. तरे सगळे ओळखीचे लोकं दिसत होते ज्यांना मी आठवतच नव्हते
मग आम्ही जायकवाडी धरणावर पोहचलोत
तिथे आम्ही एका जीम मध्ये गेलोत जिथे ऑलरेडी एक फॅमेली रहात होती
त्यांनी प्रितीचे नवे कपडे चोरले आणि मग मला राग आला आणि मी त्यांना दोन फाईट ठेऊन दिल्या आणि मग ते ढगात गेले उडून आणि मग रडायला लागले आणि पाऊस पडायला लागला...
म्हणून आई म्हणायला लागली, ' मी निघाले शाळेत.... ७ वाजले.... उठायचं नाहीये का तुला? पाऊस पडतोय' आणि मी जागी झाले तेंव्हा आई खरचं असं म्हणत होती
बर बाय द वे, एखाद्याला वाटत असेल की मी ही असली स्वप्न इथे टाकू नयेत... टाईमपास होतोय तर सांगा हां!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला काय रोजचं असली वेडी स्वप्न पडतात
रीये मस्त स्वप्न आहे
रीये
मस्त स्वप्न आहे
रिया
रिया![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
रिया, काय भन्नाट स्वप्न आहेत
रिया,![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
काय भन्नाट स्वप्न आहेत ही!!
काल पुन्हा नेहमीचं स्वप्न
काल पुन्हा नेहमीचं स्वप्न पडलं - पायरी उतरताना एक पायरी सोडुन मी खाली पडतोय आणि प्रत्यक्षात झोपेत माझा पाय झटकला आणि मला जाग आली.
मला पडणारी स्वप्न नंतर
मला पडणारी स्वप्न नंतर प्रत्यक्षात घडतात, आणि बऱ्याच वेळा मला हिंटस मिळतात की आता अस घडणार आहे.
रिया तुमची स्वप्नं म्हणजे
रिया तुमची स्वप्नं म्हणजे ....:हाहा: ,मला वाटलं मलाच अशी विचित्र स्वप्नं पडतात.
मगरपट्ट्यातील ऑफिस मधून एकदम खडकवासल्याला फिरायला, ऑफिस मधल्या लोकांबरोबर. ऑफिस सुटायची वेळ झाल्यावर,तिथून, म्हणजे खडकवासल्यापासून माझं घर जवळ असून मी परत मगरपट्ट्यात व कंपनी कॅबने घरी येते...!!
चैत्राली तुमची नाही,
चैत्राली
तुमची नाही, तुझी....
आहो जाहो नको ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने मला नेहमी पडणार एक स्वप्न म्हणजे.....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी ऑफिसला निघालेय....
माझ्या ऑफिसकडे जाण्याची वाट अतिशय बिकट आहे.... खुप सारे चढ, अवघड वळण आहेत
तरी मी कशी बशी कष्टाने आणी नेटाने ऑफिसला एकदाची पोहचते....
आणि मागे वळून पहाते तर समोरच माझ्या सोसायटीचं मागचं गेट असतं जिथे आई उभं राहून मला डब्बा, आयकार्ड किंवा असच काही तरी विसरलय असं सांगत आणून देते.....
इथून पुढे कथेचा क्लायमॅक्स नेहमीच वेगळाच असतो
यामागे कारण काय असेल?
कधी कधी वाटतं माझीपुढची कंपनी अशीच घराच्या जवळ असणारेय.
कधी कधी वाटत हा एक सुप्त संदेश आहे की जी गोष्ट मिळवण्यासाठी मी इतके कष्ट करतेय ती अगदी माझ्याजवळ आहे पण माझ्या नजरेतून सुटतेय....
अस काही असेल का माहीत नाही... पण इतर स्वप्नांसारखं या गोष्टीला सोडून द्यावसं वाटत नाही कारण हे नेहमीच स्वप्नात येत...
कोणी काही सांगू शकेल का?
काल पडलेले
काल पडलेले स्वप्नः
गणेशचतुर्थीचा दिवस आणि आम्ही गणपती आणायला गेलो तर मूर्तीवाले म्हणतायत की सगळ्या मुर्त्या संपल्या. आम्ही जिकडेतिकडे शोधतोय तर सगळीकडे मुर्त्या संपलेल्या.
मग घरी येऊन मातीची मुर्ती स्वतःच केली आणि स्वतःच पूजा केली.
जाग आल्यावर लक्षात आले की यावर्षी मुर्ती बुक नाही केलीय. आज संध्याकाळी जाऊन बूक करीन.
Pages