माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग २

Submitted by केदार on 1 August, 2013 - 01:39

For some the destination matters more than the journey and for me the journey mattered more than the destination.

लेह ला जायचे अनेक मुख्य दोन मार्ग. एक विमान मार्ग. दिल्ली वा श्रीनगर वरून विमान सेवा उपलब्ध आहे. व दुसरा म्हणजे रोड. रोड मध्येही लेहला दोन मार्गांनी जाता येते. एक श्रीनगर-कारगील-लेह ( ४१६ किमी) किंवा दुसरा मनाली-लेह ( ४७४ किमी). दोन्ही रस्त्यांना जे कव्हर करतात त्यांना आपण फूल सर्किट ( पन इंटेडेड) कव्हर करणारे लो़कं म्ह्णू. द फुल सर्किट म्हणजे एकतर श्रीनगर-लेह-मनाली उलटे म्हणजे मनाली-लेह-श्रीनगर.

जी लोकं लेहला विमानाने पोचतात त्यांनी पहिले दोन एक दिवस काहीही न करता तिथे (हॉटेलमध्येच किंवा बेडच्या जवळ) राहणे अपेक्षित आहे कारण तिथे असलेला ( वा नसलेला) ऑक्सिजन. विरळ ऑक्सिजन मुळे माणसाला AMS येऊ शकतो व त्याचे परिवर्तन HAPE, HACE मध्ये होऊन माणूस दगावू शकतो. म्हणून निदान दोन दिवस तिथे राहणे व नंतरच पुढे आणखी उंच ठिकाणी जाणे अपेक्षित आहे. जी लोकं आपल्या वाहनाने ( वा टॅक्सीने, बसने) श्रीनगर किंवा मनालीला येतात ती अ‍ॅक्लमटाईज आपोआप होतात. त्यातल्या त्यात श्रीनगर मार्ग अक्लमटाझेशनसाठी सोपा. ज्यात माणूस हळू हळू वर जातो. श्रीनगर ५००० फुट, सोनामर्ग ९००० फुट इत्यादी इत्यादी. ह्या रूट वर तुम्ही कारगील किंवा द्रास येथे रात्री राहणे अपेक्षित. बरेच लोकं १२ तासात श्रीनगर - लेह करतात पण हेस्ट इज वेस्ट. ते पण माउंटेन्स मध्ये जीथे माणसाची वस्ती अनेक मैल्स नाही, सिव्हिलायझेशन नाही, तिथे अशी घाई करण्यापेक्षा बेटर लेट देन नेव्हर.

मनाली - लेह मध्ये अनेक हाय माउंटेन पासेस अगदी दुसर्‍याच दिवशी लागतात. ( बारलाचाला, लालचुंगला, टांगलांगला वगैरे) त्यामुळे काही जण हा रुट तीन दिवसात करतात. मनाली - केलाँग - पँग - लेह असा. ह्या बद्दल मी परत त्या त्या दिवसात जास्त लिहीन.

लेह मध्ये ड्रायव्हिंग करणे हा एक वेगळा / अनोखा आणि क्वचित जीवघेणा अनुभव देखील असू शकतो. आपण जो पर्यंत पहिला 'ला" ( ला म्हणजे पास - खिंडीतून पास) करत नाहीत तो पर्यंत ड्रायव्हरला देखील स्वतः वर विश्वास ठेवता येत नाही. ९० टक्के टर्न अचानक येतात आणि केवळ एक गाडी जाईल असा रस्ता असतो त्यामुळे मध्येच चढावर असताना रिव्हर्स घेणे असे प्रकारही करावे लागतात आणि बरेचदा लो ऑक्सिजन मुळे गाड्यांना देखील ( हो Happy त्रास होतो आणि गाड्या पिकप घेत नाहीत व अडकून बसतात किंवा मागे येतात. ( पॉवर लॉस)

बरेचदा रोडवर आपण एकटेच असतो. ( अक्षरक्षः मैलोनमैल कोणीही दुसरे नसते, सेल नेटवर्क नाही) त्यामुळे जर गाडीला काही झाले तर लिटरली you are on your own! दुसरी एखादी गाडी दिसे पर्यंत बरेचदा काही तास मध्ये निघून जातात. नो सिव्हिलायझेशन, नो सेल नेटवर्क, तुम और तुम्हारी तनहाई.

माझे लेह सर्किट किमी - एकुण १७०० किमीचे झाले. ह्यात मी जम्मू ते श्रीनगर आणि नंतर मनाली ते किरतपुर ( हे सर्व देखील हिमायलन ड्रायव्हिंग आहे) धरलेले नाही. हे केवळ सर्किट ड्राईव्ह. Happy

The Full Circuit.JPG

आमचे प्लान अनेकदा बदलले कारण सर्व व्हेकेशनच ऑन द फ्लाय होते. अगदी पहिल्या प्लान मध्ये मी श्रीनगर -कारगील- लेह - नुब्रा व्हॅली - तुरतुक ( पाक बॉर्डर) - वारीला - अगम - पँगगाँग त्सो - मान - मेरेक - चुसूल (चायना बॉर्डर) - सागा ला - हानले (जिथे हबलचे भारतीय व्हर्जन आहे ती जागा) - त्सो मोरिरी मग सर्चू आणि मनाली असे एकुण २००० किमी करणार होतो. पण आम्ही पटनीटॉप आणि श्रीनगरला काही दिवस जास्तीचे घेतल्यामुळे मला दोन एक दिवस कमी पडत होते त्यामुळे हानले कॅन्सल केले आणि वारीला राऊट हा अत्यंत भयानक अवस्थेत असल्यामुळे मी वारी ला ऐवजी परत लेहला येऊन मग पँगाँगला गेलो. हे सर्व मी त्या त्या दिवशीच्या लेखात कसे जायचे, कुठे राहायचे ह्या सोबत लिहीन.

लेह मध्ये एकाच वेळेस तुम्हाला दिवसा गर्मी व रात्री थंडी अनुभवायला मिळेल. त्यामुळे सनस्क्रिन लोशन, UV प्रोटेक्शन गॉगल आणि एखाद स्वेटर असणे आवश्यक आहे. लेहबद्दलची माहिती अनेक वेबसाईटसवर मिळेल. (तेथील संस्कृती, हवामान इत्यादी इत्यादी) त्यामुळे त्यावर वेळ न घालता मी जास्त वेळ रूट्स आणि काय व कसे पाहायचे ह्यावर देईन.

खुद्द लेह मध्ये पाहण्यासारखे फार फार तर एका दिवसाचे आहे. लेह पासून १५० ते २५० किमीच्या अंतरावर सर्व ठिकाणं आहेत. त्यामुळे लेह ला जाणे म्हणजे बेस कॅम्पला जाणे व तिथून पुढे प्रत्येक दिवसाची ( किंवा दोन दिवसाची) स्वतंत्र ट्रीप असे काहीसे आहे. लेह पासून बहुतेक ठिकाणी जायला इनर लाईन परमिट लागते. हे इनर लाइन परमिट दोन कारणांकरता दिले जाते.
१. तुम्ही नेमके कुठे कुठे जाता ह्याची नोंद आपोआप होते. लेह भाग हा अतिशय दुर्गम आणि हाय माउंटेन पासेसचा आहे. जिथे ऑक्सिजन विरळ असतो त्याने आणि क्वचित चुकीच्या ड्रायव्हिंगने अनेक अ‍ॅक्सिडेंटस होतात. तर तुम्ही नेमके त्या पाँईटपासून पास झाला असाल तर आणि तुमची गाडी दरीत वगैरे कोसळली असेल तर ट्रॅक करायला सोपे पडते.
२.हा भाग खूप संवेदनशील आहे व दोन देशांच्या सीमेवर आहे. (चीन, पाक) त्यामुळे इथे अनेक ठिकाणी असे पासेस, ब्रिजेस आहेत की ते मिल्टी साठी खूपच महत्वाचे आहेत. तिथे कोण कोण जात आहे ह्याची नोंद ठेवण्यासाठी. मला चुसूल ( चीन बॉर्डर) चे परमिट मिळाले नाही. चुसुलला १९६२ साली युद्ध झाले होते. मेजर शैतान सिंगांमुळे चुसूल आजही भारतात आहे. पण मी तिथून केवळ ३० किमीवर गेलो होतो. Happy

लेहचे अनेक सर्किट आहेत त्यातील सर्वात फेमस टूरिस्टी सर्किट म्हणजे लेह - खार्दूंगला ( सो कॉल्ड हायस्ट मोटारेबल रोड, 5,602 m (18,379 ft) ) - नुब्रा व्हॅली आणि पँगाँग त्सो. ( ३ इडियट लेक). मेजॉरिटी लोकं एवढेच करतात आणि वापस जातात. पण लेह मधील त्सो मोरिरी, चुगथांग डेझर्ट हे जास्त पाहण्यासारख्या आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. ह्या सर्वांना इनर लाईन परमिट लागते तर लेह मधीलच सुंदर अश्या झंस्कार व्हॅलीला परमिट लागत नाही. झंस्कार व्हॅलीला जायला खरे तर लेहला जायची पण आवश्यकता नाही. कारगील पासूनच इकडे जाता येते. मी वेळेअभावी झंस्कार व्हॅलीत गेलो नाही. कारण मग अजून ५ दिवस जास्तीचे लागले असते. पण तुम्हाला जर त्सो मोरिरी, नुब्रा व्हॅली, पँगाँग त्सो, खार्दूंगला, चुसुल, हानले अश्या ठिकाणी जायचे असेल तर परमीट घ्यावे लागते व ते लेहच्या डि सी ऑफिस मधून थोडे शुल्क व आयडेंटिटी फोटोकॉपी दिली की मिळते. ही कॉपी मिळाली की त्याच्या ८-१० कॉपीज काढून घ्याव्यात कारण प्रत्येक पोस्टला एकेक कॉपी द्यावी लागते.

४ जुलैच्या दिवशी आम्ही निघालो. पहिला मुक्काम मनात उदयपूर ( ९०० किमी) ठेवला होता. उदयपुरला आम्ही अनेक स्टॉप घेत संध्याकाळी ७ वाजता पोचलो. उदयपूरला जायला दोन रस्ते आहेत. एक पुणे - वडोदरा - अहमदाबाद - उदयपूर तर दुसरा पुणे- धुळे - इंदोर (जवळून) - उदयपूर असा आहे. पैकी आम्ही गुजराथ मधील रस्ता निवडला. ( दोन प्रलोभन - एक जेवण, दुसरे खुद्द रस्ता) रस्ता फारच चांगला होता. डहाणू जवळ मस्तपैकी नाश्स्ता केला तेंव्हा केवळ ८:२० वाजले होते. ठाण्याला मी केवळ २:१५ तासात पोचलो आणि पुढे दिड तासात ते ही त्या भयंकर ट्रॅफीक मधून डहाणूला काही त्रास न होता आलो तेंव्हा उदयपूर सोडून पुढे जाऊ असेही मनात आले होते. मग मध्येच कुठेतरी चहा, मग मस्तपैकी काठियावाडी जेवण असे करत करत आम्ही उदयपूरला आलो. NH8 हा अतिशय सुंदर रस्ता आहे. मस्ट टू ड्राईव्ह. उदयपूर मध्ये आम्हाला रेल्वेस्टेशन जवळ एक AC रुम केवळ १४०० रूंना मिळाली. एकदम स्वच्छ व चांगली. तिथे साधारण १००० ते १५०० रू मध्ये चांगली हॉटेल्स मिळतात. मग जेवायला आम्ही मस्त पैकी एका राजस्थानी थाळी हॉटेलात जाऊन खादाडी केली. ओव्हरऑल अन इव्हेंटफुल डे. वेट ए मिनिट. एक इंव्हेट होता. भरूच चा टोल नाका! इथे च्यायला कोणत्याही क्षणी १८९० ट्रक उभ्या असतात. तुमची वाट लागते ह्या टोल नाक्यावर. आमचीही अर्थात लागली. दिड तास गेला. मग उलट्या रस्त्याने जाऊन पटकन १० मिनिटात पोचलो (त्यांनीच उलट्या रस्त्याने सोडले). अशा तर्‍हेने टोल इव्हेंट होऊन हा दिवस संपला. प्रवासाचा एक मोठा टप्पा पार. पूर्ण दिवस मुसळधार पावसाची मात्र न चुकता सोबत होती. पण गुजराथ मधील रस्ते खरच चांगले आहेत. तुलनेने (महाराष्ट्राच्या) रस्त्यावरचे ड्रेनेज चांगले असल्यामुळे पाणी रस्त्यावर थांबत नाही. ह्या पावसातही आम्ही १२० च्या अ‍ॅव्हरेज स्पीडने जात होतो

Udaipur_route.JPGNh8.jpg

५ जुलैच्या दिवशी सकाळी निघू असा विचार करूनही साधारण ९ वाजले. Happy पॅकिंग करून खाली आलो तर गाडीच सुरू होईना. सेल्फ स्टार्ट तर घेत होती पण पुढे पूर्ण सुरू होत नव्हती. आली का पंचाईत. तिथे एक ड्रायव्हर होता. तो म्हणाला की एअर आयगा रहेगा. झालं मग बॉनेट उघडून एअर आली असेल ती काढण्याचा प्रयत्न केला. एअर येणे म्हणजे डिझेल भरताना कचरा येणे किंवा एखाद बबल निर्माण होणे. ते काढण्यासाठी डिझेल फिल्टर वर एक छोटेस पंप टाईप बसवलेले असते ते चार पाचदा (किंवा १०-१२दा) दाबायचे. ते केले. तरी नाही! पण सेल्फ घेत होती. मग सर्व अ‍ॅडिशनल पॉवर घेणारे जसे AC, फॅन, कार टेप इत्यादी सर्व बंद केले आणि एक मिनिट वाट पाहून परत सुरू केली, तर काय कमाल. गाडीचे इंजिन फुरफुरू लागले. जय हो ! ह्या गडबडीत २० मिनिटे गेली आणि गाडी सुरू झाल्याच्या आनंदात नाश्ता न करता आम्ही पुढे निघालो.

उदयपूर होऊन परत दोन रस्ते जम्मू कडे जातात. एक दिल्ली मार्गे तर दुसरा हनुमानगड मार्गे. हा हनुमानगड मार्ग रोड घेण्याचे आधीच ठरवले होते कारण दिल्लीची भयानक ट्रॅफिक! येताना मी यमुना घ्यायच्या नादात हा वेडेपणा केला. ते भोग नंतर देतोच. तर हा मार्ग किशनगड पासून सुरू होतो तो पर्यंत कॉमन रस्ता NH79 मग हनुमानगड वाला "मेगा हायवे". नाव तर मेगा पण लाईन एकच. तरीही ते ४११ किमी आम्ही ४ तासात पार केले त्यामुळे आता मी ही हाच रस्ता रिकमंड करेन. मग आम्ही पुढे बटिंडा पर्यंत मजल मारली. एकूण ८२६ किमी. पण लेट स्टार्ट असूनही ७ वाजता बटिंडा, पंजाबला पोचलो. पंजाब, राजस्थान, चंडीगड इथे तपमान प्रचंड वगैरे होते. प्रचंड उकाडा अन घामाच्या धारा. बटिंडाला तर हॉटेल मालक म्हणाला की ४७ आहे !!! इथेही १२०० रु मध्ये मस्त AC डिलक्स रूम बस स्टॅन्डच्या बाजूला मिळाली.

bhatinda.JPG

आजचा इव्हेंट म्हणजे एक तर गाडी सुरू झाली नाही, अन दुसरा म्हणजे माझ्या गाडीत टायरोट्रॉनिक्स आहे. त्यातील एक सेन्सर दुपार नंतर बिघडला टायर अचूक प्रेशर असूनही 'एरर' आहे असे गाडीचे कॉम्पबाबा सांगू लागलो. मला वाटले पंक्चर असेल तर मी थांबलो. तेथील कार्यकर्ता म्हणाला, टायर पंचर है तो आपकोही उतारना होगा' मी म्हणले अबे साले मै क्युं उतारूंगा? तर नही सब अपनेआपही (स्वतःच) उतराते है असे म्ह्णाला, मी दुसरी कडे गेलो, तिथेही तेच. तिसरीकडे तिथेही तेच. मग प्रेशर पाहिले तर बरोबर. मग म्हणलं गाडीच्या कॉम्पला बसवू धाब्यावर अन तशीच सुसाट नेऊ. तसेही पंक्चर किट आणि एअर कॉम्प्रेसर माझ्याकडे होताच. काही झाले नाही.

एक नियर डेथ अनुभव मात्र हे सनसेटचे खालचे फोटो काढले त्याजवळ आला. त्या वाळवंटातील मेगा हायवे वरून मी १२० नी क्रुझ करत असतानाच एक अनडिसायडेड अल्टो ड्रायव्हर उजवीकडील टर्नवर वळू की नको, वळू की नको ह्या अवस्थेत गाडी उजवीकडे अन डावीकडे नेत होता. मी जोरात मागून हॉर्न वाजवत येतोय की बाबा सरळ रेषेत राहात तर त्याने घातलीच गाडी उजवीकडे. मी मग गडबडीत त्याच्या उजवीकडे आणि १२० ते ० असा केवळ तीन ते चार सेकंदात येऊन गाडी वाळवंटात नेऊन थांबविली. काळ आला होता, वेळ नाही! प्रज्ञानेही मला एका शब्दाने काही म्हणले नाही कारण माझी चूक नव्हती. उलट ह्या सर्वावर तिचे प्रत्यूत्तर, " आता काही काळजी नाही, तर १२० वरून ० वर इतकी मस्त कंट्रोल करू शकतोस, तर माउंटेन्स मध्ये काही प्रॉब्लेमच नाही! " दॅट्स इट! वी वेअर इन द 'लेह ग्रूव्ह' ह्यानंतर खुद्द खार्दूंगलाच्या एका वॉटर क्रॉसिंग मध्ये एक अनुभव आला पण तो नंतर . सध्या सनसेटचा आनंद घेऊ. वाळवंटात सनसेटचे एक वेगळे रूप बघायला मिळते.

sunset1.jpgSunset.jpg

दोन दिवसात फार काही न करता केवळ खाणे, चहा पिणे, गाणी ऐकणे आणि ड्रायव्हिंग असल्यामुळे फोटो अर्थातच कमी आहेत. शिवाय पर्सनल फोटोज मी टाकत नाहीये. अर्थात एखाद दोन येतीलच म्हणा.

क्रमशः

भाग १
भाग तीन
भाग चार
भाग पाच

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!!
आता माबोवर ठिय्या आंदोलन करणार आहे. तुझे क्रमशः वाचेपर्यंत! Happy

<<४ जुलैच्या दिवशी आम्ही निघालो. पहिला मुक्काम मनात उदयपूर ( ९०० किमी) ठेवला होता.<<
सही!! एका दिवसात ९०० किमी ड्रायव्हिंग??? Uhoh

बचावलात ! गुड...

पुढे वाचतोय. लेख उत्तम आहेच. फक्त लेह-लद्दाखला जाणार्‍यांसाठीच नव्हे तर इतरही ठीकाणी जाताना काय करावे (आणि करु नये) हे उत्तम लिहित आहात. मॅप भारी. Happy

अवांतर आहे पण उगाच आठवले. डॉ. जयंत नारळीकरांच्या पहिल्याच कादंबरीच्या (प्रेषित) पहिल्याच पानावर "तो गाडी चालवत होता तर ती शेजारी बसुन तोंडाचा पट्टा" असं वाक्य आहे. मला खरंतर गाड्यांची प्रचंड आवड आहे, पण लग्नानंतर गाडी चालवायची इच्छाच होत नाही. शांती आणि विश्वास हवाच Happy

सुरुवात भारी झालीये केदार. साधं, सरळ लिखाण वाचायला छान वाटतंय.

इतकं ड्रायव्हिंग एकहाती करायचं म्हणजे खायचं काम नाही. मानलं तुला.

महिन्द्राला फीडबॅक दिलास का गाडीचा ही ट्रीप झाल्यावर?

फीडबॅक दिला. अनेक XUV नी लेह सर केले आहे. पण ते मित्रांसोबत. फॅमिली सोबत (लहान मुलांसोबत) मे बी द फर्स्ट वन. Happy तसे निदान ४ कपल्स मला माहिती आहेत की जे लेहला मुलांसहीत गाडीतून गेले एक बेंगलोर वरून टोयोटो फॉर्चूनर, एक जन दिल्लीवरून स्विफ्ट वगैरे.

वॉटर क्रॉसिंगचे फोटोही अपलोड केले आहेत. मे बी नेक्स्ट मॅगझिनमध्ये येतील. Happy

पण लग्नानंतर गाडी चालवायची इच्छाच होत नाही. शांती आणि विश्वास हवाच स्मित >> लोल विजय गाडी चालविने हे मेडिटेशन आहे. अन वॉटेंड साउन्डस फिल्टर करता यायला हवेत. Wink

अहाहा.. माझ्या ट्रिपच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.. एकटाच चालवत होतास की अधिक डायवर होते?

XUV चांगलीच आहे ,माझा एक परिचीत रेनाँ डस्टर घेऊन गेला होता..अर्थात ग्रूपबरोबर

तशी आणखी एक किन्नर* कम डायवर होती. पण तिने केवळ २०० किमी चालवली. बाकी सर्व एकलाच.

* ह्यासाठी ह्या किन्नरने गाडी एकदाही साफ केली नाही, पण, "अरे गाडीची काच साफ कर बरं आधी, नेव्हिगेटरला सर्व कसं व्यवस्थित दिसायला हवं" अशी पुस्ती मात्र जोडली आहे.

टण्या - लाहुल स्पिती इज ऑलरेडी कॉलिग. कधी येतोस इथे?

१२० ते ० असा केवळ तीन ते चार सेकंदात येऊन गाडी वाळवंटात नेऊन थांबविली >> अफलातुन केदार. सुंदर लिहताय. प्र.चि. मस्तच.

केदार सहीच.. XUV 500 जिंदाबाद!
यमुना एक्सप्रेसचे फोटो नक्की टाक.
मी फक्त अहमदाबाद ते उदयपुर असा प्रवास केला आहे. रस्ता खरच चांगला आहे.

आम्ही उद्या निघतोय... 'द फुल सर्किट' ला..

विजय गाडी चालविने हे मेडिटेशन आहे. अन वॉटेंड साउन्डस फिल्टर करता यायला हवेत.>>>> एकदा यावं लागेल तुमच्या सोबत शिकायला :D... प्रयत्न करतो.

वाचल्या वाचल्या योग्य त्या व्यक्तीचे कान फुंकले आहेत. Wink
आता लिंक फॉर्वर्ड करते.
मूळात चांगली गाडी घेण्यापासून तयारी करावी लागेल.
पण करूच.

इंद्रा / साधना बेस्ट ऑफ लक.
त्सो मोरिरी आहे की नाही प्लान मध्ये? नसल्यास नुब्रा कॅन्सल करून त्सो मोरिरी अ‍ॅड कराच. आणि हो श्रीनगर मधील सो कॉल्ड मुगल गार्डन्स - स्किप दोज. नॉट वर्थ. (किंवा मला वाटली नाहीत.)

तिसरा भाग लिहितोय. Happy

अनेक ठिकाणी गाडीला ट्रक्शन मिळत नाहि असे ऐकले आहे. खरे आहे काय? >>>

ट्रॅक्शन मिळत नाही हे खरे आहे. पण ड्रायव्हर चांगला असेल तर ह्यातून मार्ग काढू शकतो. माझे रेस्क्यु अनुभव मी लिहिणार आहे. तीन चार आहेत.

४ बाय ४ मस्ट आहे का? >>
नाही. अनलेस तुम्ही त्सागा ला किंवा मार्समिकला ला जात आहात. ह्या दोन ठिकाणी ४ बाय ४ मस्ट !
शिवाय यु निड टू रिस्पेक्ट द माउंटेन्स अ‍ॅण्ड सॅन्ड. बरेच जण हुंडरच्या सॅन्ड ड्युन्स मध्ये ड्युन बॅशींग करतात आणि गाड्या अडकवून घेतात. मी देखील ड्युन बॅशींग केले पण ते बाईक वर, XUV पार्क करून.
जर काही रुल्स ठरवून घेऊन फॉलो केले तर नॅनो देखील जाऊ शकते.
(अर्थात नॅनोला हाय क्लिअरंस आहे म्हणून) आणि मी अशा एका नॅनो वाल्याला त्सो मोरिरीत भेटलोय. तो एकटाच होता त्याच्या रामप्यारीत.

सुरूवातच थरारक!

एका दिवसात पुणे ते उदयपूर??? पुढचे १५ दिवस माझ्या डोळ्यांसमोर रस्ताच नाचला असता!

यु निड टू रिस्पेक्ट द माउंटेन्स अ‍ॅण्ड सॅन्ड. >>> अगदी खरं!

Pages