चला स्वित्झर्लंडला

Submitted by दिनेश. on 31 July, 2013 - 02:35

तर चला मंडळी माझ्याबरोबर स्विस टुअरला. हि केवळ एक झलक. ( जसजसा वेळ मिळेल तसतसा या प्रत्येक जागेचे भरपूर फोटो दाखवीनच. )

सुरवात करुया फुलांपासून. डोळे भरून फुले बघितली, भरपूर फोटो काढलेत.

हि आहे आर गॉर्ज. यावेळची ट्रिप खास करुन या जागेसाठी होती.
४० मिनिटे या अरुंद गॉर्जमधून या खळाळत्या नदीच्या सोबतीने आपण जाऊ.

दहाएक मीटर खोल असलेली हि नदी खुप वेगात आपल्या पायगती वहात राहते.

हे आहे एक धरण Happy

आयूष्यात पहिल्यांदा हिमनग बघितले मी.

ही आहे एक ग्लेशियर. आपण हिच्या पोटातही जाऊ शकतो.

हा आहे इतिहासकालीन डेव्हील्स ब्रिज.

गुलाबासाठी प्रसिद्ध असलेले, रॅपर्सव्हील

नमुना म्हणून केवळ एक गुलाब.

हे आहे वडूझ गाव. ( हो याच नावाचे गाव आहे हे. )

त्यांच्या परिकथेचा संदर्भ असलेले एक गाव, हैदीलँड

हे आहे त्यांचे सर्वोच्च शिखर, जुंगफ्रॉव

हा र्‍हाईन नदीवरचा धबधबा, आपण त्या मधल्या सुळक्यावर पण जाणार आहोत.

आणि मग झुरीकमधल्या या सुंदर नदीच्या काठी, पाण्यात पाय बुडवून निवांत बसणार आहोत.

सर्व भारतीयांच्या लाडक्या टिटलीसच्या वाटेवर.

टिटलीसच्या शिखरावर.

त्याच्या पायथ्याची एक नदी.

हा देखील एक इतिहासकालीन पूल, लुझर्न गावचा. सर्व फुले खरी आहेत का तेदेखील बघूच.

आणि मग स्विस आल्प्सवरून उड्डाण करत परतही येऊ.

तर चला !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश, सफर आत्ताशी सुरू होतेय ना? पुढचा भाग कधी?

फोटो एकदम मस्त. स्वित्झर्लंडचे म्हणून जे टिपिकल फोटो असतात त्याहून एकदम हटके आहेत हे फोटो.

अजून पूर्ण सफरीचे फोटो येऊ द्या हो. लै पिसाळल्यासारखे झालेय ते पाहुन.:फिदी:

अफाट ..अफाट सुंदर. इसे कहते है नसीब! धरतीचे २ स्वर्ग काश्मीर आणी स्विस्.:स्मित:

सुहाना सफर और ये मौसम हंसी..

दिनेशदा, अप्रतिम फोटो... स्विस जितकं प्रत्यक्षात सुंदर आहे, तितकंच तुमच्या कॅमेर्‍यातूनही उतरलंय.. ते अरुंद गॉर्ज म्हणजेच ग्लेशियर शुक ना? आधीच्या ट्रिप्सच्या वेळी मिसलं होतं. मागच्या वेळी चुकून त्याचा शोध लागला. टुरिस्ट इन्फॉर्मेशन काउंटरवरच्याने या जागेविषयी सजेस्ट केलं. आम्ही दुसरीच माहिती विचारायला गेलो होतो.. काय प्रकार आहे म्हणून सहज पहायला गेलो, तर बापरे! स्वर्गातच पोहोचल्यासारखं वाटलं एकदम! उन्हाळ्यात गेलो असल्याने बाहेर नॉर्मल तापमान आणि इथे आत एकदम थंड! पाण्याचा कसला तो दुधाळ रंग.. चहूबाजूला पसरलेले काळे खडक (त्यातले काही क्वार्ट्झ ही होते!) त्या ठिकाणाहून कधीच बाहेर पडू नये. असे वाटत होते. जसे काही याच्या पलिकडे जगच नाही..अशी जादूई दैवी जागा आहे ती.. तिच्या नुसत्या आठवणीनेच व्याकूळ व्हायला झाले.

अशी दर्दी लोकांची दाद मिळाली कि कसं सार्थक झाल्यासारखे वाटते. अजून खुप फोटो आहेत.
स्विस या दिवसात तर खुपच सुंदर असते.

नले, तुम्ही आला असतात तर ! स्पेलिंग मधे जे आणि उच्चारात य.. ( यमुना / जमुना ) असे आहे ते.

सानी, मी याची क्लीप यू ट्यूबवर बघितली होती. तेव्हापासून ध्यास घेतला होता. खास या ठिकाणी ट्रिप जात नाही, पण दुसर्‍या एका ट्रिपमधे हे मिळाले. आणि त्या जागेत प्रचंड जादू आहे हे खरेच आहे. त्या ठिकाणाहून दूर व्हावेसेच वाटत नाही. तिथलेही अजून फोटो आहेतच पण तरी पहिल्यांदा असे वाटले कि फोटो बघून त्या जादूची
कल्पना करता येणार नाही. प्रत्यक्ष अनुभवावीच अशी जागा आहे ती.

झलक मस्तच!. आता सविस्तर येऊदे. आम्ही गेलो होतो त्यापेक्षा वेगळा सीझन बघून मस्त वाटलं. झुरीकला सबंधवेळ हीमवर्षावात काढला होता. Happy

कुठे आहे हे स्वित्झर्लंड?:( Sad

जखमेवरची खपली काढ्लीत अगदी!

(ह्म्म्म्म..! झुरिकच्या एअरर्पोर्ट वर ट्रांझिट ला असतांन्ना कांच फोडून बाहेर जण्याची जबरि ईच्छा असतांन्ना वेळ नसल्याने केवळ एअरर्पोर्टहून व विमानातून 'दुरून डोंगर साजरे' ह्याचा अनुभव घेतला.

छानच! आणी धन्यवाद!

अखेर गेलात नीट..... मी आजच तुमची आठवण काढली होती.... अप्रतिम फोटो... सगळ्या आठवणी उजळल्या...

दिनेशदा... तुमचे फोटो म्हणजे मेजवानीच असते... ती गॉर्ज खासच... अजुन तिकडे जाणे जमलं नाहिये...

संगम सिनेमात राजु आणि राधाच्या हनीमुनला ते जेंव्हा गोपाळला भेटतात तेंव्हा ह्या गॉर्ज चं शुटींग आहे... ते पाहिल्या पासुन मला तिकडे जायचं होतं... पण दोन-तिन वेळा स्वीस ला गेलो तरी अजुन जाणे जमले नाहिये... बघु आता पुढल्या वेळी...

वडूझ तर खासच. हा वेगळा देश आहे. लिंचेस्टाइन... त्याची ही राजधानी वडुझ. तिकडे सुरेख टॉय ट्रेन मधुन आपल्याला सफर घडवतात. पास्पोर्ट वर त्यांच्या क्राउनचा स्टँप पण मारुन देतात. हा देश वेगळा असला तरी स्विट्झर्लंड च्या पोटात आहे. त्यां बद्दल दिनेशदा अजुन लिहा...

हा धागा मी कर्टन रेझर समजते ......

हे आहे त्यांचे सर्वोच्च शिखर, जुंगफ्रॉव>> युंगफ्राउ.

>>>> पूर्ण नाव युंगफ्राऊयॉक (jungfraujoch ) आहे. युंग म्हणजे यंग म्हणजे तरूण. फ्राऊ म्हणजे स्त्री / ललना आणी यॉक म्हणजे पास म्हणजे खींड.

अरे वा खुपच छान.गॉर्ज आणि तो फॉल बघायचा राहिला आहे अजुन. तुमचे फोटो अगदि मस्तच.
हा माझा झब्बु.
Switzerland 2009 177.jpg
हा त्या पुलावर काहितरि वाद्य वाजत होता.
Switzerland 2009 210.jpg
ईटरलेकन.
Interlaken 2.jpgDrive to Switzerland 5.jpgSwitzerland 2009 103.jpgSwitzerland 2009 044.jpg
हि युंगफ्राउवरिल आईस केव्ह.
Switzerland 2009 129.jpgSwitzerland 2009 152.jpgSwitzerland 2009 157.jpg

दिनेशदा, अप्रतिम फोटो! सगळेच फोटो आवडले. पण आर गॉर्ज चे फोटो खासच आहेत! फोटो वरुन हे आयुष्यात कधीतरी पाहावेच असे मनात आले. त्याला दुजोरा सानीच्या पोस्टने दिला...स्वर्गातच पोहोचल्यासारखं वाटलं एकदम! उन्हाळ्यात गेलो असल्याने बाहेर नॉर्मल तापमान आणि इथे आत एकदम थंड! पाण्याचा कसला तो दुधाळ रंग.. चहूबाजूला पसरलेले काळे खडक (त्यातले काही क्वार्ट्झ ही होते!) त्या ठिकाणाहून कधीच बाहेर पडू नये. असे वाटत होते. जसे काही याच्या पलिकडे जगच नाही..अशी जादूई दैवी जागा आहे ती..
बघुया कधी जाणे होते ते! बाकीचे फोटोही लवकर टाका.

Pages