आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "
माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अॅअॅअॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न
नंतर ५ मिनिट जाहिराती त्यात "गोल्ड स्पॉट" , "लिम्का", लिज्जत पापड वाला ससा आणि लिरिल....(लिरिल च्या वेळी डोळे झाकले जायचे, घरच्यांचा दमच तसा होता...;)
हे सगळ झाल्यावर पडद्यावर अवतार घ्यायचा ..........जायंट रोबोट.. आणि त्याचा लहान मालक "जॉनी सोको"
जो घड्याळात बघुन रोबोट शी संवाद साधायचा..मला फार अप्रुप होते त्याचे घडाळ्यात कसे बोलले जाते. मग आजोबा ऑफिस मधुन घरी आले की त्यांचे "घड्याळ" घेउन घरभर "कॉलिंग जायंट रोबोट" करत फिरत असायचो.. जायंट रोबोट चे कवायती बघुन काहीही घरच्यांनी काम सांगितले की आधी दोन्ही हात कवायत करत उठायचो.. हात इकडे तिकडे करुन झाल्यावर मग कामाला लागायचो..घरचे सुध्दा "रोबोट उठला ना आता सगळी काम कर.रोबोट थकत नाही काही. न सांगता सगळे काम करतो" इत्यादी बोलुन मला हरभर्याच्या झाडावर चढवुन सगळी काम करुन घेत ..:)
जायंट रॉबोट च्या चालु झाल्यावर अजुन एक मालिका काही महिन्यांनी चालु झाली " Fireball XL5 "
ही मालिका मुख्यतः अंतराळवीरांवर होती.. लहान बाहुल्यांप्रमाणे दिसणारी माणसे.. त्यांची मान सारखी "कठपुतली" च्या बाहुलीप्रमाणे सतत हलणारी होती. जायंट रॉबोट पेक्षा ही मालिका जरा जास्त सुटसुटीत होती..
यात देखील एक लांब बल्ब प्रमाणे दिसणारा लहानसा रोबोट होता... "वांय्य्य्यव , व्वाय्य्यांव" सारखा सतत आवाज करायचा..... बोलक्या बाहुल्यांसारखा प्रकार होता..पण तेव्हा हे पहायला मज्जा यायची
.
अजुन एक - दोन मालिका होत्या .. एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती...नाव आता आठवत देखील नाही.. दुसरी मालिका होती.. चालत्याबोलत्या लहान गोळ्या ज्या परग्रहावरुन आलेल्या.. त्या गोळ्या वेफर्स आईस्क्रिम खायच्या..एकमेकांवर मनोरा रचुन काहीही करायच्या...
.
लहानपणी धम्माल मालिका होत्या....आजच्या मुलांना काय अप्रुप त्याचे....
.
आपल्याला सुध्दा काही आठवल्या तर नक्कीच लिहा.....:)
शाहरूख ची फौजी, सर्कस पण मस्त
शाहरूख ची फौजी, सर्कस पण मस्त होत्या.
'इमारत वरती वरती चढे ' असे टायटल सॉन्ग असलेली एक मराठी मालिका होती, त्यात उदय टीकेकर होता. त्याच्या इमारतीच्या आवारात बेकायदेशीर चालवलेल्या पाव भाजीच्या गाडीला हुसकवण्यासाठी त्याला कीती लढा द्यावा लागतो , अशी काहीतरी होती.
बाकी 'होनी अनहोनी' , श्रीकांत अशा रात्री ९ ला लागणार्या हीन्दी मालिका पण छान होत्या.
रविवारी रंगोली
रविवारी रंगोली
मला ती रेणुकाची सिरिअल
मला ती रेणुकाची सिरिअल आठवली... इम्तिहान नाव होतं
नाही.................. सैलाब
नाही..................
सैलाब .............हे नाव होते
मला यातलं जवळपास काहीच महीत
मला यातलं जवळपास काहीच महीत नाहीये
स्वप्ना > एक दफा तो अपना जीवन
स्वप्ना > एक दफा तो अपना जीवन मुझको खुद ही जिने (बोने?) दो >
एक दफा तो मुझको अपना आंचल भर के रोने दो ' असं होतं बहुतेक.
अजुन एक सिरीयल होती ज्यात ३ वेगवेगळ्या वयोगटाच्या बायका घरं सोडून बाहेर पडतात. त्यातली वृद्ध स्त्री म्हणजे `फिअर्लेस नादिया' होती. सुरेख काम केलं होत.
रेणूका शहाणे दोन्ही serials
रेणूका शहाणे दोन्ही serials मधे होती, इम्तिहान आणि सैलाब.
स्वप्ना > एक दफा तो अपना जीवन
स्वप्ना > एक दफा तो अपना जीवन मुझको खुद ही जिने (बोने?) दो >
बोने दो - हेच बरोबर आहे. छान होती ती सीरीयल. मला अजुन एका मालीकेचे टायटल साँग आवडायचे, सुजाता मेहेता ची - बेंगॉली होती बहुतेक.
मला यातलं जवळपास काहीच महीत
मला यातलं जवळपास काहीच महीत नाहीये >>>> रिया, तुला शक्तिमान आठवत असेल
मालविकाची 'कशीश' आठवतेय का?
मालविकाची 'कशीश' आठवतेय का?
मालविकाची 'कशीश' आठवतेय का?
मालविकाची 'कशीश' आठवतेय का? >> अरे मला याच मालिके बद्दल लिहायचे होते पण नावच आठवत नव्हते.
नंतर पडघवलीवर आधारित एक
नंतर पडघवलीवर आधारित एक मालिका लागायची. बहुतेक 'कुछ खोया कुछ पाया' असं काहीतरी. टायटल सॉन्ग आठ्वतंय थोडं थोडं.
यादोंके धुंदले दर्पनमे बिते हर पलकी छाया है
हर मोडपे मैने जीवनके कुछ खोया है कुछ पाया है
क्यो अंतर्मनकी पीडाको अपने ही लोग न समझे है
कितने सुलझाये प्रश्न यहा -- -- उलझे है
क्यो मन कहनेको अपना है सब इसमे दर्द पराया है
मी हे आधीही कुठल्या तरी बीबीवर लिहिलं होतं.
>>>>
हो खूप आर्त स्वर होते ह्या गाण्याचे. त्यात रोहिणी हट्टंगडी होती. ते गाणे मलाही हवे आहे.
आव्हान ही मालिका आठवते का मराठी होती?
एक दो तीन चार.. असे एक सीरिअल होते.
हो. एक दो तीन चार, एक दो तीन
हो.
एक दो तीन चार, एक दो तीन चार
चारों मिलके साथ चलें तो कर दे चमत्कार
असा टायटल ट्रॅक होता त्या मालिकेचा.
"नीम का पेड"मधील बुधिया
"नीम का पेड"मधील बुधिया आठवतोय का कुणाला?
. इम्तिहान नाव होतं>>>>>>>>.
. इम्तिहान नाव होतं>>>>>>>>. त्यात विलन चं नाव सिकंदर होतं.....
एक शुन्य शुन्य पण होती एक तेव्हा मी फार लहान होते आणि दीपक शिर्के ला बघुन मी घाबरुन रडायला सुरु करायची........:(
अजुन राजा रँचो पण मस्त होती...
श्रीमान श्रीमती
इम्तिहान नाव होतं>>>>>>>>.
इम्तिहान नाव होतं>>>>>>>>. त्यात विलन चं नाव सिकंदर होतं>>>>>>>>>>>>>>>>
तो विलन मला वाटत अनंग देसाईने केला होता हो ना?
हो मला शक्तिमान, आर्यमान
हो मला शक्तिमान, आर्यमान आठवतात
अदभुत अगम्य साहस की परी भाषा है
ये मिटती मानवता की आशा है
ये आत्मशक्ती है
दुनिया बदल स्कती है
.........................
...........................
होता है जब आदमी को खुदका ग्यान
केहलाये वो शक्तीमान शक्ती मान शक्तीमान शक्तीमान
(रिजाभ)
मी बॉब द बिल्डर बघायचे बॉब द
मी बॉब द बिल्डर बघायचे
बॉब द बिल्डर करके दिखाएंगे
बॉब द बिल्डर हा भाई हा
हो हो मी पण बॉब द बिल्डर
हो हो
मी पण बॉब द बिल्डर पाहायचे
जाई मी ऑसवर्ड पण पहाय्चे मग
जाई
मी ऑसवर्ड पण पहाय्चे
मग पिंगू पण
मग नॉडी पण....
मग करिश्मा का करिश्मा आणि शरारत पण
आणखी शकालाका बूम बूम...
सध्या इतकंच आठवतय
आता मी डोरेमॉन, निंजा हातोडी, परमॅन, सुट लाईफ ऑफ करन अॅण्ड कबीर, बेस्ट ऑफ लक निक्की हे पहाते
रिया सेम पिंच मी पण नोड़ी
रिया सेम पिंच
मी पण नोड़ी ओसवर्ड पिंगु पाहते
इथे कोनी टॉम and जेरी पाहत का
मी अजुन पण पाहते
इथे कोनी टॉम and जेरी पाहत
इथे कोनी टॉम and जेरी पाहत का
>>>>> मी पाहतो. माझ ऑलटाइम फेव्हरेट. कलेक्शन पण आहे माझ्याकडे ....
माझ्याकडे पण आहे कलेक्शन मी
माझ्याकडे पण आहे कलेक्शन
मी पण पहाते
पण ऑलटाईम फेवरेट डोरेमॉनच
मी आणि माझा नवरा आम्ही दोघही
मी आणि माझा नवरा आम्ही दोघही टॉम अँड जेरीचे पंखे आहोत
रिया आणि आबासाहेब मला ते
रिया आणि आबासाहेब
मला ते कलेक्शन मिळेल का
पण ऑलटाईम फेवरेट डोरेमॉनच >>>
पण ऑलटाईम फेवरेट डोरेमॉनच >>> मी माझ्या छोट्या चुलत भावाला नोबिता म्हणुन चिडवतो
मला ते कलेक्शन मिळेल का >>> डिव्हीडी मिळते त्याची
बहुतेक यु ट्युबवर पण मिळेल
बहुतेक यु ट्युबवर पण मिळेल
टॉम अँड जेरी - ऑल टाईम
टॉम अँड जेरी - ऑल टाईम फेवरिट!
ओये रिया आपुन भी ऑसवाल्ड्का
ओये रिया आपुन भी ऑसवाल्ड्का फॅन है....ओसवल्ड, डेझी, हेन्री. टॉम अॅन्ड जेरी ऑल टाईम फेव्हरेट!
नीना गुप्ता असलेली यात्रा सिरियल आठवतेय का? पूर्णपणे रेल्वेच्या प्रवासावर होती. ती प्रेग्नंट असते आणि लास्ट एपिसोडमध्ये बाळंत होऊन तिला मुलगी होते. आणखी काही सिरियल्स - प्रथम प्रतिश्रुती, श्रीकांत, आश्चर्य दीपक, रजनी...
देखो मगर प्यारसे म्हणून एक सिरियल रविवारी लागायची. त्यात सोनी राजदान आणि शशी पुरी वगैरे लोक होते.
देखो देखो देखो मगर प्यारसे
देखो देखो देखो मगर प्यारसे
कभी दाई ओर तो कभी बाई ओर
कभी आरसे तो कभी पारसे
दुनिया का ट्रॅफिक गुजरता रहेगा
तुम देखो मगर प्यारसे
बाबाजीका बाईस्कोप म्हणून सत्येन कप्पूची एक सिरियल लागायची. एव्ह्ढया लहानपणचं लख्ख आठवतंय.
नुक्कड आठवतेय का? गुरु,
नुक्कड आठवतेय का? गुरु, टीचरदीदी, हरी, घनशू, खोपडी, कादरभाई, तंबी, गणपत....आत्ता काही महिन्यांपूर्वी केबल्च्या एका चॅनेलवर दाखवत होते. पण नाही पहायला मिळाली अजून चालू आहे का काय माहित.
Pages