आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "
माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अॅअॅअॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न
नंतर ५ मिनिट जाहिराती त्यात "गोल्ड स्पॉट" , "लिम्का", लिज्जत पापड वाला ससा आणि लिरिल....(लिरिल च्या वेळी डोळे झाकले जायचे, घरच्यांचा दमच तसा होता...;)
हे सगळ झाल्यावर पडद्यावर अवतार घ्यायचा ..........जायंट रोबोट.. आणि त्याचा लहान मालक "जॉनी सोको"
जो घड्याळात बघुन रोबोट शी संवाद साधायचा..मला फार अप्रुप होते त्याचे घडाळ्यात कसे बोलले जाते. मग आजोबा ऑफिस मधुन घरी आले की त्यांचे "घड्याळ" घेउन घरभर "कॉलिंग जायंट रोबोट" करत फिरत असायचो.. जायंट रोबोट चे कवायती बघुन काहीही घरच्यांनी काम सांगितले की आधी दोन्ही हात कवायत करत उठायचो.. हात इकडे तिकडे करुन झाल्यावर मग कामाला लागायचो..घरचे सुध्दा "रोबोट उठला ना आता सगळी काम कर.रोबोट थकत नाही काही. न सांगता सगळे काम करतो" इत्यादी बोलुन मला हरभर्याच्या झाडावर चढवुन सगळी काम करुन घेत ..:)
जायंट रॉबोट च्या चालु झाल्यावर अजुन एक मालिका काही महिन्यांनी चालु झाली " Fireball XL5 "
ही मालिका मुख्यतः अंतराळवीरांवर होती.. लहान बाहुल्यांप्रमाणे दिसणारी माणसे.. त्यांची मान सारखी "कठपुतली" च्या बाहुलीप्रमाणे सतत हलणारी होती. जायंट रॉबोट पेक्षा ही मालिका जरा जास्त सुटसुटीत होती..
यात देखील एक लांब बल्ब प्रमाणे दिसणारा लहानसा रोबोट होता... "वांय्य्य्यव , व्वाय्य्यांव" सारखा सतत आवाज करायचा..... बोलक्या बाहुल्यांसारखा प्रकार होता..पण तेव्हा हे पहायला मज्जा यायची
.
अजुन एक - दोन मालिका होत्या .. एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती...नाव आता आठवत देखील नाही.. दुसरी मालिका होती.. चालत्याबोलत्या लहान गोळ्या ज्या परग्रहावरुन आलेल्या.. त्या गोळ्या वेफर्स आईस्क्रिम खायच्या..एकमेकांवर मनोरा रचुन काहीही करायच्या...
.
लहानपणी धम्माल मालिका होत्या....आजच्या मुलांना काय अप्रुप त्याचे....
.
आपल्याला सुध्दा काही आठवल्या तर नक्कीच लिहा.....:)
होनी अनहोनी सुपरनॅचरल
होनी अनहोनी सुपरनॅचरल घटनांबद्दल होती ना?
होनी अनहोनी
होनी अनहोनी
सदियोंसे सतयुगमे
बरसोंसे कलियुगमे
होती रही है होके रहेगी
ना कोई समझे ना कोई जाने
आखोंसे जिसने देखी वही माने
नींव नावची मालिका पण खूप छान
नींव नावची मालिका पण खूप छान होती. गुल गुल्शन गुल्फाम पण आठवतेय..
आणि सुरभि ?? बुधवारी रात्री अगदी आवर्जून बघितली जायची.
होनी अनहोनी - मला ही सीरीयल
होनी अनहोनी - मला ही सीरीयल चांगलीच आठवते कारण आमच्याकडे नविन कलर टीव्ही आल्यावर त्याच्यावर पहिली लागलेली हीच सीरीयल होती-
मस्त, nostalgic झाले,
मस्त, nostalgic झाले, श्वेतांबरा आठवतेय का? वरती सर्वांनी लिहिलेली मालिकांची नावे वाचताना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या त्या मालिका, त्या व्यक्तिरेखा.
अगदी पूर्वी १३ भागाच्या सिरीयल होत्या नंतर ५२ भागाच्या होत्या, त्यावेळी खूप enjoy केले.
रशियन लेखाकांच्या गोष्टींवर
रशियन लेखाकांच्या गोष्टींवर अधारीत एक मालिका लागाय्ची ती मस्त होती.
तसेच हीन्दीतल्या प्रसिद्ध लेखकांच्या गोष्टींवर अधारीत पण एक मालिका लागायची ती छान होती. त्यात एक फक्त 'टॉवेल' च्या गोष्टीवर एपिसोड होता तो आठवतोय अजुन.
रशियन लेखनावर आधारित काही कथा
रशियन लेखनावर आधारित काही कथा होत्या असे आठवतंय, तसेच 'एक कहानी' ह्या मालिकेत भारतातील विविध भाषेतील लेखकांच्या कथांचे हिंदी रूपांतर केले होते, तीपण छान होती मालिका.
अमोल पलेकर भाग्यश्री ची कच्ची
अमोल पलेकर भाग्यश्री ची कच्ची धूप असायची रवीवारी सकाळी.
रविवारी रात्री Queez Time असायचे.
Show Theme
क्विझ टाईम- सिद्धार्थ बसू
क्विझ टाईम- सिद्धार्थ बसू करायचा ना? त्यातच पहिल्यांदा राजदीप सरदेसाई यांना स्पर्धक म्हणून पहिले होते तेव्हा राजदीपची ओळख क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा मुलगा म्हणून करून दिली होती, आता राजदीपचे स्वतःचे IBN हे news channel आहे.
कोणाला सतिश शाह्चा ये जो है
कोणाला सतिश शाह्चा ये जो है जींदगी आठवत आहे का? आणी जस्पाल भट्टीचा फ्लॉप शो?
हो आदिती दोन्ही आठवतंय. जसपाल
हो आदिती दोन्ही आठवतंय. जसपाल भट्टी एकदम दिलखुलासपणे आणि खुसखुशीत विनोदाने विविध समस्या मांडायचा, अगदी वर्मावर बोट ठेवायचा.
किले का रहस्य !!
किले का रहस्य !!
आता ह्या जमतीलतीतक्या आणि
आता ह्या जमतीलतीतक्या आणि मिळतील तश्या बघव्याच लागतील
हायला! स्वप्ना, काय मेमरी आहे
हायला! स्वप्ना, काय मेमरी आहे तुझी! मला आठवतात या सगळ्या मालिका.
मॅक्स, किले का रहस्य फेव होति माझी.
ये भय अभिशप्त किला है, सदियों पुराना
भूल करके भी कोई, इसमें मत जाना
मत जाना
मत जाना
(आणि मग एक खच्चून किंकाळी)
देख भाई देख.
देख भाई देख.
दर गुरुवारी रात्री साडेआठ
दर गुरुवारी रात्री साडेआठ वाजता दूरदर्शनवर पहा : बुनियाद
अरे रामायण आणि महाभारत
अरे रामायण आणि महाभारत राहीलचं कि
तो विलन मला वाटत अनंग देसाईने
तो विलन मला वाटत अनंग देसाईने केला होता हो ना?>>>>>>>>>>. हो तोच....
जुनी `तृष्णा' (किट्टू
जुनी `तृष्णा' (किट्टू गिडवानीची) कुठे मिळेल का पहायला ?
रजनी आठावतय का?
रजनी आठावतय का?
समंदर = समीर सोनी नेव्हीत
समंदर = समीर सोनी नेव्हीत असतो ती मालिका मस्त होती. त्यातल्या हिरॉईनचं नाव माहित नाही.
फर्मान = कंवलजीत सिंह व दिपिका देशपांडेची मालिका. मस्त होती ती सुद्धा.
बाकी शांती आणि स्वाभिमान या आद्य विबासं मालिका यात शंका नाही.
जुनून आठ्वते आहे का? पुनित
जुनून आठ्वते आहे का? पुनित इस्सरची
मालगुडी डेज
मालगुडी डेज
>>ये भय अभिशप्त किला है ये है
>>ये भय अभिशप्त किला है
ये है अभिशप्त किला
नंदिनी, देख भाई देख आपुनका फेव्हरेट. फरिदा जलाल, नविन निश्चल, शेखर सुमन, भावना बलसावर....धम्माल. त्यात उर्वशी ढोलकिया पण होती.
त्यात उर्वशी ढोलकिया पण होती.
त्यात उर्वशी ढोलकिया पण होती. >>>>>>>>> छिल्का............
जुनून मध्ये टॉम ऑल्टरचं नाव
जुनून मध्ये टॉम ऑल्टरचं नाव केशव कलसी असतं आणि मंगल धिल्लोचं सुमेर राजवंश असतं ह्यापलिकडे मला काही आठवत नाहिये
अजनबी पण चांगली होती त्यातला
अजनबी पण चांगली होती त्यातला शकू राणा
युग मालिका पण चंगली होती
युग मालिका पण चंगली होती त्याच गान युग बदला बदला हिंदुस्तान आज के युग का हर इन्सान आसाच काही तरी होत
चन्द्रकान्ता पण मस्त होती
चन्द्रकान्ता पण मस्त होती त्यामधले जबंज, कुरुर्सिंग (याखु पिताजी )शिवदत्त तारा ,कलावती,,तेजसिंग बद्रीनाथ (इरफान खान ) यांची जादू असायची त्यामधल्या लढाया मस्त वाटायच्या प्रत्येक भाग काहीतरी गुपित ठेऊन संपयाचा मग आखा आठवडा पुढे काय होणार याची उकल करण्यात जायचा .रविवार कधी येतोय याची आतुरतेने वाट बघायची ,मस्त वाटायचं तेव्हा .
भक्ती बर्वेंची 'शोधू कुठे
भक्ती बर्वेंची 'शोधू कुठे किनारा' ही मालिकाही छान होती, अहो ऐकलत का? ही मालिका आठ्वते का? शेखर सुमनची रिपोर्टर, तहकीकात यापण छान होत्या
मराठी मध्ये सर्ज्या राजा ची
मराठी मध्ये सर्ज्या राजा ची धूम असायची तसेच आदेस बंधेकाराची तक धीनाधीन आठवते का ?
Pages