बालपणीच्या मालिका..!!

Submitted by उदयन.. on 26 May, 2013 - 03:39

आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "

माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
Giant_robot_201203.jpg

त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अ‍ॅअ‍ॅअ‍ॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न Happy

नंतर ५ मिनिट जाहिराती त्यात "गोल्ड स्पॉट" , "लिम्का", लिज्जत पापड वाला ससा आणि लिरिल....(लिरिल च्या वेळी डोळे झाकले जायचे, घरच्यांचा दमच तसा होता...;)
हे सगळ झाल्यावर पडद्यावर अवतार घ्यायचा ..........जायंट रोबोट.. आणि त्याचा लहान मालक "जॉनी सोको"
जो घड्याळात बघुन रोबोट शी संवाद साधायचा..मला फार अप्रुप होते त्याचे घडाळ्यात कसे बोलले जाते. मग आजोबा ऑफिस मधुन घरी आले की त्यांचे "घड्याळ" घेउन घरभर "कॉलिंग जायंट रोबोट" करत फिरत असायचो.. जायंट रोबोट चे कवायती बघुन काहीही घरच्यांनी काम सांगितले की आधी दोन्ही हात कवायत करत उठायचो.. हात इकडे तिकडे करुन झाल्यावर मग कामाला लागायचो..घरचे सुध्दा "रोबोट उठला ना आता सगळी काम कर.रोबोट थकत नाही काही. न सांगता सगळे काम करतो" इत्यादी बोलुन मला हरभर्याच्या झाडावर चढवुन सगळी काम करुन घेत Sad ..:)

जायंट रॉबोट च्या चालु झाल्यावर अजुन एक मालिका काही महिन्यांनी चालु झाली " Fireball XL5 "

firball.jpg

ही मालिका मुख्यतः अंतराळवीरांवर होती.. लहान बाहुल्यांप्रमाणे दिसणारी माणसे.. त्यांची मान सारखी "कठपुतली" च्या बाहुलीप्रमाणे सतत हलणारी होती. जायंट रॉबोट पेक्षा ही मालिका जरा जास्त सुटसुटीत होती..
यात देखील एक लांब बल्ब प्रमाणे दिसणारा लहानसा रोबोट होता... "वांय्य्य्यव , व्वाय्य्यांव" सारखा सतत आवाज करायचा..... Happy बोलक्या बाहुल्यांसारखा प्रकार होता..पण तेव्हा हे पहायला मज्जा यायची
.
अजुन एक - दोन मालिका होत्या .. एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती...नाव आता आठवत देखील नाही.. दुसरी मालिका होती.. चालत्याबोलत्या लहान गोळ्या ज्या परग्रहावरुन आलेल्या.. त्या गोळ्या वेफर्स आईस्क्रिम खायच्या..एकमेकांवर मनोरा रचुन काहीही करायच्या...
.
लहानपणी धम्माल मालिका होत्या....आजच्या मुलांना काय अप्रुप त्याचे....
.
आपल्याला सुध्दा काही आठवल्या तर नक्कीच लिहा.....:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूख ची फौजी, सर्कस पण मस्त होत्या.
'इमारत वरती वरती चढे ' असे टायटल सॉन्ग असलेली एक मराठी मालिका होती, त्यात उदय टीकेकर होता. त्याच्या इमारतीच्या आवारात बेकायदेशीर चालवलेल्या पाव भाजीच्या गाडीला हुसकवण्यासाठी त्याला कीती लढा द्यावा लागतो , अशी काहीतरी होती.
बाकी 'होनी अनहोनी' , श्रीकांत अशा रात्री ९ ला लागणार्‍या हीन्दी मालिका पण छान होत्या.

स्वप्ना > एक दफा तो अपना जीवन मुझको खुद ही जिने (बोने?) दो >
एक दफा तो मुझको अपना आंचल भर के रोने दो ' असं होतं बहुतेक.

अजुन एक सिरीयल होती ज्यात ३ वेगवेगळ्या वयोगटाच्या बायका घरं सोडून बाहेर पडतात. त्यातली वृद्ध स्त्री म्हणजे `फिअर्लेस नादिया' होती. सुरेख काम केलं होत.

स्वप्ना > एक दफा तो अपना जीवन मुझको खुद ही जिने (बोने?) दो >
बोने दो - हेच बरोबर आहे. छान होती ती सीरीयल. मला अजुन एका मालीकेचे टायटल साँग आवडायचे, सुजाता मेहेता ची - बेंगॉली होती बहुतेक.

नंतर पडघवलीवर आधारित एक मालिका लागायची. बहुतेक 'कुछ खोया कुछ पाया' असं काहीतरी. टायटल सॉन्ग आठ्वतंय थोडं थोडं.

यादोंके धुंदले दर्पनमे बिते हर पलकी छाया है
हर मोडपे मैने जीवनके कुछ खोया है कुछ पाया है

क्यो अंतर्मनकी पीडाको अपने ही लोग न समझे है
कितने सुलझाये प्रश्न यहा -- -- उलझे है
क्यो मन कहनेको अपना है सब इसमे दर्द पराया है

मी हे आधीही कुठल्या तरी बीबीवर लिहिलं होतं.
>>>>
हो खूप आर्त स्वर होते ह्या गाण्याचे. त्यात रोहिणी हट्टंगडी होती. ते गाणे मलाही हवे आहे.

आव्हान ही मालिका आठवते का मराठी होती?

एक दो तीन चार.. असे एक सीरिअल होते.

हो.

एक दो तीन चार, एक दो तीन चार
चारों मिलके साथ चलें तो कर दे चमत्कार

असा टायटल ट्रॅक होता त्या मालिकेचा.

. इम्तिहान नाव होतं>>>>>>>>. त्यात विलन चं नाव सिकंदर होतं.....

एक शुन्य शुन्य पण होती एक तेव्हा मी फार लहान होते आणि दीपक शिर्के ला बघुन मी घाबरुन रडायला सुरु करायची........:(

अजुन राजा रँचो पण मस्त होती...
श्रीमान श्रीमती

इम्तिहान नाव होतं>>>>>>>>. त्यात विलन चं नाव सिकंदर होतं>>>>>>>>>>>>>>>>
तो विलन मला वाटत अनंग देसाईने केला होता हो ना?

हो मला शक्तिमान, आर्यमान आठवतात Proud

अदभुत अगम्य साहस की परी भाषा है
ये मिटती मानवता की आशा है
ये आत्मशक्ती है
दुनिया बदल स्कती है
.........................
...........................
होता है जब आदमी को खुदका ग्यान
केहलाये वो शक्तीमान शक्ती मान शक्तीमान शक्तीमान Proud

(रिजाभ)

जाई Happy
मी ऑसवर्ड पण पहाय्चे
मग पिंगू पण Proud
मग नॉडी पण....

मग करिश्मा का करिश्मा आणि शरारत पण Proud
आणखी शकालाका बूम बूम...

सध्या इतकंच आठवतय Wink

आता मी डोरेमॉन, निंजा हातोडी, परमॅन, सुट लाईफ ऑफ करन अ‍ॅण्ड कबीर, बेस्ट ऑफ लक निक्की हे पहाते Proud

पण ऑलटाईम फेवरेट डोरेमॉनच >>> मी माझ्या छोट्या चुलत भावाला नोबिता म्हणुन चिडवतो Happy

मला ते कलेक्शन मिळेल का >>> डिव्हीडी मिळते त्याची

ओये रिया आपुन भी ऑसवाल्ड्का फॅन है....ओसवल्ड, डेझी, हेन्री. टॉम अ‍ॅन्ड जेरी ऑल टाईम फेव्हरेट!

नीना गुप्ता असलेली यात्रा सिरियल आठवतेय का? पूर्णपणे रेल्वेच्या प्रवासावर होती. ती प्रेग्नंट असते आणि लास्ट एपिसोडमध्ये बाळंत होऊन तिला मुलगी होते. आणखी काही सिरियल्स - प्रथम प्रतिश्रुती, श्रीकांत, आश्चर्य दीपक, रजनी...

देखो मगर प्यारसे म्हणून एक सिरियल रविवारी लागायची. त्यात सोनी राजदान आणि शशी पुरी वगैरे लोक होते.

देखो देखो देखो मगर प्यारसे
देखो देखो देखो मगर प्यारसे
कभी दाई ओर तो कभी बाई ओर
कभी आरसे तो कभी पारसे
दुनिया का ट्रॅफिक गुजरता रहेगा
तुम देखो मगर प्यारसे

बाबाजीका बाईस्कोप म्हणून सत्येन कप्पूची एक सिरियल लागायची. एव्ह्ढया लहानपणचं लख्ख आठवतंय.

नुक्कड आठवतेय का? गुरु, टीचरदीदी, हरी, घनशू, खोपडी, कादरभाई, तंबी, गणपत....आत्ता काही महिन्यांपूर्वी केबल्च्या एका चॅनेलवर दाखवत होते. पण नाही पहायला मिळाली Sad अजून चालू आहे का काय माहित.

Pages