Submitted by अभय आर्वीकर on 15 July, 2013 - 02:29
चीन विश्वासपात्र नाही
सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही
उत्तुंग झेप घे पण दमणे नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही
समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही
आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही
"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही
तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही
आता पुढील चर्चा मुद्देविहीन नाही
स्वातंत्र्ययुद्ध अथवा संग्राम कोणताही
लढतात तेच जे-जे हुजरेकुलीन नाही
अख्त्यार भावनेच्या जगतो 'अभय' असा 'मी'
हसणे अधीन नाही, रडणे अधीन नाही
- गंगाधर मुटे
------------------------------------------
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वैवकु, दम लागणें या अर्थाने
वैवकु,
दम लागणें या अर्थाने मी दमने हा शब्द वापरला होता. तो दमणे असा शब्द असावा, हे मला मान्य आहे.
त्यामुळे बदल केला आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
बेफि,
तुम्हाला सदर गझलेबद्दल बरे-वाईट काहीच बोलायचे नसेल तर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांसोबत भांडण्यासाठी या गझलेचा "आखाडा" म्हणून तरी उपयोग का करून घेत आहात.
(माझ्या माहितीप्रमाणे प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी पी.एच.डी करून डॉक्टरेट मिळविली आहे.)
बाळा बेफिकीर, काहीच्या काही
बाळा बेफिकीर, काहीच्या काही बेताल बडबडु नका. 'च्यायला' हा शब्द आमच्या मराठवाड्यात सर्रासपणे वापरला जातो, गुगल सर्च मधे ’च्यायला’शब्द टाकला तर किती तरी पानं मिळतात. ज्यांनी ज्यांनी हा शब्द वापरला आहे त्या त्या सर्वांनी काय कोणाच्या आई-माईसाठी शब्द वापरलेला नाही. सांभाळा स्वत:ला, स्वत:ची मनस्थिती बरी नसल्यामुळे आपण काहीच्या काही बरळत आहात, असे दिसते. एका प्राध्यापकाने काय लिहायचे आणि काय लिहु नये, हे आपल्या सार-ख्या स्वत:च्या जिव्हेवर ताबा गमवलेल्यांनी किमान मला सांगु नये, व्यक्तिगत रोखाचे लेखनाबद्दल मीच आपला निषेध व्यक्त करतो.
बाकी, राहीला सलेक्टीव्ह आयडींना उचकावण्याचा आरोपाचा प्तर आपल्याला एक स्पष्ट केले पाहिजे आपल्या गुरु शिष्याच्या जोडीचे लेखन, जे मला अपील करत नाही त्यामुळे मी उत्तम दाद देऊ शकत नाही. दर आठवड्याला गिरणीत दळन दळुन आणल्यासारख्या गझलांना कोण दाद देईल ? आपण सोडुन इतर उत्तम लिहिणा-या कवींना आणि त्याच्या गझलांना मी मायबोलीवर उत्तम दाद दिली आहे.
बाकी, सांभाळा स्वत:ला. हल्लीच आपले एक निराशेनं भरलेलं लेखन पाहुन मला आपली काळजी वाटायला लागली आहे.
-दिलीप बिरुटे
"उत्तुंग झेप घे पण दमणे नको
"उत्तुंग झेप घे पण दमणे नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही
समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही">>> हे दोन शेर सर्वात विशेष वाटले.
'सकाळ' मधे प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन.
तुम्हाला सदर गझलेबद्दल
तुम्हाला सदर गझलेबद्दल बरे-वाईट काहीच बोलायचे नसेल तर<<<
उत्तुंग झेप घे पण दमणे नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही
समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही<<< छान शेर आहेत.
==========================================
बिरुटे,
मायबोली म्हणजे मराठवाडा नाही. जे मराठवाड्यात सर्रास चालते ते कुठेही सर्रास चालते असा ग्रह करून घेण्याआधी जरा चौफेर आढावा घ्यायला नको का? काही ठिकाणी 'च्यायला' या शब्दाचा अर्थ 'कोणाच्यातरी आईला काहीतरी' असा होतो. तेव्हा बेताल बडबड कोण करत आहे याची सर्वप्रथम तटस्थ शहानिशा करून घ्या.
मी कोणाचा गुरू तर होऊच शकत नाही, पण मला कोणी आपला शिष्य वगैरे असावा असेही वाटत नाही. या अश्या पदव्या ते लोक इतरांना लावतात, ज्यांनी स्वत:च्या पदव्या अश्याच कोणालातरी गुरू आणि कोणालातरी शिष्य बनवून मिळवलेल्या असतात.
काळजी घ्या बिरुटे!
-'बेफिकीर'!
स्वत:ला आवरा...... गुगल पान
स्वत:ला आवरा...... गुगल पान जगभराचं आहे. मराठवाड्याचं नाही.
काळजी घ्या...!
-दिलीप बिरुटे
बिरुटे, तुम्हाला वैभव
बिरुटे, तुम्हाला वैभव कुलकर्णी 'बोअर' करत असतील तर त्यांच्याबाबतचा राग व्यक्त करताना माझा उल्लेख कशाला करता? क्रिस्टल क्लीअर बोलावे.
बेफिकीर आपण आपला माझ्याशी
बेफिकीर आपण आपला माझ्याशी काहीही संबंध नसतांना विनाकारण माझा किती ठिकाणी उल्लेख केला आहे, एवढ्यात विसरलात.
-दिलीप बिरुटे
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/44061 <<< येथील चर्चा:
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 20 July, 2013 - 18:12
च्यायला, आपली लेखनशैली परिचित होत चाललेली असल्यामुळे एखाद्या तरी शेराला दाद द्यावी असा प्रसंग जालीय आयुष्यात येतो की नाही अशी शंका यायला लागली आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 24 July, 2013 - 15:57
अर्रर्र... आपला प्रतिसाद वाचलाच नव्हता. (विचारपुसात लिंक डकवित चला. अधुन मधुन प्रतिसादाला, आपल्या रटाळ गझलांना आणि तुमच्या त्या स्टँडींग ओव्हेशन वाल्या गुरुला दाद देत जाईन)
या चर्चेत माझा काय संबंध???
आता 'ते मला उल्लेखून नव्हतेच' असे म्हणू नका
बेफिकीर आपण आपला माझ्याशी
बेफिकीर आपण आपला माझ्याशी काहीही संबंध नसतांना विनाकारण माझा किती ठिकाणी उल्लेख केला आहे, एवढ्यात विसरलात.
-दिलीप बिरुटे
<<<
लिंक द्यावीत.
(एकदा केल्याचा मात्र मला स्मरतो आहे, तीही लिंक दिलीत तर योग्य ते स्पष्टीकरण देईन किंवा माफी मागेन)
(बाकी वर मला 'बाळा बेफिकीर' असे संबोधण्याचा नैतिक, सामाजिक वगैरे अधिकार तुम्हाला कोणी दिला हे विचारण्याचे कष्ट घेत नाही आहे)
>>>> एकदा केल्याचा मात्र मला
>>>> एकदा केल्याचा मात्र मला स्मरतो आहे,
आभार. अजूनही हळुहळु स्मरण होईल. आता लिंका डकवण्याइतका मला वेळ नाही.
>>>>>बाळा बेफिकीर' असे संबोधण्याचा नैतिक, सामाजिक वगैरे अधिकार तुम्हाला कोणी दिला......
बाळा प्रेमाने म्हणालो होतो. आपल्याला आवडले नसल्यास यापुढे फक्त बेफिकीर म्हणेन.
-दिलीप बिरुटे
बाळा प्रेमाने म्हणालो होतो.
बाळा प्रेमाने म्हणालो होतो. आपल्याला आवडले नसल्यास यापुढे फक्त बेफिकीर म्हणेन<<<
मग हरकत नाही. प्रेमाने काहीही म्हणा! मीही प्रेमाने लब्बाड वगैरे म्हणेन!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
-----------------------------------------------
- बेफि, गझलेला प्रतिसाद दिल्यामुळे आता या बाफवर गझलेशी संबद्ध-असंबद्ध हव्या तेवढ्या पोस्टी टाकण्याचा मी माझ्याकडून तुम्हास दिल-ओ-जानसे मुक्तपरवाना बहाल करत आहे.
- मात्र, बिरुटेसरांसोबतचा वाद आपण अजिबात चिघळू न देता जाणिपूर्वक थोडक्यात आटोपता घेतला, असे वाटत आहे.
- थोडा आणखी पुढे चालेल अशी मी उगीच आशा बाळगून बसलो होतो.

- भ्रमनिरास केलात राव तुम्ही.
(भांडण पाहण्यासाठी अत्यंत उताविळ बाहुल्यासारखी स्मायली इथे टाकली आहे, असे गृहीत धरावे. )
बरीच चर्चा मिस झाली
बरीच चर्चा मिस झाली म्हणायची....
मी काही बोलू का ????? बिरुटे
मी काही बोलू का ?????
बिरुटे साहेब कशात तरी पी एच डी होल्डर आहेत हे समजत होते पण ते साहित्यात वगैरे विद्यावाचस्पती आहेत काय की भाषा या विषयात वगैरे ..पण त्यांचे काही लेखन वगैरे मायबोलीवर दिसत नाही ते !!
बरं त्याना कुणाचेतरी शेर अपील होत नाहीत हे समजले मग तेवढेच बोलून ते गप्प का बसत नाहीत लेखनाचा पाण उतारा की काय म्हणतात तो का करतात ??
माझे शेर अपील होत नाहीत तर त्यात काहीतरी तृटी जाणवत असणार त्याना मग त्या बद्दल काही मार्गदर्शन त्यांनी केल्यास मला बरे वाटेल किंवा माझे शेर त्याना अपील होण्यासाठी त्यात काय काय गुण असावेत त्याबद्दल त्यांनी मला काहीतरी सांगावे अशी विनंती
त्याचसोबत त्यांची एखादी गझल असल्यास त्यांनी सादर करावी अशी विनंती. रचना मला विचारपूसमधूनही कळवली तरी चालेल कविताही चालेल पण गझल मिळाल्यास अधिकच उत्तम कारण मला गझल्स जास्त चटकन आवडतात असा आजवरचा वैयक्तिक अनुभव आहे
धन्यवाद
प्रतिक्षेत .........
आपला ,
वैवकु
Pages