माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.
१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.
आठवली की लिहितो
यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.
एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.
तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?
<<<म्ह्णजे ,एखाद्या प्रसंगी
<<<म्ह्णजे ,एखाद्या प्रसंगी किंवा एखादी घटना घडत असताना ,मला असे वाटते की अरे हे आधी झालेले आहे ,माझ्या सोबत घडलेले आहे किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर असे वाटते कि इथे ह्या आधी मी आलेलो आहे.
>>>
असं माझ्या बाबतीतही अनेकदा घडतं.
मला नेहमी वेगवेगळी स्वप्न
मला नेहमी वेगवेगळी स्वप्न पडतात. पण बर्याचदा एक थीम असते
१. माझ्या स्वप्नात मी हिरो असते. इतरांना संकटातून सोडवते, मदत करते, मारामारीही करते आणि कधी कधी तर गुप्तहेरही असते
२. सार्वजनिक ठिकाणी अंगावर कपडे नाही आहेत आणि आडोसा शोधतेय. या स्वप्नामुळे खुप त्रास व्हायचा, माझ्यासारख्या इतरांना पाहून कमी होइल.
अजुन एक स्वप्न मला ४ वेळा पडलंय. माझे सगळे दात पडले आहेत. जेंव्हा जेंव्हा मला हे स्वप्न पडलंय तेंव्हा चहा प्यायल्यावर पाणी प्यायले होते.
रात्री जेवणात 'वशाट' खाल्यावर
रात्री जेवणात 'वशाट' खाल्यावर कसली स्वप्ने पडतात हो?
म्ह्णजे ,एखाद्या प्रसंगी
म्ह्णजे ,एखाद्या प्रसंगी किंवा एखादी घटना घडत असताना ,मला असे वाटते की अरे हे आधी झालेले आहे ,माझ्या सोबत घडलेले आहे किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर असे वाटते कि इथे ह्या आधी मी आलेलो आहे.
>>>
असं माझ्या बाबतीतही अनेकदा घडतं.>> देजा वू... माझ्याबाबतीत पण घडलंय कित्येकदा.
हायला!! कितीतरी स्वप्ने,
हायला!!
कितीतरी स्वप्ने, अनुभव सारखे आहेत लोकांचे! या स्वप्नांचा काही अर्थ, संबंध, संकेत असे काही असते का?
भारीच आहेत सगळ्यांची स्वप्नं.
भारीच आहेत सगळ्यांची स्वप्नं. आणि बर्याच जणांशी साधारण सारखीच आहेत.
पेपर आहे हेच माहीत नाहीये, अभ्यास वेगळ्याच विषयाचा केला गेलाय, हाईट म्हणजे सेमीस्टरला विषय होता हेच माहीत नसत. >> +१
इतरांची स्वप्ने वाचून अजून
इतरांची स्वप्ने वाचून अजून काही स्वप्ने आठवली
. पूर्वी पडणारी स्वप्ने - १.
.
पूर्वी पडणारी स्वप्ने -
१. मला स्पायडर मॅन सारखी ह्या भिंतीवरून त्या भिंतीवर उडी मारता येते.. व मी तशीच कुठेतरी इमारतींवरून उड्या मारत जातेय.
२. मी वर्षभर अभ्यास केलाच नाहीये आणि आज पेपर आहे (जे बरेचदा सत्य असे)
३. मी पाण्याशी स्पर्धा करत पळतेय, डोंगर दर्या ओलांडत आहे. (पाण्याचा रंग निळा,हिरवा, काळा, राखाडी, ह्यापैकी कुठलातरी)
आता १,२ पडत नाहीत फारशी!
सध्या केवळ मॅटरनल इन्स्टिंक्ट टाईप्स स्वप्ने पडतात.
१. गर्दीत लेकीचा हात सुटला
२. कठीण अश्या कड्यावर जाताना लेकीचा हात सुटला.
३. आम्ही कारने जाताना, बीचवर खेळताना अचानक त्सुनामी आली. (पुन्हा पाणी वेगवेगळ्या रंगाचे)
४. कोकणातल्या साकवावरून जाताना अचानक होऊर आला. (ह्याचे पाणी मात्र लालच)
छान धागा आहे. मला स्वप्ने तर
छान धागा आहे. मला स्वप्ने तर रोजच पडत असतात. मी ईथे अमेरीकेत आल्यापासुन ८-९ वर्षे रोज घरची..आई-बाबा, बहिणी, भाचे यांची रोज म्हणजे रोज स्वप्ने पडायची. आता तेवढी पडत नाहीत. पण आता ५ महिन्यापुर्वी माझे बाबा गेले. तेव्हापासुन पुन्हा आई-बाबांची स्वप्ने पडायला लागलीत.
इतर स्वप्ने... साप, ट्रेन चुकणे, देऊळ, स्वामी समर्थांची, शाळेतल्या मैत्रिणी, कुणीतरी पाठलाग करते, कधी कधी तर स्वप्नात आम्ही बहिणी गप्पा मारतो, हसतो असे चालले आहे. तेव्हा मी अर्धवट झोपेतही चक्क जोरजोरात हसत असते.
शक्यतो झोप लागण्याच्या स्टेज
शक्यतो झोप लागण्याच्या स्टेज मधे:
चालताना पायरी मिस होऊन (पाय प्रत्यक्षात हलल्यामुळे) जाग येणे
व्यवस्थीत झोपलेलो असताना:
जादूगार रघुवीर बंगल्याकडून बाजीराव रोड कडे ट्रायसिकलवर बसून जातोय, मागे दाट झाडी आहे (राणाप्रताप उद्यान अस्तित्वात आलेलं नाही), लवकरात लवकर पुढे गेलो नाही तर धोका आहे ही जाणीव, मी जीव तोडून पेडल मारतोय पण ट्रायसिकल खूप हळू चालतिये, अशात जाग येते, खूप धावल्यासारखा / सायकल मारल्यासारखा घाम आलेला असतो, पल्सरेट वाढलेला असतो
जाग येऊनही कन्टिन्यू होणारी स्वप्नः
मी एजंट आहे (विनोद टाईप्स) अन कुठल्याशा एअरपोर्टवर आलोय (दरवेळी हाच एअरपोर्ट असतो, कुठला आहे कोण जाणे). शहरात जाऊन काहितरी मिशन संपवून परत येऊन परतीचं विमान पकडायचं आहे. आजपर्यंत एकदाही विमान चुकलं नाहिये... कधी मदतीला लोकं असतात कधी नसतात. एकदा एअर फ्रान्सच्या विमानात (हेच का ते आपल्याला नाय ठाऊक) विंडो साईड सीटिंग ले-आऊट विंडो फेसिंग (आडव्या सीट्स) होता. ही स्वप्न नेहमी मधे अर्धवट जाग आली तरी कंटिन्यू होतात.
प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्वप्नः
़कुठल्यातरी (क्षुल्लक सुद्धा) प्रॉब्लेमचं सोल्यूशन दिसणं
सगळे दात निखळून पडणं हे
सगळे दात निखळून पडणं हे स्वप्न मला ही पुर्वी वारंवार पडायचं. आता नाही पडत. पण सांगता येत नाही पडू ही शकतं.
बाकी मला कोणतीच स्वप्न नेहमी पड्त नाहीत. नेहमी वेगळी वेगळी पडतात. कधी लख्ख आठवतात कधी नाही.
मस्त विषय आहे. अगदी
मस्त विषय आहे. अगदी जिव्हाळ्याचा वगैरे.
आयुष्यात 'एक्स्ट्रिम केस' आली तर काय, असा आपण सारखा विचार करत असतो. जरी नसलो (असं वाटतं, पण ते खरं नसतं) किंवा रोजच्या रूटीनमध्ये या गोष्टीला वेळ मिळत नसावा; पण सब-कॉन्शसमध्ये ती भिती/थ्रीट सारखी घर करून असतेच. नवरा/ बायको, आई / बाप, मुलं, मित्र मरणं (टचवुड..) किंवा भुकंप, जगबुडी होणे या फँटसीज आपण नकळत कधीतरी पाहिलेल्या असतात, आपल्या मेंदूच्या पडद्यावर. असं झालं तर काय- याचं उत्तर आता याक्षणी तरी माझ्याकडे नाही. आपण नेणीवेतून आणि त्याचं आऊटलेट म्हणून- स्वप्नातून, या गोष्टींची 'जमेल तशी' तयारी करत असतो, असं मला सारखं वाटतं. अशा एक्स्ट्रीम आपत्ती कधी आपल्याला जशाच्या तशा दिसतात तर कधी ट्रेन सुटणे / परीक्षेची वेळ संपणे / चुकीच्या पेपरची तयारी करणे, पायरी गहाळ होऊन पडणे/उंचावरून पडणे, छातीवर कुणीतरी बसून हलता किंवा बोलता न येणे, साप-नाग-भयानक प्राणी दिसणे.. अशा अनंत प्रकारच्या छोट्या स्वरूपात दिसतात. मी तर आजवर लाखो वेळा बघून चुकलो. माझ्या मते हे तुम्ही जिवंत, संवेदनशील आणि जागरूक (!) असल्याचं लक्षण आहे. 'इनसिक्युरिटीज्' ची यादी सतत करत राहायची आपली सवय लाखो वर्षे जुनी असेल! तर, अशा स्वप्नांतून 'बी प्रिपेअर्ड' असा मेसेज घ्या, 'सगळं ठीक होईल' असा घ्या किंवा 'रिलॅक्स, असं काही होणार नाही..' असा मेसेज घ्या. तुमच्यावर आहे.
'इंट्युशन' वर विश्वास नाही. पण 'देजावू' नेहेमीचंच.
बाकी, नंदिनी म्हणते तसं कथावस्तू आणि पात्रं असलेली आणि अत्यंत क्रिस्टल क्लियर आणि श्रीमंत स्वप्नं ही कधीतरी पडतात. मी माझ्या स्वप्नांत पर्सेपोलिस आणि पिसाच्या मनोर्यातही मला पाहिजे तसे बदल करून घेतले आहेत. आणि दगडांवरच्या रेषा-रंग, सुर्याच्या प्रकाशाचे कोन आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर अजूनही समोर दिसत असल्यागत स्फटिकासारखं स्वच्छ दिसतं. तिथंच वेरूळ दिसणं, आपलं एखादं प्रिय पात्र दिसणं हे नेहेमीचं. एकदा तर त्या दगडांना अदृष्य इंजिनं जोडली होती, आणि अख्खं दगडाचं स्ट्रक्चर स्वयंस्फुर्तीने आणि सजीव असल्यागत हलताना दिसत होतं..
वडिल गेले, तेव्हा अनेक वर्षे त्यांच्या स्वप्नांनी माझी साथ केली. रोज एक- या दराने ती येत होती. आता ती कमी झाली आहेत. घरात कुणालाच पडली नाहीत इतकी. (याचा अर्थ त्यांचं प्रेम नव्हतं असा नाही) आता बहुतेक ते कमी झालं. मी (आणि तेही) जरा शांत झालो असेन. मला सुटल्यासारखं वाटलं खरं, पण लगेच त्यांची स्वप्नं कायमची बंद तर होणार नाहीत ना- अशी भितीही वाटली.
'मी बघितलेलं स्वप्न' या विषयावर एका टिपिकल निबंधमालेतला एक निबंध आठवतो लहाणपणीचा. तो मी खूप वेळा वाचायचो, पुन्हापुन्हा. त्यात विशेष काही नव्हतं (म्हणजे आता वाटत नाही. तेव्हा ती भगवदगीता होती.) पण 'पुढचं स्वप्न पाहण्यासाठी मी झोप येत नसतानाही गोधडी पांघरूण झोपी गेलो' वगैरे वर्णन अजूनही लक्षात आहे. आता वाटतं, कुठचीही असू देत, पण 'स्वप्नं पाहू शकणं' हे एक वरदान आहे. तुम्ही जितेजागते असल्याचं तर आहेच, पण स्वतःला न्याय देण्याची धडपड करत असल्याचं, स्वतःला सतत सिद्ध करत राहण्याचंही.
साजिरा पोस्ट आवडली
साजिरा पोस्ट आवडली
साजिरा, पटलं.
साजिरा, पटलं.
देजा - वू - खूपदा होते. नक्की
देजा - वू - खूपदा होते. नक्की स्वप्नात बघितले का ते आठवत नाही पण एखादा प्रसंग पुन्हा अनुभवते आहे असे वाटते. काही जागा पण बघितलेल्या वाटतात. पण हे जे जाणवणे आहे त्याची तीव्रता शाळा-कॉलेजच्या वयात होते तेव्हा जास्त होती असे वाटते
मला पडणारी इतर स्वप्ने
१. खूप रस्ते - लहान, मोठे, मातीचे, कॉलनी मधले - वेगवेगळ्या स्वप्नांमधे वेग वेगळे रस्ते आणि 'एरीया' बघितल्या आहेत.
२. पायरी घसरून पडणे - नेहमीचेच आहे.
३. प्रवासाला जायचे आहे आणि बॅग भरलेली नाही, परिक्षा आहे पण अभ्यास झालेला नाही
४. आत्तापर्यंत अनेक घरांमधे राहिले आहे पण स्वप्नात माझे घर म्हणून कायम पहिले जुने घरच दिसते.
मला समुद्र दिसतो, पण
मला समुद्र दिसतो, पण विचित्रपण हा, की डोंगराच्या उंचीवर समुद्र, स्वच्छ पण उसळणार्या लाटा, आणि तरी त्यात लाटांमधेच मी जरा बाजूला उभी आहे, नि तरी बुडत नाही, सेफ आहे!
अजून म्हणजे न धुतलेली बाथरूम्स. याला कारण भुईंज-अतित या पुणे-कोल्हापूर बसरूटवरची खरोखरी घाण बाथरूम्स ज्याचा मी कमाल धसका घेतला!
पेपरची स्वप्नं क्वचित पडतात. एरवी जे काही हॅपनिंग असेल त्याप्रमाणे. पण एकूण स्वप्नं पडणं जरा कमी.
आणि एक अनुभव असा, की सलग २-३ वेळा फारच चक्रम, विचित्र स्वप्नं पडली तर नक्की मला पित्त झालेलं असतं. हेही क्वचितच. मग सूतशेखर मात्रेची गोळी घेतली की स्वप्न बंद!
.
.
साजिरा पोस्ट मस्त. मला
साजिरा पोस्ट मस्त.
मला अलार्म वाजल्यानंतर पडणारी स्वप्न होती
भराभर उठून सब्मिशन करतिये, मानेला , पाठीला रग लागेपर्यन्त ड्रॉइंग बोर्ड्वर काम करतेय वगैरे, आणि हे अगदी तपशिलासहेत. समांतर जाणिव असायची की हे स्वप्न आहे ,गधडे उठ आता मलाबरीच डिझाइन्स ,कन्सेप्ट्स या साखर्स्वप्नात सुचली आहेत.
अजूनही बर्याच विचारातल्या निरगाठी स्वप्नात सुटतात.
काही स्वप्ने सगळ्यांना पडतात
काही स्वप्ने सगळ्यांना पडतात पाहून आश्चर्य वाटले(बरं सुद्धा वाटले.. की आपण एकटे नाहीत)
१) साप दिसणे
२) परीक्षेला उशीर
३) पडले .. म्हणजे पडत नाही पण जिन्यातून एक पायरी चुकली म्हणून पाय लचकला व झोपेत खरोखर पाय हलतो व जाग येते... खरं तर दाणकन दचकते.
वरची स्वप्न शाळेत असताना वारंवार पडत.... चुकून अधून मधून पडतात आताश्या.. ते पण खूप त्रासले असेन तर.. तेव्हा मी ह्या सर्वांचा अर्थ शरीर थकले म्हणून पडतात असे समजून गप्प बसते. पण कुतुहल अजून हेच आहे की अशी का बरे पडतात? अजून ठोस उत्तर नाही.
अजून काही,
४)अतिशय दूर जंगलात फिरतेय एकटीच.. रस्ताच मिळत नाही.. पण खुष आहे एकटी फिरताना.
५)पैसे हरवलेत... पर्स विसरलेय... व शोधतेय.
६) घाण टॉयलेट दिसतात सगळीकडे(खूप विनोदी वाटते की असे का बर दिसत असेल..)
७) कुणीतरी अतिशय जवळचे आता दिसणार नाही म्हणून हमसाहमशी रडतेय... अगदी घाबरून रडत उठलेय व दोन मिनीटे कळत नाही की रात्र आहे का सकाळ व हे एक स्वप्न आहे. खूप घाबरलेय मी पण प्रत्येक वेळेला.
अजून बरीच पडतात पण नक्की आठवत नाही... की भितीदायक नसतात. जसें शाळेत दिवसभर खेळतच राहिले... त्याच शाळेच्या गणवेषात. कोणीच मारले नाही तरी वगैरे....
पण आजकाल कमीच पडतात. कह्रे तर मन शांत असेल तर पडतच नाही. तेव्हा मी हाच अर्थ घेते... स्ट्रेस असेल तरच स्वप्न. नाहीतर मटरनल चिंता..
>>केवळ मॅटरनल इन्स्टिंक्ट टाईप्स स्वप्ने पडतात.<< +१
असो..
म्ह्णजे ,एखाद्या प्रसंगी
म्ह्णजे ,एखाद्या प्रसंगी किंवा एखादी घटना घडत असताना ,मला असे वाटते की अरे हे आधी झालेले आहे ,माझ्या सोबत घडलेले आहे किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर असे वाटते कि इथे ह्या आधी मी आलेलो आहे.
>>> अगदी अगदी ... याला देजावू म्हणतात हे नंतर कळले...
बर्याच लोकांना साप दिसतात
बर्याच लोकांना साप दिसतात स्वप्नात
वाचुन खुप खुप बरं वाटल
मला मृत व्यक्तीची स्वप्न सारखी पडतात.. अन ती खुश असतात किंवा मला काहीतरी सल्ला देत असतात.. अश्या टाईप ची स्वप्न..
अमानवीय टाईप स्वप्न पन बरीच पडतात.. वर कोनी तरी लिहल आहे तस आधी आप्ण इथे आलो आहोत.. किंवा हेच वाक्य अधी पण स्वप्नात बोललो आहोत..
कोणासोबत हे घडलय का ????
स्वप्न पाह्तोय हे आपल्याला कळत असत पण आपण मुददाम पुर्ण जागे होत नाही.. कारण स्वप्न पुर्ण पाहायच असत.. मझ्यासोबत अस किती तरी वेळेला झाल आहे.. मी स्वप्न पाहत आहे पण तो ...त्यातला भयानक पणा किंवा तो आनंदाचा क्षण मला पुर्ण करायचा अस्तो.. मग मी उठतच नाही..
मला खूप वेळा मी काहीतरी उंच
मला खूप वेळा मी काहीतरी उंच ठिकाणावरून पडतोय असे स्वप्न पडते आणि दचकून जाग येते. बर्याच वेळा मी पलंगाच्या अगदी कडेला आलेला असतो तेंव्हा - अगदी पडण्याच्याच बेतात असतो.
<<<<स्वप्न पाह्तोय हे
<<<<स्वप्न पाह्तोय हे आपल्याला कळत असत पण आपण मुददाम पुर्ण जागे होत नाही.. कारण स्वप्न पुर्ण पाहायच असत.. मझ्यासोबत अस किती तरी वेळेला झाल आहे.. मी स्वप्न पाहत आहे पण तो ...त्यातला भयानक पणा किंवा तो आनंदाचा क्षण मला पुर्ण करायचा अस्तो.. मग मी उठतच नाही>>>
माझ्या बाबतीत हे सुद्धा ब-याचदा होतं.
अंकु, मी असं अनेक वेळा केलंय
अंकु, मी असं अनेक वेळा केलंय कारण पुढे काय होणार हे जाणून घ्यायचे असते
मला माझ्या आई बद्दल वाईट साईट
मला माझ्या आई बद्दल वाईट साईट स्वप्न पडत असतात नेहमी
मला वाटत आपल्याला जी स्वप्न पडलीयेत ना ती सकळी सकाळी उठल्या उठल्या रिकॉल केली तर कायमची लक्षात रहातात...
थोडा वेळ मध्ये जाऊ दिला की लक्षात रहात नाही
ट्राय करून बघा कधी
बाकी मल दर रात्री ३-४ स्वप्न तरी पडतातच... ज्याने माझी झोप पुर्ण होत नाही
माझ्या एका मित्राने सांगितल उश्याखाली कात्री ठेवून झोपत जा... मग स्वप्न पडत नाहीते
(कारण माहीत नाही.. त्यानेही ऐकलय हे कुठुन तरी)
पण माझ्याबाबतीत कात्रीनेही हार मानलीये
मला झोपेतून उठल्यावर जी कामं
मला झोपेतून उठल्यावर जी कामं करायच्येत, तीच मी करत्येय अस दिसतं पहाटे- पहाटे....आणि मग उठल्यावर....
हात तिच्या....हे सगळं व्हायचंच आहे होय अजुन !.....असं वाटतं
सकाळचे डबे वगेरे असे झाले स्वप्नात तर किती छान!
मलाही मी हवेत मस्त विहार करते
मलाही मी हवेत मस्त विहार करते आहे किंवा पाण्यात अतिशय आरामात पोहते आहे अशी स्वप्न बरेचदा पडतात. छान वाटतं अशी स्वप्न पडली तर, एकदम फ्रेश वाटतं.
माझ्या ओळखीची, पण एकमेकांच्या ओळखीची नसलेली माणसं अनेकदा एकत्र दिसतात.
काही स्वप्नांना खूप वेग असतो. एकापाठोपाठ एक अतिशय वेगवान घटना घडत असतात. पण जाग आल्यावर काहीही आठवत नाही.
आणि वर लिहिलंय तसं, स्वप्नात घर असेल, तर ते हमखास आमचं जुनं वाड्यातलं घरच असतं. ते घर अगदी लहान होतं. ते घर ज्यांनी कधी पाहिलंही नाही, असे खूप लोक त्या घरात आरामात रहात/ वावरत असतात. घरात काहीही अडचण होत नाही. हॅरी पॉटरमध्ये त्यांचे जादुई टेन्ट असतात, तसं ते घर स्वप्नात एक्स्पान्ड होतं
विचीत्र वाटेल वाचताना, पण
विचीत्र वाटेल वाचताना, पण लिहीतेच. विश्वास ठेऊ नका, एक मनोरंजन म्हणून वाचा. पण कदाचीत असे अनूभवायला मिळाले असेलच.
१) स्वप्नात कुणाचेतरी प्रेत दिसणे ही खूप शुभ घटना ( स्वप्न पहाणार्यासाठी) ठरते. पाहिजे तर ज्योतिष्यशास्त्रातील पुस्तक बघा.
२) स्वप्नात आपण जेवलेलो दिसलो तर दुसर्या दिवशी तब्येत बिघडते, म्हणजे अजीर्ण होते असे म्हणतात. मला याचा अनूभव नाही,पण घरच्या ज्येष्ठ सदस्यांना आहे.
३) स्वप्नात अडथळे पार करणे म्हणजे दुसर्या दिवशी किंवा येणार्या काळात आपली काही कामे सुरळीत झाल्याचा अनूभव येतो.
४) स्वप्नात साप आपल्याला चावलेला दिसणे ( विशेषतः पांढरा) म्हणजे धनलाभ होणार.
५) बाकी स्वप्नात खूप घाण दिसणे ( वर झंपीने लिहीलेले तसे) हा पण धनलाभाचा संकेत मानला जातो.
मी लिहीलेले काही स्वअनूभव आहेत आणी काही पुस्तकी त्यामुळे मनावर घेऊ नका. मजा म्हणून सोडुन द्या. नाहीतर अनिसवाले मलाच धरतील माबोवर अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल्.:खोखो:
खुप इंटरेस्टींग धागा. माझीही
खुप इंटरेस्टींग धागा.
माझीही बरीचशी स्वप्ने मिळती जुळती आहेत. कालच साप स्वप्नात आला म्हणून हा लगेच धागा उघडला. मोठठा साप आमच्या घराजवळच अगदी फिरत होता असे स्वप्न पडले.
मलाही पेपर आहे आणि आपण अभ्यासच नाही केला असे स्वप्न पडायचे बरेचदा.
मी खुप उंचावर चढतेय खाली पाहुन भिती वाटते असेही कित्येकदा स्वप्न पडते.
लहान असताना विमान येउन घराजवळ कोसळलय असे स्वप्न पडायचे.
सगळे दात निखळून पडणं हे
सगळे दात निखळून पडणं हे स्वप्न मला ही पुर्वी वारंवार पडायचं. आता नाही पडत.>>>>+१
Pages