युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक करता येइल म्हणजे ज्यूस बनवून रोज पिणे. त्यात मीठ मिरेपूड व हल्का चाट मसाला घालता येइल.

साल्सा डिप बनविता येइल. घरी पार्टी साठी.

http://www.sailusfood.com/2010/04/02/endu-tomato-pachadi-sun-dried-tomat...

http://www.sailusfood.com/2010/06/03/sun-dried-tomato-pickle-garlic-flav...

http://www.sailusfood.com/2008/08/25/tomato-pickle/

http://www.sailusfood.com/2012/05/25/chettinad-tomato-chutney-recipe/

यातले प्रकार ट्राय करा. ती चेट्टिनाड चटणी मी छोट्या पास्ता बरोबर इंडियन स्टाइल पास्ता सॉस म्हणून पण वापरते.

पालेभाजी जास्त शिजवली तर त्यातली पोषणमुल्य कमी होतात का? कधीतरी बाहेर खायची वेळ आली तर मी पालेभाजी जरुर घेते पण ति एकदमच मऊऊऊऊ शिजवलेली असते. Sad

sailu's food खरंच भारी आहे. ती फार फाफटपसारा न वाढवता चांगल्या पाकृ लिहीते. मी बर्‍याचदा तिचे फॉलो करते.

ती चेट्टिनाड चटणी बनवून पाहील. पण जास्त बनवून ठेवली तर किती दिवस टिकेल?

अमा, ज्युस मला एकटीलाच बनवुन प्यावा लागेल, जास्त कोणाला आवडत नाही.

पावसाळ्यात एकवेळ मऊ शिजवलेल्या पालेभाजीतली पोषणमूल्ये कमी झाली तरी चालतील पण नाहीत्या गोष्टी नकोत जायला अशी परिस्थिती असते.

कुठे विचारावे न कळल्याने इथे विचारते.
तोफु ( सोया-पनीर) मला पुण्यात शक्यतो कोथरुड / सिंहगड रोड भागात कुठे मिळेल ?

या वेळेस ट्राय करायला म्हणुन दुसर्‍या ब्रँडची म्युसली आणली ती आवडत नाहिये... Sad ६०० ग्रॅम च पाकिट आहे त्यात रेसिन्स, ड्राईड पपया वगैरे आहे.... मी जेमतेम २-३ सर्व्ज खल्ले बळेबळे... काहि करता येइल का या मुस्लीचं? इथे कुणाला द्यायचं म्हंटलं तरी पंचाईत असते...

या आठवड्याचा रेड व्हेलवेट केक चवीला मस्त झाला बीट रूट ने कलर पण बॅटर स्टेज ला बरोबर आला मग रेसिपी प्रमाणे चॉकोलेट पाव्डर घातली तर बेक केल्यावर कलर चॉकोलेट रेड असा काहीतरी मधलाच आला. या वीकांताला विदाउट चॉकोलेट पावडर करून बघते. रीअल बटर घालू की व्हेजी ऑइल?

पिन्की८० बटाट्याप्रमाणेच एका मावेप्रु भांड्यात धुवून ५ मि हायपॉवरवर ५ मि ठेवायचे ५ मि स्टॅडिंग टाईम.

उद्या सकाळी भरली वांगी करायची आहेत. कोरडा मसाला आत्ता करणार. प्रेशर कुकरमधे करायची तर शिट्यांचं गणित काय असावं? मऊ हवीत, पण गिचका नको. कुकर उघडला की चमच्याने वाढून घेताना अख्खी लागतील अशी हवी आहेत. मोडायला नकोत. खरं म्हणजे चारच बारकी वांगी आहेत, पण वेळ कमी आहे त्यामुळे कढईत शिजत टाकून मधे मधे ढवळायला होईलसं नाही.

अर्धा वाटी पाणी, प्रेशर आलं कि बंद करायच शिट्टी कराय्ची नाही. तेल जास्त हव , कुकर छोटाच असेल ना एक-दोन लिटर चा? चार वांग्यांसाठी मोठा कुकर नको. कढईत करायची झाल्यास, पाण्याचे झाकण ठेवा, सारख हलवायची गरज नाही १०-१५ मि. शिजायला हवीत वांगी.

मी कोरडा मसाला वापरत नाही. बारीक चिरलेला कांदा, गूळ, ओला नारळ, गोडा मसाला वगैरे एकत्र केलेला मसाला असतो. भाजून बिजून घेत नाही. डाळ-भाताबरोबरच भरलेली वांगी वाफवून घेते. सगळ्यात वरच्या लंगडीत, पाणी अजिबात न घालता भरलेली वांगी ठेवायची. बरोबर होतात.
फोडणीत घातली की अक्षरशः एक वाफ पुरते सगळं सारखं व्हायला.

९, कोरडा मसाला म्हणजे काय काय घालणार त्यात?

छोट्या कुकरात फोडणी करून भरलेली वांगी त्यात परतून वांगी अर्धी (चारच वांगी आहेत तर अर्ध्यापेक्षा जरा
कमीच) बुडतील एवढं पाणी घालून दोन शिट्या... दुसरी शिटी होऊ लागली की ताबडतोब गॅस बंदच करायचा. कूकरची एक शिट्टी कमी पडते.

आता कुकरच्या शिट्या करू नका, गॅस वाचवा असे खरंतर आहे, पण सकाळच्या पारी गॅसपेक्षा वेळ वाचवणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं.

कोरडा म्हणजे अ‍ॅक्चुअली कोरडा नाही. घाईघाईत लिहिलं तसं. वर नीरजाने म्हटलंय तसं ओलं खोबरं, गोडा मसाला वगैरे भरायचं मिश्रण करून ठेवणार फ्रिजात. सकाळी ते वांग्यात भरून फोडणी करून कुकरमधे भाजी शिजवायची.

शिटी आणि मग दुसर्‍या शिटीच्या आधी बंद असं करून बघते. २ लिटरचा आहे कुकर.

मावेमधे पटकन होतात भरली वा.न्गी.
Bowl मधे रचुन फोडणी घालायची आणि Cling Wrap लावुन ३.५ min high power ठेवायचे.खुप छान होतात.

अमेरिकेत मोठे ओव्हन असतात २-३ खणाचे. त्यात एकदम २-३ भाज्या कोणी केल्या आहेत का?
नेहमीप्रमाणे गॅसवर फोडणी करून मोठ्या फोडी जराशा परतून घ्यायच्या. आणि मग ओव्हनसेफ भांड्यांमधे भाजी शिजायला ठेवायची. मी करून बघणार आहे हा प्रयोग.

भरली वांगी, पनीर, बटाट्याचा रस्सा, अशा भाज्या उत्तम होतात आणि तेही कमी तेलात. एक मैत्रिण नेहमी पार्टीसाठे करते.

ओव्हन मध्ये पनीर टिक्का कसा करावा? मी screwers मध्ये लावून कॉम्बो मध्ये लावलं (कूक + ग्रील) तर marination ला पाणी सुटलं आणि पनीर नुसतंच शिजलं. ग्रिलिंग effect नाही आला. ग्रीलच्या ऐवजी नुसतं preheat करूनही चांगलं होतं का पनीर टिक्का? यूट्यूब वर बघितलं असं.
ओव्हन preheat करताना वेळ सेट करावी लागत नाही ना? माझा ओव्हन वेळ विचारतोय. त्याशिवाय पुढे जातनाहीये. manual वाचून समजत नाहीये म्हणून इथे विचारतीये. काय वेळ द्यावी २०० डिग्री C ला?
कोणी सांगू शकेल का?

माझ्याकडच्या कुकरने आज वाकुल्या दाखवत माझी परीक्षा बघितली! Uhoh

वर तुम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कुकर लावला आणि तिसर्‍या मिनिटापासून दर २ सेकंदामागे एक फुसकी अर्धवट शिटी असा खेळ सुरू! शेवटी माझ्या अंदाजाने गॅसची आंच आधी कमी आणि मग पूर्ण बंद केली. नशिब जोरावर म्हणूनच घडली वांगी! Happy

मी तर एका गेट टू गेदरला वांगी आणण्याचं कबुल केलेलं. कुकरात भाजी केली चक्क वांगी नुसती चिरली आणि त्यात मसाला न भरता फोडणीत परतून घेतला, वांगी टाकली, थोडी वाफवून वरून पाणि घालून एक मोठी शिट्टी काढली. छान मिळून आलेली भाजी.

लाजो इतर कुठल्याही ब्~एटरवाल्या डिशमध्ये चमचा चमचा ढकल...कुणाला काही कळणार नाही.
मी अशा प्रकारे प्~अन्केकच्या पीठात काही नं काही (सात्विक) ढकलते...प्रत्येकवेळी चव थोडी बदलते. पण आम्हाला चालतं. तुला चवीच्या बाबतीत अशा adjustments चालणार असतील तर प्रयत्न कर.

थॅंक्स वेका.

मी देखिल नुसते ओट्स /प्लेन सिरीअल असेल तर ढकलते गं पराठ्यात, पॅन्केक्स, धिरड्यात वगैरे... पण या म्युसली मधे फ्रुट्स चे तुकडे, रेसिन्स, खोबर्‍याचे काप वगैरे आहेत... विकांताला त्याच्या कुकिज/मफिन्स करुन सोमवारी ऑफिसात मॉर्निंग टी ला न्यायचे ठरवले आहे Happy

Pages