माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.
१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.
आठवली की लिहितो
यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.
एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.
तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?
आयला, सगळ्यांनाच बरीच कॉमन
आयला, सगळ्यांनाच बरीच कॉमन स्वप्न पडतात हे आश्चर्यच आहे. खालची २/३ स्वप्ने मला नेहमीच पडतातः
- सार्वजनिक ठिकाणी आपल्या अंगावर कपडे नाहीत ,हे जाणवून ओशाळेपणा /लाज वाटणे व झोपमोड होणे>> नेहमीच पडतात
- खाली पडल्यासारखे वाटून जाग येणे >> असले पण
- साप (जास्त करुन नाग) मागे लागणे अथवा मी त्यांना मारणे>> सगळ्यात जास्त कॉमन
मला जाम शंका येतीय आता हा जो कोण स्वप्न पाडणारा असेल तो शॉर्टकट म्हणुन बर्याच जणांना एका वेळेस एकच स्वप्न दाखवत असेल (एकच प्रोग्रॅम बर्याच कॉम्प्युटर वर रन केल्या सारखा).
परवा मात्र खुपच वेगळ स्वप्न पडल, प्रुथ्वी अचानक सुर्याच्या गुरुत्वाकर्षणातुन मुक्त झाली, अचानक अंधारुन आल, प्रचंड थंडी पडली आणि आकाशात तारे अत्यंत वेगाने घावायला लागले. माझ्या अंगावर एक हात आला आणि नंतर आवाज, अहो उठा ७ वाजलेत.
मी अगदी धरती आणि आकाशाच्या
मी अगदी धरती आणि आकाशाच्या मधोमध झुल्यावर बसलेय आणि खूप उंच उंच झोका घेतेय अचानक एकदम उंचावर गेल्यावर मी पडते अस दिसत आणि दचकुन जाग येते …. हे अगदी लहानपणापासून नेहेमी दिसणारं स्वप्न आहे
मस्त उडत जायचे मी. खालचा
मस्त उडत जायचे मी. खालचा भूभाग अगदी स्पष्ट दिसायचा. कधी बिल्डिंग्जच्या वर जाऊन बसायचे. हे उडणं मी बरेचदा खूप एंजॉय करायचे.>>>मामी, मलाही असे स्वप्न पडते(कधीतरी)
परिक्षा, अभ्यास झाला नाही, अपूर्ण सबमिशन>>+१
साप दिसतात...पण ते काही करत नाहीत. मला सापाची खूप भिती वाटते. टिव्ही वर सापाबद्दल कार्यक्रम पाहिला, फोटो पाहिले कि ते हमखास स्वप्नात दिसतात.
दात पडल्याचे स्वप्न पडतात....आणि त्यानंतरच्या आठवड्यात काहितरी मोठा खर्च / खरेदी होतेच होते.
तशी स्वप्ने जास्त पडत नाहीत. वरिल स्वप्नां व्यतिरिक्त काही वेगळ असेल तर ते लक्षात राहत नाही.
सार्वजनिक ठिकाणी आपल्या
सार्वजनिक ठिकाणी आपल्या अंगावर कपडे नाहीत >>
हे पडायचं शाळेत असताना. कॉलेजला एखाद दुस-या वेळेला पडलं असेल. मला वाटतं होमवर्क झालेला नसणे किंवा आणखी काही कारणाने परिणामांच्या विचाराने हे स्वप्न पडत असेल. स्वतःची फजिती होण्यामागे काही मानसशास्त्रीय कारणं. असतात असं ऐकलय. गुगळायला पाहीजे. इथल्या स्वप्नांचे कुणाला परंपरागत, मानसशास्त्रीय अर्थ देता आले तर अजून मजा येईल.
शेवटच्या पेपरला न पोहोचणे हे स्वप्न परीक्षा झाल्यावरही पडत रहायचं दहावीच्या प्रचंड टेण्शननंतरही पडत होतं. अतिताणामुळे हे स्वप्नं पडतं हे वाचलय कुठेतरी.
मी काही वर्षापुर्वी माझ्या
मी काही वर्षापुर्वी माझ्या स्वप्नात सारख्या हलणार्या, पडणार्या दातामुळे वैतागुन एक पुस्तक वाचलं होतं- स्वप्न अन त्याचा मानसिक स्थितीशी संबंध असं काहीतरी. त्यामध्ये काही मजेशीर भाग होते. खखोदेजा. ते मी नंतर इथे लिहिन. तोपर्यंत अजुन स्वप्नं येऊ द्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वप्ने ब्लॅक अँड व्हाईट
स्वप्ने ब्लॅक अँड व्हाईट असतात की रंगीत?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला एकदम डीटेलमधे स्वप्नं पडतात. बरीचशी स्वप्नं दुसर्या दिवशी सकाळी लख्ख आठवतात. स्वप्नांना ठराविक कथावस्तू देखील असते, वेगवेगळी लोकं असतात. सतत एकच स्वप्न पडले असे मात्र होत नाही. रोज वेगवेगळी स्वप्न.
घरामधे घडणार्या एखाद्या मोठ्या घटनेच्या (चांगल्या वाईट कशाही) स्पष्ट संकेत मला स्वप्नातून दिसतात. वडलांचा अपघात झाला होता तेव्हा त्यांना जसं हॉस्पिटलमधे अॅडमिट केलं होतं (बँडेज, सलाईन, त्यांच्या शरीराची थरथर, त्यांची बडबड) हे सर्व मला जसेच्या तसे आदल्या रात्री स्वप्नात दिसले होते. (अपघात १५ जानेवारीला झाला) मी हे स्वप्न संक्रांतीच्या दिवशी माझ्या रूममेटला सांगितले होते.
आम्ही घर विकत घ्यायच्या आधी मला स्वप्नांमधे मी रोज फरशी पुस्ताना दिसायचे वर आईला ओरडून "मला कामवाली म्हणून ठेवायला घर घेतलंस काय?" असं विचारायचे. घर घेतल्यावर थोड्याच दिवसांनी आईचा पाय मुरगळल्याने मलाच फरशी पुसावी लागायची.
सुनिधीचा जन्म व्हायच्या आधी बारा तास मला स्वप्न पडलं की आम्ही नवरात्रीतून सर्व देवीच्या ओट्या भरल्या होत्या, पण नाचण्याच्या देवीची ओटी भरायची राहून गेली होती म्हणून आई आणि मी जाऊन ओटी भरून आलो आणि येताना देवी आमच्यासोबत घरी आली.. आईला रात्री दोन वाजता उठवून मी हे स्वप्न सांगितलं तेव्हाच आई म्हणे मुलगी होणार बहुतेक...
असे बरेच आहेत किस्से.
हे खर्या घटनांचे संकेत
हे खर्या घटनांचे संकेत मिळण्याची डिटेलवार स्वप्न माझ्या आत्याला पण पडतात. तिच्या स्वप्नात देव वगैरे येतात. तिची स्वप्ने ऐकणं हे फारच रंजक असतं.
मला पण एकदा दात पडण्याचं स्वप्न पडलं होतं. मी सिंक पाशी चूल भरण्यासाठी गेले आणि सगळेच्या सगळे दातच पडले.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बाकी ते उंचावरुन पडण्याचं पण पडतं अधून मधून.
दात पडण्याचं स्वप्न पडल्यावर मात्र मी जाम टरकले होते.
http://www.huffingtonpost.com
http://www.huffingtonpost.com/2011/07/13/dreams-about-being-naked_n_8914...
http://www.world-of-lucid-dre
http://www.world-of-lucid-dreaming.com/30-common-dream-symbols.html
झोपेच्या सुरुवातीच्या
झोपेच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये अर्धवट स्वप्न पडून त्यातच उंचावरुन पडल्यासारखे वाटून दचकून जाग येणे ह्याला शास्त्रीय भाषेत काहीतरी नाव आहे.
मला खूप विचित्र आणि वेगवेगळी स्वप्नं पडतात. बहुतांशी ती दिवसभरात घडलेल्या घटना किंवा मनात चाललेल्या विचारांशी निगडीत असतात. असे असले तरी ते स्वप्न काहीच्याकाही अतर्क्य असते. त्यातली काही दुसर्या दिवशी उठल्या-उठल्या आठवतात. नंतर मात्र विस्मरणात जातात.
टण्या + १००. शिकत असताना पडली नाहीत, आता मात्र अधूनमधून उद्यावर परीक्षा आलीय, अभ्यास काहीच झाला नाही असे स्वप्न पडते. जाग आली की हे खोटे आहे हे जाणवून हुश्श होते.
अरे मघाशी सांगायला विसरले.
अरे मघाशी सांगायला विसरले. प्रत्यक्ष आयुष्यात अंगावर पाल पडून झाली त्यामुळे तसलं स्वप्न पडत नाही.
(पण पास झाले बै! हुश्श्य)
प्रत्यक्ष आयुष्यात शाळेत गेल्यावर लक्षात आलं की आपण फक्त इतिहासाचाच अभ्यास केला. ना. शास्त्राचा कंप्लीतली विसरलो त्यामुळे तसली स्वप्न पण पडत नाहीत
मला मधे बरेचदा स्वप्नात वाघ
मला मधे बरेचदा स्वप्नात वाघ दिसायचे. माझ्या अगदी जवळ आणि मला भीती वगैरे काही वाटत नाही आहे असे. बरेचदा मला स्वप्न पाहताना कळते की आपण स्वप्न पाहत आहोत आणि हे काही खरे नाही. ह्यालाच ल्युसिड ड्रिमिंग म्हणतात हे एवढ्यातच कळाले.
नंदिनी त्याला प्रिमोनिशन
नंदिनी त्याला प्रिमोनिशन म्हणतात किंवा सर्वमान्य भाषेत इंट्युशन ( अंतःप्रेरणा).:स्मित:
मध्यंतरी मला नासिकला एका परिचितांकडे गप्पा मारतांना पाश्चात्य ज्योतिष्यतज्ञ किरोविषयी माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सांगीतले की किरोच्या पुस्तकात अंकशास्त्राच्या माहितीत हा प्रिमोनिशनचा उल्लेख आहे. कारण त्यांच्या मुलीला पण असे एक दोन अनूभव आले होते.
सॉम आणि अॅपमॅक चे पेपर
सॉम आणि अॅपमॅक चे पेपर सोडवले तरच हा प्रोजेक्ट तुम्हाला देउ अस स्वप्न पडल होत मला. खरतर ही पुस्तक माझ्या आर्कीटेक्चर च्या कोर्सला एक सेम ला होती. तेव्हा कधी ते झेपत नहीये अशी परिस्थितीही नव्हती. पण स्वप्नात मात्र आता काही हा प्रोजेक्ट मिळत नाही अस फिलिंग आल होत.
साप, ओलसर दमट गाभारे आणि शैकराच देउळ त्यात्ला उदबत्ती, फुलांचा वास हे तर बर्याच दा पडणारे स्वप्न. दमट्पणा आणि वास अगदी जाणवतात.
स्वप्न दोश !
स्वप्न दोश !
मला ते उडण्याचं स्वप्न
मला ते उडण्याचं स्वप्न बर्याचदा(खरतर नेहमी) पडते.
काय तर, मला उडण्याचे कौशल्य अवगत झाले आहे. जेव्ह्ढे जोरात हात खाली मारतो (पोहतांना मारतो तसे) तेव्हढे उंच जाणार, आणि खाली येण्यासाठी हात वर मारले की जमीनीवर. मग कोणाला ईम्प्रेस करण्यासाठी उगीच ऊडणार.
आणखी एक स्वप्न पडते की, एखादी क्लीष्ट संज्ञा/थेअरी/कॉन्सेप्ट ई. मला समजलेली आहे. ती मी शोधली आहे.
कधी कधी गाणे/कविता/कथा सुचतात आणि समजते की हे स्वप्न आहे आणि आपण हे लक्षात ठेउन, ऊठल्यावर लिहावे/म्हनावे. पण उठल्यावर काहीच लक्षात राहत नाही.
गाडी चोरी झाली किंवा पार्किंग केलीय, परत आलो तर सापडत नाही.
भारी आहेत एक एक स्वप्न... मला
भारी आहेत एक एक स्वप्न...
मला एकदम डीटेलमधे स्वप्नं पडतात. बरीचशी स्वप्नं दुसर्या दिवशी सकाळी लख्ख आठवतात. स्वप्नांना ठराविक कथावस्तू देखील असते, वेगवेगळी लोकं असतात. सतत एकच स्वप्न पडले असे मात्र होत नाही. रोज वेगवेगळी स्वप्न<<<< + १
आमच्या घरासमोर मोकळे पटांगण होते तिथे विमान क्रॅश झालय हे स्वप्न मात्र मला ३-४ वेळा पडलय....
स्वप्नात ओळखीची माणसं असतात पण ती वेगळी दिसतात... मी स्वतःचा चेहरा माझ्या स्वप्नात कधीच पाहिला नाहिये.
काहितरी समारंभ चालु असतो... पूजा असते.. पण देवाचे दर्शन मात्र होत नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मलाही नंदिनीसारखी काहि स्वप्न आठवतायत जी येणर्या घटनांचे संकेत देतात...
अगदी रिसेंटली पडलेलं एक हास्यास्पद स्वप्न....
मी (असावी कारण माझा चेहरा दिसत नाहिये) हातात ब्रेड रोल घेऊन जीवाच्या आकांताने धावत्येय आणि माझ्या मागे एक भला मोठा कुत्रा धावतोय.... मागुन कुणीतरी सांगतय... दे फेकुन तो ब्रेड.. कुत्र्याला घाल तो ब्रेड... शेवटी मी ब्रेड टाकुन देते.... स्वप्न फिनीश... दोन दिवसांनी काहि कारणाने मी डॉक्टरकडे गेले तर तिने मला 'सध्या काहि दिवस ब्रेड खाऊ नकोस' असे सांगितले
१० वी चा रिझल्ट लागायच्या २ दिवस आधी मला स्वप्नात ५४.८ टक्के मिळाले असं स्वप्न पडलं होतं
घाबरुन रडायचे बाकी होते... प्रत्यक्षात मला ८४.५ टक्के मिळाले
फक्त आकड्यांची आदलाबदल.... बहुतेक मी स्वप्नात उलटे वाचले ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला स्वप्नात अनेकदा माझ्या
मला स्वप्नात अनेकदा माझ्या ओळखिच्या अशा व्यक्ती एकत्र दिसतात ज्यांना मि ओळखते पण ते प्रत्यक्शात एकमेकाना ओळखत नाहित.
मला बरेचदा मी मुख्यमंत्री
मला बरेचदा मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाल्याचे स्वप्न दिसए आणि मी स्वप्नात बघितलेल्या काही स्कीम्स प्रत्यक्षातही उतरतात. (नुकतीच वेटींग तिकिट- नो ट्रॅव्हल).
माधान्य भोजन ही योजना अक्षयपात्र या संस्थेकडुन खुपच चाम्गल्या पद्दतीने चालवली जाते. अगदी आधुनिक यंत्रे वापरुन भात आणि भाजी (साम्बर) बनवला जातो, तसं देशभरात झालय आणि शासकीय शाळांचा दर्जा इतका चांगला केलाय की इंटरनॅशनल स्कुल्समधुन विद्यार्थी शासकीय शाळेत जात आहेत.
असं खरच होईल का?
१० वी चा रिझल्ट लागायच्या २
१० वी चा रिझल्ट लागायच्या २ दिवस आधी मला स्वप्नात ५४.८ टक्के मिळाले असं स्वप्न पडलं होतं अ ओ, आता काय करायचं घाबरुन रडायचे बाकी होते... प्रत्यक्षात मला ८४.५ टक्के मिळाले स्मित फक्त आकड्यांची आदलाबदल.... बहुतेक मी स्वप्नात उलटे वाचले >>> वॉव!!!
चालणे किंवा धावण्या ऐवजी
चालणे किंवा धावण्या ऐवजी मोठमोठ्या उड्या मारत (40-50 फुट) जाणे >>> अरे हो की असंच स्वप्न मलाही पडायचं.
आणि मी खाली येताना तरंगतच यायचो. हे स्वप्न मी खुप एन्जॉय करत होतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
उडण्याचं स्वांतन्त्र्य खुप मस्त...
लग्न झाल्यापासुन हे असं स्वप्न पडलं नाहिये पण.
पाय जमिनीवर आलेत आता.
र मोकळे पटांगण होते तिथे विमान क्रॅश झालय >> हे एकदोनदाच मला पडलय असं स्वप्न.
कोल्हापुरातल्या घराच्या बाजुलाच एक मोठ शेत होतं. त्या शेतात विमान पडलय अस स्वप्न होतं.
पण सारखं नाही पडत असं स्वप्न...
१. बरयाचदा साप दिसतात
१. बरयाचदा साप दिसतात स्वप्नात.
२. अनेकदा मी कशामधेतरी अडकून पडलेय असा पण दिसतं.
कोणाला अर्थ माहित असल्यास प्लिज इथे पोस्ट करा.
सार्वजनिक ठिकाणी आपल्या
सार्वजनिक ठिकाणी आपल्या अंगावर कपडे नाहीत ,हे जाणवून ओशाळेपणा /लाज वाटणे व झोपमोड होणे>> नेहमीच पडतात>>>>>> हो मलाही बर्याचदा असं स्वप्न पडतं
पाय घसरुन पडल्याने जाग येणे, साप, दात दुखतोय, दात पडलाय, परीक्षा आहे आणि अभ्यासच झाला नाहीये ही पण नेहमीचीच.
शरद उपाध्यांच्या राशीचक्र
शरद उपाध्यांच्या राशीचक्र पुस्तकात स्वप्नांवर एक लेख आहे. त्यात सांगितले आहे की स्वप्ने दोन प्रकारची असतात "सुचक" आणि "भासक"
भासक स्वप्ने - मेंदूच्या खेळामुळे पडतात.
सुचक स्वप्ने - यात भविष्याविषयी काही संकेत असतात.
वर नंदिनीने सांगितलेली स्वप्ने "सुचक" प्रकारातील असावीत.
मला वरचेवर पडणारी स्वप्ने: मी
मला वरचेवर पडणारी स्वप्ने:
मी माझ्या शरीरातून विलग होऊन तरंगत आहे. कधी हवेतच पोहत आहे असे वाटते. खाली माझे शरीर पाहून मी मेलो की काय अशी भीती वाटते आणि जाग येते.
कधी तरी डोंगरावरून घरंगळत खाली पटतोय असे वाटते आणि मग जाग येते.
वर उल्लेखलेले टॉयलेटवाले स्वप्नपण अनेकदा पडते.
मला हे दात पडायचं स्वप्न का
मला हे दात पडायचं स्वप्न का पडत असेल नेहमी???
माझ्या बाबांना नेहमी अशी स्वप्न पडायची.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
१)बस/ ट्रेनमधे चांगली बसायला जागा मिळालेली असतांना ते काहीतरी कारणासाठी उतरुन खाली जातात. आणि बस सुटते.
२)खुप खुप एकात एक रुम्स आहेत. एक दरवाजा उघडुन आत शिरले की त्या रुमला अजुन २-३ दरवाजे, आतल्या रुममधे उघडणारे. (थोडक्यात त्या 'तकेशीज कॅसल' किंवा भुलभुलैया सारखे). आणी बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही...इ.इ.
३) दिल्लीच्या चांदनी चौकसारखा एरिया...जिथे दोन्ही बाजुंनी उंचच उंच इमारती आहे. आणि काही दंगाधोपा झाल्यासारखं वाटतं. पळापळ होते. पण तिथुन पळायलाच जागा नाही.
एक आठवणीतले स्वप्न: शाळेत
एक आठवणीतले स्वप्न:
शाळेत असताना भुगोल+अर्थशास्त्राचा पेपर होता. भुगोलाचा अभ्यास झाला होता पण अर्थशास्त्राचा (नावडता विषय असल्याने) काहीच अभ्यास झाला नव्हता. रात्री फार झोप येत होती आणि टेंशन पण होते. कसाबसा अर्थशास्त्राचा एक धडा केला आणि झोपलो.
स्वप्नात मला शाळेत अर्थशास्त्राचा तास चालू आहे. सर शिकवतात असे दिसत होते. सकाळी पेपर लिहिताना मला अर्थशास्त्राची उत्तरे अगदी लख्खपणे येत होती. खूप आश्चर्य वाटत होते तेव्हा.
मला ३-४ वर्षांपूर्वी, आपण
मला ३-४ वर्षांपूर्वी, आपण शंकराच्या देवळात गेलोय, पाण्यातुन चालत , कधी मी एकटी, किंवा कधी नवर्यासोबत असे स्वप्न वारंवार पडायचे. आईच्या सांगण्यावरुन जवळच्या शंकराच्या मंदिरात जाऊन नारळ वगेरे देऊन आले, तिथपासून ते स्वप्न परत नाही पडले. काय योगायोग आहे कोणास ठाउक!
बाकी, पाय घसरुन पडल्याने जाग येणे, साप, दात पडलाय, परीक्षा आहे आणि अभ्यासच झाला नाहीये किंवा पेपर लिहूनच होत नाहिये ही पण नेहमीचीच.
मजा आहे राव. पण माझा काही तरी
मजा आहे राव.
पण माझा काही तरी लोच्या दिसतोय ..(नाही नाही मला ही स्वप्न पडतात)
स्वप्नात सगळे ओळखीचे ,क्वचित अनोळखी पात्र,ठिकाण दिसतात. विशेष म्ह्णजे बर्याच वेळा ते स्वप्न खर्या जिवनात को रिलेट होताना दिसतात.
म्ह्णजे ,एखाद्या प्रसंगी किंवा एखादी घटना घडत असताना ,मला असे वाटते की अरे हे आधी झालेले आहे ,माझ्या सोबत घडलेले आहे किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर असे वाटते कि इथे ह्या आधी मी आलेलो आहे.
म्ह्णजे ,एखाद्या प्रसंगी
म्ह्णजे ,एखाद्या प्रसंगी किंवा एखादी घटना घडत असताना ,मला असे वाटते की अरे हे आधी झालेले आहे ,माझ्या सोबत घडलेले आहे किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर असे वाटते कि इथे ह्या आधी मी आलेलो आहे.
>>>
हे अगदी असच माझ्याबाबतीतही अनेकदा झालेय. कॉलेजला जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा वाटले होते की कधीतरी ही इमारत, जागा पाहिली होती. इथे आधी आलो होतो.
Pages