नुकताच पुन्हा एकदा दिल्ली - आग्रा प्रवासाचा योग आला. यमुना एक्स्प्रेसवे या देखण्या रस्त्यावरून प्रवास करताना मज्जाच येते. या रस्त्यामुळे दिल्ली - आग्रा हा चार तासांचा प्रवास दोन तासात करता येऊ लागला आहे.
तीन पदरी + तीन पदरी, लांबचलांब पसरलेला हा रस्ता, आजूबाजूला मोकळी जागा, शेतं, छोट्या वस्त्या, विटांच्या भट्ट्यांच्या चिमण्या .... हे सगळं नजरेत साठवून घेता घेता प्रवास चुटकीसरसा संपतो.
मध्येच एका टप्प्यावर - ग्रेटर नॉयडामध्ये - लागतं - बुद्धा सर्कीट. फॉर्म्युला वन कारच्या रेसिंगकरता तयार करण्यात आलेला इंटरनॅशनल लेव्हलचा ट्रॅक. आग्र्याहून दिल्लीला परतताना हे रस्त्याच्या डावीकडे दिसतं.
काही वर्षांतच आजूबाजूची मोकळी जागा भरून जाईल. मोठेमोठे रेसिडेंशियल, शॉपिंग कॉप्लेक्स होतील. काहींच्या जाहीराती लागल्याच आहेत. डिस्ने थीमचा एक रेसिडेंशियल कॉप्लेक्स येऊ घातलाय.
आग्र्याच्या आणखी जरा पुढे असलेल्या टुण्डला येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट येणार असल्याची घोषणा केली गेली आहे.
हे होईल तेव्हा होईल आणि होईलच. पण तोवर सध्यातरी हिरव्यागार शेतांना बाजूला घेऊन धावणार्या यमुना एक्स्प्रेस वे ची काढलेली प्रचि तुमच्याबरोबर शेअर करत आहे. काही प्रचि सप्टेंबर २०१२ मधील आहेत तर काही जुलै २०१३ मधील आहेत.
बुद्धा सर्कीट
.
.
मामी, किती प्रवास करतेस?
मामी, किती प्रवास करतेस?
मस्त आहे एकंदरित दिल्ली हे
मस्त आहे एकंदरित दिल्ली हे एक वेगळेच प्रकरण आहे असे ऐकून आहे ( रस्ते मोठे, राजेशाही, राजधानीला साजेसे वगैरे )
टू व्हीलर्स ना परवानगी आहे का ह्या हायवेवर ?
येस्स, भारतात या रस्त्यावर
येस्स, भारतात या रस्त्यावर मला गाडी चालवायची आहे.
फोटो मस्त आलेत
फोटो मस्त आलेत
फॉर्म्युला वन रेसिंग
फॉर्म्युला वन रेसिंग ट्रॅकपर्यंत प्रवास केलाय ह्या रस्त्यावर, त्यापुढे मात्र अजून गेलो नाही. खरंतर एखाद्या विकेंडला सहज जाता येण्याजोगं आहे.
रेसिंग ट्रॅक मात्र मस्त आहे. मला कधीच फॉर्म्युला वन मध्ये इंटरेस्ट नसूनही तिथे रेसिंग बघताना मजा आली होती.
काही वर्षांतच आजूबाजूची मोकळी जागा भरून जाईल. मोठेमोठे रेसिडेंशियल, शॉपिंग कॉप्लेक्स होतील. काहींच्या जाहीराती लागल्याच आहेत. डिस्ने थीमचा एक रेसिडेंशियल कॉप्लेक्स येऊ घातलाय.>>> अजूनतरी इथे जागा बुक करणं आटोक्यात आहे. रेट्स खूप कमी आहेत. पण एकूणच युपीमधल्या गुंडागर्दीमूळे ग्रेटर नोयडामध्ये सुद्धा गुंतवणूकीसाठी घर घ्यायची जरा भिती वाटते. हे तर त्याही पुढे आहे.
वॉव छान आहेत फोटो! राम कपूर
वॉव छान आहेत फोटो!
राम कपूर आणि साक्षी तन्वरची अॅड आठवली
अरे वा, मस्त दिसत आहे
अरे वा, मस्त दिसत आहे एक्स्प्रेस वे ..
डिसेंबरं मधे याच रस्त्यावरुन
डिसेंबरं मधे याच रस्त्यावरुन प्रवास केलाय. अजिबात गर्दी नव्हती.गाडी रेंट्ने घेतली होती पण ड्रायवर ७०/८० च्याच स्पीड्ने गाडी चालवत होता.स्पीड वाढवु नये म्हणुन काही लॉक असते का?
एक नवीन अनुभव ,छान . (डिसेँबर
एक नवीन अनुभव ,छान . (डिसेँबर जानेवारीत इकडे मोहरीची शेते फुलांवर पिवळी असतांना पूर्वी जुन्या रस्त्याने गेलो होतो ). पुढे कधी इटली ,जर्मनी ऑस्ट्रिया मध्ये मामी गाडी चालवाल त्याचेपण फोटो दाखवा .
असले रस्ते आपल्या भारतात कधी
असले रस्ते आपल्या भारतात कधी होतील?
मस्त फोटोज , पाभे भारतातलाच
मस्त फोटोज , पाभे भारतातलाच आहे की तो रस्ता , अर्थात सगळीकडे व्हायला बरीच वर्ष लागतील म्हणा.
मस्त हायवे आणि फोटो
मस्त हायवे आणि फोटो
एक्सप्रेस हायवेवर टु व्हीलर बघुन दचकलोच.
मला पुणेरी दुचाकीकर मावळे आठवले.
हल्लाबोलच होइल तिकडे जर अलाउड असेल तर..
माझी एक दिल्लीवाली दोस्त
माझी एक दिल्लीवाली दोस्त सांगत होती.. की भैय्या लेगा कौन ऐसे जगह पे घरं? गाडी पार्कींगमें नही लगायी तोह छुरा घोप देते हैं, पागल लोंग हैं वहा के | नये नये पैसे और पुराने खयालात |
खखोदेजा
मस्त फोटो! आग्र्याचे फोटो पण
मस्त फोटो!
आग्र्याचे फोटो पण टाक.
मस्त रस्ता आहे. आपल्या
मस्त रस्ता आहे.
आपल्या मुंबईचा फ्री वे पण मस्त झालाय. कुर्ला ते माझगाव, २० मिनिटात जाता येतेय.
अरे व्वा! मामी, मस्तच झालाय
अरे व्वा! मामी, मस्तच झालाय हा फ्रीवे! GBB technology जिंदाबाद!
मस्त आहेत फोटो. पुणे-मुंबई
मस्त आहेत फोटो.
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे नवीन होता तेव्हा असाच पांढराधोप, गुळगुळीत, प्लेन इ. दिसायचा. आता त्यावर अगणित ठिगळं लागली आहेत
टोलही दणदणीत. रीटर्न टोल
टोलही दणदणीत. रीटर्न टोल रुपये ५१०/- आहे.
आमचा ड्रायव्हर चांगला १२० च्या स्पीडनं (आणि आमचं लक्ष नसेल तर १५० च्या स्पीडनं) जात होता. वाटेत तीन टोलनाके लागतात. पहिल्या टोलनाक्यावरची रिसीट दुसर्यावर दाखवली तर त्यानं लगेच स्पीडचा अंदाज घेऊन दम भरला ड्रायव्हरला.
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
मंजूडी, यावेळी आग्र्याला जाणं
मंजूडी, यावेळी आग्र्याला जाणं झालं नाही. पुढच्या वेळेस नक्की!
यावेळी शिकोहाबादहून पुढे चंबळ नदीवर गेलो. तिथे भरपूर प्रमाणात सुसरी आहेत. मात्र पावसाळ्यात नदीचं पात्रं फुगतं त्यावेळी त्या आत चिखलात दडून बसतात. हिवाळ्यात बाहेर येतात. चंबळाच्या खोर्यात जाताना जरा भीतीच वाटत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरट-पिवळ्या मातीचे ढीग. यातच काही ठिकाणी गुहा सदृश लहान लहान जागा दिसत होत्या.
बटेश्वर नावाच्या गावात यमुनेच्या तीरावर शंकराचं एक प्राचीन मंदिर आहे. याव्यतिरिक्त छोटी छोटी अशी आणखी १०० मंदिरं आहेत म्हणे. त्यामुळे ते गाव १०१ मंदिरांचं गाव म्हणून ओळखलं जातं. बटेश्वर मंदिरासमोरच्या मातीच्या टील्यामध्ये बांधलेलं घर.
सैल, मऊ माती. त्या आधी दोन दिवस पाऊस पडला नाही म्हणून ठीक नाहीतर पावलं पावलं खोल चिखल झाला असता. ही घरं कशी काय बांधतात आणि कशी काय टिकतात देव जाणे.
बटेश्वरपासून काही अंतरावर जरार येथे चंबळ सफारी लॉज आहे. अनेक परदेशी मंडळी इथे येऊन, राहून सुसरींचा अभ्यास करतात. आमची एका दिवसाची ट्रिप असल्याने तिथे जाता आलं नाही. पण तिथे जाऊन राहिल्यास पक्षी निरीक्षण, स्टीमरमधून चंबळ नदीची सफर करता येते. तिथे अनेकानेक प्रकारचे पक्षी दिसतात.
हा सगळा परीसर यमुना आणि चंबळ अशा दोन नद्यांच्या मधे येतो. आम्ही पुढे नदगावन नावाच्या गावातून चंबळ नदीच्या तीरावर गेलो. प्रचंड ऊन तरीही वारा आल्यावर गारवा वाटत होता. येथेच पलिकडच्या तीरावर एक किल्लाही आहे असं कळलं. या ठिकाणी नदीच्या पात्रातून वाहतूक सुरू होती.
माणसांबरोबरच वाहनं, म्हशीची ने आण :
नदीतून येणार्या प्रवाश्यांकरता वाहतून व्यवस्था तयार आहे. झाडाच्या सावलीत निवांतपणे फेरीबोट किनार्याला लागण्याची वाट पाहणारी वाहनं :
या झाडाच्या सावलीत बसून कोकीळाची साद ऐकत बरोबर आणलेली पुरी-भाजी खाल्ली.
मामी मस्तच ग.
मामी मस्तच ग.
मस्त
मस्त
फोटो आवडले. दुचाकींना परवानगी
फोटो आवडले. दुचाकींना परवानगी आहे असे दिसते.
मस्त फोटो व वर्णन.
मस्त फोटो व वर्णन.
मस्त वर्णन आणि फोटोही. एक
मस्त वर्णन आणि फोटोही.
एक भाप्र : चंबळेला डाकूंचा युनिफॉर्म कुठे मिळतो ?
( गाडीचे फोटो टाकले हे बरं झालं. नाहीतर चालत गेलात का, रस्त्यावरून विमानाने गेलात का अशा शंका कुणी न कुणी विचारल्या असत्याच :))
चंबळेला डाकूंचा युनिफॉर्म
चंबळेला डाकूंचा युनिफॉर्म कुठे मिळतो ?
>>
तुमास्नी हवाय काय?
मामी बॅकसीटवरून? अहो
मामी बॅकसीटवरून? अहो एक्सप्रेसवेवर कसं स्टिअरिंग आपल्या हाती हवं.
मी गेलोय यमुना एक्सप्रेसवेवर मला आवडला. माझा रस्ता खरेतर NH8 / NH79 असतानाही केवळ हौसेखातर मी भर दिल्लीत दुपारच्या भयान ट्रॅफिक मध्ये मागच्या गुरूवारी गाडी घातली न यमुनाला लागलो? का तर केवळ रस्ता कसा आहे पाहण्यासाठी.
रस्त्याबद्दल बोलत आहोतच तर मला नवीन ग्रॅंट ट्रंक ( दिल्ली / हरयाणा / पंजाब) मधील फारच आवडला. तीन तीन रांगा आणि विभाजक. ( आपल्या एक्सप्रेसवे पेक्षा चांगला वाटला)
पण सर्वात आवडला तो गुजरात मधील NE1! ( किंवा अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवे ! ) प्रचंड पावसात मी १४० + ने गाडी नेऊ शकत होतो कारण संपूर्ण NE1 वर इतकी चांगली ड्रेनेज सिस्टिम आहे की कुठेही पावसाचे पाणी साचलेले दिसले नाही. एक्झिट / रेस्ट एरिया वगैरे पण अगदी अमेरिकन धर्तीवर पण खुद्द रस्ता मात्र अमेरिकेन इंटरस्टेट पेक्षा खूप चांगला! )
गेल्या विकेंडला मी ६४७३ किमीचा गाडी प्रवास करून वापस आलो. संपूर्ण भारतभर ( कर्नाटक ते जम्मु अॅण्ड काश्मिर) मुख्य महामार्ग अगदी अमेरिकेच्या तोडीचे होत आहेत हे प्रत्यक्ष बघून आनंद वाटला. (अर्थात तरीही ते पूर्ण बांधलेले नाहीत, मध्येच गायी येऊन बसू शकतात आणि राजस्थान मध्ये गायीच गायी.)
तुमचा नको
तुमचा नको
चंबळेला डाकूंचा युनिफॉर्म
चंबळेला डाकूंचा युनिफॉर्म कुठे मिळतो ? >>>>
गाडीचे फोटो टाकले हे बरं झालं. नाहीतर चालत गेलात का, रस्त्यावरून विमानाने गेलात का अशा शंका कुणी न कुणी विचारल्या असत्याच >>> ते ही परवडलं. पण असा प्रवास करण्यामागची मनोभुमिका काय होती वगैरे रिकामटेकडे प्रश्नही आले असते .....
केदार .. :). चारेक वर्षांपूर्वी मुंबई ते कूर्ग प्रवास केला होता. त्यावेळी कर्नाटकातले रस्तेही अतिशय आवडले होते (मधले मधले काही खराब पॅचेस सोडले तर)
Pages