नुकताच पुन्हा एकदा दिल्ली - आग्रा प्रवासाचा योग आला. यमुना एक्स्प्रेसवे या देखण्या रस्त्यावरून प्रवास करताना मज्जाच येते. या रस्त्यामुळे दिल्ली - आग्रा हा चार तासांचा प्रवास दोन तासात करता येऊ लागला आहे.
तीन पदरी + तीन पदरी, लांबचलांब पसरलेला हा रस्ता, आजूबाजूला मोकळी जागा, शेतं, छोट्या वस्त्या, विटांच्या भट्ट्यांच्या चिमण्या .... हे सगळं नजरेत साठवून घेता घेता प्रवास चुटकीसरसा संपतो.
मध्येच एका टप्प्यावर - ग्रेटर नॉयडामध्ये - लागतं - बुद्धा सर्कीट. फॉर्म्युला वन कारच्या रेसिंगकरता तयार करण्यात आलेला इंटरनॅशनल लेव्हलचा ट्रॅक. आग्र्याहून दिल्लीला परतताना हे रस्त्याच्या डावीकडे दिसतं.
काही वर्षांतच आजूबाजूची मोकळी जागा भरून जाईल. मोठेमोठे रेसिडेंशियल, शॉपिंग कॉप्लेक्स होतील. काहींच्या जाहीराती लागल्याच आहेत. डिस्ने थीमचा एक रेसिडेंशियल कॉप्लेक्स येऊ घातलाय.
आग्र्याच्या आणखी जरा पुढे असलेल्या टुण्डला येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट येणार असल्याची घोषणा केली गेली आहे.
हे होईल तेव्हा होईल आणि होईलच. पण तोवर सध्यातरी हिरव्यागार शेतांना बाजूला घेऊन धावणार्या यमुना एक्स्प्रेस वे ची काढलेली प्रचि तुमच्याबरोबर शेअर करत आहे. काही प्रचि सप्टेंबर २०१२ मधील आहेत तर काही जुलै २०१३ मधील आहेत.
बुद्धा सर्कीट
तुमचा नको >> आमच्याकडे
तुमचा नको >>
आमच्याकडे नाहीच्च्यै.
मामी कूर्गचा वृ देणे प्लीज.
मामी
कूर्गचा वृ देणे प्लीज. जायचं आहे.
वॉव... मस्तच आहे रस्ता गाडी
वॉव... मस्तच आहे रस्ता
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गाडी चालवायलामस्त मज्जा आली असेल
Pages