आंब्याचा केक

Submitted by मानुषी on 15 July, 2008 - 06:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या रवा, १ वाटी साखर, पाऊण वाटी लोणी किंवा तूप , १ वाटी दही, १वाटी दूध, १ वाटी आंब्याचा पल्प्(फ्रेश किंवा कॅनमधला). १चमचा बेकिंग पावडर.
काजू बदाम बेदाणे हे सगळे ड्राय फ्रुट्स थोडे थोडे किंवा ऑप्शनल.

क्रमवार पाककृती: 

एका भांड्यात रवा घ्या. त्यात दही, दूध, साखर, लोणी/तूप सगळे जिन्नस नीट कालवून ठेवा. हे मिश्रण ४/५ तास झाकून ठेवा. ४/५ तासांनी करायच्या वेळी त्यात बेकिंग पावडर व आंब्याचा रस मिक्स करा. ड्राय फ्रुटस घालून चांगले मिक्स करा. ओव्हनच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता. प्रीहीटेड ओव्हनमध्ये १५० ते १८० तापमानाला ४० ते ४५ मिनिटे बेक करा. झाल्यावर सुरी किंवा विणकामाची सुई आत खुपसून पहा. जर स्वच्छ बाहेर आली तर समजा केक झाला.

वाढणी/प्रमाण: 
५/६जणांसाठी.
अधिक टिपा: 

१) याच केक मध्ये तुम्ही खूप व्हेरिएशन्स करू शकता. वरील मिश्रणात आंबा कॅन्सल करून (म्हणजे जर आंबा अव्हेलेबल नसेल तर) वेलदोडा जायफळ पूड घालून सिंपल प्लेन केक करू शकता.
२) आंब्याऐवजी फणसाचा पल्प घालू शकता. फणसाचा हा केक कोकणातल्या सांदण या पदार्थाच्या जवळपास जातो.
३) आंब्याऐवजी अननसाचे तुकडे घालू शकता. पण अननस कच्चा वापरू नये. अननसाच्या बारीक फोडी थोडी साखर घालून मंद गॅसवर एक उकळी काढावी व नंतर या थोड्या शिजलेल्या फोडी व थोडा ३/४ चमचे पाकही तुम्ही घालू शकता. फक्त पाकाच्या प्रमाणात साखर थोडी कमी करावी. थोडा पाइनॅपल एसेन्सही घालावा. हा अननस केक सुद्धा अप्रतीम होतो.
४) मिश्रण झाकून ठेवण्याचा वेळ सीझन प्रमाणे बदलेल.
करून पहा व कळवा.

माहितीचा स्रोत: 
हा बेसिक केक माझी आई निखार्‍यावर करायची. व्हेरिएशन्स माझी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधुरी, छान आहे recipe. पण एक वाटी साखर दोन वाटी रव्याला पुरेल? दही आणि दूधपण आहे म्हणून विचारते.

हो अर्च एवढी साखर पुरते. पण करण्यापूर्वी साखरेची चव घेऊन पहा. मध्यम गोडासाठी १ वाटी पुरते. कमी वाटल्यास साखरेचे प्रमाण १/२ चमच्यांनी वाढवू शकतेस.
करून पहा. हा केक साधारणपणे बिघडत नाही. आणि खूप न्युट्रिशस असतो व एगलेस!.

mmm333 फारच छान आहे. मि दोनदा केला मस्त होतो.

Microwave मध्ये हा केक करता येतो का? माझ्याकडे ओव्हन नाही म्हणुन विचारते आहे. प्लिज नक्कि उत्तर द्या

खुप छान रेसीपी आहे. मी साधा रव्याचा करते. या वेळेस आंबा घालुन नक्की करुन पाहिन.

मंजिरी
मी मायक्रोमध्ये बेकिंग फारसे करत नाही. ओटीजी(साधा ओव्हन) मध्ये सर्व प्रकारचे बेकिंग अत्तम होते. त्यामुळे मायक्रोमध्ये कसा होतो मी सांगू शकत नाही.

अनघा व आरती
प्रतिसादाबद्दल धन्यवाद

मस्तच रेसीपी आहे ही !! पण एक शंका आहे. आंब्याचा पल्प घातल्यावर हे मिश्रण पातळ होते का? हे कितपत घट्ट असावे? मी असा केक कधी केला नाही म्हणुन भा.प्र.

वा...खुप छान.नकी करुन बघेन ....

मला एक विचारायचयं(चुकीच्या ठिकाणी विचारत आहे तरी पण) , इकडे अमेरिकेत हापुस आंबा मिळतो का?कुठे?...या वर्षी इकडे मी घरचा आंबा मिस करत आहे..:अरेरे:

धन्यवाद सीमा Happy मी तिच लिंक द्यायला आले होते.

धन्यवाद....किती इन्स्टंट प्रतिसाद.....तुम्ही तसेच मागवता का, थोडक्यात चांगले असतात ना??

मी काल रात्री केला होता.. अगदी उत्तम झाला. केकचा रंग तर इतका सुरेख दिसतो.. (फोटो काढायचा मात्र राहुन गेला. गरम असतानाच खायला सुरवात केली मुलांनी Happy आणि छानही लागतो गरम गरम).. खुप खुप आभार इतकी मस्त कृती दिल्याबद्दल.

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

सुरेख आहे हा केक. पण फोटो बघायला मिळाला असता तर दुधाची तहान ताकावर तरी भागली असती!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

या केक मधे रवा फाईन सुजी का थोडा जाडसर रवा (उपमा रवा मिळतो तो) वापरायचा. रेसेपी खुप छान वाटते आहे.

ऊनो
कोणताही रवा चालतो. कारण आपण तो २/३ तास भिजवतो त्यामुळे मस्त फुलतो.

बी
कधीतरी हा केक केला तर फोटो टाकीन.

एक शंका आहे, आंब्याचा पल्प घातल्यावर हे मिश्रण पातळ होते का? हे कितपत घट्ट असावे? मी असा केक कधी केला नाही म्हणुन भा.प्र.

मंजिरी हा केक मायक्रोव्हेव मोड वर करायचा असेल, तर मिश्रण काचेच्या बोल मधे (बोल ला तुपाचा हात लावुन) मायक्रो च्या हाय पॉवर वर ३ मि. (१००% वर ३ मि.) आणि ८०% (७५० पॉवर) वर ३ मि. ठेवायचा.
सेटींग करताना मायक्रो---> ९०० पॉवर--->३ मि.--->७५० पॉवर---->३ मि.----> स्टार्ट
अस करायच. हाच केक अंड घालुन करायचा असल्यास १ वाटीला २ अंडी ह्या प्रमाणात करायचा मग दही घालायची गरज नाही आणि झाकुन ठेवायला नको.
व्हेरिएशन म्हणून रवा मैदा मिक्स पण करु शकतो.

हापुस आंब्याचा रस असेल तर मिश्रण पातळ होत नाही. रस पातळ वाटल्यास दुध थोड कमी घालायच. अंड असेल तर दुध कमीच लागत.

एकदम मस्त रेसिपी. आजच केला. प्रमाण अगदी योग्य आहे सगळ्याचं, ममम धन्यवाद Happy
ओव्हन- ओटीजी मध्ये १६० डीग्रीवर ४५ मिनिटे बेक, त्याआधी ३०० डी. वर ५ मिनिटे प्रीहीट.

Image008_1.jpg
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

माधुरी तुझ्या रेसिपीने केक केला होता. छान झाला होता. इथली साखर कमी गोड असते म्हणून दिड कप घातली. अगदी बेताचा गोड झाला होता. मी रत्नाचा मँगो पल्प वापरला. रेसिपीबद्दल थँक्स.

100_0490.jpg

मी पण ह्या कृतिने केक केला, पण माझा शिर्या सारखा लागत होता. काय बर चुकल असेल?
( श्या, दरवेळेस माझा रव्याचा केक शिर्यासारखाच लागतो Sad )

माझा सांदणासारखा झाला Happy पण सांदण म्हणुन खपुन गेला.

केकसारखी चव हवी असेल तर असे करून पहा,
एकदम बारीक रवा घ्यायचा. भाजायचा नाही नी बेकींग सोडा व बेकींग पॉवडर हे अर्धे अर्धे टाकले तर अगदी कळून येत नाही की सेमोलिनाचा(अर्थात रवा) केक आहे. हलका सुद्धा होतो,डेन्स होत नाही. आणि हो सोडा वगैरे अगदी शेवटी टाकायचा. त्याच्यापुढे जर कमर्शियल केकची चव असेल तर नुसते अंड्याचे पांढरे खूप खूप फेटून + वॅनिला ईसेन्स शेवटी फोल्ड करायचे मिश्रणात मग बघा कसा होतो. पण मी नाही अंडे टाकत आमरस टाकून हा केक बिना अंड्याचा मी नेवैद्य म्हणून खपवू शकते. :)(आज की नारी जिंदाबाद) Happy

ह्या केकचं मिश्रण ४/५ तास तसच ठेवुन मग केक करायचा असतो. मिश्रण जरा जास्त वेळ ठेवले तर चालेल का? म्हणजे ८-९ तास? एक प्रोब्लेम आहे. मला शुक्रवारी रात्री केक करायचाय. तर सकाळी ऑफिसला जाताना मिश्रण बनवले व ऑफिसमधुन आल्यावर केक केला तर कसा होइल?

अरे माझ्या प्रश्नाचे कोणीतरी उत्तर द्या रे! किती ठिकाणी विचारु??
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

माधवी, केकचे मिश्रण गुरूवारी रात्री भिजवून शुक्रवारी सकाळी केक करून जा. रात्री मिश्रण जरा कमी आंबेल. तू कुठे आहेस, कल्पना नाही, पण पुण्या/ मुंबईत सध्या प्रचंड उकाडा आहे. दही/दूध घालून दिवसभर ठेवलंस, तर जास्त आंबेल मिश्रण. थंडीच्या दिवसात हा प्रयोग चालेल, सध्या रिस्की आहे. शुक्रवारी सकाळी केक करून, तसाच ओव्हनमध्ये दिवसभर ठेवलास तर चालणार नाही का?
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

धन्यवाद पूनम! Happy
गुरूवारी रात्री भिजवून शुक्रवारी सकाळी केक करून जा >> ही चांगली कल्पना आहे.
मी पुण्यातच आहे. तेच मला कळत नव्हतं कसं करावं ते. रात्री उशिरा भिजवलं नी सकाळी केक केला तरी सहा एक तास होतातच की ग! पण ऑफिस मधुन निघायला उशिर झाला तर जिवाची घालमेल तरी होणार नाही.

-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

रात्री उशिरा मिश्रण भिजवुन सकाळी केक केला. छान झाला. नी एक गंम्मत झाली. दुध तापवले तेव्हा कळले की ते नासले आहे. मग एव्हढ्या रात्री कुठे दुध मिळनार? मग नेसले एव्हरीडे पावडर चे दुध बनवले नी वापरले. मस्त झाला केक.
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

कालच केक करुन पाहिला, मस्त झाला, छान रेसिपीबद्दल धन्यवाद!
एक प्रश्न, माझा केक नेहमी मध्यभागे थोडासा कच्चा राहतो, नीट फुगत नाही, काय कारण असेल्/काय उपाय करता येइल?

Pages