आंब्याचा केक

Submitted by मानुषी on 15 July, 2008 - 06:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या रवा, १ वाटी साखर, पाऊण वाटी लोणी किंवा तूप , १ वाटी दही, १वाटी दूध, १ वाटी आंब्याचा पल्प्(फ्रेश किंवा कॅनमधला). १चमचा बेकिंग पावडर.
काजू बदाम बेदाणे हे सगळे ड्राय फ्रुट्स थोडे थोडे किंवा ऑप्शनल.

क्रमवार पाककृती: 

एका भांड्यात रवा घ्या. त्यात दही, दूध, साखर, लोणी/तूप सगळे जिन्नस नीट कालवून ठेवा. हे मिश्रण ४/५ तास झाकून ठेवा. ४/५ तासांनी करायच्या वेळी त्यात बेकिंग पावडर व आंब्याचा रस मिक्स करा. ड्राय फ्रुटस घालून चांगले मिक्स करा. ओव्हनच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता. प्रीहीटेड ओव्हनमध्ये १५० ते १८० तापमानाला ४० ते ४५ मिनिटे बेक करा. झाल्यावर सुरी किंवा विणकामाची सुई आत खुपसून पहा. जर स्वच्छ बाहेर आली तर समजा केक झाला.

वाढणी/प्रमाण: 
५/६जणांसाठी.
अधिक टिपा: 

१) याच केक मध्ये तुम्ही खूप व्हेरिएशन्स करू शकता. वरील मिश्रणात आंबा कॅन्सल करून (म्हणजे जर आंबा अव्हेलेबल नसेल तर) वेलदोडा जायफळ पूड घालून सिंपल प्लेन केक करू शकता.
२) आंब्याऐवजी फणसाचा पल्प घालू शकता. फणसाचा हा केक कोकणातल्या सांदण या पदार्थाच्या जवळपास जातो.
३) आंब्याऐवजी अननसाचे तुकडे घालू शकता. पण अननस कच्चा वापरू नये. अननसाच्या बारीक फोडी थोडी साखर घालून मंद गॅसवर एक उकळी काढावी व नंतर या थोड्या शिजलेल्या फोडी व थोडा ३/४ चमचे पाकही तुम्ही घालू शकता. फक्त पाकाच्या प्रमाणात साखर थोडी कमी करावी. थोडा पाइनॅपल एसेन्सही घालावा. हा अननस केक सुद्धा अप्रतीम होतो.
४) मिश्रण झाकून ठेवण्याचा वेळ सीझन प्रमाणे बदलेल.
करून पहा व कळवा.

माहितीचा स्रोत: 
हा बेसिक केक माझी आई निखार्‍यावर करायची. व्हेरिएशन्स माझी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान तसेच करायला सोपी अशी रेसिपी... Happy

कृती मधे काहीच बदल केला नाही, फक्त आकार बदलला. मुलीन्ना डब्ब्यात नेण्यासाठी सोईचा म्हणुन (शाळेत देताना नट्स टाकता येणार नाही).
Cup_Cakes_03.jpg

येथे अनेक लहान मुलान्ना विविध (दाणे, अन्डी) प्रकारच्या अ‍ॅलर्जी असतात. शाळेत डब्यात देताना या गोष्टी टाळाव्यात अशा कडक सुचना आहेत.

माझा सुप्पर डुप्पर फसला... काहीही वेगळं केलं नाही पण बहुतेक आंब्याचा रस थोडा गार होता. काहीतरी चिवटसं झालंय.

मी आज हा केक ट्राय करणार आहे. ह्यात रव्याच्या ऐवजी भगर कशी लागेल? चालेल का? चालली तर हा केक उपासाला पण चालेल.
प्लिज कोणी ट्राय केलाय का?

हा केक माझ्याकडे गावीही बर्याच वेळा केलेला आहे. अन्डी नसल्यामुळे सगळेजण खातात. मी विकतचा, साखर खुपच कमी असलेला पल्प वापरते. अप्रतीम चव व रन्ग येतो.

भगर वापरायची असल्यास शिजवुन वापरलेली बरी असे वाटते. रवा भिजतो व मऊ होउन केक मध्ये शिजतो. भगर तशी मऊ होइल असे वाटत नाही.

Pages